Skip to main content

बिग् बॉस

Taxonomy upgrade extras

बिग् बॉस या टीव्हीवर भरपूर टी आर पी कमावणाऱ्या रियालिटी शोला अलिकडे उतरंडीची कळा लागली होती. प्रेक्षकांनी व जाहिरातदारांनी या शोकडे पाठ फिरवली होती. कदाचित आमची माती आमची माणसं याची टी आर पी सुद्धा तुलनेने बरी असू शकेल. सुरुवातीला टीव्ही प्रेक्षकातील आंबटशौकीनांना बिग् बॉसच्या 'त्या बंगल्या'तील चार भिंतींच्या आड नेमके काय घडत आहे याची उत्सुकता होती. एपिसोड एडिटर त्याचा पुरेपूर फायदा घेत प्रेक्षकांची उत्कंठा वाढवत होता. बिग् बॉसला न जुमानता त्याच्याही नजरेआड अनेक गोष्टी घडत असाव्यात. परंतु त्या दाखवल्या जात नाहीत याबद्दल प्रेक्षक नाराज होते.

विवाहसंस्था

Taxonomy upgrade extras

(१) नुकतीच समलिंगी संबंध अाणि समलिंगी विवाह यांवर इथे बरीच चर्चा झाल्यामुळे मला या विषयावर लिहावंसं वाटलं, पण मला जे म्हणायचं अाहे त्याचा समलिंगीपणाशी तसा खास काही संबंध नाही हे पुढे स्पष्ट होईलच.

कटु सत्य

व्रुध्दांनो! क्रोध करणे एकदम बंद करा. कारण राग कोणीही सहन करत नाही.युवकाने आपला क्रोध ' थोडा कमी ' केला तर चालू शकेल; परंतु व्रुध्दाने आपला क्रोध ' थोडा कमी' नाही, तर 'पूर्णच' सोडायला हवा. तारुण्यात क्रोधाला किँमत असते. जो कमावित असतो , घराचा खर्च चालवित असतो त्याचा क्रोध लोक सहन करु शकतात; पण जो काहीही कमवित नाही,केवळ बसुन खात असतो आणि तरीही गुरगुरतो अशा माणसाचा क्रोध कोणीही पसंत करीत नाही. व्रुध्दाची किँमत कुत्र्यासारखी असते. लोक म्हणतात , ' म्हातार्याला तर भुंकण्याची सवय झाली आहे. त्याला भुंकू द्या.'

प्रवास मनाचा...

बऱ्याचदा आपलं मन खूप सैरा-वैरा धावत असतं, त्याच्या वेगावर लगाम लावणे मग जरासं अवघड होऊन जातं...
कधी थेट भविष्यात जाऊन स्वप्नं रंगवतं, तर कधी भूतकाळात जाऊन अडकून बसतं...
खरच मी मनाला "Time Machine" म्हटलो तर मुळीच वावगं ठरणार नाही...

कधी-कधी मग मन आपल्या लहानपणी आपल्याला घेऊन जातं आणि लहानपण दिसताच आपल्या ओठांवर नकळत स्मित हास्य येतं...

कुजबुज

फार फार दिवसान्नी येई
सायसाखरी हाक कापरी
सुरकुतलेत्या मऊ आजीची..
खोल तळाशी कुजबुज होई
गोधडीच्या त्या गडद उबेशी

सायङ्काळी कधी अचानक
आठवणीञ्ची होते दाटी
भरून जाते शब्द निसटता
अश्रुन्नीही व्याकुळ दृष्टी

आजच का हे आठवायचे होते सारे?
दिसावयाचे आजच अन् चेहेरेही परके?
हनु लपविता गच्च उराशी गुडघ्यांवरती
अश्रुञ्चे भित्रेपण त्या अन्धारी सरते .....

युरोपमधे घडतंय काय ?

Taxonomy upgrade extras

युरोपमधल्या जर्मनी आणि फ्रान्स या दोन देशांमधे बदलाचे वारे वहात आहेत. फ्रान्समधे नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमधे सार्कोझी यांच्या पक्षाचा पराभव होऊन सोशालिस्ट विचारसरणीकडे झुकणार्‍या पक्षाला बहुमत मिळालं आणि तिथे आता नवं सरकार आलेलं आहे. जर्मनीमधलं अँजेला मर्कल यांचं सरकार अजून बदललेलं नाही परंतु चार दिवसांपूर्वी North Rhine-Westphalia या प्रांतात झालेल्या निवडणुकांमधे विद्यमान सरकार असलेल्या पक्षाचा दारुण पराभव झालेला आहे.

झॅटमे झिंगा नि दरीयामे खसखस. Updated

काल लेख लिहायला घेतला तेवढ्यात वाघीन आली. तीने डरकाळी फोडून मला कामाला लावले. माझी बॉस नव्हे बॉसीन मॅड्म आहे. तीचे नाव वाघ्मॅडम आहे. आम्ही तीला खाजगीत वाघीन म्हणतो. तीच्या चेहर्‍यावर नेहमी खुनशी भाव असतात. जगात सगळ्यात सुंदर आणि हुश्शार आपणाच आहोत अशा अविर्भावात वाघीन वावरते. ऑफीसमधे सर्वजण तीला चळाचळा कापत असतात. तीच्या चेहर्‍यावर मी ४ वर्षात कघीही प्रेमळ, मैत्रीचे, वास्त्ल्याचे भाव पाहील्याचे स्मरत नाही. तर वाघीनीने डिस्टर्ब केल्यामुळे कालाइवजी आज इथे तुम्हाला एक प्रष्न विचारीत आहे.

कॉकटेल लाउंज : अ डे अ‍ॅट बीच

‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे “अ डे अ‍ॅट बीच”

पार्श्वभूमी:

उन्हाळ्याचा तडाखा वाढतो आहे, मस्त समुद्रकिनार्‍यावर जाऊन पाण्यात डुंबावेसे वाटते आहे. डुंबता डुंबता मध्येच घसा ओले करणे ओघाने येतेच. पण तुम्हाला समुद्रकिनारी जायला जमणार नसेल तर आजचे कॉ़कटेल तुम्हाला समुद्रकिनार्‍याची आभासी सफर घडवून आणेल त्याच्या नुसत्या नावानेच.

मालिबू बेस्ड हे कॉकटेल वाढत्या उन्हाळयावरचा 'उतारा' म्हणून बीच वर न जाताही बीच वर गेल्याचे समाधान देईल. :)

कडू कडू कारले

एक होता _ _ _, गाव त्याचे पार्ले
आवडायचे त्याला, कडू कडू कारले

एकदा त्याने खाल्ले, गोड गोड कारले
आणि त्याचे डोके, फिर फिर फिरले

“आवडे मला कडू, आणि हे काय चारले”
असे म्हटले जिभेने, नि मानगूट त्याचे धरले

कॉफीचे पाकीट त्याने, आणले भलेथोरले
बाटलीभर कॉफी प्यायला, तरी नाही पुरले

कडूशार कोयनेल, होते घरी उरले
बादलीभर प्यायले, तरी नाही पुरले

अंगणात होते पाच, कडुनिंब पेरले
एक अख्खे झाड खाल्ले, तरी नाही पुरले

शेवटी त्याच्या डोक्यात, खरे काय ते शिरले
आणून कडू साखर, तिचे बकाणे भरले

२० मे २०१२ चे कंकणाकृती सूर्यग्रहण

येत्या रविवारी, २० मे २०१२ रोजी होणारे कंकणाकृती सूर्यग्रहण चीन, तैवान, जपान आणि युनायटेड स्टेट्सच्या काही भागांमधून दिसेल. मुख्यतः चीनची दक्षिण किनारपट्टी, उत्तर तैवान, दक्षिण जपान आणि दक्षिण यू.एस.मधून दिसेल. ग्रहण कुठून आणि किती वेळ दिसेल यासाठी गूगल आणि नासाने उपलब्ध करून दिलेला हा नकाशा पहावा. कंकणाकृती ग्रहणाचा पट्टा किंवा चंद्राची antiumbra बरीचशी प्रशांत महासागरातूनच प्रवास करणार आहे. ग्रहण दिसण्याचा सर्वोच्च कालावधी असणारी जागाही प्रशांत महासागरातच आहे.