याच आडनावाच्या एका भारतीय डॉक्टरने माझ्या आईचं बुडाचं हाड मोडलं होतं
नुकतंच हे वाक्य वाचनात आलं.
"याच आडनावाच्या एका भारतीय डॉक्टरने माझ्या आईचं बुडाचं हाड मोडलं होतं त्यावर गेल्या आठवड्यात शस्त्रक्रिया केली."
त्यावर सुनील यांनी म्हटलं की, विरामचिह्नांचा वापर केला नाही तर ते
याच आडनावाच्या एका भारतीय डॉक्टरने माझ्या आईचं बुडाचं हाड मोडलं होतं, त्यावर गेल्या आठवड्यात शस्त्रक्रिया केली.
असे वाचले जाईल!
या लेखाचा उद्देश मौजमजेचा आहे.
१. याच वाक्यातले शब्द तेच ठेवून पण क्रम बदलून आणि विरामचिह्नं वापरून किती वेगवेगळे अर्थ अन्-अर्थ करता येतात? थोडेसे विभक्ती प्रत्यय बदलायलाही हरकत नाही.
- Read more about याच आडनावाच्या एका भारतीय डॉक्टरने माझ्या आईचं बुडाचं हाड मोडलं होतं
- 39 comments
- Log in or register to post comments
- 14889 views
एन्. डी. तिवारींविरूद्धच्या खटल्याच्या निमित्ताने
Taxonomy upgrade extras
डिस्लेमरः पुढील खटल्याची माहिती विविध बातमीपत्रे व आंतरजालावरून उचलली आहे. त्याचे तपशील पटकन सापडले नाहित. तेव्हा तपशीलातली चुभुद्याघ्या. चुका निदर्शनास आणल्यास सुधारल्या जातील
====
"एन. डी तिवारी हे श्री शेखर यांचे वडील आहेत" असा दावा कोर्टात दाखल झाल्याचे सर्वज्ञात आहेच. श्री. शेखर यांनीच तसा दावा केला आहे. हे सिद्ध करण्यासाठी कोर्टाने सर्वप्रथम श्री शेखर यांची आई व त्यांचे पती यांच्या रक्ताच्या नमुन्यांची डीएनए टेस्ट केली. यात सिद्ध झाले की श्रीमती शर्मा या श्री.शेखर याची आई आहेत मात्र श्री. शर्मा (शेखरच्या आईचे पती) त्याचे वडील नाहीत.
- Read more about एन्. डी. तिवारींविरूद्धच्या खटल्याच्या निमित्ताने
- 14 comments
- Log in or register to post comments
- 7341 views
पी. साईनाथ विरुद्ध माँटेकसिंग आलुवालिया
चार दिवसांपूर्वी 'हिंदू' दैनिकात पी. साईनाथ यांचा नेहमीच्या शैलीतला एक लेख आला आहे (The austerity of the affluent). सरकारनं खर्चात कपात केली पाहिजे असं आवाहन २००९मध्ये मनमोहन सिंगांनी केलं होतं त्याचा संदर्भ या लेखाला आहे. दिवसाला २९ रुपये खर्च करणारा शहरी माणूस किंवा २३ रुपये खर्च करणारा ग्रामीण माणूस गरिबीरेषेच्या वर आहे असं नियोजन आयोग मानतो. यात पुष्कळसे गरीब लोक गरिबीरेषेच्या वर राहतात आणि गरिबांसाठीच्या तरतुदींपासून वंचित होतात म्हणून साईनाथ यांचा त्याला आक्षेप असावा.
- Read more about पी. साईनाथ विरुद्ध माँटेकसिंग आलुवालिया
- 25 comments
- Log in or register to post comments
- 16626 views
कंकणाकृती सूर्यग्रहण - मे 2012
नुकत्याच सुर्यग्रहणाचा टेलिस्कोप वापरून काढलेला एक फोटो इथे देतो आहे. फोटो सोलर फिल्टर वापरून घेतला. नंतर फोटोतील ब्राईटनेस आणि टेंपरेचर विंडोज फोटो इडीटरने अॅडजस्ट केले.

चित्र सर्वांना दिसेल अशी आशा आहे. चित्र फार मोठे असल्यास इथे पहावे.
चित्र कसे काढले इ. बद्दल माहिती देण्याचा लवकरच प्रयत्न करतो.
- Read more about कंकणाकृती सूर्यग्रहण - मे 2012
- 20 comments
- Log in or register to post comments
- 21532 views
सोळावं वर्ष...........
शून्यापासून सुरू होऊन अनंतापर्यंत पोचणार्या अंकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.
उदाहरणार्थ --
शून्य - निराकार चैतन्यस्वरूप; एक - आत्मा, जगदात्मा; दोन - ग्रहणे; तीन - त्रिमूर्ती, त्रिवेणी संगम; साडेतीन - मुहूर्त; चार - आश्रम; पाच - तत्त्वे; सहा - रिपु; सात - सप्तपदी; आठ - गंध; नऊ - ग्रह; अकरा - रुद्र; बारा -राशी; तेरा - (अक्षरी) मंत्र; चौदा - विद्या; पंधरा - ??????????
सोळा - ‘सोळावं वरीस धोक्याचं’, ‘तू कितने बरस की? मैं सोलह बरस कीऽऽऽऽ’
असा हा सोळावा अंक आणि सोळावं वर्ष! बालपण आणि तारुण्य ह्यांच्या सीमारेषेवरील एक महत्त्वाचं वर्ष. माणसाच्या आयुष्यात अद्भुतता घेऊन येणारं!
- Read more about सोळावं वर्ष...........
- 7 comments
- Log in or register to post comments
- 6041 views
स्वत:त खोलवर डोकावणारी... ती... एकटी....
"एकम" - मिलिंद बोकील - मौज प्रकाशन....
"एकम" ही ‘मौज - दिवाळी२००४’ च्या अंकात प्रसिध्द झालेली कादंबरी. ही कहाणी आहे देवकीची. देवकी मराठीतील एक प्रथितयश लेखिका. ‘मातृभाषा मराठीतच लिखाण करायचं’ असं तिनं पक्कं ठरवलं आणि त्यानुसार आपला जीवनमार्ग आखला. त्यासाठी तिला आजन्म एकटेपणा स्वीकारावा लागला आणि तिने तो जाणीवपूर्वक स्वीकारलासुध्दा.
- Read more about स्वत:त खोलवर डोकावणारी... ती... एकटी....
- 3 comments
- Log in or register to post comments
- 6190 views
सर्च इंजिन - कसे चालते रे भाऊ ?
एकदा माझ्या मोठ्या मुलाला शाळेत मांसाहारी फुलाबद्दल (व्हिनस फ्लायट्रॅप) माहिती दिली होती पण त्याचे जे फोटो दाखवले ते ब्लॅक अॅन्ड व्हाइट होते. रंगीत फोटोसाठी तो माझ्यामागे लागला होता. त्याला फक्त फोटो बघायचे होते. मग त्याला मी म्हटले गुगल वर शोधुयात ना! गुगलच्या चित्रविभागाला साकडे घालून त्या फुलाची आणि त्यासारख्या दुसर्या फुलांचीही चित्रे त्याला दाखवून गुगलच्या शोध जगताची अलीबाबाची गुहा त्याला उघडून देली. काहीही शोधायचे असल्यास गुगल मध्ये सर्च करून माहिती मिळवता येते, ह्या कल्पनेने तो एकदम खुष झाला.
- Read more about सर्च इंजिन - कसे चालते रे भाऊ ?
- 11 comments
- Log in or register to post comments
- 8623 views
मुंबईचा संत - डॉ. झाकीर नाईक
Taxonomy upgrade extras
मुंबईचे संत डॉ. झाकीर नाइक यांच्याबाबत बरेच ऐकले होते
म्हणून थोडा मागोवा घेतला आणि बरेच विचारधन पदरात पडले.
इस्लामचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी त्यांच्या भाषणाचे निरनिराळ्या ठिकाणी
कार्यक्रम होत असतात.
या कार्यक्रमामधे ते इस्लामबाबत निरनिराळ्या मुद्द्यांच्या आधारे विवेचन करतात.
लोकांच्या शंकांना उत्तरे देतात. कार्यक्रमाला मुस्लिम, गैरमुस्लिमही हजर असतात.
प्रचंड संख्येने हजर असतात.
मुद्दा मांडत असताना झाकीर नाइक कुराण, वेद, बायबल मधील श्लोकांचा अचूक संदर्भ देतात. स्मरणशक्ती अफाट आहे.
अध्याय नं १६ श्लोक नं १९ असे उल्लेख धडाधड येतात.
- Read more about मुंबईचा संत - डॉ. झाकीर नाईक
- 3 comments
- Log in or register to post comments
- 3731 views
पळवाट
या जगात येणा-या प्रत्येकाला (आणि प्रत्येकीलाही अर्थातच) परमेश्वराने एक देणगी दिलेली असते. माझ्याबाबतीत सांगायचे तर माझे दिशांचे ज्ञान अगाध आहे! अगदी आयुष्याची दिशा वगैरे तर सोडूनच द्या, पण ईशान्य मुंबई, दक्षिण मुंबई या भानगडीही मला कळत नाहीत. माहीममधली एखादी इमारत जर मला शिवाजी उद्यानापासून (की मैदान?) माहिती असेल, तर माटुंगा स्थानकापासून आधी मी शिवाजी मैदानापाशी येते आणि माहितीच्या रस्त्याने परत माहीमपर्यंत जाते.
- Read more about पळवाट
- 24 comments
- Log in or register to post comments
- 11372 views
'चित्रबोध' वृत्तांतः पूर्वतयारी
३१ मे ते ३ जून पर्यंत चित्रबोध नावाची कार्यशाळा म्हणा किंवा व्याख्यानमाला म्हणा 'पालकनिती' आणि 'सुदर्शन कलामंच' यांनी संयुक्तरीत्या आयोजित केली असल्याची माहिती ऐसीअक्षरेच्या माहितगार यांनी दिली असल्याचे तुम्ही वाचले असेलच. पालक आणि शिक्षकांसाठी खुल्या असलेल्या या कार्यशाळेत लगोलग नाव नोंदवले व ही नोंदणी काही दिवसांतच भरली व अनेक उत्सुकांना नाईलाजाने नकारघंटा वाजवावी लागल्याचे कळले.
- Read more about 'चित्रबोध' वृत्तांतः पूर्वतयारी
- 22 comments
- Log in or register to post comments
- 19508 views