रा. स्व. संघाच्या हिंदुत्वाचे कवित्व!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना डा. केशव बळीराम हेडगेवारांनी नागपुर येथे १९२५ साली केली. हेडगेवार हे मुलत: सशस्त्र क्रांतीचे समर्थक असले तरे नंतर त्यांच्या लक्षात आले कि या खंडप्राय देशात सशस्त्र क्रांती अशक्यप्राय आहे. बाळासाहेब देवरसांनी आपल्या आत्मचरित्रात लिहुन ठेवले आहे कि हेड्गेवारांनी अनेक तरुणांना भगतसिंगाचा मार्ग चोखाळण्यापासुन परावृत्त केले. रा.स्व. संघ हेडगेवारांच्या काळापर्यंत (१९४०) तरी एक आदर्श संघटना होती असे म्हणता येते. म. गांधींनीही या संघटनेची तारीफ केलेली इतिहासात दिसते. परंतु गोळवलकर गुरुजी १९४० मद्धे सरसंघचालक झाले तसे या संघटनेचे खरे दात दिसु लागले.
- Read more about रा. स्व. संघाच्या हिंदुत्वाचे कवित्व!
- Log in or register to post comments
- 5445 views
कॉकटेल लाउंज : जामुनटीनी
'कॉकटेल लाउंज' मालिकेतील आजचे कॉकटेल आहे "जामुनटीनी”
पार्श्वभूमी:
मागच्या आठवड्यात सुट्टी घेऊन पुण्याला आलो होतो. आल्याआल्या बायकोने मंडईत जायचा फतवा काढला. सगळा असंतोष मनातल्या मनात दाबून टाकून हसर्या चेहर्याने पिशव्या हातात घेऊन गुणी नवरा असल्याचा साक्षात्कार बायकोला करून दिला. (अॅक्चुली ह्याला तोंड दाबून बुक्क्यांचा मार म्हणतात पण असो...)
- Read more about कॉकटेल लाउंज : जामुनटीनी
- 6 comments
- Log in or register to post comments
- 8914 views
वाघाने फोडली डरकाळी...
वाघाने फोडली
डरकाळी
पक्षी उडले
आभाळी
माकड भलते
घाबरले
झाडावर
वरवर चढले
टवकारले
हरणांनी कान
इकडून तिकडे
फिरवली मान
पाण्यामधल्या
मासोळ्या
पाण्यासोबत
थरथरल्या
खाकरला
वाघाने घसा
जंगल झाले
एक ससा
- ग्लोरी
- Read more about वाघाने फोडली डरकाळी...
- 7 comments
- Log in or register to post comments
- 4404 views
चित्रपटातले प्रथम "हट के"
Taxonomy upgrade extras
भारतीय चित्रपटसृष्टीला १०० वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त ऐसी अक्षरेवर झालेला "सोहळा" फार मोठा दिमाखदार नसला तरी आवडला. त्यानिमित्ताने कोणत्या चित्रपटात सर्वप्रथम काही वेगळं झाल्याच्या नोंदी आहेत का हे शोधत होतो. काही सापडले, काही सापडले नाहीत. पण अशी एक संपूर्ण यादी बनवावी असे वाटते. विशेषतः इंटरनेट आणि आय.एम.डी.बी.च्या आधीच्या जमान्यातल्या चित्रपटांची माहिती चार लोकांशी बोलल्याशिवाय जमा होणार नाही.
- Read more about चित्रपटातले प्रथम "हट के"
- 26 comments
- Log in or register to post comments
- 19355 views
विज्ञान-काल्पनिका लेखक रे ब्रॅडबरी यांचे निधन
विज्ञान-काल्पनिका आणि अद्भुतकथांचे विख्यात लेखक रे ब्रॅडबरी यांचे निधन झाले आहे. ते ९१ वर्षांचे होते. आधुनिक तंत्राधिष्ठित जीवनाविषयीच्या काल्पनिका लिहून विज्ञान काल्पनिका या अप्रतिष्ठित साहित्यप्रकाराला साहित्याच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे श्रेय ब्रॅडबरी यांना दिले जाते. 'फॅरनहाइट ४५१'(१९५३), 'मार्शियन क्रॉनिकल्स'(१९५०) यांसारख्या त्यांच्या पुस्तकांनी जगभरातल्या वाचकांना मोहित केले होते.
- Read more about विज्ञान-काल्पनिका लेखक रे ब्रॅडबरी यांचे निधन
- Log in or register to post comments
- 3119 views
भारताचे वाढते आंतरराष्ट्रीय महत्त्व
Taxonomy upgrade extras
सध्या बलाढ्य अमेरिका अस्वस्थ आहे. त्यांना अफगाणिस्तानचे विकतचे दुखणे निस्तरणे कठीण जात आहेच. त्याच वेळी इराण-पाकिस्तान वगैरेंनी त्यांची कोंडी चालवली आहे. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय नियम या नावाखाली जे अमेरिकेने व्यापारी खेळांचे नियम बनविले होते त्याला न जुमानता स्वतःच्या मर्जीने व्यापार करून चीनने जगभरात दबदबा वाढवला आहे. युरोपियन देशांवर अवलंबून असलेल्या आफ्रिकन देशांच्या अंतर्गत घडामोडीत अजिबात लक्ष न घालता केवळ व्यापारी संबंध ठेऊन चीनने तिथे बळकट पाय रोवले आहेत. चीनने दक्षिण अमेरिका खंडातही प्रभाव वाढवण्यास सुरवात केली आहे.
- Read more about भारताचे वाढते आंतरराष्ट्रीय महत्त्व
- 15 comments
- Log in or register to post comments
- 11292 views
‘मीड’ अर्थात ‘माधवी’
कुर्प्यॉस्की नावाची पोलीश मीड (मधापासून बनविलेली वाईन) चाखण्याचा योग परवाच आला. अतिशय मधुर, सामान्यतः डेर्झट वाईन या सदरात मोडणारी आणि मधाचा सुंदर स्वाद असलेली ही वाईन मला खूपच आवडली म्हणून त्याबद्दल थोडेसे.
- Read more about ‘मीड’ अर्थात ‘माधवी’
- 41 comments
- Log in or register to post comments
- 51848 views
समुद्रपक्षी
Richard Bach च्या 'जोनाथन लिंग्विस्टन सी गल ' चे मुक्त/स्वैर रुपांतरः
माहित आहेत मर्यादा,माझ्या मला...पण,
मर्यादा आणि आकांक्षा,प्रमाण आहे व्यस्त
उंच आकाशात भरारी घ्यायची आहे मला मस्त!
कार्वर म्हणतो,
Start where you are,
with what you have
make Something of it
Never be satisfied!
मग मी का नाही जायचं,उंच उंच आकाशात?
माझे दोन चिमुकले पंख,
पेलतील ना हे शिवधनुष्य!
आणि,होईल त्याचंच इंद्रधनुष्य,सप्तरंगी!
कारण,जोडीला माझी जिद्द आहे,
आहे आकांक्षा आणि माझी इच्छाशक्ती,
माझी मनोदेवता,माझा आतला आवाज!
नाही मला मान्य,
- Read more about समुद्रपक्षी
- 8 comments
- Log in or register to post comments
- 6130 views
...पाऊसगाणे...
धरतीची आस
होउनी उदास
अंतरी भकास
प्रार्थिते देवास
हजार डोळे
आभाळास पहाती
निष्प्राण होउनी
केविलवाणे होती
आस ती मनास
गावे पाऊसगाणे
मनांत रोजचेच
पाण्याचे रडगाणे
मना लागलीसे
धरतीची ओढ
कोसळे आभाळ
पाऊस होऊन
- Read more about ...पाऊसगाणे...
- Log in or register to post comments
- 2117 views
पाणी घेऊन आलेत ढग
पाणी घेऊन आलेत ढग
आता पाऊस येईल बघ
वार्यावरती होउन स्वार
धूळ घेईल गिरक्या फार
आभाळ करेल धडालधूम
वीज करेल झगमग झगमग
आता पाऊस येईल बघ
कोकीळ घेईल लंबी तान
नाचेल मोर छान छान
बेडूक करेल डराव डराव
मजाच मजा येईल मग
आता पाऊस येईल बघ
हिरवे हिरवे होईल ऊन
वारा गाईल हिरवी धून
मातिला येईल हिरवा पूर
हिरवे होईल सारे जग
आता पाऊस येईल बघ
- ग्लोरी
- Read more about पाणी घेऊन आलेत ढग
- 8 comments
- Log in or register to post comments
- 5599 views