स्वप्न
वस्त्र ढगांचे धुवून सागरी वाळत घालीन व्योमी
धग सूर्याची इस्त्रीसाठी येईल माझ्या कामी
कधि चंद्राचा घेउनी चेंडू खेळत बसेन गगनी
चांदणमेवा थोडा थोडा खाईन अधुनी मधुनी
प्रकाशवर्षांचे अंतर मी तोडिन प्रकाश वेगे
अंतरिक्ष लंघून संपता कशास येईन मागे?
सांग स्वप्न हे माझे कधितरी येईल का सत्यात?
ठाऊक नाही ? - रात्रंदिन मग झोपून पाहीन वाट
प्रतिक्रिया
छान आहे कविता
छान आहे कविता
*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||
कविता छानच,
पण 'छोट्यांसाठी' असेल तर ती फारतर जे १९८०-२००० मध्ये 'छोटे' होते त्यांच्यासाठी आहे.
तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.
मला कविता फार आवडली. एकदम
मला कविता फार आवडली. एकदम कलाटणीच दिलीत.
मनीषा, १४टॅन,..शुचि
धन्यवाद.
समुद्रावर्
वस्त्र ढगांचे धुवून सागरी वाळत घालीन
ह्यावरुन जुनी आठवण झाली. माझ्या एका भाचीने समुद्र कधीच पाहिला नव्हता. लहान असताना ती स्वत: गोष्टी रचून सांगायची, त्यांत एक नेहमीची गोष्ट म्हणजे,
एक बाई एकदा समुद्रावर धुणं धुवायला गेली होती.
आम्ही मुंबईकर या वाक्याला भरपूर हंसायचो.
छान कविता. लहानपणी मंगळावर
छान कविता. लहानपणी मंगळावर जायची स्वप्ने पाहिलेली त्याची आठवण झाली. यत्ता पहिलीत असताना विचार केला की चौथी संपल्यावर जाऊ. चौथी संपल्यावर कळाले की आत्ता तरी कै होत नै मग म्हटले दहावीनंतर जाऊ. मग लक्षात आले की काही होणे नाही.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
कविता मस्त..
कविता मस्त..
ह्यावरून तो मुपीवरचा महाप्रसिद्ध लेख आठवला..
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
छोट्यांसाठी लिहिणं कठीण असतं.
छोट्यांसाठी लिहिणं कठीण असतं.
व्योमीला सोपे करायला हवे.
मजेदार.
बॅटमॅन, पुंबा, अचरट
धन्यवाद. पुंबा, मुपीवरचा महाप्रसिद्ध लेख? लिंक देता?
बालकवींची कविता वाचून न आवरता
बालकवींची कविता वाचून न आवरता आलेली काव्यवेणा इथे कविताबालक म्हणून प्रकट झाली आहे असे म्हणावे काय ?
गर्दीतला दर्दी
छान आहे
वेगळीच कल्पनाशक्ती!
माझ्या ब्लॉगला जरूर भेट द्या-निमिश्किल
https://nimishexpress.blogspot.com/