रात्रीला पंख फुटले
रात्रीला पंख फुटले
अन ती गेली उडून
दिवस बिचारा काम करून
गेला थकून भागून
शोधू कुठं अन जाऊ तरी कसं ?
हि अर्धवट नोकरी सोडून
विचार करुनी वेडा झाला
मग्न गेला बुडून
वैनतेया सांगे विनवून
कामिनीस आण शोधून
खगराज चहू भ्रमण करुनि
आला निरोप घेऊन
गरोदर आहे यामिनी
सांगे तात बनलात आपण
गळून पार अर्धा झाला
जमीन गेली सरकून
कोण देईल सुट्टी मजला ?
कोण ठेवेल धरती झाकून ?
उडणारा बोजवारा आठवून
हात पाय गेले गळून
शिस्तीत नोकरी केली असती
तर नसते लागले माझे
नको तिकडे ध्यान दिले
आता उचला दोघांचेहि ओझे
{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}
प्रतिक्रिया
हाहाहा आणि कोण पोर होणार
हाहाहा आणि कोण पोर होणार म्हणे रजनीला/निशेला/यामिनीला?
अरे हां रात्रीच्या गर्भात
अरे हां रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उष:काल
कळलं कळलं
गरुडासाठी, वैनतेय हा शब्द
गरुडासाठी, वैनतेय हा शब्द वापरल्याबद्दल धन्यवाद.
धन्यवाद शुचितै आणि अर्थ बरोबर
धन्यवाद शुचितै आणि अर्थ बरोबर घेतलात .. मानलं तुम्हाला