करोनाव्हायरस नेमका किती धोकादायक आहे?

करोनाव्हायरस नेमका किती धोकादायक आहे? अजूनही हे निश्चितपणे सांगता येत नाही
- उपलब्ध माहितीचा अन्वयार्थ अन्य प्रकारे करायला वाव आहे.
-----------------
अनुवादकाची टीप: ‘द स्पेक्टेटर’, यू.के.च्या ताज्या अंकातील डॉ. जॉन ली यांच्या लेखाचा हा अनुवाद आहे. डॉ. ली पॅथॉलॉजी विषयातील निवृत्त प्राध्यापक, आणि माजी एन.एच.एस. कन्सल्टंट आहेत. या लेखातील विचार ‘बरोबर’ की ‘चूक’ अशा कप्प्यात बसविता येण्यासारखे नाहीत. तथापि, या समस्येची दुसरी बाजू ते दाखवितात. यामुळे, या विषाणूबद्दल वाटणारी भीती जरी थोडी कमी झाली, तरी पुरेसे आहे. याचा अर्थ सर्वसाधारणपणे घ्यावयाची काळजी आणि सरकारी बंधने धुडकावून लावायला हरकत नाही असे अजिबात नाही.

-------------

Illustration from the Spectator

वैयक्तिक स्वातंत्र्यावर सध्या घातली गेलेली बंधने, इंग्लंडच्या इतिहासातील सर्वात कडक आणि दूरगामी परिणाम करणारी आहेत. असे करण्यात पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी मिळालेला वैज्ञानिक सल्ला काटेकोरपणे पाळला, असेच म्हणावे लागेल. सरकारच्या सल्लागारांमध्ये एकमत होते, आणि ही मंडळी विवेकाने त्यांचं काम करत असावीत असं आपण म्हणू. दिवसागणिक वाढत जाणारी रुग्णांची संख्या लक्षात घेता, कुठल्याही नेत्याने अशीच पाऊले उचलली असती.

पण गेल्या काही आठवड्यांमध्ये अभावानेच दिसून आलेले काही वेगळे दृष्टीकोन मी इथे मांडू इच्छितो. उपलब्ध आकडेवारीचा वेगळ्यापद्धतीने अर्थ निघू शकतो. आयुष्याचा बराचसा काळ मी आरोग्यसेवा आणि विज्ञान शाखांमध्ये घालविलेला आहे. या शाखांमध्ये निःसंदिग्धतेपेक्षा अनेक शंका आणि संदिग्धताच जास्त दिसून येते. सध्याच्या उपलब्ध माहितीचा वेगळा अर्थ निघू शकत असेल, आणि तो अर्थ जर सत्याच्या अधिक जवळ नेणारा असेल, तर त्यानुसार कार्यवाही विषयीचे निष्कर्ष बदलतील.

आपण एका अतिशय जीवघेण्या आजाराविषयी चर्चा करतोय का, हे ठरविण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे मृत्यू दर (death rates) पाहणे. एखाद्या आठवड्यात किंवा महिन्यात एरवी जितके लोक मरण पावतात, त्यापेक्षा सध्या जास्त लोक मृत्युमुखी पडत आहेत का? संख्याशास्त्रीयदृष्ट्या, ब्रिटनमध्ये या महिन्यात सुमारे ५१,००० मृत्यू अपेक्षित आहेत. हा लेख लिहितांना ४२२ मृत्यू कोव्हिड-१९ शी जोडले गेले आहेत, म्हणजेच एकूण मृत्यूंच्या ०.८%. जागतिक पातळीवर जानेवारी ते मार्च दरम्यान १.४ कोटी मृत्यू अपेक्षित आहेत. जगात आजपर्यंत १८,९४४ मृत्यू कोव्हिड-१९ शी जोडले गेले आहेत, म्हणजेच एकूण मृत्यूंच्या ०.१४%. या संख्येत वाढ होऊ शकते, पण तूर्तास, फ्लू सारख्या अन्य संसर्गजन्य रोगांच्या मानाने हा मृत्यू दर कमीच आहे. जागतिक स्तरावर आकाश-पाताळ एक करणाऱ्या प्रतिक्रिया व्यक्त व्हाव्यात, अशी ही आकडेवारी नाही.

चीन आणि इटलीमधून आलेल्या सुरवातीच्या आकड्यांवरून मृत्युदर ५ ते १५%, म्हणजेच स्पॅनिश फ्लूच्या जवळपासातला होता. ज्या प्रमाणात रुग्णांची संख्या ‘एक्स्पोनेंशियली’ वाढत गेली त्यावरून अशी शक्यता वर्तविली गेली, की जगातली कोणतीही आरोग्यसेवा एवढा रुग्णभार सहन करू शकणार नाही. ही परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठीच सध्याच्या उपायांचे समर्थन केले जात आहे. १९१८ ते १९२० च्या दरम्यान जगातल्या एकचतुर्थांश लोकांना स्पॅनिश फ्लूची बाधा झाली; ५० कोटी बाधित लोकांमध्ये ५ कोटी मृत्युमुखी पडले. अशी परिस्थिती पुन्हा उद्भवली तर तयारी असावी म्हणून आपण आपत्कालीन योजना आखल्या.

हा लेख लिहीत असतांना इंग्लंडमध्ये ८०७७ बाधित व्यक्तींमध्ये ४२२ मृत्यू, म्हणजे ५% मृत्युदर असे वरकरणी वाटेल. ‘हा दर फ्लूच्या ०.१%च्या पुढे खूपच जास्त आहे’, म्हणून परिस्थिती गंभीर आहे असे म्हटले जाते. पण खरोखरच या दोन आजारांच्या आकडेवारीची तुलना होऊ शकते का, हे पाहणे गरजेचे आहे.

इंग्लंडमध्ये कोव्हिड-१९ च्या ज्या चाचण्या केल्या गेल्या, त्या बहुतांशी रुग्णालयांमध्ये केल्या गेल्या, जिथे रुग्ण कोणत्याही संसर्गाने सहज बाधित होऊ शकतात. रुग्णांसोबत काम केलेल्या कोणालाही हे ठाऊक असतं की कोणतेही टेस्टिंग रुग्णालयापुरतं मर्यादित असलं, तर एखाद्या इन्फेक्शनच्या तीव्रतेचे ‘ओव्हरएस्टीमेट’ आपोआप होते. शिवाय, आपण अशा कोव्हिड-१९ केसेस बद्दल बोलतोय, ज्या टेस्टिंग करून घेण्याइतपत आजारी किंवा ते चिंताक्रांत लोक आहेत. कोणतीही लक्षणे नसलेले किंवा अत्यल्प लक्षणे असलेले अनेक लोक असतील, ज्यांना व्हायरसची बाधा झाली आहे, पण याची त्यांना कल्पनाही नसेल.

म्हणूनच जेव्हा ब्रिटनमध्ये ५९० केसेसचे निदान झाले होते, तेव्हा सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार, सर पॅट्रिक व्हॅलान्स म्हणाले की बाधित लोकांची खरी संख्या कदाचित ५,००० ते १०,००० च्या दरम्यान संभवते; म्हणजे पॉझिटिव्ह केसेसच्या १० ते २० पट अधिक. त्यांचे हे म्हणणे बरोबर असेल, तर त्याचा अर्थ असा की, या व्हायरसमुळे असणारा मृत्यूदर दिसतोय त्यापेक्षा १० ते २० पट कमी, म्हणजे सुमारे ०.२५ ते ०.५% इतकाच असेल. असे असेल तर कोव्हिड-१९ आणि स्पॅनिश फ्लू साधारण तितकेच घातक आहेत असा अर्थ होतो.

इथे आणखी एक गंभीर समस्या असू शकते: मृत्यूचे कारण ज्याप्रकारे नोंदविले जाते. यूके मध्ये श्वसनसंस्थेच्या इन्फेक्शनमुळे जर कोणाचा मृत्यू झाला, तर त्या इन्फेक्शनचे विशिष्ट कारण लक्षात घेतले जात नाही, किंवा नोंदविले जात नाही फक्त ‘नोटीफाएबल’ आजार असेल, तरच त्याचा तसा उल्लेख केला जातो. त्यामुळे या सदरातले बहुतांशी मृत्यू, ब्रॉन्कोन्युमोनिया, न्युमोनिया, वृद्धत्व, किंवा तत्सम सदरात नोदाविले जातात. फ्लू, किंवा अन्य सीझनल इन्फेक्शन साठी तपासण्या केल्या जात नाहीत. एखाद्या रुग्णाला मोटरन्यूरॉन डिसीज किंवा कर्करोगासारखा गंभीर आजार असेल, तर तो मूळ रोगच ‘मृत्यूचे कारण’ म्हणून नोंदविला जातो – जरी अशा रुग्णाला शेवटी श्वसनसंस्थेचे इन्फेक्शन झालं असलं तरी. म्हणजेच काय, तर यू.के.मध्ये डेथ सर्टिफिकेट्स मध्ये ‘मृत्यूचे कारण’ म्हणून श्वसनसंस्थेच्या इन्फेक्शन्सचे ‘अंडर-रिपोर्टिंग’ होतं.

कोव्हिड-१९ च्या आगमनानंतर काय घडलंय ते पाहूयात. ज्या ‘नोटीफाएबल डिसीजेस’ च्या यादीत हद्दपार झालेल्या ‘देवी’ रोगाचे किंवा प्लेग, रेबीज, ब्रुसेलोसिस सारख्या रोगांची (जे रोग ब्रिटिश डॉक्टर्स आपल्या उभ्या आयुष्यात कधी पाहणारही नाहीत) नावं आहेत, त्यात आता नव्याने कोव्हिड-१९ चा समावेश केला गेला आहे....पण फ्लू चा नाही. म्हणजे आता प्रत्येक कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह रुग्णाची अधिकृत नोंद होईल. हे ‘भाग्य’ फ्लू किंवा अन्य श्वसनसंस्थेच्या इन्फेक्शन्सच्या नशिबी नाही!

सद्य:स्थितीत प्रत्येक कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह रुग्ण त्याच्या डॉक्टर्स आणि नर्सेसना माहीत असणार आहे, आणि असा रुग्ण जर दगावला, तर त्याच्या मृत्यूचं कारण कोव्हिड-१९ असंच नोंदविलं जाणार आहे. ‘कोव्हिड-१९ मुळे झालेला मृत्यू’ आणि अन्य कारणांमुळे मृत्यू झालेल्या रुग्णात कोव्हिड-१९ आढळून येणे, या दोन्हींमध्ये खूप फरक आहे. कोव्हिड-१९ ‘नोटिफाएबल’ केल्याने हा आजार जास्त मृत्यूंना कारणीभूत ठरत आहे, असा भास होऊ शकतो; हे खरं असलं नसलं तरी. याच कारणामुळे हा आजार फ्लूपेक्षा जास्त जीवघेणा आहे, असाही भास होऊ शकतो – केवळ मृत्यूचे कारण कसं नोंदविलं जातं यामुळे.

आपण कोव्हिड-१९ चा प्रसार रोखण्यासाठी कडक उपाय योजले तर या आजारामुळे होणारे मृत्यू कमी होतील हे ओघाने आले. पण जो आजार मुळातच तितकासा भयानक नव्हता, त्याचं संकट आपण टाळू शकलो, अशी आपली खातरी होण्याचा इथे धोका आहे. कोव्हिड-१९ ची डेथ सर्टिफिकेट वर नोंद करण्याच्या या पद्धतीमुळे आपल्याला दिसून येतंय की मरण पावलेल्या बहुसंख्य रुग्णांना काहीतरी अन्य आजार अगोदरपासून होता (अंडरलाइंग कंडिशन). अशा रुग्णांना अन्य सीझनल व्हायरसेसचीही लागण झालेली असू शकते. पण हे आपल्याला समजत नाही कारण या व्हायरसेसचा ‘मृत्यूचे कारण’ म्हणून उल्लेख करायची पद्धत नाही.

कोव्हिड-१९ ची आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंची एक्स्पोनेन्शियल वाढ भयानक भासू शकते. पण आपण फ्लू किंवा अन्य सीझनल व्हायरसेसचा आलेख काढला तर तोही असाच भयानक वाटेल. त्यांच्या बाबतीतही काही देश इतरांच्या मानाने बऱ्या स्थितीत, तर काहींमध्ये उच्च मृत्युदर आहे, असं आढळून येईल. अमेरिकेतले ‘सेन्टर्स फॉर डिसीज कंट्रोल’ फ्लूच्या केसेसचा साप्ताहिक अंदाज प्रकाशित करत. ताज्या आकडेवारीनुसार, सप्टेंबरपासून ३.८ कोटी अमेरिकन लोकांना फ्लूची बाधा झाली, ३,९०,००० जणांना रुग्णालयात दाखल करावं लागलं, तर २३,००० जण मरण पावले. पण या आकडेवारीमुळे कोणीही भयभीत होत नाही, कारण फ्लू सर्वपरिचित आहे.

---

कोव्हिड -१९ बद्दलच्या आकडेवारीत देशादेशांमध्ये भरपूर तफावत आहे. हा लेख लिहितांना इटलीत ६९,१७६ केसेस (६८२० मृत्यू, म्हणजे ९.९% मृत्युदर) आहेत, तर जर्मनीत ३२,९८६ केसेस (१५७ मृत्यू, म्हणजे ०.५% मृत्युदर) आहेत. या दोन देशांत आढळून येणारा व्हायरस खरंच इतका वेगळा आहे, की जणू भिन्न आजारच म्हणावेत? की मृत्यूदरात वीसपट फरक असण्याइतके इटलीतले लोक कमकुवत आहेत? असं जर नसेल, तर आपल्याला जी आकडेवारी दिसते आहे, ती सरळसरळ तुलना करता येण्यासारखी नसेल, असे म्हणायला वाव आहे.

इतर देशांचे कोव्हिड-१९ निगडीत मृत्युदर पाहूयात: स्पेन ७.१%, अमेरिका १.३%, स्वित्झर्लंड १.३%, फ्रान्स ४.३%, दक्षिण कोरिया १.३%, आणि इराण ७.८%. इथे आपण सफरचंदांची तुलना संत्र्यांशी तर करत नाहीयोत ना?

आईसलंड (जिथे टेस्टिंग ची सुविधा अतिशय व्यवस्थित आहे) मधून आलेल्या प्राथमिक माहितीवरून असं दिसतं, की बाधा झालेल्या जवळजवळ ५०% लोकांमध्ये इन्फेक्शनची कोणतीही लक्षणे आढळत नाहीत. उरलेल्या बहुतेकांमध्येही ती किरकोळ स्वरुपाची असतात. तिथे ६४८ केसेस आणि २ मृत्यू, म्हणजे ०.३% मृत्यूदर आहे. जगभर जसजशी अधिकाधिक लोकांची चाचणी केली जाईल, तसे तसे अत्यल्प किंवा काहीच लक्षणं नसलेल्यांची संख्याही वाढत जाईल. जसजशी एखादी साथ प्रस्थापित होत जाते, तसतशी इन्फेक्शन्ची तीव्रता कमी कमी होत जाते.

मृत्यू ही अशी गोष्ट आहे, की ज्याबद्दल दुमत असू शकत नाही. एखाद्या नव्याने उद्भवलेल्या इन्फेक्शन मुळे जर लोक जास्त प्रमाणात मरत असतील, तर त्या लोकसमुहाचा मृत्यू दर वाढेल. पण अद्याप तरी, जगात कुठेही मृत्युदर वाढल्याची आकडेवारी पुढे आलेली नाही.

काही रुग्णांमध्ये (विशेषतः धूम्रपान करणारे, आणि ज्यांना श्वसनसंस्थेशी निगडीत अन्य एखादा विकार आहे) कोव्हिड-१९ मुळे श्वसनसंस्थेवर गंभीर स्वरूपाचे परिणाम दिसून येतात हे निर्विवाद सत्य आहे. वृद्ध लोकांना इतर इन्फेक्शन्स होण्याचा जसा जास्त धोका असतो, तसाच त्यांना कोव्हिड-१९ चा ही असतो. इटलीत कोव्हिड-१९ मुळे मृत्यू पावणार्यांचे सरासरी वय ७८.५ वर्षे आहे. दहातले नऊ मृत्यू सत्तरी ओलांडलेल्यांमध्ये आहेत. सर्व गोष्टी समान असतील तर इटलीचे आयुर्मान ८२.५ वर्षे आहे. पण एखाद्या नवीन व्हायरसचं आगमन होतं, तेव्हा सर्व गोष्टी समान नसतात.

सध्यातरी काही प्रमाणात ‘सोशल डिस्टन्सिग’ आणखी काही काळ चालू ठेवणं शहाणपणाचं ठरणार आहे; विशेषतः वृद्ध लोक आणि ज्यांची प्रतिकारशक्ती काही कारणांनी कमकुवत झालेली आहे, असे. पण जेव्हा टोकाचे उपाय सुचविले जातात, तेव्हा त्यामागे ठोस पुरावा असायला हवा. कोव्हिड-१९ च्या बाबतीत तसा उपलब्ध नाहीये. यू.के.चा लॉकडाउन ‘काय होऊ शकेल’ अशा मॉडेलिंग वर आधारित आहे. अशा मॉडेल्सविषयी अधिक माहिती असणे गरजेचे आहे. त्यांमध्ये वय, अगोदरच असलेले आजार, व्हायरसचा बदलता ‘व्हिरुलन्स’ (ताकद म्हणूयात), डेथ सर्टिफिकेटवर लिहिली जाणारी करणं, वगैरे गोष्टींचा विचार केला गेलाय का? यातलं कुठलंही गृहीतक जराही इकडचं तिकडे केलं, तरी संभाव्य मृत्यूदरात भरपूर फरक पडू शकतो.

याअगोदर कुठल्याही व्हायरसवर मानवाने इतकं लक्ष केंद्रित केलं नव्हतं. कदाचित कोव्हिड-१९ ला आपण दिलेला प्रतिसाद यामुळेच असेल. इटलीतील रुग्णालयांमधली दृश्ये धक्कादायक आहेत, पण टेलिव्हिजन म्हणजे विज्ञान नव्हे.

विविध लॉकडाउन मुळे कोव्हिड-१९ चा प्रसार मंदावेल, आणि रुग्णांची संख्या कमी होईल. लॉकडाउन शिथिल केले की ती संख्या परत वाढेल. पण यामुळे लॉकडाउन चालू ठेवण्याचं काही कारण नाही. एखादा अतिजहाल व्हायरस असता तर गोष्ट वेगळी होती. म्हणूनच आपण माहिती (डेटा) काय पद्धतीने संकलित करतो ते खूप महत्त्वाचं आहे. या व्हायरस मुळेच मृत्यू झाला का (की मृत्यू अन्य कारणामुळे झाला, आणि त्या रुग्णामध्ये हा व्हायरस केवळ सापडला), हे ठरविण्याचे निकष अधिक काटेकोर करायला हवेत. नाहीतर या व्हायरसच्या नावाखाली नोंदल्या गेलेल्या मृत्यूंची संख्या जास्त असल्याचं भासेल; वस्तुस्थिती तशी नसली तरी. मग पुढे? संभाव्य धोक्यापासून लोकांचा बचाव करण्याच्या नादात लोकांच्या नोकऱ्या, आयुष्याचा ‘पर्पज’, त्यांचा निवांतपणा हिरावून घेण्याचे दूरगामी परिणाम आपण कसे मोजणार? कोणता मार्ग स्वीकारण्यात कमीतकमी अपाय संभवतो?

इथे माणसांचे जीव विरुद्ध पैसा असा वाद, किंवा नैतिक मुद्दा नाहीये. आपण आत्ता जे करतोय, त्याचे दूरगामी परिणाम नेमके काय होतात ते तपासून बघायला महिने काय, वर्षे जातील. कदाचित ते आपल्याला कधीच नीट कळणार नाहीत. शालेय शिक्षणाची दैना, वाढीव आत्महत्या, वाढीव मनोरुग्ण, इतर आजारांसाठी (ज्यांचा आपण समर्थपणे सामना करत आहोत) असलेली संसाधने कोव्हिड-१९ कडे वळविणे...असे अनेक प्रश्न समोर येतात. आता ज्यांना वैद्यकीय मदतीची गरज आहे, असे अनेक लोक कदाचित डॉक्टर्सकडे जाणारच नाहीत, किंवा कदाचित या आजारासामोर त्यांच्याकडे लक्षच दिलं जाणार नाही. शेतीउत्पादनांचे काय? जागतिक अर्थव्यवस्थेचं काय? या गोष्टींचा सर्व वयोगटातील लोकांवर, विशेषतः विकसनशील देशांवर जो दीर्घकाळ परिणाम होईल, त्याचं काय? या सर्वाची मोजदाद शक्य आहे का?

‘आम्ही विज्ञानाला अनुसरून वागतोय’ असं सर्व देशांची सरकारं सांगत आहेत. यू.के. च्या सरकारच्या धोरणांबाबतीत आपण त्यांना दोष देऊ शकत नाही. त्यांना मिळालेल्या वैज्ञानिक सल्ल्यानुसारच ते जबाबदारीने वागण्याचा प्रयत्न करत आहेत. पण सर्व सरकारांनी लक्षात घ्यायला हवं, की घाईघाईने सादर झालेलं विज्ञान बहुतेक वेळा निम्न दर्जाचं असतं. पुरेसा ठोस पुरावा नसतांना, त्यामागच्या विज्ञानाची पुरेशी चिकित्सा न करताच आपण फार मोठे निर्णय घेतले आहेत.

येणाऱ्या दिवसांत, महिन्यांत, कोव्हिड-१९ संबंधी जी जी माहिती, पुरावे पुढे येतील, त्यांचा विचार भावना बाजूला ठेऊन, आणि खऱ्या टीकाकाराच्या नजरेतून आपण करायला हवा. सर्वात महत्वाचं म्हणजे आपण आपलं मन खुलं ठेवलं पाहिजे – काय आहे ते पाहिलं पाहिजे, ‘काय असेल’ अशा भीतीने कलुषित झालेल्या गोष्टींकडे नाही.

---
अनुवाद: डॉ. अजेय हर्डीकर
(अनुवादक पुण्यातील एका नामवंत वाहननिर्मिती कंपनीतून वैद्यकीय अधिकारी पदावरून नुकतेच निवृत्त झाले आहेत.)
निवेदन : सद्यस्थितीविषयी जनप्रबोधन करण्यासाठी हा अनुवाद केला आहे . प्रताधिकार उल्लंघन करण्याचा व्यावसायिक अथवा अन्य हेतू नाही.

Copyright rests with The Spectator (1828) Ltd. This translation and the image accompanying it are provided on a not-for-profit basis and only meant for educational purposes. Neither Aisi Akshare nor the translator stand to gain anything on a commercial basis by this.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

गाईगुरांना होऊ लागला की मेलोच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला. भाषांतर करून घेण्याबद्दल आभार.

बाकी सविस्तर प्रतिसाद हाफिसाची वेळ संपल्यावर, संध्याकाळी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सर्व व्यवहार बंद ठेवून होणारे नुकसान आणि विषाणू चा प्रकोप होवून होणारे नुकसान ह्या मध्ये तुलना करायचा प्रयत्न आहे पण तसा सरळ युक्ती वाद न करता आड मार्गाने तेच सुचवायचे आहे.
एक तर ह्या विषाणू ची ओळख जेव्हा पासून झाली तेव्हा पासून त्या विषाणू च मानवी शरीरावर होणारे परिणाम ह्या वर खूप उलट सुलट दावे केले गेले आहेत .
त्या मुळे गोंधळाची स्थिती आहे.
हा विषाणू नवीन आहे त्याची ओळख अजुन पूर्ण पटवता आली नाही अशा अवस्थेत रोज नव नवीन माहिती प्रसारित करण्याची गरज नव्हती.
१) हा विषाणू मानव निर्मित आहे चीन नी कारस्थान करून पसरवला आहे(सत्य असत्य अजुन सुद्धा माहीत नाही)
२) हा विषाणू वटवाघूळ मधून माणसात आला की आणि कोणत्या प्राण्यां मधून आला की निसर्ग निर्मित आहे ह्यांची कोणतीच ठोस कारण माहीत नसताना त्या वर प्रसार माध्यमांनी आणि संशोधकांनी मत व्यक्त करणे.
३) ह्या विषाणू पासून होणाऱ्या रोगाची लक्षणे नक्की कोणती आहेत ह्या विषयी सुद्धा ठाम न राहता रोज नवीन लक्षण सांगणे.
आणि सांगितलेली लक्षण एवढी कॉमन आहेत की किती तरी लोकात किती तरी वर्षा पासून आहेत.
४) हा विषाणू पसरतो कसा हे आपण समजतो ते खात्री नी सत्य आहे असे सुद्धा नाही.
५) आता तर नवीनच दावा वाचला मी की हा विषाणू मानवी शरीरात खूप वर्षा पासून आहे फक्त आता तो उत्क्रांत झाल्या मुळे रोग निर्माण करत आहे आणि हे खरे असेल तर lockdown la kahi arthch rahat nahi.
Ha ek bhag झाला.

दुसरा भाग
१) lockdown जास्त दिवस चालू ठेवले तर तीव्र आर्थिक मंदी येईल.
२) शेती पासून सर्व उद्योग धंदे बंद पडतील आणि जगावर उपास मारीची वेळ येईल.
३)आणि त्यातून सावरणे खूप कठीण होवून जाईल भूक बळी पडतील आणि त्यांची संख्या रोगांनी मरणाऱ्या संख्ये पेक्षा कमी नसेल.
Lock down ha तात्पुरता उपाय आहे .
मृत्यू दर खूपच कमी असेल तर उपचारांवर सर्व ताकत लावून जगातील सर्व व्यवहार चालू ठेवणे हाच मार्ग योग्य आहे..
फक्त ह्या मधून एक चांगले घडले.
ओझोन च थर सुधारला.
प्रदुषण हवेचे नष्ट झाले .
हवेतील कोण कोणते प्रदूषणकारी घटक नष्ट झाले ह्याची आकडेवारी आता मिळाली असेल आणि जे प्रदुषण होत आहे green house effect hot aahe त्याला मानवनिर्मित करणेच जबाबदार आहेत हे निसंधीक्त पने सिध्द होईल.
आणि सस्तन प्राणी रवंध करतात म्हणून ग्रीन हाऊस इफेक्ट वाढत आहे,शेतीमुळे वाढत आहे, मांस मुळे वाढत आहे असले बालिश दावे फेटाळून लावण्या एवढे पुरावे निर्माण झाले हा सर्वात मोठा फायदा corona मुळे नक्की झालं.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनुवाद आवडला.

इटली, जर्मनी आणि युरोपातले काही देश, इराण, पाकिस्तान यांच्याबरोबर साउथ इस्ट एशियन कंट्री यांची गती मंदावत आहे. खास करून साउथ इस्ट एशियन कंट्रीजचे आकडे आणि संथ झालेली गती पाहून आपले आकडे तेवढे वाढणार नाहीत असे वाटते आहे. उष्ण कटीबंधात हा रोग थैमान घालणार नाही या दाव्यात तथ्य आहे असे वाटते आहे. आपलाही कर्व्ह फ्लॅट होत जाईल लवकर अशी आशा आहे.

हा लेख पण अनुवाद करण्याजोगा आहे. खास करून शितलादेवी, टिका हे संदर्भ माझ्यासाठी नवीन होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

४६० अ‍ॅक्टीव्ह केस साठी महिनाभर लॉकडाउन? मला वाटलेले सिंगापूर बर्‍यापैकी कंट्रोल मध्ये आले आहे. Sad

सिंगापूर गव्हरमेंटच्या या वेबसाईटवर प्रत्येक केस ऑडीट करून नंबर दिला आहे.

भारत सरकारची पण ही साईट चांगली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जे हवे ते मिळाले एकाच ठिकाणी. खास करून ग्राफ्स आवडले.
मी हे पेज पहात होतो, खासकरून डेली केसेस साठी दिलेल्या कलर कोडींग मुळे ट्रेंड कळायला मदत होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असले गोलगोल फिरवून लिहिलेले लेख मला मुळातच आवडत नाही. विद्वान माणुस राज्यकर्ता होऊ शकत नाही असे म्हणतात ते उगाच नाही. नेहमी दोन दगडावर पाय ठेऊन उभे राह्यचे, गुळमुळीत बोलायचे, आपल्यावर कोणताही दोष येऊ द्यायचा नाही आणि वरवर संतुलित दिसणार्‍या वाक्यांमधून आपल्याला हवा अजेंडा पुढे रेटायचा. त्यामुळे ना त्यांचा अजेंडा साध्य होतो ना कोणता निष्कर्ष निघतो. माणसाने कोणतातरी निर्णय घेऊन मोकळे व्हावे. भले चुक किंवा बरोबर असो. त्याची फळे भोगायची तयारी देखील ठेवावी. नुसतं गोल गोल राणी, इथं इथं पाणी खेळून काय साध्य होणार ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गंमत वाटली.
मुटके, मूळ लेखक शिक्षण व व्यवसायाने डॉक्टर आहे. तो कशाला राज्यकर्ता व्हायला जाईल ?
समाजातील प्रत्येक माणसाने प्रत्येक कृती ही राज्यकर्ता होण्यासाठो करावी असं मत आहे का तुमचं
बाकी विद्वान माणूस राज्यकर्ता होत नाही या तुमच्या मताशी सहमत आहेच.
पण तेव्हढा एकच धंदा नाही जगात .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डॉक्टर आहे त्यामुळेच जास्त गंमत वाटली. निदान डॉक्टरने तरी स्पष्ट काय ते सांगावे. आता लगेच निष्कर्ष काढावयास असमर्थ असतील तर थोडे दिवस उशीरा लेख लिहिला असता तरी चालले असते की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Bertrand Russell

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

There is absolutely no problem being doubtful but a wise shall always refrain from expressing it in public.
It helps only to create chaos.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संदिग्धते बरोबर जगण्याची सवय करून घ्या. जग काय आणि विज्ञान काय संदिग्धच असते. त्याचा अर्थ लावणे आणि तो तो अर्थ इतरांच्या अर्थाशी किंवा वास्तवाशी जोडणे हेच विज्ञानाचे काम असते. 

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

__/\__

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्याच संदर्भात मोठा प्रतिसाद लिहायचा आहे... पण ऑफिसातही करोनावहायरससंबंधित काम जोरदार सुरू झालंय.

सध्यापुरतं अवांतर - एक विदावैज्ञानिक मित्र म्हणतो, संदिग्धतेची सवयच होणं एवढंच महत्त्वाचं नाही, त्या परिस्थितीत आनंदी राहाता आल्याशिवाय विदावैज्ञानिक होऊ नये. हे काम तरुण, अननुभवी लोकांसाठी नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हे विधान एवढं ठामपणे करणाऱ्या रसेलला 'फूल्स'मध्ये धरायचं की 'वाइझर पीपल' मध्ये धरायचं? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संदिक्त म्हणजे सत्य आणि असत्य ह्यांच्या सीमेवर असलेली अवस्था.
पण एकाद्या गंभीर विषयावर जेव्हा जबाबदार व्यक्ती भाष्य करते तेव्हा ते भाष्य सत्य नसेल तरी ठीक आहे पण सत्याच्या जवळ जाणारे असावे.
कारण पूर्ण जग त्यांचे भाष्य हे सत्य आहे असे समजून वर्तन करत असतात.
आता जो व्हायरस धुमाकूळ माजवत आहे त्याच विषयी जबाबदार लोक उतावीळ पण भाष्य करताना दिसली.
सत्य काय आहे हे पूर्ण समजून न घेता अर्धवट अभ्यास च्या जोरावर अनेक उलट सुलट सल्ले दिले गेले.
उदा . हा व्हायरस जास्त तापमानात active rahat nahi.
हवे मध्ये 1/2 तास च जिवंत राहतो,
हवे मध्ये पसरत नाही फक्त रोग्याच्या तोंडातून उडणारे तुषार शरीरात गेले नाही पाहिजेत.
फक्त म्हातारी लोकच मरतात
किती तरी दावे .
आणि हे सर्व दावे पूर्ण चुकीचे होते हे आता हेच लोक सांगत आहेत.
गरम वातावरणात जिवंत राहतो.
हवेतून 8 ते 10 मीटर पर्यंत प्रवास करू शकतो.
पृष्ठभागावर 3 ते चार दिवस जिवंत राहतो.
तरुण सुधा मृत्यू मुखी पडतात.
ही जी वृत्ती आहे ती लोकांचा विज्ञान वरील विश्वास डळमळीत करते.
अभ्यास करा ,प्रयोग करा,चारी बाजूने विचार करा आणि नंतर व्यक्त व्हा.
आजकाल ची विन्यान विषयी संकेत स्थळे आणि मासिक' आज tak' सबसे तेज पेक्षा खूप खूप पुढे आहेत.
चुकीची अर्थवट माहिती सबसे तेज च्या नादात प्रसारित करत आहेत.
ती स्थळ माहिती देत आहेत की जाहिरात करत आहेत हेच समजत नाही.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ2

१.सध्या धुमाकूळ घालत असलेला व्हायरस हा ह्युमन पॅथॉजेन म्हणून पूर्वी ज्यावर संशोधन झालेले नाहीये असा आहे.
२.तुम्ही ज्याला 'दावे' म्हणत आहात ती त्या त्या स्टेज मधे तोपर्यंत निदर्शनास आलेली 'निरीक्षणे' होती. आजच्याही निरीक्षणाच्या बाबतीत तेच आहे ( अजून अभ्यास झाल्यावर हेही बदलेल कदाचित)
३. वैद्यकीय शास्त्र/सूक्ष्मजीवशास्त्र विषयक अभ्यासकांना हे मान्य असतंच. जोपर्यंत कुठलेही निरीक्षण पुरेसा अभ्यास (संख्याशात्रीय व जैवशास्त्रीय पद्धती आहेत याच्या) झाल्याशिवाय पूर्ण मान्य केले जात नाही ( आणि अंतिम सत्य म्हणून तर कधीच मान्य केले जात नाही, कारण जसे जसे शास्त्र प्रगत होत जाईल तसतसे प्रत्येक विषयावर नवीन काही येणारच अशा विचारांना शास्त्र जगतात मान्यता असते.
३.तुम्ही जर या (व आधीच्या) निरीक्षणांकडे अंतिम म्हणून बघत असलात, तर विनंती आहे , की कृपया असे करू नका , अजून किमान एक दीड वर्ष तरी.याचे कारण या काळात नवनवीन माहित्या पुढे येत असणारेत, नक्कीच.
४.जर शास्त्रीय अभ्यास पूर्ण नाहीये तर मग उघडपणे लिहावे का ? असाही प्रश्न येऊ शकतो.
पण असा विचार केला तर या विषयावर माहितीचा पुर्ण ब्लॅक आऊट करावा लागेल जगभर.
हे केल्याचेही दुष्परिणाम असतात.
एनिवे.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संदिग्ध.
खरंय तुमचं - माध्यमांमधे फार उलटसुलट बातम्या आल्या आहेत.
२४*७ काहीही न घडता बातम्या निर्माण करणाऱ्या माध्यमांना कोरोनाव्हायरससारखं काही सापडल्यावर ते सोडतील का?

ही जी वृत्ती आहे ती लोकांचा विज्ञान वरील विश्वास डळमळीत करते.

पण म्हणून विज्ञानाला का जबाबदार धरायचं?
हे म्हणजे खून झाल्याबद्दल सुरीला बोल लावण्यासारखं आहे.

माध्यमं आणि भलेही वैद्न्यानिक उतावळेपणाने बोलले असतील - ते (कधीकधी) चुकीचं आहे.
इतक्या वेगाने घडणाऱ्या घडामोडी जगापुढे आणताना जवळ आलेल्या जगात हे सगळं होणं अपरिहार्य आहे.
त्यापेक्षा मग कुणालाच काहीच सांगायच नाही - हॉलिवूडी चित्रपटांप्रमाणे नायक,नायिका, बळी पडणारा एक काळा माणूस आणि त्यांचे सवंगडी ह्यांनी सुम मधे व्हायरसवर उपाय शोधायचा
म्हणजे सगळे कंट्रोल रूममधले स्क्रीन न्याहाळणारे लोकं मिठ्या मारायला मोकळे.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

___________ खालील व्हिडीओ जरुर ऐका. स्वत:च्या जबाबदारीवर त्यातील टिप्स ग्रहण करा________________

करोनाशी कसे लढाल्

कुमोओ सांगतात- ताप येणार अगदी ३-३ दिवस येणार पण पडून रहायचं नाही. उठुन थोडं थोडं स्ट्रेच करा. इच्छाशक्ती फार मजबूत हवी. उठायचं, व्हायटॅमिन्स घ्यायची, वेळेवर टॅलेनॉल घ्यायची. पाणि, गेटॉरेड पिणे वगैरे करत रहा.
खोल श्वास घ्या. होय दुखणार पण घ्यायचा खोल श्वास घ्यायचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला.

लेख प्रकाशित झाल्यापासून प्रकाशित झालेल्या आणि माझ्या वाचनात आलेल्या काही गोष्टी -

इटलीत मृत्युदर खूप जास्त आहे तसंच इटलीत घरातल्या सगळ्या पिढ्यांनी एकत्र भेटण्याची संस्कृती जास्त आहे. वयस्कर लोकांचा मृत्युदर जास्त आहे आणि इटलीतल्या कोव्हिड१९-मृतांचं सरासरी वय ७५+ आहे, ह्या दोन्हींचा परस्परसंबंध शोधता येईल.

जर्मनीत बाधितांमधला मृत्युदर कमी आहे ह्याचं कारण त्यांनी जानेवारीच्या मध्यापासूनच काळजी घ्यायला सुरुवात केली.

अशासारख्या साथींचे दीर्घकालीन परिणाम सहज सांगता येत नाहीत; कारण त्यावर होणारी उपाययोजना किती प्रभावी आहे हे आधी माहीत नसतं. आणि प्रभावी नसलेले उपाय करणं सर्वसाधारणपणे बाजूला टाकलं जातं (दिवे लावा म्हणल्यावर फटाके लावण्याचे प्रकार झाले तरी मोठ्या प्रमाणावर लोक करत नाहीत.) त्यामुळे ठोस विधानं करणंही शक्य नसतं.

दुसरं, सुरुवातीला सिम्युलेशन्समध्ये माणसांची विभागणी फक्त बाधित आणि अबाधित अशी होती. मग लक्षणं दिसणारे आणि लक्षणं न दिसणारे अशी झाली. ह्या दोन्हींमध्ये मोठा फरक आहे. अनेक करोनाबाधित लोकांमध्ये लक्षणं दिसत नव्हती; पण त्यांच्याकडून प्रसार होत होता. मग पुढची पायरी येते, करोनाची बाधा झाली असेल तर कितपत झाली आहे. व्यक्तीवर किती 'व्हायरल लोड' आला असेल आणि तिची प्रतिकारक्षमता किती जास्त आहे; पुढचा प्रश्न येतो, संसर्ग झाल्यावर लक्षणं किती वाईट होती; किती काळ व्यक्ती गंभीर ‌अवस्थेत होती; इत्यादी.

ह्या सगळ्या गोष्टी काळ्यापांढऱ्या नसतात; त्यात वर्गवारीही असेल असं नाही. म्हणजे १ ते १० आकड्यांमध्ये वर्गीकरण केलेलं असेलच असं नाही. ते करता येणं शक्य आहे का, हे बघावं लागेल. उदाहरणार्थ दिवसाच्या तापमानाचं मोजमाप करताना त्याचं वर्गीकरण केलं जात नाही; पण आपल्या सोयीसाठी आपण 'उकडतंय' किंवा 'बरं आहे' अशी विभागणी करतो.

ही गुंतागुंत त्या-त्या विषयात काम केल्याशिवाय समजत नाही. विदा मिळवण्यासाठी वेळ लागतो; मिळालेली विदा कशी सावडायची हे समजायला वेळ लागतो. मग सावडण्याचं काम. ते झाल्यानंतर प्राथमिक निष्कर्ष. त्यावरून नवे प्रयोग, नवी निरीक्षणं.

एरवी असे आशावादी लेख मला सहसा आवडत नाहीत; पण ह्या लेखात आशावादामागचं वैज्ञानिक गृहितक आहे. म्हणून लेख आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.