करोनाविषयक

कुटुंबातील एक ज्येष्ठ सदस्य मुंबईतल्या बीकेसी कोविड केंद्रात अॅडमिट आहेत. त्यांच्याकडे स्मार्टफोन आहे पण ते फक्त काॅल करू शकतात किंवा उचलू शकतात. त्यांची तब्येत बरी आहे, आॅक्सिजन वगैरे नीट आहे. त्यांना तिथलं जेवण आवडलं नाहीये म्हणून आजपासून डबा लावलाय, जुहूच्या इस्काॅन मंदिरातला. फक्त ते डबे फेकून देण्याजोगे नसतात, कोविड केंद्रातून बाहेर नेऊ देतात का डबे ते आज कळेल. पाहू कसं जमतंय. त्यांच्या मते तिथली व्यवस्था वाईट आहे, वाॅर्डबाॅय खूप कमी आहेत, वगैरे वगैरे. तिथे कोणी तब्येत जरा ठीकठाक असलेलं आहे का याचा शोध घेतोय. म्हणजे त्यांना मदत होईल. त्यांना कसली, आम्हाला मदत होईल त्यांचं स्टेटस कळायला.
सोसायटीतलं एक कुटुंब आजारी पडलं होतं मागच्या आठवड्यात. आजीला अॅडमिट करावं लागलं, नातवाला पण थोडं इन्फेक्शन होतं. मग तोही तिथेच अॅडमिट झाला, आणि आजीची व्यवस्थित काळजी घेतली त्याने. गरम होत होतं फार तर घरनं टाॅवर फॅन नेला, कोविड केंद्र तसं जवळ असल्याने जेवणही घरनं देता येत होतं त्यांना. सोसायटीतलेच आणखी एक काका तिथे होते, त्यांचीही या मुलाने खूप काळजी घेतली, जेवण, औषधं सगळं पाहिलं.
तिथल्या रुग्णांच्या ज्या काही वैद्यकीय चाचण्या केल्या जातात त्या आपल्याला कशा कळतील असा प्रश्न पडला होता. तर एका पोर्टलवर रुग्णांचे हे सगळे तपशील डकवले जातात. ते आपण पाहू शकतो, डाउनलोड करू शकतो. मी तसं करून आमच्या डाॅक्टरांना पाठवले. तब्येतीचा अंदाज हाच उपयोग, कारण उपचार तिथे योग्य होत आहेत. त्याबद्दल वाईट काही ऐकलेलं नाही अजून. ही साइट आहे https://covid.superdr.in/PatientLogins.aspx जो माेबाइल नंबर तिथे रजिस्टर केलेला असतो तो वापरून हे तपशील पाहता येतात. भारतात असं काही होत असेल असं वाटलं नव्हतं.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet