तो रविकर का ....

रंजीशही सही दिल ही दुखाने के लिए आ
आ फिर से मुझे छोड के जाने के लिए आ ..

मेहदी हसन यांचे मंद सूर खोलीतील शांततेस चार चांद लावत होते. क्रॅनबेरी ज्युस हातात खेळवत खेळवत शोना गझल ऐकताना भान विसरली होती. खरं तर न्यु यॉर्क मध्ये सुंदरसा तिचा फ्लॅट आणि समोर मिलिअन डॉलर वॉटर फ्रंट व्ह्यु. चंद्राची कोर आकाशातही सस्पेन्डेड आणि पाण्यातही तरंगत होती. वॉटर फ्रंटच्या कडेकडेने लावलेले अगणित नाजूक लुकलुकणारे दिवे. त्यांचा मंद प्रकाश. खरे तर कोणाचीही ब्रह्मानंदी टाळी लागावी अशी ही संध्याकाळ. शोनाच्या मनात मात्र हलकीशी कळ उमटली होती. गझलेचं असच असतं नाही - एक मूडसा बन जाता है! एक मेलो, मखमली, पेन्सिव्ह, शोकाकुल मूड. बस्स ती संध्याकाळ त्या मूडमध्ये रंगलेली. भिंतीवरही पूलाचे चित्र , अर्धवर्तुळाकार पूल आणि ते वर्तुळ पूर्ण करणारे त्या पूलाचे पाण्यातले प्रतिबिंब. येस्स्स फक्त ब्लॅक & व्हाईट. आजचा मूडच होता ब्लॅक & व्हाईट. कोणतीच अन्य छटा नसलेला. असा मूड कसा असतो सांगू - शोना या मूडला 'ॲसिड टेस्ट' म्हणे. अशा मूडमध्ये मनात जी व्यक्ती आपल्याही नकळत अधिराज्य गाजवते ती आपले प्रेम असते.

यशस्वी, बुद्धीमान शोनाला तशी पुरुषांची ना कधी कमी भासली ना तिला कधी विधीनिषेध, संकोच वाटला. स्मार्ट तर होतीच ती.अन्य कोणाच्या मॅनिप्युलेशनला, काव्याला बळी पडणाऱ्यातली नव्हती. She never shied away from men. No amorous opportunity startled her either. आलेली प्रत्येक संधी तिने पडत्या फळासारखी उचलली होती. तिने स्वत:ची सेक्श्युॲलिटी नीट एक्स्प्लोअर केलेली होती. It's a gift. Isn't it? आणि तितक्याच क्लिनिकल प्रिसिजनने तिने वेळ येताच स्वत:च्या प्रेमिकांना आयुष्यातून हद्दपारही केलेले होते.मग तो नेहमी कॉम्प्लिमेन्टसची बरसात करणारा श्रीनाथ वेलुरु असो की तिचा विशीतल पहीला वहीला प्रियकर कृष्णा असो. अह्हा!! पामिस्ट्री सांगण्याच्या निमित्ताने कृष्णा वरचे वर हात पकडे तेव्हा कशा झिणझिण्या यायच्या. कृइष्णा वॉज अमेझिंग. ही वॉकज वेल एन्डोव्ड टू. & दॅट नेव्हर हर्ट्स .... या विचारांनीच शोनाच्या ओठांवर मिष्किल हसू उमटले. गच्चीवरती दोघांचा रंगलेला रोमान्स आणि पहीलावहीला स्पर्श..... इट वॉझ इनटॉक्सिकेटिंग. शोनाच्या मन:पटलावरती सारे सारे क्षण थुई थुई नाचत होते. येस देर!! देअर..... प्लीझ कंटिन्यु... थांबू नकोस ,,, उसासे, हेवी ब्रीदिंग , It was heady दुसरा शब्दच नाही It was heady. आजही कृष्णाचा स्पर्श आठवला की भोवळ आल्यासारखे होते. गोड भोवळ... डिझी.

लग्नानंतर शोनाला लवकरच कळलं एकदा परफेक्शन अनुभवलं की मग थोडाही खुजेपणा व्यक्तीला चालवुन घेता येत नाही. तसा आनंद वाईट नव्हता. ह्म्म्म्म!! फक्त त्याच्यात ती जिगर ती ओढ नव्हती.थंड होता तो. परफेक्शनिस्टही. शोना पिसाटल्यासारखी होताना तो तिला थंडपणे सांगायचा - शेव्ह करुन ये. मी वाट पहातो. व्हॉट द फक! वाट कसली बघतोस, आता तवा तापला आहे पोळी भाजून घे पण नाही त्याच्या परफेक्शनिस्ट, ऑबसेसिव्ह स्वभावाला, प्रत्येक गोष्ट अमुक एका प्रकारेच लागायची. आंघोळ करुन येउन, स्पर्मिसायडल प्लस काँडोम का तर परफेक्ट प्रिकॉशन. भाडमे गई असली प्रिकॉशन. दर वेळेला या सगळ्या सोपस्कारांनंतर ती थंड थंड होउन, ल्युब लागली नाही तर नवल होतं. दर वेळेला तिला आनंदच्या मीठीतही कृष्णा आठवायचा. अर्थात घटस्फोट दूर नव्हता. शोनाचे इतक्या थंड प्रकृतीच्या माणसाशी पटणे दुरापास्तच होते.

ते असो नंतरही अनेक आले-गेले. जेलस, कॉम्प्लिमेन्टस देणारे, कावेबाज, आत्मविश्वास नसलेले-असलेले. फक देम ऑल. आज मेहेदी हसन ऐकताना, मात्र यातलं कोणीही तिला आठवलं नाही. तिला आठवला किरण.

“छानी माझी सोनुकली ती – कुणाकडे ग पाहत होती?
कोण बरे त्या संध्येतून – हळुच पाहते डोकावून?
तो रविकर का गोजिरवाणा – आवडला अमुच्या राणींना?”
लाजलाजली या वचनांनी – साधी भोळी ती फुलराणी!

आठवीत होती ही कविता. नुकतेच कळे उभार धरु लागले होते. आपण सुंदर आहोत हा साक्षात्कार होण्याचा काळ. कंबरेची गोलाई आकार घेण्याचा काळ. क्लासमध्ये किरण - किती गोड नाव. नावापासून सारच कसं गोड. गोरा पान - कालेभोर डोळे- लालबुंद स्वेटर-गळ्याला , मानेला भरपूर पावडर लावलेला. तो दिसला की तिच्या पोटात बारीक गोड कळ यायची. अतिशय आवडायचा तो तिला. तिचा पहीला क्रश..कायसुंदर अनुभूती होती ती. कोणीतरी विलक्षण आवडण्याची. मैत्रिणीबरोबर त्याच्याविषयी मारलेल्या चोरट्या गप्पा.
बघतोय का गं तो?" "किती हुषार आहे ना. सगळ्या प्रश्नांना हात वर असतो त्याचा. गणितात पहीला येतो नेहमी" किती लख्ख गोरा आहे. खरं तर मुली, मुलांपेक्षा भरभर मोठ्या होतात. किरण तसा पोरगेलेसाच होता. त्याने अजिबात फरक पडत नव्हता. तिला तो मनस्वी आवडत होता. ती परी होती, फुलराणी होती.

जैसे तुझे आते हैं, ना आने के बहाने
वैसे ही किसी रोज़ ना जाने के लिये आ

वाह!! मेहदी हसन - गाण्यातला ठहराव- संथपणा...... येशील का? मीदेखील तर लहान होते, निरागस, काव्यमय होते.. ना दुनियादारीत बरबटले होते, ना माझा आत्मा विकला होता. भले यशस्वी नसेन, पण फुलराणी तर होते. जर तेव्हा भेटला असतास तर ........
शोनाची डोळे भरुन आले. जर-तर ला अर्थ नव्हता. दुसरी गझल सुरु करुन, शोना क्रॅनबेरीचा अजुन एक चषक बनवण्याकरता फ्रीजपाशी गेली. अजुनही न्यु यॉर्कचा चंद्र पाण्यावरती हिंदकळतच होता. तिची गॅलरी चंद्रकिरणांनी पार उजळून निघाली होती.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (1 vote)

प्रतिक्रिया

गॅलरी रविकराने नव्हे तर चंद्रकिरणांनी उजळली होती, म्हणून मनात आले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Smile तुमची एक सुंदर कविता आठवते मला. सापडली की देते. त्यात हा किरणाचा संदर्भ आलेला आहे एकदा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मग हा रविकर आठवला
http://www.misalpav.com/node/2443

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

येस्स्स्स मलाही तीच (https://aisiakshare.com/node/4387) आठवली. अतिशय सुरेख कविता आहे ती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

If you can't negotiate contraception in your marriage, do you really think you're going to [negotiate] that high-powered job?

https://www.cnn.com/2021/09/03/africa/women-sexual-pleasure-gender-equal...
------------------

"Pleasure is threatening," he says. "It challenges those who are in power. As long as the society keeps women as second-class citizens, then men are in control. So denying [women] reproductive health, contraception, safe abortions, and certainly altering their body -- taking away the sexual pleasure aspects of one's anatomy -- keeps them suppressed and patriarchy in power."

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0