अकाली पिकलेल्या टोमॅटोमुळे उडाली खळबळ

१५ नोव्हेंबर, आळंदी

टोमॅटो

एकाच घोसातल्या टोमॅटोंपैकी एकच टोमॅटो आधी पिकायला लागल्यामुळे आसमंतात खळबळ उडाली आहे.

लाल रंग आलेल्या टोमॅटोनं इतर टोमॅटोंना 'मोठं कसं व्हायचं' याची व्याख्यानं द्यायला सुरुव‌ात केली. "मी खूप मेहनत केली, कष्ट सोसले तेव्हा मी मोठा झालो. फक्त कुचाळक्या करून कुणी मोठे होत नसतात, आलं का लक्षात? जगाचे टक्केटोणपे खावे लागतात, समजलं ना! मोठा आहे म्हणून बाकीचे टोमॅटो माझा दुस्वास करतात, मला वेडंवाकडं म्हणतात. पण ज्येष्ठांचा मान राखणं हीच आपली संस्कृती आहे. माझा फक्त रंगच लाल आहे असं समजू नका; मी अनुभवानंही तुमच्या सगळ्यांपेक्षा मोठा आहे. तुमच्या कळ्या उमलल्या नव्हत्या, तेव्हा मी चांगला गोटोळा होऊन जगात राहत होतो. तुम्हाला आता फक्त माझं स्टेटस दिसतं, पण त्यामागे मोठी मेहनतही आहे."

शेजारच्या घोसावर मात्र टोमॅटोंनी या भाषणबाजीला साफ विरोध केला. "हा सांगतो तेवढा काही मोठा नाहीये. अजून पुरेसा लालही झाला नाही तर मिजास पाहा याची. याचा आकार किती, हा बोलतो किती!" अशी एक प्रतिक्रिया आली.

तर एका गरम माथ्याच्या तरुण टोमॅटोचं म्हणणं, "या म्हाताऱ्यावर नक्की औषध टाकलं असणार. मेल्याला, सतत मिरवायचं असतं, लाल टांगेवाला कुठचा! नुस्ता लाल झाला म्हणून काय अक्कल आली का सगळी जगातली! आणि असेल सगळी अक्कल याला, तर काय देऊळ बांधायचं का याचं?"

आणखी एका टोमॅटोची प्रतिक्रियासुद्धा आमच्या कानांवर आली. त्यातला छापण्यालायक भागच इथे दिला आहे. "$%^) स्वतः ^&* आणि मग $$^&(. आमच्या #%६ काळी $&&*%$ दुसरे #$&^&* ... "

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

अभिनेते अतुल कुलकर्णी यांच्या कडून प्रेरणा (आत्ताच वाचलेली बातमी)घेऊन मी एवढंच म्हणेन,

टोमॅटो चे पिकणं आणि परिपक्व होणं यात फरक आहे.

Smile Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

विक्रम गोखले हा एक नेहमीच डोक्यात जात आलेला प्राणी आहे.

(तसाच, नाना पाटेकर हा दुसरा.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपण भारतीय नको त्यांना सिरियसली घेतो.
कोणताही नट किंवा कोणतीही नटी दिलेले संवाद उत्कृष्ट पद्धतीने बोलते, अभिनय करते. याच्या पलिकडे त्यांचं काहीही चालत नाही. आजकाल तर पीआर एजन्सीच्या जमान्यात कुठला नटवा किंवा नटवी कसला स्टंट करेल काहीच सांगता येत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

'न'बा, त्या समस्त थेरडेशाहीचा निषेध करणारे तुम्ही, फक्त विक्रम गोखल्यांत का अडकता!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

छे छे! विक्रम गोखले हा केवळ मासला आहे. नमुना.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म्हणजे ? ममव जगातील चिल्लर बातम्या अमेरिकेत ही इतक्या लगेच दखलपात्र होतात ?
मला नाही वाटत की त्याचा या लेखाशी काही संबंध आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रुपक आहे का हे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान पोस्ट .तुमच्या पोस्ट सरळ समजत नाहीत खोलात जावून विचार केला तर च समजतात.
ही सवय सर्वांस नसते.
कधी सरळ समजेल अशा पोस्ट पण करत जा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म्हणजे, ही पोष्ट तुम्हाला समजली???

थोर आहात! जरा आम्हाला सगळ्यांनासुद्धा समजावून सांगा ना. इथे कोणाच्याच समजण्यापलीकडची आहे ही पोष्ट - खुद्द लेखिकेला तरी समजली आहे की नाही, लेखिकाच जाणे!

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझ्या पोस्ट चे शेवटचे वाक्य वाचा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शेवटचे तीन ठिपके व अवतरणचिन्ह समजले नीट.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा स्वतःला नास्तिक आहे असे समजत होता.
जगाला पण तो हेच सांगत होता .
आता अचानक हिंदू चा प्रेमी कसा झाला?
मूर्ख माणूस आहे.
हुशार,बलाढ्य ब्रिटिश लोकांनी सर्व अंकित देशाचा हक्क सोडला.
फक्त भारत हा त्यांचा अंकित नव्हता.
जे गोखले आणि ती मूर्ख कंगना ह्यांना माहीत नाही
का?
ब्रिटिश साम्राज्य किती देशात पसरले होते ? ह्याची तरी ह्यांनी माहिती करून घेतली पाहिजे होती.
जागतिक महायुद्ध झाली नसती तर ब्रिटिश सत्ते नी कोणत्याच देशाला स्वतंत्र दिले नसते हेच अंतिम सत्य आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

…नास्तिक असणे आणि हिंदू असणे या गोष्टी mutually exclusive कधीपासून होऊ लागल्या?

नास्तिक मनुष्य हिंदू असू शकत नाही, किंवा, हिंदू मनुष्य नास्तिक असू शकत नाही, म्हणून कोणी सांगितले?

चार्वाकाचे नाव ऐकले आहेत काय? (बाकी, आम्ही चार्वाकाचे फक्त नावच ऐकले आहे, ते सोडा.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

“हिंदू असणे” ह्मणजे काय रे भाऊ?

माझ्या मते, हिंदू असण्याचे कुठलेच “आवश्यक / पुरेसे” निकष नाहीत. Pretty much anything goes. हां, by association काही गुणधर्म कालपरत्वे चिकटले आहेत. थोडे गणिती भाषेत बोलायचे, तर हिंदू धर्माचा पैस दोन मितींच्या आलेखासारखा आहे, असे मला वाटते:

१. ‘क्ष’ अक्षावर शून्याच्या एका बाजूस ‘आस्तिक’ आणि दुसऱ्या बाजूस ‘नास्तिक’
२. ‘य’ अक्षावर एका बाजूस ‘सहिष्णू’* आणि दुसऱ्या बाजूस ‘असहिष्णू’*

अशी मांडणी केली, तर चार quadrants उद्भवतील. स्वत:स हिंदू म्हणवणारे आणि इतर धर्मीय ज्यांस हिंदू समजतात असे सर्व लोक चारपैकी कोणत्या तरी एका quadrant मधे बसतील असे मला वाटते.

पैकी मी ठार नास्तिक आणि काहीसा असहिष्णू आहे. पण ठार नास्तिक राहतानाच सहिष्णू होणे हा माझा प्रकल्प आहे.

*सहिष्णूपणाची माझी व्याख्या: tolerance is the belief that “I could be wrong”.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

हे मान्य केले तर.
हिंदू हा सर्वात आधुनिक धर्म आहे सर्व विचारांच्या लोकांस तो स्वीकारतो.
हिंदू धर्म हा लवचिक धर्म आहे तो हिंदू आहे हे सिद्ध करण्यासाठी काहीच अटी लावत नाही.
हे तुम्ही मान्य करता का?
दोन्ही बाजू नी वाजणाऱ्या लोकांचा मला खूप तिरस्कार आहे.
मतावर ठाम असावं..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हिंदू हा सर्वात आधुनिक धर्म आहे सर्व विचारांच्या लोकांस तो स्वीकारतो.
हिंदू धर्म हा लवचिक धर्म आहे तो हिंदू आहे हे सिद्ध करण्यासाठी काहीच अटी लावत नाही.
हे तुम्ही मान्य करता का?

(‘सर्वात आधुनिक’बद्दल असहमत आहे, कारण जे ‘सनातन’ आहे, ते एकसमयावच्छेदेकरून ‘आधुनिक’ म्हणणे हा बहुधा वदतो व्याघाताचा प्रकार व्हावा - कारण ‘आधुनिक’मध्ये काहीशी ‘पूर्वी कधीतरी हा धर्म नव्हता’ अशी जी छटा येते, ती ‘सनातन’शी विसंगत आहे. परंतु, ‘आधुनिक’ सोडून बाकीच्याबद्दल बोलायचे, तर…)

तत्त्वतः, होय.

(प्रत्यक्षात, व्यवहारात मात्र हे कितपत खरे आहे, याबद्दल साशंक आहे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नास्तिक हिंदु असलो तरी दंगलीच्या वेळेस गुंडांच्या हातात सापडलो तर, सुंता केलेली नाही वा धार्मिक प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत म्हणून माझी हत्या होणार, हे निश्चितच!

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आम्ही पार्लेकर!

उपरनिर्दिष्ट टमाटा पिकलेला नव्हे, तर सडलेला आहे. दुर्दैवाने सध्या सडलेले टमाटेच बहुमतात आहेत असे वाटते. बागेचे काय होणार कोण जाणे…

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

…जहन्नममध्ये! (नाहीतर मग तुम्हाला कोठे गेली म्हणून वाटले? जगातल्या एकमेव सर्वसमावेशक ठिकाणी???)

कुंपणच जर शेत खाऊ लागले… आपले, माळीच जर बाग पोखरू लागले, तर दाद कोणाजवळ मागणार?

असो चालायचेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सरकारी अत्यंत कडक कायद्यात किती तरी पळ वाटा असतात...
सक्षम लोक कधीच कायद्यात अडकत नाहीत.(एकदा अपवाद सोडा).
तसे नास्तिक पण नसावे.
नास्तिक म्हणजे.
जो कोणत्याच धर्माचा अंकित नाही.
जो कोणतेच देव,धर्म,परंपरा मानत नाही मानव धर्म सोडून .
अशी माझी व्याख्या आहे..नास्तिक व्यक्ती.
हिंदू,मुस्लिम,बुद्ध,ख्रिस्त, जैन,शीख असू च शकत नाही

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नास्तिक व्यक्ती.
हिंदू,मुस्लिम,बुद्ध,ख्रिस्त, जैन,शीख असू च शकत नाही

- हिंदूंमध्ये, माझ्या कल्पनेप्रमाणे, देव किती मानावेत - शून्य, एक, किंवा एकाहून अधिक - याबद्दल काहीही बंधने नाहीत. (मी स्वतः या तिन्ही फेज़ेसमधून अधूनमधून, आलटूनपालटून जात असतो. आणि हो, मी स्वतःला हिंदू समजतो. अधूनमधून गोमांससुद्धा खात असलो, तरीही. परंतु, माझे सोडा. सावरकर नास्तिक असल्याबद्दल ऐकलेले आहे.)

- नास्तिक मनुष्य व्याख्येने मुसलमान किंवा ख्रिस्ती असू शकत नाही, हे मान्य करता येण्यासारखे आहे. (स्वतःला नास्तिक, बिगरमुसलमान म्हणवणारे, परंतु समाजाकडून, वंशपरंपरेने मुसलमान गणले जाणारे जावेद अख़्तरसारखे लोक आहेत, ही बाब अलाहिदा.)

- नास्तिक मनुष्य हा व्याख्येने शीख होऊ शकत असावा, किंवा कसे, याबद्दल साशंक आहे, परंतु तेथे(सुद्धा) तुमच्याशी सहमतीकडे कल आहे.

- बौद्धांमध्ये, माझ्या कल्पनेप्रमाणे, ईश्वर ही संकल्पना नाही. (अर्थात, माझी कल्पना चुकीची असू शकते.) त्यामुळे, एकसमयावच्छेदेकरून बौद्ध आणि नास्तिक असणे हे (बहुधा, व्याख्येनेच) शक्य असावे, असे वाटते.

- जैनांबद्दल कल्पना नाही.

असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

निसर्गात जी टोमॅटो खूप अगोदर पिकतात ..
ते पिकनेच अनैसर्गिक असते
उन्ह किंवा बाकी कारणाने ती पिकल्या सारखी वाटतात पण ती सडलेली असतात
तेच माणसाला पण लागू होते.
सडकी विचारधारा असणारे परिपूर्ण समजत असतात पण तीच लोक सडकी असतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म्हणजे हे रूपक आहे समजून प्रतिक्रिया येत आहेत त्या सोडून . . .
------
त्या एका टोमाटोची ओळख ( आइडेंटिफिकेशन ) केले असल्यास तो अगोदरचा आहे हे खात्रीपूर्वक सांंगता आले असते. फळे जेव्हा गुच्छात येतात तेव्हा काही वेळा क्रम असतो. टोकाकडून खाली, खालून टोकाकडे वगैरे फुलांचे फळ होत जाते, आणि त्याच क्रमाने बहुधा फळे पिकत जातात.. आणि त्यांना खूण केली ( मार्कींग) तरीही ठरवता येते अगोदरच/ नंतरचे. टोमाटोच्या कळ्या चारच्या गुच्छांत येतात पण त्यात क्रम नसतो. वरच्या आणि खालच्या गुच्छांत तो असतो. एकाच गुच्छातल्या फळांना म्हणतोय.
फळझाडांना पोषक द्रव्ये कमी पडू लागली/ पाण्याचा ताण पडू लागला की झाड आहे त्या फळांत गर ( आतल्या बियांना पुढे रुजताना पोषण म्हणून) न वाढवता बिया वाढवू लागते आणि गर पिकू लागतो.
क्रमाला धुडकावून पिकणारे अकाली शहाणे (प्रˈडिजस्) असतात.

निरीक्षण आवडले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एवढा विचार नका करू! मी उगाच आचरटपणा करत होते. रूपक-बिपक माझ्या मनात नव्हतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हिरव्या, कच्च्या टोमॅटो ची दाण्याचा कूट वापरून केलेली भाजी छान लागते.

त्या एकच पिकलेल्या टोंमॅटोचा फारसा उपयोग दिसत नाही. कारण भाजी, आमटीत वापरावा तर तो फारच छोटा आहे, आणि नीट पिकलेला, रसदार पण नाहीये.
कच्चे टोमॅटो पिकेपर्यंत, अती पिकल्याने तो वाया जाणार बहुदा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********

दुश्मन है हजारो यहॉ जानके - जरा मिलना नजर पहेचानके |
कई रूप में है कातिल - कहीं दीप जले कहीं दिल ..||