शेष
नेणिवेला जाणिवेने छेदता जे उरतसे
सकल ते समजून घेणे कधिच का सोपे नसे?
या क्षणी जे स्तंभ भासे, शूर्प ते पुढच्या क्षणी
पाहू मी गजरूप कैसे, नेत्र माझे झाकुनी
कोणी त्या म्हणतात माया; वास्तवाचा विभ्रम
कोणी त्या म्हणती अविद्या; म्हणती कोणी संभ्रम
वास्तवाचे रूप कैसे? कोण जाणे सर्वथा?
ज्ञेय-ज्ञाता भेद फिटता
शेष
आदिम
शांतता
- Read more about शेष
- Log in or register to post comments
- 1756 views
झुंड ची प्रतिकात्मकता
मी चित्रपट समीक्षक नाही. चित्रपटाचा रसास्वाद कसा घ्यावा याचा कोणताही अभ्यासक्रम कधीही मला अभ्यासाला नव्हता. भारतियांचे चित्रपटाचे वेड आणि त्यातून प्रत्येकाचे असणारे आकलन असाच माझाही प्रवास झालेला आहे. अन्य समाजमाध्यमात झुंड कसा दिसला याबद्दल लिहीले आहे. तेच इथे डकवतो आहे.
नागराज सिनेमा कसा बनवतो ?
स्पर्धा का इतर?
- Read more about झुंड ची प्रतिकात्मकता
- 10 comments
- Log in or register to post comments
- 6060 views
पणती
घन दाटुनि नाही आले झणी | सौदामिनी कुठुनी ये अंगणी || धृ ||
चिंब भिजली आठवगीते | नभ बरसती तुला बघुनी |
त्या मेघांतून वीज चमकता | माळ प्रभूची शब्द धरी || १ ||
त्या भेटींची चित्रे धूसर | सात पडद्यामागे विरली |
रानी नाही शालू हिरवा | धरा नेसली ऊन्हंकाहिली ||२||
दोन नयनी एकच दृष्टी |अता न होई गाठीभेटी |
दुरूनी सूर आरतीचे येता | खोल गर्भाशी घुमते घंटी ||३||
किणकिणते ध्वनी भरूनी आले | कलत्या साऊल्या पडल्या अंगणी |
मावळतीच्या तेजासंगे | पणती होई नभदामिनी || ४ ||
- रानभुली
- Read more about पणती
- Log in or register to post comments
- 1529 views
'द कश्मिर फाईल्स' चित्रपटाच्या निमित्ताने
नुकताच बहुचर्चित 'द कश्मिर फाईल्स' हा बहुचर्चित चित्रपट पाहिला. चित्रपटाच्या अनुषंगाने माध्यमांमधे उलट सुलट बातम्या दोन्ही बाजूंनी दोषारोप आपण अनुभवले. उत्तर प्रदेश निवडणूक आणि त्यानंतर हा चित्रपट यांच्या चर्चेमुळे युक्रेन युद्धाला भारतीय माध्यमांत मिळणारे महत्त्व कमी झाले.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about 'द कश्मिर फाईल्स' चित्रपटाच्या निमित्ताने
- 14 comments
- Log in or register to post comments
- 7327 views
दि काश्मीर फाईल्स - अस्वस्थ करणारा अनुभव
सिनेमा पाहताना जर अस्वस्थ वाटत असेल तर त्या सिनेमाचा कंटेंट आणि कंटेक्स्ट योग्य जागी प्रहार करतो. अर्थातच सगळेच मनाला भिडणारे सिनेमे ह्यूमन लेवल वर करूण वाटतात. ठणकावून आणि ओरबडून सत्य सांगणारे सिनेमे फार कमीच. त्यापैकी काश्मीर फाईल्स. काश्मिरी पंडितांच्या शिरकाणाबद्दल तिखट आणि तीव्र भाष्य करणारा सिनेमा. काही लोकांना हा सिनेमा प्रोपागंडा वाटतो कारण त्यांच्या डीप नॅरेटिव्हला धक्के बसतात म्हणून. सेट केलेलं नॅरेटिव्ह जर खोटं पडू लागलं की जळफळाट, तळमळ, खदखद बाहेर येणं सहाजिकच आहे. मात्र जे काही दाखवले आहे काश्मीर फाईल्स मध्ये ते सत्य घटनेवर आधारित आहे. कपोलकल्पित कथांवर तर नक्कीच नाही.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about दि काश्मीर फाईल्स - अस्वस्थ करणारा अनुभव
- 6 comments
- Log in or register to post comments
- 5337 views
लोकांनी पृथ्वीचा आकार कसा शोधला?
"जांभया कसल्या देतोयस? नऊ वाजले. पहाट झाली."
"अरे काल यूएसबरोबर काॅल होता. त्यांच्या दुपारी बारा वाजता."
"न्यूयाॅर्क आठनऊ तास पाठी ना आपल्या? तू दहाला झोपतोस सांगू नको मला!"
"आमचं यूएसचं ऑफिस ॲन्करेजला आहे भेंजो. अलास्कामधे."
"मग तिथल्या कलीगला तू काय म्हणतोस - अरे वा, तू अलास्का?"
"एकदम चूप! एकतर झोप येतेय आणि त्यात तुझे पीजे. भेंजो हा टाईम डिफरन्स कमी करायची कायतरी ट्रिक पाहिजे."
"ॲक्चुअली सगळी माणसं एका उभ्या रेषेवर राहत असती तर बरं झालं असतं."
"उभी रेषा म्हणजे?"
- Read more about लोकांनी पृथ्वीचा आकार कसा शोधला?
- 10 comments
- Log in or register to post comments
- 7299 views
मुलांच्या जगातली 'साइकिल' आणि 'प्लूटो'

- Read more about मुलांच्या जगातली 'साइकिल' आणि 'प्लूटो'
- 14 comments
- Log in or register to post comments
- 6972 views
मोटार फक्त पाहावी!
मला ते लिमोझिन नाव आठवेना. मग मी big fancy car असं गूगललं. त्यात भलतंच कायतरी दाखवायला लागले. बेअक्कल गूगलला अजूनही माझी भाषा समजत नाही, म्हणून मी आता 'डकडकगो' वापरते. बरा अर्धा हल्ली मातृभाषा कमी बोलतो, आणि उत्तमार्धीभाषा जास्त बोलतो. मी त्याला विचारलं, "काय रे, मी कुठल्या लांबड्या गाडीला बस म्हणते?" लगेच आवाज आला, "अंऽऽऽ …. लिमोझिन."
- Read more about मोटार फक्त पाहावी!
- 53 comments
- Log in or register to post comments
- 17229 views
झांटिपी आणि बोका
हे लेख मी फेसबुकवर ही प्रसारित केले आहेत. इथे पुनःप्रसाारण.
मी: तर मी तुम्हा दोघांवर एक सदर लिहिणार आहे. cartoon strip सारखं पण लिहून.
झांटिपी: लिहून का?
मी: मला जे नमूद करायचंय, ते विचारपरिप्लुत असल्याने, शब्द हेच योग्य माध्यम आहे.
बोका: सरळ सांग ना, तुला चित्र काढता येत नाही
मी: आणि तुम्हीही काही फारसे फोटोजनिक नाही. असो. तर मी असं सदर लिहितेय. त्याचं नाव असेल 'झांटिपी आणि बोका'
बोका: झांटिपी कशाला पाहिजे? 'बोक्याचे विचारधन' किंवा नुसतं 'बोका' ठेव. सिर्फ मेरा नाम ही काफी है!
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about झांटिपी आणि बोका
- 8 comments
- Log in or register to post comments
- 5171 views
मीनाक्षी कोकणेची गोष्ट
असामान्य बायकांच्या कथा, 'सक्सेस स्टोरीज' नेहमीच लिहिल्या जातात, 8 मार्चला तर एकदम घाऊक भावात. मेनस्ट्रीम पत्रकारितेत असतानाही मीही असं अनेकदा केलं आहे पण मला नेहमीच खूप नाव नसलेल्या, प्रसिद्धी, कौतुक पुरेसं वाट्याला न आलेल्या तरीही प्रचंड कष्ट उपसणाऱ्या, संघर्ष करणाऱ्या स्त्रियांच्या कहाण्या खुणावतात. म्हणूनच आज मीनाक्षी कोकणेची कहाणी.

ललित लेखनाचा प्रकार
- Read more about मीनाक्षी कोकणेची गोष्ट
- 10 comments
- Log in or register to post comments
- 6475 views