लेखाजोखा
लेखाजोखा
आयुष्याच्या अखेरीस मांडावा का लेखाजोखा?
आठवांच्या हिंदोळ्यावर सुख देई दु:खाला झोका.
शुष्क कोरड्या बागेवरती इवली शिंपण आनंदाची
हृदयी ठसले हास्य निरागस, कानी कर्तव्याच्या हाका.
कुरतडलेल्या काळजावर कुणी लावले ठिगळ सराईत
अवचित कुणीसा विणून गेला आपुलकीचा रेशीम टाका.
अंधाऱ्या अवघड रात्री स्नेहाच्या तेवल्या ज्योती
विश्वासाला अंधपणाने दिला कधी जीवघेणा धोका
तेच तेच अन् तसे निरर्थक थबकलेले सगळे क्षण,
बाळमुठीत बोटांना बिलगे पळभर जगण्याचा मोका.
- Read more about लेखाजोखा
- Log in or register to post comments
- 2217 views
फुरसद के कुछ पल
बालपणीचा काळ सुखाचा मागे पडून कित्येक वर्षं उलटलेली असतात. आपली मुलं जवळपास आपल्या उंचीला किंवा त्याही पार गेलेली असतात. वरच्या पिढीच्या संध्याछाया सुरू झालेल्या असतात आणि आपण खलील जिब्रानची मुलांविषयीची कविता नव्याने समजू लागलेले असतो. आईवडील मध्यमवयीन असताना आपल्या कानावर पडलेल्या कितीतरी गोष्टी आपण त्या वयाला पोहोचल्यावर नव्याने उमगायला लागतात. लहानपणी ऐकलेली गाणी आताशा आणखी आवडायला लागतात. आपण म्हणलं तर अनुभवी आणि म्हणलं तर शिकाऊ अशा दोन्ही गटात मोडत असतो. कित्येकांची लग्न मुरलेली असतात तर काहींची घडी विस्कटलेली असते. पण नित्याचं रहाट गाडगं काही थांबत नाही.
- Read more about फुरसद के कुछ पल
- 3 comments
- Log in or register to post comments
- 6486 views
उगाच सुचलेली कथा
सीएसएमटीला गरीब रथ एक्स्प्रेस ची नुकतीच एन्ट्री झाली. घर सोडताना संसारी माणूस कुलूप लावलं की नाही याची खात्री करतो... अगदी तसच बड्या गोल्डफ्लेकची दोन पाकीट खिशात आहेत की नाही याची त्याने खात्री केली. प्रवास साधारण 4 तासाचा होता. एवढ्यासाठी तिकीट काढण्याची धावपळ करण्यात त्याला रस नव्हता त्यामुळे आवडत्या अंकाच्या डब्यात बसायचं त्याने ठरवलं...
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about उगाच सुचलेली कथा
- 3 comments
- Log in or register to post comments
- 3172 views
आठवणीतील घरं -- नानी का घर -- भाग ३
पहिले भाग प्रकाशित केलेले आहे
- Read more about आठवणीतील घरं -- नानी का घर -- भाग ३
- 3 comments
- Log in or register to post comments
- 2615 views
आठवणीतील घरं -- नानी का घर -- भाग २
पहिला भाग प्रकाशित केलेला आहे
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about आठवणीतील घरं -- नानी का घर -- भाग २
- Log in or register to post comments
- 2261 views
आठवणीतील घरं -- नानी का घर -- भाग १
तितली रानी तितली रानी
मुझको दे दो अपने पर
पर लगाके उड जाऊंगी
अपनी नानी के घर
मुलगी हे म्हणायला लागली आणि मला आईच्या घराच्या ऐवजी माझ्या नानीचं घर आठवायला लागलं.
लहानपणीच्या खूप आठवणी या औरंगाबाद मधल्या घरा भोवती आहेत हे जाणवल.
माझ्या आजीचं नाव विमल आणि आजोंबांचं नाव वासुदेव म्हणून घराचं नाव गोकुळ असा ठेवलेलं आणि नाव पुरक असायला पाहिजे म्हणून कि काय पण वासुदेवांना ८ नातवंड. (या हिशोबानी माझ्या दुसया आजोंबांच्या घराचं नाव हस्तिनापूर असायला पाहिजे होतं कारण तिकडे आम्ही ५ जण. असो.)
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about आठवणीतील घरं -- नानी का घर -- भाग १
- 11 comments
- Log in or register to post comments
- 5486 views
प्रमाणलेखन - तुम्ही हा-ही-हे लिहिता का?
मराठी वर्तमानपत्रांमधल्या बातम्यांची शीर्षकं हल्ली असल्या धाटणीची असतात - 'ह्या नटीनं केला होता हा हेअरकट'. ह्याबद्दल फेसबुकवर थोडी तक्रारबाजीही बघितली. ते ठीकच.
बऱ्यापैकी गांभीर्यानं भाषा वापरणाऱ्या लोकांच्या लेखनात दोन पॅटर्न दिसले -
१. अमकी गोष्ट केली तर तुम्हाला फरक दिसेल.
- Read more about प्रमाणलेखन - तुम्ही हा-ही-हे लिहिता का?
- 17 comments
- Log in or register to post comments
- 11810 views
गूगल ट्रेंड्स : महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री कोण?
अर्थातच माझ्याकडे आत्ता चिकार वेळ आहे, किंवा आहे ते काम करायचा चिकार आळस आहे (आणि खिशाला हे परवडतंय) म्हणून केलेले हजामपट्टीचे धंदे.
तर महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका आणि त्यांचे निकाल येऊन काही दिवस लोटले आहेत. एरवी एवढ्या दिवसांत मुख्यमंत्री कोण होणार, हे ठरतं. शपथविधीची तयारी वगैरे सुरू होते. पण ह्या वेळेस महाराष्ट्रात शपथविधीच्या तयारीच्या ऐवजी मीम्स, विनोद पसरायला लागले आहेत. म्हणून हे किडे. गूगल ट्रेंड्सवर कोणाला जास्त मतं दिसत आहेत.
- Read more about गूगल ट्रेंड्स : महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री कोण?
- 20 comments
- Log in or register to post comments
- 13886 views
भावनात्मक थकवा
भावनात्मक थकवा
- Read more about भावनात्मक थकवा
- 2 comments
- Log in or register to post comments
- 6127 views
जिप्सी
जिप्सी
आम्ही असतो जिप्सी
घोळदार रंगीत झग्यात, चमकदार मण्यांच्या माळांत,
तनामनावर खुशीचा साज मिरवणाऱ्या जिप्सी
झग्याच्या प्रत्येक रंगीत तुकडयाचा धागा
कुठेतरी जुळलेला असतो
माळेच्या एकेक मण्यातून आम्ही आयुष्य ओवत असतो
हे माझं, ते माझं, काहीच नसतं कायमचं
जिप्सींनी कधीच कुठंच नसतं गुंतायचं
नवी जागा, नवे रिवाज, जीवनाची नवी वळणं
स्विकारत अलिप्त
नियती नेईल तिथे, पुढेच जायचं असतं
जिप्सींनी कधीच कुठेच गुंतायचं नसतं
- Read more about जिप्सी
- 4 comments
- Log in or register to post comments
- 3714 views