Skip to main content

जंत

-----जंत-----
शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी?
वृत्ती जन्मल्या आता, दावया तुका खोटी
मिथ्या मोहती जना, भाषणे भली मोठी
कणा विकुनी रतीसी, केसाने गळा घोटी
दावी संवेदना जना, तोडती मास बोटी
म्हणे वासना पाप, परी तमाखु न सुटी
दंभ दाडुनी गर्भी, साधी मधूशब्द ओठी
चढी पटावर लगबग, लंगडत हारांसाठी
सांगी गर्वाने जना, आम्ही शुक्र संतामठी
कळे कधी तयांसी, मलमूत्र ते संतासुटी
नचं व्यवहार परी ,परदुःखे सुखी होती
संघर्षात अंतरीच्या, हारूनी पेढे वाटी
प्रकाश सर्वत्र तयांचा, अंधार बुडिदेठी
अशेही उत्सरती कच्चर, जंत संतापोटी

रेट्रो स्ट्रीट : अर्थात जुन्या गाण्यांच्या गप्पा (भाग २)

पहीला भाग - http://aisiakshare.com/node/7087

Roxette - The Look
पहील्यांदा ऐकले. ड्राइव्ह करताना हे गाणे रेडीओवर वाजत होते. I found it heady.
.

_______________________________

स्पर्धा का इतर?

माझा गोड बालवाडी शिक्षक

bahurupi p l deshpande

मुंबईच्या उपनगरात राहणाऱ्या, मराठी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या, घरी टेपरेकॉर्डर, टीव्ही असणाऱ्या आणि लायब्ररीसाठी पैसे मागितले तर लगेच मिळणाऱ्या अनेक लोकांच्या आयुष्यात हा माणूस जशा प्रकारे आला त्याचप्रकारे माझ्याही आयुष्यात आला. त्याने माझं वाचनविश्व समृद्ध करून टाकलं.

ललित लेखनाचा प्रकार

कीडा

प्रत्येक जीव आपली गुणसूत्रे पुढे जावीत या दृष्टीने आटोकाट प्रयत्न करतो हे ऐकून आहे, परंतु माझ्यासारखे जीव या गुणाला काही वेगळाच आयाम आणि खोली बहाल करतात.
.

गायिले मी गाणे आपुल्या मनात l

चार पाच वर्षांपूर्वी आतल्या उलथापालथेनं नव्यानं जगायला शिकले, म्हणजे कसं असतं,कशा कशांचा निकाल लागायचा, तो लागून झाला की, पुढचा प्रवास सोप्पा. इथं प्रश्न तब्येतीचा होता. शरीर दिसायला ठीक ठाक असलं तरी आत पडझडलेलं , जबाबदारीच्या नशेत सगळ्याकडं सफाईनं दुर्लक्ष झालं, सगळं सगळं साचून एकदाच समोर आलं तेव्हा खरं तर चाळीशी पार करत होते. भलं- बुरं समजलं होतं. आणि ते समजायला ती वर्ष पार करून यावं लागतं तेव्हा ते समजतं हे ही समजलं होतं. आता स्वतःला वेळ दिल्याशिवाय आपलं काही खरं नाही हे मनोमन पटल्यानं स्वतःला बघायला लागले.