उजेड
भरपूर उजेड आहे इथे.
इतका उजेड मला झेपेल का?
इतका उजेड मला पुरेल का?
हा उजेड माझा व्हायला हवा.
करू अशी आशा?
आहे मला परवानगी?
की नकोच?
जराशी तिरीप आणि
कुणीतरी तारस्वरात भुंकू लागतो.
कुणी हिडीस नाचत ती तिरीप कापून टाकतो
बरेचसे चोची मारतात
तरीही उजेड हवाय मला.
माझा माझा.
तळघराचा तळ गाठून झाला असावा.
आता बाहेर यायचंय.
हवा, पाणी, उजेड सगळ्यांचाच असतो.
माझा वाटा हवाय.
- नी
- Read more about उजेड
- 3 comments
- Log in or register to post comments
- 3743 views
ज्योतिष चर्चा २०१९
ज्योतिष ही मौजमजाच आहे हे जोपर्यंत कठीण प्रसंग आपल्यावरच शेकत नाहीत तोपर्यंत कुणीही मान्य करेल. एखादी व्यक्ती कशी वागेल हे त्याच्या राशीवरून ( born under star) थोडीफार कल्पना येते. तर अशा गमतीजमतींसाठी हा धागा वेगळा काढतोय.
ज्योतिष न कळणारे, त्यावर विश्वास नसणारेही अनुभव लिहितीलच. आता या धाग्यातून त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा अजिबात हेतू नाही. झालेल्या घटना, व्यक्तींच्या कुंडल्या पाहून त्यातून स्टॅटिस्टिकल डेटा वापरून अमुकएक टक्के शक्यता असते/नसते अनुमान काढण्याचे बरेच प्रयत्न झाले आहेत. हे सर्व जमेस धरून थोडा टैमपासअन टवाळकीला भरपूर वाव आहेच.
- Read more about ज्योतिष चर्चा २०१९
- 7 comments
- Log in or register to post comments
- 8710 views
खरडफळा फुलबाज्या - ज्योतिष
डिस्क्लेमर-
ज्योतिष शास्त्र आहे की नाही? .......................... माहीत नाही.
कुंडली मांडता येते, गणिती द्न्यान आहे? ......................नाही अर्धवट माहीती आहे. व मुख्य थोडाफार पडताळा आहे.
ज्योतिषविषयी प्रश्न विचारला तर उत्तर देता येइल? ...................... डिपेन्डस!
मला ज्योतिषविषयक माझे काही अनुभव सांगायचे आहेत - जरुर! स्वागत आहे. त्याकरताच हा धागा आहे.
ज्योतिषविरोधी एकाही प्रश्नावर मी गिल्ट ट्रिप वर जाणार नाही आणि प्रश्नाकडे सोईस्कररीत्या दुर्लक्ष करणार आहे. तरी चालू द्या.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about खरडफळा फुलबाज्या - ज्योतिष
- 47 comments
- Log in or register to post comments
- 40442 views
शोध
शोधत होतास जिवाच्या आकांतानी मला, तेव्हा होते मी तुझ्याच पाठीशी उभी
काल आजची गोष्ट नाही, मी आहे अनादि, अविचल, अन कालातीत।
पहाते आहे तुझी धडपड माझ्यापर्यंत पोहोचण्याची, निरंतन आणि निष्प्रेम
तुला पार करावी लागतील युगे आणि शिकावे लागतील करुणा आणि त्यागाचे धडे।
जमलंच करायला हे सगळं, तर दिसेन मी तुझी वाट पहात तुझ्याच पाठीशी उभी
पण वळून मात्र पहावं लागेल, जाणिवेचा हात धरून आणि प्रेमानी डोळे भरून।
- Read more about शोध
- Log in or register to post comments
- 1958 views
रंगमयी...रसमयी बाणाची कादंबरी!!
रंगमयी .... रसमयी बाणाची कादंबरी !!
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about रंगमयी...रसमयी बाणाची कादंबरी!!
- 11 comments
- Log in or register to post comments
- 14438 views
माझे पोहे
आज मी पोहे करायला घेतले. किती वर्षांनी करत होतो कुणास ठावूक. आईला फोन केला अन् सगळं विचारून घेतलं. मग त्यानुसार पोहे घेतले. निवडले. भिजवले. मग कांदा चिरायला बसलो. 2 चांगले कांदे चिकार वेळाने रडत रडत चिरून झाले. मग स्टो पेटवाय घेतला. गॅस संपला होता ना. मग स्टो पेटवून बघितला. पेटेना. हलवून बघितला. रॉकेल संपले होते. मग रॉकेल भरले. पुन्हा चालू केला पण तरी पेटेना. नंतर पंप उपसून बघितला. वायसर बिघडलेला दिसला. तोपर्यंत हात सगळे काळेमिट्ट झाले होते. वायसर फिरवून बघितला निघता निघेना. मग तसंच खुपसून पुन्हा चांगलं 20 वेळा पंप मारला. तरी पेटेना.
- Read more about माझे पोहे
- 13 comments
- Log in or register to post comments
- 8911 views
‘इनसाइड द एम्प्टी बॉक्स' - चित्रं आणि शब्द आणि चित्रकार-लेखक प्रभाकर बरवे
कलांच्या सहवासाने मनाची श्रीमंती वाढते, मन अधिक समृद्ध होते ह्याचा अनुभव नुकताच घेतला. मुंबईतील NGMA येथे भरवलेले ‘इनसाइड द एम्प्टी बॉक्स - प्रभाकर बरवे यांच्या मूळ चित्रांचे प्रदर्शन’ बघितले आणि वाचलेदेखील. काही व्यक्ती ह्या निव्वळ कलावंत असतात तर काही त्यांच्यातील माणसासह कलावंत असतात. प्रभाकर बरवे यांचं दुसर्या प्रकारात सामावलेलं ह्या रुपाची त्यांच्या चित्रांतून-डायर्यांतून भेट झाली.
स्पर्धा का इतर?
- Read more about ‘इनसाइड द एम्प्टी बॉक्स' - चित्रं आणि शब्द आणि चित्रकार-लेखक प्रभाकर बरवे
- 11 comments
- Log in or register to post comments
- 11183 views
कहाणी स्त्रीपुरुष समानतेची

ऐका स्त्रीपुरुष समानते तुमची कहाणी.
- Read more about कहाणी स्त्रीपुरुष समानतेची
- 17 comments
- Log in or register to post comments
- 16628 views
सजले अंतर
नाही माझ्या आसवांना तुझ्या श्रावणाची सर
वाट चिंब ही भिजली आणि सजले अंतर
दारी निघताना होती पागोळ्यांची मध्यलय
जणू सोबतीला आले तुझ्या संतूरीचे स्वर
विसरलो गेला कसा सारा दिवस सरून
झाली दिवेलागणी अन्, मन कातर कातर
काजळले क्षितिज हे, मिटल्या पापण्यांसम
चमकत्या मोतियांची नवी लेवून झालर
प्रश्न नाही आला मनी, नाही यायचाही कधी
जाणशी तू सारे आणि मला ठाऊक उत्तर
मातीतून मातीकडे असा मृद्गंधी प्रवास
ज्यात एक एक झाला श्वास श्वास हा ईश्वर...
- कुमार जावडेकर
- Read more about सजले अंतर
- 6 comments
- Log in or register to post comments
- 5242 views
नकळत सारे घडले ४
हे एक विडंबन आहे हे कायम लक्षात असू द्या!!!!
दुसरा: सर, आपलं एफ१६ जरी पडलं असलं तरी त्या अगोदर आपल्या वैमानिकाने भारतात जाऊन तिथे मिझाईल डागलं याचा मला अभिमान वाटत होता.
पण त्याचाही नेम चुकला.
फुरफुर: कुठे धरला होता:
दुसरा: धरला नव्हता. धरणार होता.
फुरफुर: (जरा ओरडून) अरे पण कुढे?
दुसरा: भारतीय ब्रिगेडच्या मुख्यालयावर.
फुरफुर: पुढे
दुसरा: ती मिग२१ अपेक्षेपेक्षाही लवकर आली. जणू भुताटकी झाली.
फुरफुरः ?????
- Read more about नकळत सारे घडले ४
- 2 comments
- Log in or register to post comments
- 1995 views