Skip to main content

सात्विक संतापातली नैतिकता

आज आमचे एक मित्र - त्यांची बदनामी टाळण्यासाठी त्यांचं नाव सांगत नाही - यांच्याशी फोनवर गप्पा झाल्या. तेव्हा नैतिकतेचा विषय निघाला. कॉपी करणं वगैरे. त्यावरून आठवलं.

रेट्रो स्ट्रीट : अर्थात जुन्या गाण्यांच्या गप्पा

तर असं झालं , मालक अदिती यांनी खोडी काढली बेस गिटारसंबंधी. ते काय असतंय वगैरे. आणि मग बराच कुटाणा झाल्यावर त्या म्हणाल्या कि मला ( नेहमीप्रमाणे ) हे सगळं माहितेय वगैरे. पण असो . तर खरडफळ्यावर गप्पा वाढत गेल्या. गविशेठ , शुचि मामी , भटोबा , नील लोमस , चौदावा धूमकेतू आणि मालक अदिती , कधीकधी चक्क थत्ते वगैरे . चालकमालक जंतू कावणार असं गृहीत धरून खरडफळ्यावरून चर्चा धाग्यावर आणायचं ठरवलं ( पण जंतू कावलेच नाहीत , )गवि शेठनी नाव सुचवलं म्हणून देऊन टाकलं रेट्रो स्ट्रीट.

स्पर्धा का इतर?

भाषा

जिंकण्याची, हारण्याची सारखी भाषा कशाला?
तारण्याची, मारण्याची सारखी भाषा कशाला?

देव अथवा देश दोन्हीं कल्पना या माणसांच्या
व्यर्थ त्यांनी भारण्याची सारखी भाषा कशाला?

माणसांनी घेत जावी काळजी; पण - माणसांची
देवळे उद्धारण्याची सारखी भाषा कशाला?

रोज थोड्या मिळकतीने जुळवतो मी दोन टोके
कर नवे आकारण्याची सारखी भाषा कशाला?

मानतो मी एक बिंदू-मात्र आहे या जगी पण -
सूक्ष्मता स्वीकारण्याची सारखी भाषा कशाला?

- कुमार जावडेकर

रस्त्यावरची भांडण

प्रत्येकाची घर/शाळा/ऑफिस सोडून रस्तात/रेल्वेत/विमानात भांडण होतातच. काही वेळा वेळ मारामारीवर येते. मला असे तीन वेळा अनुभव आलेत. तुमचे पण अनुभव वाचायला आवडतील.
प्रसंग १ कॉलेज
एप्रिल महिन्याच्या कडक दुपारी मी एकटाच कॉलेजहुन बस स्थानक का कडे परतत होतो. तेव्हा रस्तात माझ्यापेक्षा वयाने जरा मोठे आणि शरीराने जास्त मोठी अशी दोन मुले आडवी आली. बहुतेक ती लोकल असावी, तोंडात गुटखा आणि हातात टच स्क्रीन फोन. (तेव्हा बहुतेकांकडे 0 ते ९ *# वाले मोबाईल असायचे)
मला अडवून विचारणं सुरु केलं की तू माज्या आते की मावस बहिणीच्या मागे का लागलास? इ इ.

सत्ता, पैसा और डर

एक मर्तबा सत्ता , पैसा और डर
आपस मे रहे थे लड़
यू हुआ की ऐसे,
सत्ता को लगा मै बलवान
मै अज़ीम, पैसा और डर मेरे गुलाम।

पैसा बौखलाहटकर बोला,
मै कैसा गुलाम?
दुनिया मुझसे चलती है,
जो मै चाहू करवा सकता हूँ,
तो काहे का मै गुलाम, मै सिकंदर।

पैसा हँस पडा, कहने लगा
मै हूँ दुनिया मे इसलिए
सत्ता तू तो रौब जमाता है,
मेरा गुलाम तो डर है,
जो मै चाहू उससे करवाता हूँ।

सत्ता झिझककर बोला,
मै न होता तू कैसे बढ पाता,
तेरी आन-बान-शान मुझसे है,
मेरा जब तक है तख्त़,
तब तक तू है सख्त़।

टाळ्या

आमच्या एव्हिएशनच्या फील्ड मध्येच एक रुबाब आहे बॉस!
कोणाला ते ताठ चालणारे युनिफॉर्ममधले पायलट आठवतील,
कोणाला तो टॉप गनमधला रे-बॅन लावलेला चिकणा टॉम क्रूझ आठवेल,
कोणाला दुसऱ्या महायुद्धातली B-52 बॉम्बर्स आठवतील...
पण मला सांगू काय आवडतं?

तो फ्लाईन्गचा नशा, ती डोक्यातली हलकीशी गरगर,
तें गुईईईईं करून खाली येणं आणि झप्पकन वर जाणं,
ते डौलात फिगर ऑफ एट काढणं...
खाली खेचणाऱ्या ग्रॅव्हीटीला एफ ओ देत उंच उंच जाताना हवेत पंखांनी रेखलेल्या त्या रेषा!

मेकप मेकप मेकप!

एकेकाळी - म्हणजे इसपू वगैरे काळातच साधारण - लोकांचे मेकअप करायचे मी. ब्रायडल, नाचाचे, शाळेच्या गॅदरींग्जचे वगैरे.

ललित लेखनाचा प्रकार

मी, उडू , पक्षी आणि परब्रह्म

मी, उडू , पक्षी आणि परब्रह्म

मी पक्षी कसा झालो याची गंमत किंवा गोष्ट किंवा गंमतगोष्ट सांगावी म्हणतो. आता पक्षी झालो म्हणजे कोणाच्या शापाने वगैरे नाही हां, पुराणकथा नाही ही, म्हणजे मी पुराणांपेक्षाही पुराणा असलो तरीही या गोष्टीचा आणि पुराणाचा काहीही संबंध नाही. अगदी आपखुशीनं पक्षी झालो मी , थोडा माझ्याही नकळत; आणि यात शापापेक्षाही वरदानाचाच काही संबंध असावा.

ललित लेखनाचा प्रकार

चलो कुंभ चले ऽऽऽऽ

माझ्या अबोध मनात कुंभविचाराची रुजवण एके दिवशी सकाळी लोकसत्तेसोबत आलेलं कुंभमेळ्याचं रंगीबेरंगी, रंजक प्रसिद्धीपुस्तक बघून झाली होती. फेसबुकवर पत्रकार शर्मिष्ठा भोसलेचे कुंभवृत्तांत वाचून विचार बळकट होऊ लागला. एका कलीगने, तुम्ही हा अनुभव घ्यायलाच हवा, योगीच मुख्यमंत्री असल्याने सुव्यवस्थेच्या दृष्टीनं हा कुंभ न भूतो न भविष्यती आहे अशी खात्री दिली.या आधीच्या एका कुंभाला तो बरेच दिवस राहून आला असल्याने त्याचे अनुभवाचे बोल मानून जायचं नक्कीच केलं.सध्या प्रवासी भारतीय असलेल्या मैत्रिणीला विचारलं तर ती माझ्यासोबत कुंभ धाडसाला एका पायावर तयार होतीच.