Skip to main content

भीमाशंकरच्या लाकूडचोरीची गोष्ट

तर ते दिवस होते पेटलेले . निसर्गप्रेम , निसर्गसंवर्धन , निसर्गरक्षण वगैरे .
तर झाले असे कि आम्ही तीन चार मित्र नेहमीप्रमाणे भीमाशंकरला गेलो होतो. दिवस उन्हाळ्याचे . अजेंडा होता की पक्षी नेहमीचेच झाले , यावेळी जरा या जंगलातील प्राणी बघुयात. रात्री. भीमाशंकरमधील एक आटत आलेले तळे ही जागा ठरली. साधारणपणे त्याच्या कडेच्या एका कोपऱ्यात काळ्या स्लीपिंग बॅग्समध्ये रीतसर लपून , दबा वगैरे धरून आम्ही संध्याकाळी बसलो . ( सर्वसाधारणपणे प्राणी पाण्यावर संधिप्रकाश आल्यानंतर मध्यरात्रीपर्यंत एकापाठोपाठ पाणी पिण्याकरिता येतात , अशी माहिती होती )

३६

गुरुजी आणि गायन शिकणे या लेखावरून आठवलं. पाचवीत/सहावीत होतो. मराठी माध्यम अनुदान मिळणारी ( सरकारी ग्रान्ट) शाळा. गायन विषय शिकवायला मास्तर ठेवायला परवडत होतं. शाळेची फी पाच रु, जवळच्याच खासगी संगीत विद्यालयात गायन/वादन फी दहा रु आठवड्यास दोन तास. पाचवी ते सातवी गायन विषय होता, चित्रकलाही.

तुझ्या कवितेची ओळ

तुझ्या कवितेची ओळ
अवचित ओठी येते
जिंदगीच्या निवडुंगा
इवलेसे फूल येते

तुझ्या कवितेची ओळ
अवचित ओठी येते
कालियाच्या डोहातून
कृष्णधून उमटते

तुझ्या कवितेची ओळ
अवचित ओठी येते
पाखराच्या लकेरीने
गचपान थर्थरते

कवितेची ओळ तुझ्या
पुन्हा पुन्हा ओठी येते
पुन्हा पुन्हा रुजूनिया
पुन्हा पुन्हा उगवते

कथा - माझा बहावा

कथा - माझा बहावा
-------------------------------------------------------------------------------------------------------------

वसंत ऋतूपासून बहाव्याची झाडे फुलू लागली आहेत .
त्या बहाव्यांना समर्पित .

वसंतात फुलावा- मनाचा बहावा ,
त्याचा बहर -कोणी डोळे भरून पहावा !
-------------------------------------------------------------------------------------------------------------

ललित लेखनाचा प्रकार

नदी

युलियान तुविम हा पोलिश कवितेतला एक हिराच. तुविमची लेखकीय कारकीर्द विविधतेने भरलेली आहे. उछ या शहरात १८९४ साली त्याचा जन्म झाला तर १९५३ साली मृत्यू झाला. ज्यू कुटुंबात वाढलेल्या तुविमचं संपूर्ण जीवनच संघर्षमय आहे, त्यात स्वतःच्या देशाचा शोध आहे. त्यामुळे त्याची राजकीय कविता फार ताकदीची आहे तरीही त्याची कवी-प्रतिभा तिथेच थांबत नाही. बि-बा-बो कॅब्रेचा एक महत्वाचा लेखक हा आज पोलिश साहित्य क्षेत्रामध्ये सर्वोत्कृष्ट बालकविता लिहिणारा कवी म्हणून ओळखला जातो. त्याच्या लहान मुलांच्या कविता या - double audience - ची उत्कृष्ट उदाहरणे आहेत.

आवडती नावडती शहरं (आणि गावं!)

"खरडफळा ही धाग्यांची जननी आहे" असं एक अनाम लेखक म्हणून गेलाच आहे
तद्वत ही चर्चा सुरू करतो आहे.

आपण एखाद्या शहरात किंवा गावात जन्मतो. बरेचदा आयुष्यभर तिथेच राहून ते ठिकाण "आवडून घेतो". मग त्या जागेला नावं ठेवलेली आपल्याला आवडत नाहीत.
केल्याने देशाटन .. मनुजा चातुर्य मिळतसे फार हे आईशप्पथ खरं आहे.
म्हणजे इतर जागा पाहिल्या. नवे देश, नवी ठिकाणं दिसली की वाटतं - च्यायला. असंही असू शकतं!
तर उद्देश हा की - तुमच्या आवडत्या शहरांबद्दल (आणि गावांबद्दलही ) सांगा- की तुम्हाला त्यातलं काय आवडतं/काय आवडत नाही वगैरे.
खास नावडत्या जागांबद्दलही नक्की सांगा.