Skip to main content

पुस्तक परीक्षण - युगंधर

पुस्तक परीक्षण - युगंधर: शिवाजी सावंत (लेखक: निमिष सोनार, पुणे)

2018 साली युगंधर मी एक अतिशय महत्त्वाची कादंबरी वाचली. सलग नाही तरी थोडी थोडी रोज अशी वाचली. "युगंधर" ही शिवाजी सावंत यांची मी वाचलेली पहिलीच कादंबरी. महाभारत, कृष्ण, भगवदगीता आणि श्रीमदभागवत या विषयांवर मला अखंडपणे वाचायला, लिहायला, चर्चा करायला आणि अभ्यासपूर्ण चिंतन करायला आवडते. याच हेतूने युगंधरही वाचली.

ललित लेखनाचा प्रकार

वाईट मुलींची टॉप टेन लक्षणं

Shanaya

येताजाता काही मराठी मालिका पाहिल्यावर मला वाईट मुलींची जी टॉप टेन लक्षणं दिसली ती ही अशी -

Taxonomy upgrade extras

व्यभिचाराच्या नावाने...

राजू आणि रूपाचे लग्न झाले. संजू आणि शिल्पा यांचेही लग्न झाले. दोन्ही जोडप्यांचा सुखाचा संसार सुरू असताना अचानक एक दिवस राजूने संजू आणि रूपाला नको त्या अवस्थेत पाहिले. आता राजूने हा प्रकार बघितल्यावर रूपाला अद्दल घडावी अशी त्याची मनापासून इच्छा होती. तो जवळच्या पोलीस ठाण्यात गेला. त्याने संजू आणि रूपाविरुद्ध तक्रार दिली. पोलीस म्हणाले, रूपाला आरोपी करता येणार नाही. कायद्यानुसार फक्त संजूलाच आरोपी करून त्याचेविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करता येईल.

च्या मारी लय भारी , आपली लव्हस्टोरी एकदम न्यारी

च्या मारी लय भारी ,

आपली लव्हस्टोरी एकदम न्यारी

दिल अपना दरवाजा है तो वोह है समुंदर

तेरे सामने कोई नई

तूइच मला है सुंदर

तुझ्यासाठी सोडली मी जानू

माझी वडिलोपार्जित प्रॉपर्टी

मी एकुलता एक खानदानाचा

तर तू शिरीमंताची कार्टी

नारळीपोफळीच्या बागा होत्या

होते नारळ लटकलेले

तुझे नारळ बघितले

सरळ प्रॉपर्टीमधून हात झटकले

त्यादिवसापासून ते स्वप्नात येऊ लागले

डोळ्यासमोर हलू लागले

कल्पवृक्ष का म्हणतात हे पटू लागले

ठरवून टाकले मनाशी सरळ

पाहिजेत मला हेच नारळ

शहराकडून "बा" चा फून आला

शहराकडून "बा" चा फून आला

केल्या केल्या विचारू लागला

कोण टाकून गेला

लेंडूक आपल्या शेतामध्ये

म्या म्हटलं

माझ्याशिवाय हाय कोण इथं

तुमास्नी ह्ये कोण बोललं तिथं

"बा"ने घपकंन हासडून शिवी

लावली गाडीस चावी

निघाला परतीस गावाकडं

म्या धावलो धपाधप

लेंडूक शोधाया शेताकडं

घेता वास चहूकडं

नाक साफ चोंदून गेलं

च्या मारी माझ्या अपरोक्ष

कोण शेत शिंपून गेलं

घेतली कुदळ फावडी

कराया खाली वर माती

फुले पसरली चहुकडं

जागोजागी लावली उदबत्ती

एक वेळ अशी येते कि

एक वेळ अशी येते कि

तुम्हाला झाडं जवळची वाटू लागतात

तुमच्याशी फुलं बोलू लागतात

सारे पक्षी तुमच्याकडेच बघून उडतायत

असं वाटू लागलं

कि समजा तुमची प्रेमळ पहाट झालीय

दूर मनाच्या आकाशात

एक प्रेमाची चांदणी उगवलीय

ती जशी टीम टीम करू लागेल

तसं प्रेम पसरेल चराचरी

नखशिखांत बनवेल प्रेम पुजारी

सुचतील रात्रीबेरात्री नवीन उखाणे

भल्या पहाटे द्याल कबुतरांस दाणे

गप्प घालाल विवेकानंदांची घडी

तोंडाचा होईल चंबू अन नजर सताड उघडी

मायबापास वाटेल जेव्हा

तुमचा काहीतरी बिघाड झालायं

भेटी लागी जीवा: आत्तापर्यंत काय घडले?

भेटी लागी जीवा: आत्तापर्यंत काय घडले? लेखक: निमिष सोनार, पुणे

सोनी मराठी या वाहिनीवरची "भेटी लागी जीवा" ही खूप चांगली सिरीयल आहे. स्टार प्लस महाभारतातील शंतनू, कलर्स वरच्या सम्राट अशोक मधला बिंदुसार आणि सोनीवरच्या बाजीराव पेशवा मधला शाहू महाराज या दमदार भूमिकेनंतर बऱ्याच काळानंतर समीर धर्माधिकारी मराठीत आलेला आहे! आतापर्यंत "भेटी लागी जीवा" मध्ये काय घडले हे येथे मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे यापुढचे एपिसोड जरी तुम्ही बघितले तरी ते समजतील!

ललित लेखनाचा प्रकार

मी भाग्यवान

अलीकडे "राहून गेलेल्या गोष्टी" हे सदर पाहिलं. पण आपल्याला मिळालेल्या म्हणजे लाभलेल्या गोष्टींचीही दखल घ्यावी असं वाटलं. निमित्त झालं आज बऱ्याच दिवसांनी माझ्या प्राथमिक शाळेतल्या शिक्षिका चिणेबाई यांच्याशी फोनवर बोलणं झालं. बोलता बोलता त्यांनी विचारलं, बिझी असतेस का खूप, मी सांगायला तोंड उघडणार होते – या सत्रात मी तीन पेपर शिकवतेय, शिवाय डिसर्टेशनसाठी दोनजणी... – धाडकन गप्प बसले. प्रथमिक शाळेत प्रत्येक वर्ग हा एकशिक्षकीच होता. गणित, भाषा, विज्ञान, इतिहास, भूगोल.. सगळं त्या एकहातीच शिकवायच्या. शिवाय चौथीच्या स्कॉलरशिपसाठीचे वेगळे तासही शाळेतच व्हायचे त्यातही त्या शिकवायच्या.

जोर काढुनी पोर काढलं , काट्यावरचं बोर निघालं

जोर काढुनी पोर काढलं

काट्यावरचं बोर निघालं

ऐन उमेदीत रंग दाखवलं

कार्ट सालं क्रूर निघालं

नाना स्वप्नं पाळण्यातली

अश्रूं बनली पापण्यातली

स्मरती कर्मे मागली पुढली

काठी साली कमकुवत निघाली

मी पण देखील हेच केले

उगाच वाही अश्रुंचे नाले

का दोष त्या नशिबाला ?

पुसले का कधी आईबापाला ?

{सिद्धेश्वर विलास पाटणकर}

बेडूक उड्या - लहान मुलांसाठी यूट्यूब चॅनल

भूमिका बदलतात आणि बदललेल्या काळाची ओळख होते. पालक झाल्यावर लहान मुलांनी ऐकायची गाणी, गोष्टी याचे बदललेले अवतार समोर आले. आता मुलांना वाचायला पुस्तकं कमी आणि बघायला व्हिडिओज जास्त आहेत हे लक्षात आलं. या नव्या डिजिटल माध्यमात असलेलं मराठी बालसाहित्य मात्र पालक म्हणून मला कधी तुटपुंजं वाटलं तर कधी उथळ. कुठलाही दृश्याचा आधार नसताना फक्त एकदा ऐकून पाठ होणाऱ्या कविता, आजही संपूर्ण आठवणाऱ्या गोष्टी, हसत खेळत म्हटलेली बाराखडी, पाढे हे सगळं बदललेल्या डिजिटल माध्यमात पुरेसं उपलब्ध नाही असं लक्षात आलं.