Skip to main content

(वाईट) साईट-सीईंग

कॅनियनच्या वरती पडूनी अडवे फोटो किती काढिले
सेल्फीस्टिक अति वापरून उलटे-सुलटे स्वत: पाहिले
इन्स्टाग्रामवरी करून पोष्टी, फेस्बुक लाईवही
केले फीड सुरू, बघून ललना ब्लॉन्ड-सुबक-ठेंगणी!

दगडांच्यातच काय हीस दिसते ढमके? मना वर्तले
अस्मादिक-मुख-चंद्र-बिंब दिसते उजवे कुणी बोलिले!
त्याला 'थॅन्क्यु ब्रदर' म्हणू तरी कसा, दांताळ उचकाटुनी
गोची काहीतरी असे, न समजे, त्याच्या रिमार्कातली!

उठलो, पॅन्ट झटकलीच पुरती धूळीत जी माखली
आणिक् उचलाया स्मरून वळलो बॅकपॅक् कॅमलची,
एकदम पाठीच्या कण्यात चमके, कळ जीवघेणी अगा
उठतो का बसतो! गमुनि दिवसा तारेच म्या देखिले!

मी टू - बाई गं, तू एकटी नाहीस!

२००७ सालची गोष्ट आहे, मी स्टार न्यूजमध्ये (आताची एबीपी) काम करत होते. श्रीलंकेत होणा-या दक्षिण आशियायी देशांच्या माध्यम प्रतिनिधींच्या 'साफमा' या संघटनेच्या वार्षिक बैठकीसाठी मला आमंत्रित करण्यात आले. त्यावेळी मुंबईहून अजून एक पत्रकार येणार होते, पण काही कारणाने त्यांचे येणे रद्द झाले. मी श्रीलंकेला पोचले, त्यावेळी विमानतळावर कोणीही हजर नव्हते. बहुदा मुंबईहून कुणी येणार आहे, याची त्यांना कल्पना नव्हती. कसेबसे राहण्याचे स्थळ शोधून काढले, बॅगा टाकल्या आणि शोधत शोधत 'साफमा'च्या गेटटुगेदरला जाऊन पोचले. यजमान देशातर्फे प्रतिनिधींच्या स्वागताचा कार्यक्रम होता.

बळीराज किंकर अख्नंडीत माझे

छन्दीष्ट्य वातावरणी
जर्जर धारा हि सारी
जरब कायम असे दिनकराची
दुर्भिक्ष्य ते जान्हवीचे पाणी II

यति नग सारे
काष्ठ मांडी हाट सारा
त्रागा मरुत वाही
रिक्त अंबार सारे II

कंगाळ बळीराज
करी मख
घेउनि नांगर हाती
अर्ध्वयु अवतरती स्वअभ्युदयासि II

अक्षर आरोहण अर्ध्वयु
ते साधे
अनृत अनुज मानुनी
बलीराजासी
उध्रुत उधम इंद्रजाल सारे
बळीराज किंकर अख्नंडीत माझे II

{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }

कोडे - चवळीचे दाणे

(१) चवळीच्या दाण्यांचे १० पेले आहेत.
(२) प्रत्येक पेल्यात १०० चवळीचे दाणे आहेत.
(३) १० पैकी ९ पेल्यात, प्रत्येक दाणा १ ग्रॅमचा आहे.
(४) १० वा जो पेला आहे, त्यातील प्रत्येक दाणा ०.९ ग्रॅमचा आहे.
(५) तो विशिष्ठ् पेला कोणता ते माहीत नाही. डोळ्यांना कळू शकत नाही.
(६) एक तराजू आहे.
(७) त्या तराजूत फक्त एकदाच वजन करता येते. परत नाही. कारण एकदा वजन केल्यानंतर तो तराजू अदृष्य होतो.

कोडे - तो तराजू वापरुन, तो पेला कसा ओळखाल?
_________________
उत्तर मलाही माहीत नाही. मी प्रयत्नच करते आहे :)

टेस्ला आणि इलॉन मस्क - भाग 2.

मस्कचा सीक्रेट प्लॅन!

2008 साली टेस्लाची 'रोडस्टर' नावाची स्पोर्ट्सकार विक्रीला आली. आणि अर्थातच त्या गाडीवर उड्या पडल्या. 80 सालच्या सुमाराला सोनीचा वॉकमन घ्यायला लोकांनी खिशातून भरमसाठ पैसे काढून दिले तसंच काहीसं. गाडीची किमान किंमत होती एक लाख दहा हजार डॉलर. पण हे दाढीचे, हे मिशीचे म्हणत दीड लाखांपर्यंत सहज जात होती. लोकांनी तेवढे दिलेही एवढं काय होतं तिच्यात?

भयकथा: त्या वळणावर..

"भेटलास का तू धर्मेंद्र साहेबांना? झालं ना तुझं काम?", जितेंद्र मला फोनवर म्हणाला.

"अरे, काम झालं. अगदी मनासारखं. हा क्लायंट मला मिळाला. धर्मेंद्र साहेबांकडे माझ्याखातर शब्द टाकल्याबद्दल धन्यवाद. मी त्यांच्यासोबत चांगला बिझिनेस करून त्यांचे मन जिंकेल, चांगल्या दर्जाचे प्रॉडक्ट त्यांना देऊन तू त्यांना माझ्यासाठी दिलेला शब्द सार्थ करून दाखवेन!", मी म्हणालो.

आता रात्रीचे आठ वाजून गेले होते. हे काम सहा वाजता आटोपणार होते पण होता होता या ना त्या कारणाने उशीर झाला.

ललित लेखनाचा प्रकार

माळढोक पर्वाचा अंत झाला

माळढोक पर्वाचा अंत झाला

आता हळूहळू माळरानही संपेल

अशीच भूक वाढत राहिली

तर उद्या फक्त माणूसच उरेल

तो डौलदार असेल ,

रुबाबदार असेल

तो कसा होता ?

ते मात्र आता पुस्तकात दिसेल

त्याचाही पुतळा बनेल

निर्लज्जासारखे रोवत सुटतील त्याला

प्रत्येक बागेत

किंवा करतील त्याची पेंग्विनसारखी थुकदाणी

आणि लीहितील त्यावर " माझा खाऊ मला द्या "

मी फक्त ऐकलं होतं त्याच्याबद्दल

भरभरून मिळणाऱ्या अनुदानाबद्दल

निसर्गप्रेमींच्या त्यागाबद्दल

अन गहाणवट पडलेली सरकारी अक्कल

अध्यात्माला विनोदाचे वावडे नाही :)

अध्यात्मिक स्तोत्रे, मंत्र, पोथी, पुराणे वाचत असतेवेळीच लक्षात आले होते की स्तोत्रांतही बरेच प्रकार आहेत, स्तुती, कवच, भुजंगस्तोत्रे, अष्टके,नामावली, अभंग आणि अन्य काही. स्तुती, अष्टके आणि भुजंगस्तोत्रे. या प्रकारांत देवांचे स्तुतिपर वर्णन असते, अनेक सुंदर उपमा, रुपकांच्या लडी उलगडतात ज्या की मंत्रमुग्ध करुन सोडणाऱ्या असतात, उत्कृष्ट असे काव्याचे नमुने असतात. याउलट कवचांमध्ये काहितरी मागितलेले असते. उदाहरणार्थ त्या देवतेची विविध नावे गुंफुन माझे पूर्वेकडुन शंकर, पश्चिमेकडुन वामदेव, दक्षिणेकडुन त्र्यंबक, प्रवासात स्थाणु .... वगैरे रक्षण करो. म्हणजे यात देवांना कामाला लावलेले असते.उदा.-\

ललित लेखनाचा प्रकार

दुर्दम्य

नाव हाकारुन दर्यामध्ये जमीन जेंव्हा केली दूर
आणि नक्षत्रांवर नजर ठेवत, गेलो शीड फुगवून,
वल्हे मारत क्षितीजाकडे, तेंव्हा लक्षात नाही आली
वाऱ्यांची मनमानी आणि वल्ह्यांची ताकद.
पिचलेली.

उत्तुंग शिखरांच्या विक्राळ वळणांवर
ठेवलं पाऊल पहिलं आणि बिलगलो कातळांना
जिवाच्या करारानं, तेंव्हा नाही बाळगली तमा
वैशाख-वणव्यांची नी कड्यात रोवलेल्या नखांची.
रक्ताळलेल्या.

टेस्ला आणि इलॉन मस्क - भाग 1.

1981 साली मी आमच्या एका उच्चहून थोड्याशा उच्च मध्यमवर्गीय नातेवाइकांकडे गेलो होतो. त्यांच्या विशीतल्या मुलांनी मला एक त्यांचं नवीन खेळणं दाखवलं. वॉकमन. त्यात एक कॅसेट घालून माझ्या कानांवरती इअरफोन लावले आणि मला आत चाललेलं गाणं आपल्या कानांत ढाणढाण आवाजात ऐकू आलं. इअरफोन काढून टाकले की शांतता. म्हणजे हे गाणं केवळ माझ्यासाठीच चालू आहे, माझं आहे. मी काय ऐकतो आहे यावर माझा हक्क आहे, जगाचा त्याच्याशी काही संबंध नाही. आणि मुख्य म्हणजे दोनचार कॅसेट बाळगल्या तर पंचवीस तीस मला आवडणारी गाणी मी कुठेही घेऊन जाऊ शकतो, चालता चालता ऐकू शकतो.