Skip to main content

दिवसातून छप्पन वेळा

दिवसातून छप्पन वेळा
माझा चेहेरा बदलत असतो
आरश्या पाठचा अचपळ पारा
नसानसातून दौडत जातो

दोन देतो दोन घेतो
चेहेरा तेव्हा निब्बर होतो
टेक्नोमंद ठरतो तेव्हा
थोडा थोडा कोकरू होतो

कोsहं प्रश्न पडतो तेव्हा
मुमुक्षू मी असतो खास
कटिंग सोबत बिडी पिताना
मीच टपोरी टाईमपास

अचाट काही जेव्हा बघतो
अफाट काही जेव्हा ऐकतो
अतर्क्याची हाक ऐकून
अवघा चेहेरा कुतूहल बनतो

जुनी गाणी, जुने छंद,
वार्‍यासंगे विस्मृत गंध,
दर्वळतात भोवती जेव्हा
चेहेरा कवळा होतो तेव्हा

काही कोडी (नवीन कोडं: २३ ऑगस्ट)

इंटरनेट न वापरता सोडवलीत तर उत्तम :)

कोडे ४ या कमेंटमध्ये आहे
कोडे ४

कोडे 1.

हे कोडं एका सत्यघटनेवर आधारित आहे.

नोव्हेंबर १९७१

स्थळ: पोर्टलॅंड, अमेरिका

पोर्टलँडहून सिएटलला जाणाऱ्या एका फ्लाईटचं वन वे तिकीट घेण्यासाठी एक माणूस विमानतळावरच्या तिकीट काउंटर वर पोचला. त्याने त्याचं नाव "कूपर" असं सांगितलं. त्याने काळा गॉगल घातलेला होता आणि त्याच्या हातात एक काळी बॅग होती.

खानावळ - एक शतशब्दकथा

एक जुनी, सरकारी अनुदानावर चाललेली खानावळ होती.
सर्व मेंबरं, तिथे गुण्यागोविंदाने जेवत असत.
जेवण साधेच असे, रविवारी एखादी स्वीट डिश असे.
तर, हळुहळु मेंबर्सची संख्या वाढत गेली.
काही नवीन मेंबर आले.
त्यांनी रोजच स्वीट डिशची मागणी केली.
कंत्राटदार गयावया करु लागला.
शेवटी आमटीतले पाणी वाढवून, ही मागणी त्याला पुरी करावी लागली.
त्यानंतर आणखी मेंबर आले.
ते स्वतःचे स्वीट खाऊन शेजारच्याचेही मागू लागले.
जुन्या मेंबरांनी निषेध नोंदवला.
पुढे पुढे तर, ते हिसकावून घेण्यापर्यंत मजल गेली.
वातावरण फार गढुळ झाले.
नवीन मेंबरांची आपापसात भांडणे सुरु झाली.

ललित लेखनाचा प्रकार

मृत्यु दर्शन

आपल्यापैकी बर्‍याच जणांना, आयुष्यात कधीतरी, जवळून मृत्यु दर्शन झाले असेल. मलाही ते बर्‍याच वेळा झाले आहे. निव्वळ, दोरी बळकट, म्हणून त्या प्रसंगांतून सहीसलामत सुटलो आहे. त्यातील पांच ठळक घटना, अगदी नुकत्या घडलेल्या गोष्टीप्रमाणे लख्ख आठवतात.

त्रिकथा १: अंधाराची ^खरी चव

दोस्तांनो तुम्ही कधी त्या "अंधाराची चव" नावाच्या हॉटेलात गेलतात का?
आपल्या टुमदार पेन्शनर शहरात ते चालू झालं तेव्हा प्रचन्ड हाइप झालं होतं आठवतंय?
म्हणजे त्यांचा मेन सेलींग पॉईंट होता की ते आपल्या गिऱ्हाईकांना चक्क आंधळेपणाचा तात्पुरता आणि थरारक अनुभव देऊ करायचे वगैरे...

ललित लेखनाचा प्रकार

''साहित्य सेतू''कडून आलेले निवेदन

*साहित्य विषयक उपक्रमांसाठी त्वरित समन्वयक पाहिजे.*

*पुणे येथे*

मराठी साहित्य विषयक कार्यशाळा, संमेलने, प्रकल्प, वार्तांकन, व्यवस्थापन इ. उपक्रमांसाठी आणि दैनंदिन कामकाजासाठी उत्साही समन्वयक हवा आहे. स्त्री / पुरूष... मराठी साहित्याची आवड तसेच उपक्रमशीलता आणि सृजनशीलता हवी... वयाची / अनुभवाची अट नाही.

कोणत्याही विषयातील पदवी / संगणक ज्ञान आवश्यक. काही तरी करण्याची जिद्द हवी. योग्य मानधन दिले जाईल. दीर्घ करिअर आणि उत्तम प्रगतीची संधी...

*संपर्क- साहित्य सेतू*

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

दूध , आंदोलन वगैरे वगैरे : २ आणि अंतिम

दुग्ध व्यवसाय कॉटेज इंडस्ट्री छाप होता त्यावेळी दुधाचे कलेक्शन मुख्यतः सहकारी दूध संघ, छोट्या खाजगी डेअऱ्या आणि सरकारी डेअऱ्या यांच्याकडे असे. एक तर या अतिशय मर्यादित स्वरूपाच्या असत आणि तिथे व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान हे जुनाट आणि कमी दर्जाचे असे. बऱ्याच सहकारी साखर कारखान्यांच्या छत्राखाली दुधाच्या डेअऱ्या पण चालू झाल्या. मॉडेल सहकारी साखर कारखान्याप्रमाणेच. साखर कारखान्यांप्रमाणेच इथेही राजकीय उद्देश जास्त असे आणि अजूनही आहे. त्यामुळे दर्जा, नवीन प्रॉडक्टसवर काम, कार्यक्षमता वगैरे या गोष्टी दुय्यम.

सुपरहिरोंचा शोले!

"इन्फिनिटी वॉर" च्या सकाळी साडेआठच्या शोला सुद्धा फुल्ल गर्दी, शिट्ट्या, टाळ्या, हास्याचे कारंजे! पूर्ण चित्रपटभर मिस्कील विनोदी डायलॉगची सुखद पेरणी! एकेका सुपरहिरोच्या एंट्रीला टाळ्या आणि शिट्ट्या! यात भारंभार सुपरहिरो आहेत. एकामागून एक येतच राहतात. इतके की काहींचे नाव पण आपल्याला माहिती नाहीत. मी शेवटी मोजणे सोडून दिले.

समीक्षेचा विषय निवडा