Skip to main content

सोप्पंय - सगळं खापर उदारमतवाद्यांवर - प्रताप भानू मेहता

Good Morning Liberals

(प्रताप भानू मेहता यांच्या 'Blame it on the liberals' ह्या लेखाचा मुग्धा कर्णिक यांनी केलेला अनुवाद)

ही बातमी समजली का - भाग १७८

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही.

मनातले छोटेमोठे प्रश्न आणि विचार - ९५

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००+ झाले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
---

इन्क्रेडिबल्स २

Incredibles 2

सुपरहिरोंच्या बाबतीत भारतीय चित्रपटसृष्टी चाचपडत असताना हॉलीवुड मात्र याबाबत फार पुढे निघून गेलं आहे हे आज इन्क्रेडिबल्स 2 बघताना जाणवलं.

समीक्षेचा विषय निवडा

काला, करिकालन... कालदेव...

डिसक्लेमर....

काला सिनेमा रावणाचा आहे. रामाच्या प्रतिमेला तोडत फोडत रामचे, कृष्णाचे, हिंदूइझमचे रिडल्स उद्ध्वस्त करणारा आहे. बाबासाहेबांच्या रिडल्स इन हिंदूइजमची सिनेमॅटीक वर्जन आहे.

--------—--------------------------

kaala-image

समीक्षेचा विषय निवडा

फेसबुकवरचे आश्चर्यकारक जाहिरातविश्व : रु. १२० खर्चून प्राप्त झालेले ज्ञान

या लेखाची पीडीएफ लिंक

नमस्कार,

आमचा सध्या चालू असलेला उपक्रम, म्हणजे वेगवेगळ्या खेळांचे नियम सांगणारी वेब सिरीज, हिची माहिती अधिकाधिक लोकांना व्हावी म्हणून काय करता येईल याचा आम्ही विचार करत होतो. वॉट्सअप वर सर्वाना लिंक पाठवूनही व्यूझ फारसे वाढेनात, म्हणून कोणीतरी सजेस्ट केलं फेसबुकवर लिंक टाकून पहा.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

माथेरान- भाग 2

कॉव्हेनन्टर्स पंथियांमध्ये (स्कॉटलंडमधील ख्रिस्ती धर्मियांचा एक पंथ) अशी एक समजूत होती की त्यांचे पर्वत किंवा टेकड्या या त्यांच्याबरोबर चित्रगुप्ताच्या दरबारात येतात. त्याच धर्तीवर माझ्या असे ऐकण्यात आले आहे की, भारतात आपले सर्व आयुष्य घालवल्यावर जे लोक (अर्थातच इंग्रज), म्हातारपण, जास्त श्रीमंती, व्याधीग्रस्तता, बदल हवा म्हणून किंवा नुसता आळशीपणा या सारख्या कारणांमुळे, भारत सोडून इंग्लंडला परत जाउन आपले एकाकी आयुष्य जगत असतात त्यांना भारतातल्या पर्वतराजींच्या स्वप्नांनी पछाडलेले असते.

ललित लेखनाचा प्रकार

शब्दांनो

पाह्यलंय तुम्हाला
जिज्ञासेचा तळठाव घेताना.
अज्ञाताच्या कडेलोट दरीतून उसळताना.
स्वप्नवास्तवाच्या हिंदकळत्या सीमेवरून खुणावताना.
सत्याभासाच्या मृगजळातून ठिबकताना.
स्थूलसूक्ष्माच्या अथांग वर्णपटातून विखुरताना.
क्षुद्रतेत बुजबुजताना.
कोलाहलात गजबजताना.
एकांतात निनादताना.
जाणिवेत- नेणिवेत अथक धपापताना.

अनघड शब्दांनो
वेचून वेगळं करतोय
तुम्ही उष्टावलेलं - आजच्या आयुष्यासाठी.
तुम्ही कवेत घेतलेलं- कवितेसाठी.