स्वगत
आज तुझ्यात विसावूदे,
अव्यक्त तरीही राहूदे।
आज तुझ्यात रमलेले
प्रतिबिंब मला न्याहाळू दे।
फिरून कधी येईल ही
साजणवेळ ओंजळीत।
सुख दुःखाचे गान अंतरी
माझे मलाच गाऊ दे।
- Read more about स्वगत
- 5 comments
- Log in or register to post comments
- 4397 views
वय वाढणं ... माझ्या बदलत गेलेल्या समजुती आणि दुभंग
आपल्यातला कोवळेपणा संपत चाललाय ही जाणीव त्रासदायक वाटते. म्हणजे एकीकडे आपण पूर्वी अगदिच भोळसट/मूर्ख होतो असं वाटायला लागतं. पण पुढच्या क्षणी तरीही "होतो तसेच बरे होतो" असंही वाटतं. चटकन कुणावर विश्वास टाकणं जमत नाही. काही चांगलं सहज होइल असंही वाटत नाही. एक विचित्र संशयी भाव मनात खोल रुतून बसतो. ज्या त्या गोष्टीकडे cynical नजरेनं पहायला शिकतो. शिवाय जिथं तिथं हिशेब लावणंही आलच. म्हंजे अगदि कुणाशी मस्त गप्पा मारत असलो तरी मधूनच वाटतं ....."ह्याला आपल्याकडं नेमकं काय काम असेल?" . चमत्कारिक अवस्था होते.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about वय वाढणं ... माझ्या बदलत गेलेल्या समजुती आणि दुभंग
- 52 comments
- Log in or register to post comments
- 41986 views
धवल
खोडलेले चित्र तुझे
रेघा खोडलेल्या
निळ्या-हिरव्या रानगच्च
वाटा मोडलेल्या
खोडलेले चित्र तुझे
खोडलेल्या रेघा
शुष्क-रुक्ष भूमी
खोल खोल भेगा
अतृप्त हा कुंचला
रंग ही अतृप्त
सगुणात निर्गुण
विलुप्त , सुप्त ... दीप्त ?
हरेक रंगाला , हरेक छटेला
वेगवेगळा गंध
कोठेतरी पण
गुप्तसा धवल
दरवळे मंद
- Read more about धवल
- 3 comments
- Log in or register to post comments
- 2752 views
यलो ऑकर ची स्वप्ने :
पानगळ सुरु झालीय
नोव्हेंबर मधली
सेकंदागणिक कोसळतायत
हजारो स्वप्नं
गवताच्या अगणित हिरव्या
छटांमध्ये
रानावनांत , जंगलात
शहरातल्या पार्कात
पडीक घरांच्या अवतीभवती
धांदल नुसती
अविरत
एकेक पान पाहावं
अगदी जवळून ,
गाढ , सुगंधी झोपेतल्या
खुशबूदार स्वप्नासारखं
पहिल्या धारेच्या
प्रशियन ब्लू चे शिंतोडे
सूर्याने जाळून टाकलेले
कच्चे खाऊन टाकलेले रंग
व्हर्मीलॉन रेड पासून बर्न्ट सिएना
पर्यंत च्या सर्व रंगश्रुती
अलगद ऐकाव्यात
पान गळून पडताना
किणकिणतात या श्रुती
काही तुटक जिवंततेच्या हिरव्या खुणा
- Read more about यलो ऑकर ची स्वप्ने :
- 2 comments
- Log in or register to post comments
- 2271 views
नाक रगडण्याच्या निमित्ताने - तुमचा चष्मा किती नंबरचा?
'आपल्याकडे' असा एक प्रवाद आहे की "आपला समाज भयंकर सहिष्णू आहे".
या वाक्याचा नीट विचार करू.
'आपला' म्हणजे काय याबद्दल मतभिन्नता भरपूर. 'आपला समाज 'म्हणजे भारतीय का हिंदू का महाराष्ट्रीय का पश्चिम महाराष्ट्रीय का मराठवाडी का वैदर्भीय का पुन्यामुंबयअमरिकावाले का ममव का ब्राह्मण का मराठा का आणिक कुणी वगैरे किरकोळ तपशील आपापल्या चवीनुसार मीठ टाकून घेण्याची पद्धत आहे.
- Read more about नाक रगडण्याच्या निमित्ताने - तुमचा चष्मा किती नंबरचा?
- 16 comments
- Log in or register to post comments
- 13796 views
बग
फोन वाजला. उचलला. पलीकडे बॉस होता.
"अरे अमुक अमुक जरा अर्जंट सुट्टीवर गेलाय. तमुक तमुक ठिकाणी जाऊन त्याचं अर्धं राहिलेलं असं असं काम कर ना जरा"
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about बग
- 22 comments
- Log in or register to post comments
- 24218 views
क्रूर काळ्या कारस्थान सत्यकथेचा दुसरा भाग.
मूळ लेखनाचा दुवा
शेअर करण्यास पूर्ण परवानगी. करावेच. (मूळ भाषांतराचा दुवा)
---
मुख्य न्यायमूर्ती मोहित शाह यांनी सोहराबुद्दीन केसमध्ये हवा तसा निकाल देण्यासाठी माझ्या भावाला शंभर कोटीची ऑफर दिली होती; दिवंगत न्या. लोयांची भगिनी सांगते.
निरंजन टकले- २१ नोव्हेंबर २०१७
----
- Read more about क्रूर काळ्या कारस्थान सत्यकथेचा दुसरा भाग.
- 7 comments
- Log in or register to post comments
- 11382 views
गोडसे भटजीसुद्धा आधुनिक वाटतील...
तर झालं काय की ऐसीच्या खरडफळ्यावर चर्चा चालू होती - लेखनातून माणसाचं वय दिसतं का? त्यावर अभ्याने 'अस काही नसतं' म्हणून घेतलं. आणि वर म्हटलं की 'गोडसे भटजी पण आधुनिक भासतील असं मला लिहुसं वाटतं पण लोकं लिहु देत नैत.' आता ऐसीसारख्या ठिकाणी कोणीतरी 'अभिव्यक्तीस्वातंत्र्य नाही' अशी तक्रार केली म्हटल्यावर आमचे उदारमतवादी अश्रू भळभळा वाहायला लागले. अभ्यालाच अभिव्यक्ती नाही? अभ्यालाच भ्या वाटतं? ही कितीतरी पातळीवर गंभीर प्रश्न निर्माण करणारी परिस्थिती आहे. सानेगुरुजी म्हणाले होते 'माझ्या अश्रूंना हसू नका. त्यांच्यात खूप शक्ती आहे.' आता आमचे अश्रू किती पावरफुल हे आम्हाला माहीत नाही.
- Read more about गोडसे भटजीसुद्धा आधुनिक वाटतील...
- 12 comments
- Log in or register to post comments
- 11395 views
बघ जरा....
बघ जरा झोळीत माझ्या काय आहे….
रंगरेषा लांघणारे चित्र आहे
पृष्ठकोरे चांगदेवी पत्र आहे
गहन काही उकलणारे सूत्र आहे
सावळीशी सूर्यगर्भी रात्र आहे
मुक्तीच्या मोहात गाफिल गात्र आहे
शत्रूच्या शोधात हसरे मैत्र आहे
फाल्गुनाला खेटुनी बघ चैत्र आहे
वास्तवाला विंधणारे यंत्र आहे
प्राणफुंकर मागणारा मंत्र आहे
अद्भुताचे इन्द्रजाली स्तोत्र आहे
अंत ना आदि असे घटिपात्र आहे ...
बघ इथे झोळीत माझ्या काय आहे…
.....की कुण्या कवितेत त्याच्या हेच आहे ?
- Read more about बघ जरा....
- 13 comments
- Log in or register to post comments
- 9480 views
Loving Vincent - गिमिकाच्या पलीकडे
हा चित्रपट रहस्यपट नाही; अगदी व्हिन्सेंटच्या खुनाचा तपास, असा वरवरचा पदर असला तरीही. या लेखनात त्या असल्यानसलेल्या रहस्याचा भेदही केलेला नाही. तेव्हा चित्रपट बघण्याआधी लेखन वाचायला हरकत नसावी. चित्रपट बघण्यासाठी व्हॅन गॉच्या चित्रांची, चित्रशैलीची किंवा एकंदर चित्रकलेबद्दल फार माहिती, आकलन असण्याचीही आवश्यकता नाही. शब्द आणि त्यासोबत येणाऱ्या प्रतिमा आणि काही प्रमाणात संगीत या गोष्टी एकत्र समजत असतील, तर जरूर चित्रपट पाहा.
- Read more about Loving Vincent - गिमिकाच्या पलीकडे
- 14 comments
- Log in or register to post comments
- 16738 views