Skip to main content

शेतकऱ्यांना कर्जमाफी : स्वरूप, व परिणाम

कर्ज ही संकल्पना साधी सोपी आहे. व्यवस्थेत जे लोक बचत करतात त्यांना बचत करण्यासाठी बँक एक विशिष्ठ भूमिका पार पाडते. बचत करणाऱ्या लोकांना एकत्र येऊन त्यांच्या बचतीवर परतावा मिळवण्याची संधी उपलब्ध करून देणे. व ज्यांना त्यांच्या महत्वाच्या गुंतवणूकीच्या निर्णयांसाठी कर्ज उभे करायचे आहे त्यांना कर्ज उपलब्ध करून देणे. अर्थातच कर्जावर व्याज आकारले जाते व त्यातून मिळणाऱ्या निधीमधून बचतदारांना परतावा (व्याज) दिला जातो. कर्जदाराचे कर्ज घेण्यामागचे निर्णय अनेक असू शकतात. उदा. घर घेण्यासाठी कर्ज किंवा व्यवसायातील गुंतवणूकीसाठी कर्ज - उदा.

|| "ऐसी" हुच्चभ्रूंची लक्षणे ||

हुच्चभ्रूंचे कैसे बोलणे | हुच्चभ्रूंचे कैसे चालणे
समानांशीच कंपूनी जाणे | कैसे असे ||

दुर्बोधत्वाचे परम-आधारू | क्लिष्ट व्होकॅबचे भांडारू।
चोखंदळांचे महामेरू | चिवित्रान्न भोगी ||

उठपटांग ज्ञानराशी | उदंड असती जयांपाशी |
गुगलपरिपुष्ट आयक्यूशी । तुळणा कैसी ||

यांसी गमे जे रोचक | त्यावरी कमेंटती टंग-इन-चीक |
शष्प न कळोनि नीचभ्रू लोक | वाचनमात्र राहती ||

हुच्चभ्रू तितुके मेळवावे । नीचभ्रू झोडावे/इग्नोरावे ।
निरागसतेचे देखावे | परी करावे चातुर्ये ।।

अता नीचभ्रूपणाचा त्याग । करोनि साधावा सुयोग।।
अभिजाततेची लगबग । येरू म्हणतो करावी ||

Making of photo and status : ९. जाऊँ क्या खंडाला!?

प्रस्तावना : ज्यांची प्रस्तावना वाचायची राहून गेली असेल, त्यांनी ती वाचण्याकरिता कृपया खाली दिलेल्या लिंकवर हळुवारपणे टिचकी मारावी.

http://www.aisiakshare.com/node/6241

दरस बिना..

समुद्राचा तळ गाठता येत नाही, आणि अश्रूचा स्रोतसुद्धा सापडत नाही.. दोघांना अस्तित्व खारेच आहे, एक अथांग तर दुसऱ्याचे अलौकिक.

दुपार सरत असतांनाचा वेळ, चार ते पाचचा, या वेळेत सारे भरून आलेले असते. ना खोल ना गंभीर, सगळे सुटेसुटे होणारे गुंते. वासांनी निर्माण झालेले जग मोकळे होत एक केवळ श्वास होणारे.

ललित लेखनाचा प्रकार

पोळीचा चिवडा

पोळीचा चिवडा

साहित्य-
५ पोळ्यांचा चुरा, २ चमचे तेल, एक छोटा चमचा मोहरी, एक छोटा चमचा जिरे, हळद, कढीपत्ता, मूठभर शेंगदाणे, बारीक कापलेला कांदा, बारीक कापलेला टमाटा, बारीक कापलेल्या २-३ हिरव्या मिरच्या, चवीपुरते मीठ, सजावटीसाठी कोथिंबीर.

कृती-
सर्वात प्रथम कढईत २ चमचे तेल घ्यावे. तेल तापल्यावर त्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता, शेंगदाणे, मिरच्या, कांदा, टमाटा घालून फोडणी द्यावी. नंतर त्यात पोळ्यांचा चुरा आणि मीठ घालून चांगले परतून घ्यावे. कढईवर झाकण ठेऊन २ मिनिटे शिजू द्यावे. पोळ्यांच्या चिवड्यात सजावटी साठी कोथिंबीर घालावी.

कळी म्हणते कळीला...

कळी म्हणते कळीला

कळी म्हणते कळीला 
उद्या मी होईल फुल गळेल मग
पाकळया सार्या नेईल 
कोणीतरी मजला चुरगळून ...
  
किती छान वाटतं जेव्हा कोहळं
हे बालपण पानाच्या गर्द 
हिरवाळाईत डुलतं पण कळीच जेव्हा फुलं होतं
तेव्हा इतराच्या नजरेत भरतं....

स्त्री आणि कळी 
यांचा मिलाप किती जुळतो 
दोघीच्याही वाट्याला खुटून नेण्याच दुख: मात्र
माणसाकडूनच मिळतं....

नाट्यत्रयी वाडा चिरेबंदी, भाग#१

मी नाटकवेडा माणूस आहे. म्हणजे नाटकं पाहायला आवडतात, नाटकं करायला नाही! ह्या ब्लॉग वर मी बऱ्याच नाटकांबद्दल लिहिले आहे. त्यातही मला जुन्या काळातील, म्हणजे १९७० ते १९९० मध्ये रंगमंचावर आलेल्या नाटकांचे पुन्हा आजच्या काळात केलेले प्रयोग पाहायला आवडतात. मराठी नाटकांच्या बाबतीत हा तसा पहिला तर सुवर्णकाळ होता. काही वर्षांपूर्वी दूरचित्रवाणी वाह्निन्यांच्या गर्दीत एक दोन मराठी वाहिन्या होत्या त्या अशी जुनी नाटकं दाखवत असत. वाडा चिरेबंदी हे नाटक जुने आणि बरेच प्रसिद्ध आहे. प्रसिद् नाटककार महेश एलकुंचवार यांनी ते लिहिले आहे. त्यांचे एक नाटक वासांसि जीर्णानि खूप पूर्वी मी पहिले होते, त्यात डॉ.

समीक्षेचा विषय निवडा

उदासगाणी

चार महिने या खोलीत मी राहतो आहे, तितक्या रात्री मी इथे जागवल्या आहेत. आज उद्याची शेवटची रात्र असणार आहे. काहीही धड हाती न लागता इथून मी निघणार आहे, तरी पण, हा ‘पण’ जमा केलेल्या इथल्या आठवणींना माझ्या मनात उभा करतो आहे. मला माझं गवसण्याच्या अडनिड्या प्रयत्नात ही खोली आता एक भाग झाली आहे. कित्येक गाणी इथे मी ऐकली असतील, ठराविक गाण्यांच्या रिंगणात रात्री गेल्या खऱ्या, त्यातून मला उदास गाण्यांचेच वेड लागले आणि मग त्या जोडीला पैसे कमवायला काही कामे मिळवता येतात का, त्यासाठी कित्येक गोष्टींना नेटवर जोखून पाहिले असेल. सप्टेंबरच्या परीक्षेचा पास निकाल इथेच पाहिला.

ललित लेखनाचा प्रकार

हे सव्यसाची,

खुणावतील तुला जटिल गणिते-
आदिस्फोटाच्या प्रसववेणांची

हाकारतील तुला कोडी-
विस्कळखाईत क्षणोकणी होणार्‍या
विश्वाच्या अटळ अंताची

या अपार भूतभविष्यादरम्यान
लीलया झुलणारा तुझ्या प्रज्ञेचा झोका
कुठे खिळवलाय, हे सव्यसाची?

तो इथेय बघ,
निळ्या पाखरपंखावर
अथक थिरकणार्‍या
क्षणभंगूर वर्तमानात