Skip to main content

मी तुझा चंद्र झालो

मी तुझा चंद्र झालो....
केव्हा काय विचारतेस?
तोंड धुता धुता
हळू हळू वृद्धिंगत होणार्‍या कपाळरूपी किनारपट्टीकडे पाहून
कुठपर्यंत पाणी मारावं समजलं नाही
.........तेव्हाच.

कांदा संस्थानात स्वप्नदोषावर बंदी

कांदा संस्थान, (प्रतिनिधी). दि. ११. - कांदा संस्थानात आज बहुसंख्येने स्वप्नदोषांना फौजदारी गुन्हा ठरवले गेले. या ग्रामसभेला नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली होती. ऐसी अक्षरेची प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित होती, तिच्याकडून मिळालेला हा वृत्तांत.

समलैंगिकता

ऐसीवर मराठी विकीपीडियावर चढवण्यासाठी लेख तयार करणं या उद्देशाने 'विकीपानांसाठी' हा नवा विभाग सुरू केलेला आहे. विकीसाठी लेख तयार करणं हे दोन प्रकारे करता येईल एक म्हणजे इतर भाषांत अस्तित्वात असलेल्या पानांचं भाषांतर/रूपांतर करणं. दुसरं म्हणजे नवीन पानच सुरू करणं. या दोन्ही प्रकारांसाठी हा विभाग वापरता येईल.

भाषांतर/रूपांतर करणं हे मोठं ओझं वाटू शकतं. एखाद्या व्यक्तीला आख्ख्या लेखाच्या भाषांतरासाठी वेळ मिळेलच असं नाही. काही तांत्रिक शब्दांच्या भाषांतरावर अडून रहायला देखील होईल. त्यामुळे हे ओझं सगळ्यांनी वाटून घेतलं तर हलकं होईल. हे करण्यासाठी आम्हाला एक मार्ग सुचलेला आहे. तो असा.

Taxonomy upgrade extras

पुन्हा ऐरणीवरः समलैंगिकता!

Taxonomy upgrade extras

सुप्रीम कोर्टाचा धक्कादायक निकाल. समलैंगिंक संबंध ठेवणे बेकायदेशीरच!

मुळात "नॅचरल" काय हे कोर्टाने कसे ठरवले हे समजले नाही. :(

या निकालानंतर सरकारला सुबुद्धी होवो आणि घटनेत/या कलमात बदल करून संमतीपूर्वक ठेवलेल्या (अत्यंत नैसर्गिक अश्या) समलैंगिक संबंधांना कायदेशीर मान्यता मिळो ही मनःपूर्वक सदिच्छा! :(

निकाल वाचून फारच वाईट वाटले

चावडीवरच्या गप्पा - 'आप'आपली मते

chawadee

“पवारसाहेबांनी राष्ट्रवादीच्या वेबसाइटवर त्यांच्या एका ब्लॉग पोस्टवर कसले सणसणीत आणि परखड विश्लेषण केले आहे दिल्ली विधानसभा निवडणुकांचे!”, बारामतीकर, चावडीवर प्रवेश करत.

“वेबसाइट, ब्लॉग...बरं... बरं... काय म्हणताहेत तुमचे आदरणीय शरदचंद्ररावजी पवारसाहेब?”, नारुतात्या उपहासात्मक सुरात.

अश्वत्थामा, व्यासांचा आणि जीएंचा!

जीएंना महाभारताचे खुप आकर्षण होते हे आता सर्वश्रुत आहे. प्रतिभावंताचा विषय निघाला की जीए हटकुन व्यासांचे नाव घेत. जीएंच्या कथांमध्ये काही ठिकाणी महाभारताचे संदर्भ आलेले आढळतात. त्या उपमांनी, संदर्भांनी जीएंच्या कथांना एक वेगळीच श्रीमंती बहाल केलेली दिसते. त्यादृष्टीने जीएंची पत्रे महत्वाची आहेत. विशेषतः सुनिताबाईंना लिहिलेल्या जीएंच्या पत्रांत त्यांनी महाभारतावर, त्यातील व्यक्तीरेखांवर चर्चा केली आहे. ज्या तर्‍हेने जीए या विषयावर लिहितात त्यावरुन हे जाणवते की महाभारत हा त्यांच्या सततच्या चिंतनाचा विषय असावा.

धाव्वीची परिक्षा

त्याकाळी उदगीरला किमान मध्यमवर्गीयांमधे धाव्वीच्या परिक्षेचे महत्त्व लग्न, मुंज, मूल होणे आणि निर्वाण यांच्यापेक्षा जास्त नसले तरी कमी तरी नव्हते. मुल दहावीला असणे आणि नसणे यामुळे गृहजीवनावर फार व्यापक परिणाम पडे. मनोरंजनाचे स्रोत आणि कर्मे, इतर कुटुंबीयांची देखिल, पूर्णतः बाजूला ठेवली जायची. सातवीच्या मुलाने टीव्ही पाहायचा नाही, कारण दहावीतला मुलगा डिस्टर्ब होईल. तेव्हा माझी नववीची परीक्षा झाली होती आणि त्या महत्त्वाच्या दिव्यासाठी मनाची तयारी करत होतो.

एक अकल्पनीय गुप्त खजिना

2010 या वर्षामध्ये कधीतरी, अगदी सर्वसाधारण दिसणार्‍या आणि स्वित्झर्लंड पासून ते जर्मनीमधील म्युनिच असा प्रवास करणार्‍या एका व्यक्तीकडे स्वित्झर्लंड-जर्मनी सीमेवरील सीमा शुल्क अधिकार्‍यांचे लक्ष वेधले गेले. जर्मनीमधील अनेक धनाढ्य मंडळी, त्या देशात आयकराचा दर अतिशय उच्च असल्यामुळे आपला पैसा स्वित्झर्लंडमध्ये गुंतवत असतात. अशा लोकांचा शोध घेण्यासाठी या सीमेवरील अधिकारी प्रवाशांबद्दलची माहिती अगदी रुटीन असल्यासारखी जमा करत असतात. डोक्यावरचे सर्व केस पांढरे शुभ्र झालेल्या या व्यक्तीकडे सीमा शुल्क अधिकार्‍यांनी त्या व्यक्तीकडचे कागदपत्र मागितले.