"प्रेतात्म्यांची जत्रा" एक सिने परीक्षण.
कार्निवाल ऑफ सोल्स
Carnival Of Souls: The Strange Story Behind the Greatest Horror Movie You’ve Never Seen
कार्निवाल ऑफ सोल्स हा एक विचित्र, अविस्मरणीय आणि विशेष म्हणजे अत्यंत कमी खर्चात बनवलेला भीती चित्रपट आहे. ही चर्चमध्ये ऑर्गन वाजवणाऱ्या एका स्त्रीची करूण कहाणी आहे. (चित्रपटात नायक नाहीये. ह्या नायिकेच्याच भोवती हा चित्रपट बेतला आहे.) तिला एका अमानवी चेहेऱ्याने पछाडले आहे. नायिका नुकतीच एका जीवघेण्या अपघातातून वाचली आहे. मरणारच होती पण वाचली. मोटारगाडीतून मैत्रीणींबरोबर प्रवास करताना तिची गाडी पुलाचा कठडा तोडून नदीत पडते. हा ह्या चित्रपटातील सुरवातीचा सीन आहे.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about "प्रेतात्म्यांची जत्रा" एक सिने परीक्षण.
- 15 comments
- Log in or register to post comments
- 4374 views
Pandemic
त्याला सकाळी लवकर उठायची सवय होती. पण आज सकाळी त्याला नेहमीसारखे प्रसन्न वाटत नव्हते. काय कारण असावे?
त्याचे नाव होते राजे. अनंत राजे. जिम मध्ये जाऊन कमावलेले शरीर. धडधाकट प्रकृती. कधी दवाखान्याची पायरी चढलेला नाही. सकाळची भरभक्कम न्याहारी. न्याहारी न खावीशी वाटावी असं काही नव्हतं. जगण्यासाठी खाणे का खाण्यासाठी जगणे असले तात्विक विचार यायचं वय नव्हते.
बाजूच्या टेबलावर दोन तरुणी बसल्या होत्या. पैकी एक ती किंचित काळ्या रंगावर गेली होती. पण तिचा आवाज म्हणजे स्वरांची तान. सिंग-सॉंग. तो तिला नेहमी पहात असे. तिच्या मैत्रिणीसह ती ब्रेकफास्ट करायला येत असे.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about Pandemic
- 2 comments
- Log in or register to post comments
- 1472 views
आरक्षणाच्या बैलाला ऽ ऽ ऽ
त्याचं असं झालं, समाजाचं एकदमच बिनसलं
जातीपाती एकवटल्या, आरक्षणाला कंटाळून
संगनमताने सर्वांनी एकच ठराव केला संमत
आम्हाला करा ब्राह्मण, तरच सोडू आरक्षण
एकीकडे प्रत्येकाला पाहिजे होती ब्राह्मण जात
आरक्षणाच्या ठेकेदारांना पटत नव्हते अजिबात
जातीपातीच्या राजकारणाचे नेते झाले उदास
सगळेच झाले ब्राह्मण तर चालणार कसे दुकान
वाटलं होतं सुटेल पेच, पुढ्यात होती खरी मेख
ब्राह्मणात नक्की कोण, होत्या डझनभर शाखा
सगळे ब्राम्हण एकदम, आंदोलनात आले थेट
आधी सांगा कोणते ब्राह्मण, मग ठरवा कोटा
- Read more about आरक्षणाच्या बैलाला ऽ ऽ ऽ
- Log in or register to post comments
- 1358 views
विकीलीक्स : धोकादायक पण सुंदर?
Taxonomy upgrade extras
ज्यूलिअन असांजची नुकतीच सुटका झाली आहे. तो कोण आहे? विकीलीक्स काय होतं? त्यामुळे काय झालं? याचा उहापोह या निमित्ताने पुन्हा एकदा.
- Read more about विकीलीक्स : धोकादायक पण सुंदर?
- 3 comments
- Log in or register to post comments
- 2351 views
जीवनाचा ताल (The Rhythm of Life)
सॅमी डेव्हिस ज्युनियर या अफलातून गायकाच्या "The Rhythm of Life" या गाण्याचा भावानुवाद करण्याचा प्रयत्न.
===========================================================================
बाबाजी राहत होते कलकत्त्यात
प्रवचनं झोडती मोठमोठी
अचानक आतला आवाज वदला -
"चहूकडे पसरव तुझी कीर्ती"
"बाबाजी, बघ हे लाखो येडे
धाव घेती नव्यानव्या पंथांकडे
त्यांना गटव, सोड तुझी बायको आणि बाळ
सुरु कर नवा पंथ - जीवनाचा ताल!"
- Read more about जीवनाचा ताल (The Rhythm of Life)
- 7 comments
- Log in or register to post comments
- 2028 views
भास्करबुवा बखले: भरभरून देणारे संगीतज्ञ
शैला दातार यांनी लिहिलेल्या भास्करबुवा बखले यांच्यावरील ‘देवगंधर्व’ हे ‘राजहंस’ने प्रकाशित केलेले चरित्र वाचताना संगीत व नाट्यक्षेत्रातील त्यांच्या महान कार्याबरोबरच एका प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचा वाचकांना प्रत्यय येतो. ह्या दोन्ही क्षेत्रांतील बेभरवशांच्या जीवनपद्धतीची माहिती असूनसुद्धा आपल्यातील माणुसकीला धक्का न लावता एक निकोप जीवन जगलेल्या भास्करबुवांचे यथार्थ चित्रण लेखिकेने फार सुंदरपणे उभे केले आहे.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about भास्करबुवा बखले: भरभरून देणारे संगीतज्ञ
- 2 comments
- Log in or register to post comments
- 1614 views
सिंधू सरस्वती संस्कृती (भाग ६)
सिंधू संस्कृतीचे लोक कोण? आर्य कोण? सध्याचे भारतवासी कोण? जनुकीय पुरावा काय सांगतो?
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about सिंधू सरस्वती संस्कृती (भाग ६)
- 2 comments
- Log in or register to post comments
- 2108 views
सद्दीत सुमारांच्या ह्या
जटिलाच्या दारावरती
दुर्बोध देतसे थाप
भेटीत उमजले दोघा,
"उभयतांस एकच शाप
सद्दीत सुमारांच्या ह्या
उ:शाप नसे शापाला
अस्वस्थ उद्याची हाक
ऐकू ना येई कुणाला"
दुर्बोध जटिलसे हसले
दुर्बोधून जटिलही गेले
अन् विषण्ण होऊनी दोघे
आश्रयी कवीच्या गेले :)
- Read more about सद्दीत सुमारांच्या ह्या
- 3 comments
- Log in or register to post comments
- 1584 views
नदीचे प्रदूषण - न चर्चीले गेलेले कारण
आपल्या धार्मिक ग्रंंथात नदीची पुजा, तेथे स्नान, फुले अर्पण करणे इत्यादी फार डिटेल लिहीले आहे. तसे केल्याने पुण्य मिळतेच, पण वाचकांसाठी सगळ्यात आकर्षणाचा भाग असला लिहीलेला असतो की तुमचे सारे कष्ट संपतील, संपत्ती मिळेल, रोग नष्ट होतील इत्यादी. अनेक ग्रंथात तर अनेक नद्यांचे स्नान, परिक्रमा सांगितलेली आहे.
पुण्य, पाप कोणी पाहीले आहे? अन ते नदीत स्नान केल्याने लगेच मिळेल असे नाही.
पण वर जे कष्ट, रोग, इत्यादी आहे ते लगेच दिसणारे आहे.
अन आपल्या धार्मिक ग्रंथांना पठण, पारायण करणार्यांना हा आकर्षणाचा बिंदू आहे.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about नदीचे प्रदूषण - न चर्चीले गेलेले कारण
- 2 comments
- Log in or register to post comments
- 1655 views
ड्रॅगनची ज्ञानमहासत्ता
Taxonomy upgrade extras
आपल्या शेजारील ड्रॅगन केवळ लष्करी महासत्ता झालेला नाही. तर आर्थिक महासत्ता झालेला आहे. आणि, आता ज्ञान महासत्ता देखील झालेला आहे.
- Read more about ड्रॅगनची ज्ञानमहासत्ता
- 14 comments
- Log in or register to post comments
- 4539 views