अशी वाहने येती - ( विडंबन )
(चाल - अशी पाखरे येती - )
अशी वाहने येती, आणिक ढुशी देऊनी जाती
दोन दिशांनी धावत थांबत, दोष दुजाला देती ...
खांब तो मला कधि ना दिसला, ताठा कोठे अता राहिला
जरा खालुनी, जाय उखडुनी, तारा वरच्या झुकती ...
पुढून येता पोलिस दिसले, मी स्कूटरवर मला तोलले
नव्हते लायसन्स, घरीच ते तर, कुंठित झाली कुमती ...
हात एक तो पुढेच सरला- काठीवर खात्रीने फिरला-
देवघेवीतील सवयी अजुनी, कुठून मज त्या कळती ...
पुढे तयांच्या खाण्यासाठी, मीच हात ते धरले हाती
त्या घडल्या तोडीची आता, दूर पसरली ख्याती ...
.
- Read more about अशी वाहने येती - ( विडंबन )
- 3 comments
- Log in or register to post comments
- 2940 views
'जोयानाचे रंग' आणि बालसाहित्य
Taxonomy upgrade extras
कविता महाजन यांचे 'जोयानाचे रंग' हे पुस्तक माझे आणि माझ्या पुतणीचे (आता वय ५ वर्षे) अतिशय आवडते पुस्तक आहे. तिला कैक वेळा वाचून दाखविताना जोयाना आणि तिच्यातले साम्य पाहून तिच्यासकट आम्ही आचंबित होतो. जोयाना हे नांव तर खासच. पुतणीचे नांवही 'ख्रिश्चन' वाटणारे असल्याने दोघींतले साम्य अगदी नांवापासूनच आहे :). या पुस्तकाबद्दल तुमचे खूप खूप आभार.
तुम्हांला असे कधी सांगता येईल असे वाटले नव्हते. या प्रतिक्रियेच्या निमित्तने ते साधले, त्याबद्दल तुम्हांला 'ऐसी..'वर आमंत्रित करणार्यांनाही धन्यवाद.
===
- Read more about 'जोयानाचे रंग' आणि बालसाहित्य
- 77 comments
- Log in or register to post comments
- 78453 views
मुक्तचक्र
शून्य असे मी ओढुनताणुन
नुसता पोकळ रिक्ताकार
पोकळीत कण भरण्यासाठी
पांघरली मी भगवी छाटी!
रिक्त भासते परी तिथे मग
राजस तामस नूतन तगमग
कशास पुनरपि रेटा द्यावा
नव्या दमाने प्राणच ओतुन?
शून्य म्हणुनी का व्यर्थ जगावे
का शून्यातच विरूनि जावे
शून्यभावनें राख कुडीची
व्योमाकाशी विखरत जावे?
पण..
क्षुद्र तृणावर सावरलेला
दवबिंदू जणु प्रकाशयात्री
अस्तित्वाचे अगम्य उत्तर
नित्य वसतसे त्याच्या गात्री
आणि अनाहत शंखामधला
नाद सनातन दक्षिणवर्ती
गुरुत्व की भ्रूमध्यामधले
प्रकाशते जे तिमिरावर्ती..
भिडेन मग मी त्या न्यूनाला
व्यापुन टाकिन त्या शून्याला
शून्य नव्हे, ते नित्य निरंजन
- Read more about मुक्तचक्र
- 6 comments
- Log in or register to post comments
- 5854 views
भारतातले कुपोषणाचे आकडे फुगलेले आहेत का?
कुपोषण हा गंभीर विषय आहे. भारतात चाळीस टक्क्याहून अधिक मुलं कुपोषित आहेत असं वाचल्याचं आठवतं. मात्र ही मोजमाप करण्याचे निकष बरोबर आहेत का? पानगरिया यांनी एक पेपर लिहून हा प्रश्न उपस्थित केलेला आहे. मूळ पेपर वाचता आला नाही, पण त्यावरील चर्चेमधून काही गोष्टी स्पष्ट होतात.
- Read more about भारतातले कुपोषणाचे आकडे फुगलेले आहेत का?
- 7 comments
- Log in or register to post comments
- 8168 views
पेन्शन-२
*************************************************************************************
पेन्शन-१
आता कितीसे तेल उरले आहे दिव्यात? आणि ते किती दिवस पुरणार? दत्ता येवून गेला आणि छाती फुटल्यासारखे वाटते आहे त्या दिवसापासुन...
*************************************************************************************
- Read more about पेन्शन-२
- 8 comments
- Log in or register to post comments
- 10257 views
शरद जोशीँचा सिध्दांत
Taxonomy upgrade extras
लहान भाऊ म्हटला जोशीँच्या घरचा मयताचा निरोप द्यायला तू जा. साधारण वन डे रिटर्न अंतरावरच सर्व नातेवाईक राहतात त्यांचे. आज माझ्याकडे सहा बैल आणि चार गाई आल्या असल्याने आणि नुकतीच गटारी पाळल्याने श्रावण साजरा करण्याचा खूब मनसुबा रचलेल्या एका अत्यंत बड्या आसामीस ते मटेरिअल बोनलेस स्वरुपात द्यायचं असल्याने , मला आज जातीने इथे हजर राहून , बैल फाडायचे उच्च शिक्षण देणार्या महाविद्यालयात मी कमावलेले प्रगत ज्ञान आज सिध्दण्याची बिकट वेळ निकट आलेली आहे.
- Read more about शरद जोशीँचा सिध्दांत
- 6 comments
- Log in or register to post comments
- 8382 views
आणि पुस्तकांची नावं...
"पात्रांच्या नावाआधी पुस्तकांच्या नावाचा विचार करायला हवा होतास... ते आधी सांगायचंस ना." एक मित्र म्हणाला.
"अरे ठरवून लिहीत नव्हते काही. असंच लिहून झालं ते उगाचच." मी म्हटलं आणि पुस्तकांच्या नावांविषयी आठवायला लागले.
पुस्तकाचं नाव ठरवून मग लेखन सुरू होतं, असा तर काही क्रम नसतो. माझ्याबाबतीत तर असं झालंय की बहुतेकवेळा मी लेखन पूर्ण केल्यावर मग पुस्तकाच्या नावाचा विचार केलाय. अपवाद फक्त 'ठकी...'चा. ते लेखन सुरू केलं तेव्हाच, म्हणजे जेमतेम एक पान लिहून झालेलं असतानाच सुचलं आणि पक्कंही झालं.
माझ्या लेखनाची सुरुवात कवितांनी झाली. कवितांना शीर्षकं देणं मला कधीही जमलं नाही.
- Read more about आणि पुस्तकांची नावं...
- 8 comments
- Log in or register to post comments
- 7129 views
पेन्शन-१
अण्णांना जाग आली. अंथरूणाच्या बाजुची भिंत तशीही थोडी ओलसर होतीच पण ह्या थंडीच्या दिवसात तर ती पार काकडायची़च. उधईची अंडीदेखिल सुरकुतावी एवढी थंडी! ब्रम्हपुरीला ओढ्याकाठच्या घरी, भर पावसाळ्याच्या दिवसात ज्या रात्री विष्णु झाला तेंव्हाही घर असेच गारठलेले होते. थंडी, गर्मी आणि पाऊस, सगळेच महामूर होते ब्रम्हपुरीला. पण इथल्या थंडीपुढे हात टेकले असे त्यांना वाटले. घरामागुन जाणार्या रेल्वेच्या रुळांशेजारी गेल्या पावसाळ्यात काही चर काढून नालीला जोडले होते, तेंव्हापासुन ही भिंत ओल धरु लागली होती. मधल्या खोलीतली बाज आताशा फारच कुरकुरत असे आणि परवाच्या दिवशी बापूसाहेब बसले तर तिची पार झोळीच झाली.
- Read more about पेन्शन-१
- 24 comments
- Log in or register to post comments
- 19432 views
नावात काय... नावाचं काय... इत्यादी
आता माझं नाव 'दुष्टबुद्धी' असं ठेवलेलं असतं, तर मी काय केलं असतं? :-).
आणि 'कविता' ठेवलेलं आहे, तरी मी काय करू शकतेय?
सूत्रसंचालक या जमातीच्या या नावावर आणि महाजन या आडनावावर केलेल्या कोट्यांनी वैताग आला की हे कळूनच चुकतं.
- Read more about नावात काय... नावाचं काय... इत्यादी
- 6 comments
- Log in or register to post comments
- 7230 views
छायाचित्रण पाक्षिक-आव्हान २४: प्रकाश
फोटोग्राफीला "छायाचित्रण" म्हणावे का "प्रकाशचित्रण" याबद्दल अनेकदा संवाद वाचतो. खरंतर, माणसाचे डोळे विविध आकार त्यावर पडणार्या प्रकाशापेक्षा, सावल्यांमुळे अधिक ओळखतो. वेगळा पोत, वेगळे रंग, वेगळी दृश्यमानता हे सारे प्रकाशाचेच खेळ!
छायाचित्रण करताना मला सर्वात आव्हानात्मक काय वाटते ते आपल्या चित्रात प्रकाशाला नियंत्रित करणे. त्यातही प्रकाशालाच चित्रीत करायचे असेल - तो प्रकाश हाच चित्राचा विषय करायचा असेल - तर अधिक सृजनात्मक विचार करावा लागेल असे वाटते.
याच विचारातून या वेळच्या आव्हानाचा विषय आहे "प्रकाश".
स्पर्धा का इतर?
- Read more about छायाचित्रण पाक्षिक-आव्हान २४: प्रकाश
- 47 comments
- Log in or register to post comments
- 72700 views