आंतरजालावर उगवून आलेले - १ (गणेशोत्सव)
Taxonomy upgrade extras
आपल्यापैकी अनेक जण आंतरजालावर वावरत असतो. बरेच वाचनीय / श्रवणीय / प्रेक्षणीय संकेतस्थळांवर आपण जात असतो. मात्र तरीही एखाद्या विषयावर काहि माहिती हवी असेल तर मात्र गुगल बाबा की जय करावे लागते. गुगलून प्रत्येक वेळी हवी तीच माहिती मिळेलच याची शाश्वती नसते, अश्यावेळी आपण परिचितांना माहिती विचारू लागतो. या धाग्याचे स्वरूप असेच अनौपचारीक आहे.
आंतरजालावर तुम्हाला काय दिसले / मिळाले वगैरे धागे आपण बघतो. मात्र इथे त्यापुढे एक पायरी जाऊन एखाद्या विशिष्ट विषयाशी संबंधीत माहिती एका धाग्यावर मिळावी असा उद्देश आहे.
- Read more about आंतरजालावर उगवून आलेले - १ (गणेशोत्सव)
- 6 comments
- Log in or register to post comments
- 4989 views
सांगावेसे वाटले म्हणून.....
खूप लहानपणी आम्हाला एक कविता होती. सारखा सारखा वाहून वाऱ्याचे पाय दुखत कसे नाहीत? सारखी सारखी वाहून नदी थकत कशी नाही? सारखी सारखी कामं करून आई दमत कशी नाही? अशी काहीशी ही कविता होती. ती आम्हांला सगळ्यांना खूप आवडायची. पण ही कविता शिकवताना, बाई आम्हाला म्हणाल्या, “सारखं सारखं बोलून तुमचं तोंड दुखत कसं नाही?” आणि हे ऐकताना आम्हाला सगळ्यांना एकदम खुद्कन हसूच फुटलं. आम्ही सगळ्या मुली खूप बडबड्या होतो. त्यात मी नेहमी आघाडीवर. माझा छंद काय? असं विचारल्यावर मी कधीकधी ’गप्पा मारणे’ असं उत्तर आजही देते. माझ्या मते, प्रत्येक माणसाला माझ्याइतकं तीव्रतेने नसेल कदाचित, दुसऱ्याशी बोलावंसं वाटतच असतं.
- Read more about सांगावेसे वाटले म्हणून.....
- 24 comments
- Log in or register to post comments
- 22472 views
पुस्तकांविषयीचे ब्लॉग्ज साहित्यसृष्टीला हानिकारक आहेत का? (भाग २)
Taxonomy upgrade extras
'पुस्तकांविषयीचे ब्लॉग्ज साहित्यसृष्टीला हानिकारक आहेत का?' या धाग्यावरच्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याच्या माझ्या प्रयत्नांत काय निष्पन्न झालं ते इथे मांडलं आहे. प्रतिसाद मोठा झाल्यामुळे स्वतंत्र धागा काढला आहे.
समकालीन मराठी साहित्याविषयी मराठी ब्लॉग्जवर कितपत लिहिलं जातं हे पाहण्यासाठी मी सध्या चर्चेत असलेल्या काही साहित्यिकांची मासल्यादाखल (सॅंपल म्हणून) यादी तयार केली. त्यात मी ही नावं घेतली :
आसाराम लोमटे, कृष्णात खोत, प्रशांत बागड, प्रवीण बांदेकर
- Read more about पुस्तकांविषयीचे ब्लॉग्ज साहित्यसृष्टीला हानिकारक आहेत का? (भाग २)
- 11 comments
- Log in or register to post comments
- 8203 views
माळरानी खडकात जेव्हा रुजते बियाणे
यंदा पावसाने ताण दिला नि आख्या पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. कुठून कुठून पैदा केलेले बियाणे ज्याने त्याने घाई करून पेरले होते. पालख्या पंढरपुरात पोहचल्या कि हमखास पाऊस लागतो असा आजपर्यंतचा अनुभव होता. परंतु यंदा पालख्या परत फिरल्या तरी पाऊस जोर धरत नव्हता. दिवसातून एखादी सर यायची पण अंगावरील कपडे देखील भिजायची नाहीत. कमी ओलीमुळे दाणा पीठाळला नि उगवण चांगली झालीच नाही. उगाच कुठतरी फुटा दोन फुटावर मोड दिसत होता.
- Read more about माळरानी खडकात जेव्हा रुजते बियाणे
- 7 comments
- Log in or register to post comments
- 4673 views
देव नाही देवळात
देव आहे, का देव नाहीच !
एक शंका घुटमळणारी,
सदैव मनाला पोखरत आहे -
देवळाबाहेर लंगडा माणूस
एका आंधळ्याच्या ताटलीत
आदबीने जवळचे नाणे टाकत आहे -
हे असे का, ते तसे का
अपंग नसतांना माझे मन
पंगु बनायला सरावत आहे -
देव जवळून गेला तरीही
रांगेतल्या लोकांसोबत
आस्तिक-नास्तिक चर्चा रंगत आहे !
.
- Read more about देव नाही देवळात
- 4 comments
- Log in or register to post comments
- 3662 views
कॉन्स्पिरसी थिअरीज
आत्ताच फेसबुकवर एक कॉन्स्पिरसी थिअरी वाचली.
गणपती झाले...
दसरा दिवाळी येत आहे.
मिष्टान व मिठाईचे दिवस..
विदेशी चॉकलेट्स चा खप वाढावा म्हणून आता खव्या वर धाडीचे सत्र सुरु होणार..
बनावटी खवा,.भेसळ युक्त खवा जप्त अश्या बातम्या झळकणार..
उद्देश हाच की चोकलेत्स भेट म्हणून द्या ..
पारंपारिक मिठाई नको...............................
म्हटलं आपल्याला अशा कॉन्स्पिरसी थिअर्या बनवता येतात का पाहू.
मी पण बनवल्या आहेत काही थिअर्या.
१. स्त्रीमुक्तीचा प्रचार सुरू झाला.
- Read more about कॉन्स्पिरसी थिअरीज
- 29 comments
- Log in or register to post comments
- 19369 views
आपल्या या भारत देशात
आपल्या या भारत देशात
आपल्या या भारत देशात
धर्म संस्कृतीचे गोडवे गातात................
म्हणायला आपली पवित्र संस्कृती
अनुकरण मात्र करतात पाश्चाती
धर्माने वागणाऱ्यास गावंढळ समजतात
आपल्या या भारत देशात..............
भ्रष्टाचाराचा उधळतो आहे वारू
दुधापेक्षा महाग आहे दारू
सर्व काही नेत्यांच्या हातात
आपल्या या भारत देशात.......................
शिक्षण नाही गरिबांच्या आवाक्यात
प्रवेशासाठी लाखो मोजले जातात
अपेक्षांच्या ओझ्यांनी विद्यार्थी दडपतात
आपल्या या भारत देशात................
राजकारणात फक्त गुंडानाच प्रवेश मिळतो
सज्जनांना बाहेरचा मार्ग दाखवला जातो
- Read more about आपल्या या भारत देशात
- 14 comments
- Log in or register to post comments
- 7787 views
व्यसन
.
- Read more about व्यसन
- 5 comments
- Log in or register to post comments
- 5460 views
पुस्तकांविषयीचे ब्लॉग्ज साहित्यसृष्टीला हानिकारक आहेत का?
गेल्या वर्षीच्या बुकर पारितोषिकावरून उठलेला वाद आणि त्याचा मराठी आंतरजालाच्या संदर्भात लागलेला अर्थ बुकर पारितोषिक, साहित्यिक मूल्य, दर्जा वगैरे या धाग्यात चर्चिला होता. या वर्षीच्या बुकर पारितोषिक निवडसमितीचे प्रमुख सर पीटर स्टॉटहार्ड यांनी ब्लॉगविश्वातल्या साहित्यविषयक मतांबद्दल काही विवादास्पद विधानं केली आहेत. त्यांच्या या विधानांमुळे इंग्रजी साहित्यक्षेत्रात पुन्हा एकदा खळबळ उडली आहे. स्टॉटहार्ड हे इंग्रजी साहित्यविश्वात प्रतिष्ठित असलेल्या 'टाइम्स लिटररी सप्लिमेंट'चे संपादक आहेत.
- Read more about पुस्तकांविषयीचे ब्लॉग्ज साहित्यसृष्टीला हानिकारक आहेत का?
- 17 comments
- Log in or register to post comments
- 13287 views
राम .. राम .. राम ..
राम... राम... राम... राम ...
माळ घेऊन माझा जप चालू आहे
कानावर बातमी
पेट्रोल डिझेल महागले
राम .. राम .. राम ..
माळ घेऊन जप चालू
कानावर बातमी
कोळसा घोटाळा जलसिंचन घोटाळा
राम . राम.
जप चालू
राम .
सिलेंडरची टंचाई
मरा.. मरा.. मरा...
आजकाल माझा जप नीट का होत नाही, माझ्या रामालाच ठाऊक !
.
- Read more about राम .. राम .. राम ..
- 6 comments
- Log in or register to post comments
- 5535 views