रामायण व महाभारत या काव्यांकडे आपण एका वेगळ्या प्रकारे पाहू शकतो. हा इतिहास आहे की नाही; राम आणि कृष्ण देव होते की नाही हे प्रश्न बाजूस ठेवू. ही दोन काव्ये त्या काळातील आपला देश आणि समाज याबाबत बरेच काही सांगतात. जी माहिती मिळते ती फार उद्बोधक आहे.
6 ऑगस्ट हा हिरोशिमा दिवस. सध्या ‘ओपनहायमर’ हा ख्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित चित्रपट गाजत आहे. ट्रिनिटी टेस्ट म्हणजे अणुबॉम्बची पहिली चाचणी झाली त्यावेळी झालेला स्फोट पाहून ओपनहायमरला गीतेतील जे श्लोक आठवले त्यांचे नक्की अन्वयार्थ कसे लावावेत? विनोबा आणि कृष्ण श्री. अर्जुनवाडकर यांनी ते कसे लावले होते? आज हिरोशिमा दिनाच्या निमित्ताने प्रा. बालमोहन लिमये यांचा लेख.
एका व्यापारी कंपनीने एक अवाढव्य आणि उज्ज्वल इतिहास असलेला देश याच देशातील सैनिकांचा वापर करून जिंकला. त्यामुळेच स्वातंत्र्यावेळी भारताला एक battle hardened सैन्य मिळाले.
इंग्रजांनी आधुनिक शिक्षण सुरू करण्यास प्रोत्साहन दिले. इंग्रजांनी चालू केलेल्या शिक्षण संस्थातून जे भारतीय बाहेर पडले त्यांना शिक्षणाचे महत्त्व लगेच कळले. वर्तमानपत्र आणि छापखाने ही कल्पनाही भारतात नवीन होती. आधुनिक भारताचा तो पाया झाला.
स्वतःला सवर्ण समजणारा समाज अस्पृश्यतेचा शिक्का उठवलेल्या सोन्यासारख्या जीवनाच्या चिंध्या करत असतो. आपण देश, धर्म, संस्कृती वगैरे शब्द किती क्षुद्र मर्यादेच्या रिंगणात वापरत असतो याचा प्रत्यय आला की आपले जगणे आपल्यालाच ओशाळवाणे वाटायला लागते. – पु. ल. देशपांडे