धर्माचा खरा अर्थ समाजापुढे मांडणारे विचारवंत एकोणिसाव्या शतकात उभे राहिले. दादोबा तर्खडकर, रामकृष्ण भांडारकर आणि जोतिबा फुले हे खऱ्या अर्थाने पहिले धर्म सुधारक होते.
शांतता, स्वातंत्र्य, विकास, समान हक्क आणि मानवी आत्मसन्मान ही सार्वत्रिक नैतिक मूल्ये (universal moral values) आहेत. पण मनुस्मृती लिहिली गेली त्या काळी या मूल्यांची कल्पना नव्हती.
अठराव्या शतकात शासनयंत्रणा कशी होती? आनुवंशिकतेने चालत आलेली वतनदारी सामान्यजनांचा जराही विचार करत नसे. जमा झालेला सारा सामान्यांच्या कल्याणासाठी वापरला जात नसे. संहितेवर आधारित न्यायव्यवस्था नव्हती. न्यायनिवाडा गावातील पंचांतर्फे होत असे.
थोरले माधवराव यांचे निधन फार लहान वयात झाले आणि त्यानंतर कोणीही कर्तबगार पेशवा झाला नाही. मग एका बाजूस मराठी सत्ता कोलमडली आणि दुसऱ्या बाजूस इंग्रजांची सत्ता वाढत गेली. इंग्रजांनी निरनिराळे अवैध मार्ग अवलंबून एकामागून एक संस्थाने गिळंकृत केली. शतकाच्या शेवटी इंग्रजांचे मोठे सैनिक सामर्थ्य उभे झाले होते.
इतिहासाचा अभ्यास करताना जिथे सलग प्रवाह खंडित झालेला दिसतो, अशा जागा शोधून त्यांचा अभ्यास केला गेला पाहिजे. भारताच्या इतिहासात १८१८ ते १९२० हा काल अशी जागा होती जिथे अखंड प्रवाह खंडित झाला आणि प्रवाहाला नवीन वळण मिळाले. त्या दशकाबद्दल सुधीर भिडेंची लेखमाला.
खाली एक पोस्ट ची लिंक देतो आहे ,
त्या नुसार आणि त्यावर जे कॉमेंट्स आले त्या नुसार "अल्ला देवे...अल्ला दिलावे " हा अभंग संत तुकाराम महाराजांचा आहे. या फोटो नुसार अभंग क्रमांक ३९८७ , ३९८८ अशा आशयाचा आहे. तर काही कॉमेंट्स नुसार अभंग क्रमांक ३९३६ , ३९३७ आहे.
.
कुतूहल म्हणून अधिकृत शासकीय शासकीय अभंग गाथा पाहिली , तर
अभंग क्रमांक ३९३६ , ३९३७ , ३९८७ , ३९८८ असे आहेत.
.
"३९३६. कान फाडूनियां मुद्रा तें घालिती । नाथ ह्मणविती जगामाजी ॥ १ ॥ घालोनियां फेरा मागती द्रव्यासी । परी शंकरासी नोळखती ॥ २ ॥ पोट भरावया शिकती उपाय । तुका ह्मणे जाय नर्क लोका ॥ ३ ॥"
.
(मागच्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील महाराष्ट्रातील विपरीत सामाजिक परिस्थितीतही स्वेच्छेने निवडलेले समाजकार्य शेवटपर्यंत एकाकी अवस्थेत नेणाऱ्या काही मूठभर व्यक्तींत 'समाजस्वास्थ्य' हे मासिक चालविणारे र. धों. कर्वे यांचे नाव सर्वात वरचे असेल. 26 वर्षे चाललेल्या या मासिकातील काही निवडक लेखांचा संग्रह पद्मगंधा प्रकाशनानी प्रसिद्ध केला आहे.
प्रा. प्राची देशपांडे लिखित "Creative Pasts" हा प्रबंधवजा ग्रंथ वाचून काही काळ उलटून गेला पण त्याबद्दल लिहायचे राहून गेले. राहून गेले म्हणा; त्याबद्दल लिहायला झेपेल असं वाटेना म्हणा. अलिकडे ते पुन्हा हाताशी लागलं. म्हण्टलं जमेल तशी ओळख करून द्यावी. म्हणून हे टिपण. संशोधनाच्या शिस्तीच्या अभावातून ते जन्माला आलेलं आहे त्यामुळे "आपणपण लिहायला काय जातं" असा त्याचा नूर आहे.