सामाजिक

दानिश सिद्दिकी

दानिश सिद्दिकी हा पुलित्झर मिळालेला पहिला भारतीय फोटोग्राफर होता. तो जे काम करत होता ते अतिशय आव्हानात्मक होतं. छायाचित्रकार इंद्रजित खांबे यांची आदरांजली.

स्पिन डॉक्टर्सची चलती!

(Spin doctor या इंग्रजी शब्दातील नेमका आशय ध्वनित करणारा मराठीत समानार्थी शब्द न सापडल्यामुळे संपूर्ण लेखात इंग्रजी शब्दच वापरला आहे.)
p1

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

करोनाव्हायरस आणि प्रतिकारशक्ती – डॉ. विनीता बाळ (भाग २)

लस दिल्यानंतर शरीरात काय व्हायला हवं? लस मिळालेल्या लोकांकडून संसर्ग कमी होतो का? हर्ड इम्युनिटी कधी येईल का? यासारख्या प्रश्नांची उत्तरं देत आहेत ज्येष्ठ इम्युनॉलॉजिस्ट डॉ. विनीता बाळ.

कोव्हिड लसींची परिणामकारकता - डॉ. प्रमोद चाफळकर

लसींची परिणामकारकता म्हणजे किती टक्के लोकांना कोव्हिड-१९ होऊ शकतो असा त्याचा अर्थ नाही. हॉस्पिटलमध्ये दाखल व्हायला लागू नये आणि मृत्यू होऊ नये एवढीच लसींची उद्दिष्टे आहेत. लस घेऊन हॉस्पिटल आणि मृत्यू टळला तरी सौम्य कोव्हिड-१९ होऊ शकतो. आणि ती व्यक्ती व्हायरस पसरवू शकते. त्यामुळे लस घेतल्यावरही फेसमास्क लावणे आणि सोशल डिस्टंटन्सिंग पाळणे आवश्यक आहे.

दुसऱ्या लाटेच्या निमित्ताने

महाराष्ट्रात कोरोना महासाथीचा ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात कहर चालू होता. ऑक्टोबरपासून हळू हळू सगळं ओसरत चाललं होतं . डिसेंबर अखेरीला दररोज नवीन बाधित रोग्यांची संख्या आटोक्यात आल्यासारखं चित्र दिसत होतं.

जानेवारीत सार्वत्रिक लसीकरणाची सुरुवात झाली आणि महासाथीच्यासंदर्भात सकारात्मक वातावरण निर्माण झालं होतं. पण आता महासाथ पुन्हा जोराने उसळून आलेली दिसते.

पुण्यात तर फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात फक्त दीडशे-दोनशे नवीन बाधित असत. आज चार पाच आठवड्यांच्या नंतर हाच आकडा हळू हळू वाढून दीडशेवरून ४५००च्या घरात गेला आहे.

लसविषयक शंकानिरसन आणि चर्चा

लसविषयक माहितीचा महापूर जरी सध्या आला असला तरी समाजात / लोकांच्या मनात अजूनही अनेक किंतु-परंतु आहेत. त्यांपैकी काहींचा परामर्ष घेत आहेत अवधूत बापट आणि मिलिंद पदकी.

नैतिकतेसाठी परमेश्वर हवा(च) का? – एक सर्वेक्षण

माणूस हा एक विचित्र प्राणी आहे. या प्राण्याला नाविन्याची फार हौस आहे. त्याच्यात सर्जनशीलतेची क्षमता आहे. गुंतागुंतीच्या समस्यांना योग्य उत्तरं शोधण्याची हतोटी आहे. त्यानी केलेल्या तंत्रज्ञानातील अफाट प्रगतीमुळे मानवी जीवन सुसह्य होत चालले आहे. स्वत:च्या आरोग्य स्थितीवर संशोधन करत तो आता जास्तीत जास्त वर्षे जगण्याचा प्रयत्न करत आहे. दुर्धर समजलेल्या रोगांवर औषधोपचार शोधल्यामुळे निरोगी आयुष्य जगणे त्याला आता शक्य होत आहे. परंतु एवढे करूनसुद्धा अजूनही तो अविचारांना, चुकीच्या विचारांना बळी पडतोच आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

महाराष्ट्रातील करोना : साथनियंत्रण व लसीकरण - डॉ. प्रदीप आवटे

डॉ. प्रदीप आवटे महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्पात (Integrated Disease Surveillance Program उर्फ IDSP) सर्वेक्षण अधिकारी आहेत. सध्या चालू असलेल्या लसीकरणाबाबत आणि एकंदर महासाथीच्या प्रवासाबाबत त्यांनी 'ऐसी अक्षरे'ला मुलाखत दिली.

सत्तातुराणाम् न भयं न लज्जा...

.xxx काही वर्षापूर्वी रॉबर्ट ग्रीन या अमेरिकेतील ‘एस्क्वॉयर’ नियतकालिकाच्या संपादकाने लिहिलेले व (भरपूर मार्केटिंगचे तंत्र वापरून) गाजविलेले ‘48 लॉज ऑफ पॉवर’ हे पुस्तक म्हणजे 15व्या शतकातील निकोले मायकेव्हेलीचीच सुधारित आवृत्ती म्हटले तरी वावगे ठरणार नाही. ‘दि प्रिन्स’ या मायकेव्हेलीच्या गाजलेल्या पुस्तकात सत्ता कशी काबीज करावी, सत्ता कशी टिकवावी व विरोधकांच्यावर मात कसे करावे याबद्दलचे काही उपयुक्त सल्ला-वजा-डोज दिले होते.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

सार्वजनिक आरोग्यव्यवस्था आणि लसीकरण यंत्रणा - डॉ. मधुसूदन कर्नाटकी

आपल्या खंडप्राय देशात कोरोनाचे लसीकरण कसे होणार अशी शंका बऱ्याच लोकांच्या मनात येते. परंतु आपण यापूर्वीही मोठे लसीकरण कार्यक्रम यशस्वीपणे पार पडले आहेत आणि कोरोना लसीकरण कार्यक्रमही तसाच यशस्वी होईल यात शंका नाही. लोकांच्या मनात असलेला किंतु दूर व्हावा याकरिता महाराष्ट्र राज्याच्या आरोग्यसेवेचे माजी सहसंचालक डॉ मधुसूदन कर्नाटकी यांचा हा लेख.

पाने

Subscribe to RSS - सामाजिक