सामाजिक

एका भारतीय नागरिकाचे मनोगत

एका भारतीय नागरिकाचे मनोगत...

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

बुद्धीवादाचा एक पंथ होउ नये- कै. मा.श्री. रिसबूड

सहज समजेल फलज्योतिष काय आहे व काय नाही? या कै. मा.श्री. रिसबूड यांच्या पुस्तकातील प्रकरण. हे प्रकरण टाकावे कि नाही? याबाबत रिसबूड साशंक होते. अंनिस यावर काय विचार करेल असाही मुद्दा होता. पण मी हे प्रकरण पुस्तकात असावे याबद्दल आग्रही होतो. त्यानुसार त्यांनी हे प्रकरण पुस्तकाच्या शेवटी समाविष्ट केले.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

समलिंगीसंबंध समाजमान्यता

६ सप्टेंबर २०१८ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ३७७ कलमामधून समलैन्गिकतेला वगळण्यात आले आहे. त्यामुळे अशा संबंधांना कायदेशीर मान्यता मिळाली असून समलैंगिक संबंध ठेवणाऱ्या व्यक्तींना इथून पुढे गुन्हेगार मानण्यात येणार नाही. या निर्णयानंतर समाजमनात आणि समाजमाध्यमांवर अनेक निरनिराळ्या तऱ्हेच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ठराविक सुजाण आणि संवेदनशील नागरिकांनी याबाबत समाधान आणि आनंद व्यक्त केला असला तरीही बहुसंख्य व्यक्तींना न्यायालयाच्या या निर्णयाचे महत्व व गरज लक्षात आले नाही असे, या प्रतिक्रियांवरून दिसते आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

वैचारिक - २

आरक्षणे देऊनही एखादा समाज शैक्षणिकदृष्ट्या सक्षम होईल याची सध्याच्या काळात खात्रीपूर्वक सांगता येत नाही. कारण भारतीय शैक्षणिक व्यवस्था म्हणजे मराठीत इंडियन एज्युकेशन सिस्टीम बुरसटलेली आहे. म्हणजे ही व्यवस्था बदलायला मूळातच
सुधारणा करून आणायला पाहिजे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

वैचारिक - १

कॉंग्रेस, भाजपा सारखे राष्ट्रीय पक्ष हे केवळ लोकशाहीचे मुखवटे आहेत. खरा देश चांडाळ चौकटी चालवत आहे. या चांडाळ चौकटीत देशातील व परदेशातील गुंतवणुकदार, कार्पोरेट व इंडस्ट्रियल लॉबी, मेडिया हाउसेस मँनेज करणारे आणि तथाकथित धर्माचे ठेकेदार असे सगळे येतात. त्यामुळेच मतदानाच्या वेळी सर्वाधिक ध्रुवीकरणासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जातपातधर्म. त्याचा वापर पुरेपूर करुन घेण्यासाठी राजकारणी नेहमीच तयार असतात. शिकले सवरलेले पण याला बळी पडतात. घडलेल्या घटनांचा केवळ जातपातधर्म यावर आधारित उल्लेख करणारे स्वतःला धर्मनिरपेक्ष वगैरे म्हणवून घेतात.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

इस्कॉन चा भोंदूपणा

इस्कॉन चा भोंदूपणा
रविवारी एका सिनिअरच्या आग्रहावरून १ इस्कॉन च्या रथयात्रेला जाण्याचा योग आला. (स्थळ दार एस सलाम टांझानिया).तिथे रथ वाली गाडी जाताना पुजारी लोक एका हातात दहाहजार शिल्लिंग घेऊन प्रसाद म्हणून केळं/चिकू देत होते.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

कर्तव्यपूर्ती

कंपनीच्या एकाच ऑफीसमध्ये दामले, जाधव, जगताप व मेश्राम हे चार जण काम करत होते. त्यांच्या बॉसचे नाव होते कारखानीस. कामाचे वाटप करणे, इतरांकडून व सहकाऱ्यांकडून झालेल्या कामाचा अहवाल तयार करणे, कामाचा पाठपुरावा करणे, आणि यानंतर नेमके काय करायचे याचा निर्णय घेणे याची पूर्ण जबाबदारी कारखानीस यांच्यावर होती. कारखानीस व त्यांच्या चार सहकाऱ्यांची टीम कार्यक्षम होती. कुठल्याही तक्रारीला येथे जागा नव्हती.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

भारतीय लोकशाही आणि जातजमातींच्या अस्तित्वाचा गुंता

काल वसंत व्याख्यानमालेत सुहास पळशिकरांच्या भाषणाला गेलो होतो. छोटेखानी भाषण होतं. तासभराचं असेल. विषयही घिसापिटा वाटेल असा होता. "जातजमातींच्या अस्तित्वाचा गुंता आणि भारतीय लोकशाही ". पण मला भाषण आवडलं. भाषणातला जो cosmetic भाग होता, तोसुद्धा आवडला. पळशीकरांचा आवाज, बोलण्याची लय, स्वच्छ,स्पष्ट शब्दोच्चार आणि अचूक शब्द निवड. इंग्लिश पुस्तकांच्या तुलनेत मराठी पुस्तकांमध्ये खूपदा हा दोष आढळतो की त्यांची छपाई तितकीशी भारी नसते. कागद सुमार/सर्वसाधारण असतो. फॉण्टकडे नीट लक्ष दिलेलं नसतं. भाषणाच्या बाबतीत ह्याचे समांतर मुद्दे म्हणजे आवाज, शब्दोच्चार वगैरे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

कलाकारांचे अजब जग...

अफाट समुद्राच्या तीरावर असलेल्या एका डोंगर माथ्यावर बसून अभय दातार बायनाक्युलर्समधून भोवतालचे दृश्य न्याहाळत होता. समुद्राच्या लाटा, लाटावरून उडणारे पक्षी, दूर कुठेतरी मच्छीमारांच्या होड्या इत्यादी गोष्टी बघत असताना त्याचे मन भरून येत होते. हाडाचा कलावंत असल्यामुळे प्रत्येक दृश्य नवीन काही तरी सांगत आहे, असे त्याला वाटत होते. तितक्यात त्याच्या बायनाक्युलर्सचा रोख समुद्राच्या काठावर पसरलेल्या निर्जन वाटणाऱ्या वाळूत केंद्रित झाला. काही क्षण रोखून पाहिल्यानंतर तेथे दूर कुठेतरी हालचाल दिसत होती.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

अरे पुन्हा 'समते'च्या पेटवा मशाली!

अरे पुन्हा 'समते'च्या पेटवा मशाली!

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

पाने

Subscribe to RSS - सामाजिक