सिलिकॉन व्हॅलीतल्या जेंडर डिसक्रिमिनेशनबद्दल
सिलिकॉन व्हॅलीत असलेल्या आणि वाढलेल्या जेंडर डिसक्रिमिनेशनबद्दल लेख - The Tech Industry’s Gender-Discrimination Problem
काही लक्षणीय मुद्दे -
- साधारण २०१२ नंतर कॉलेजातून नुकत्या बाहेर पडलेल्या पोरांना नोकऱ्या देण्याच्या स्पर्धेत, आपण 'कूल' आहोत असं दाखवण्याच्या ईर्ष्येमध्ये जेंडर डिस्क्रिमिनेशन वाढत जात आहे.
- स्त्रियांना कोणत्या, काय पातळीवर अन्याय सहन करावा लागतो, याची पुरुषांना कल्पनाही नसते. (आणि आपल्याला ते समजत नाही हे सुद्धा समजत नाही; त्यामुळे मान्य करण्याचा प्रश्नच येत नाही.)
- ट्रंपुली निवडून आल्यानंतर या विषयावर बोलण्याची स्त्रियांना आणखी जास्त गरज वाटते.
स्त्रियांना कोणत्या, काय
अनेक ठिकाणी जेंडर डिस्क्रिमिनेशन होते हे मला मान्य आहे. पण ती समस्या आहे हे मात्र मान्य नाही. फुर्रोगाम्यांनीच ती समस्या आहे ची बोंबाबोंब चालवलेली आहे व तो बकवास आहे.
सरकारी कंपनी मधे डिस्क्रिमिनेशन होणे हे गैर आहे. पण खाजगी कंपनी मधे डिस्क्रिमिनेशन होण्यात काहीही चूक नाही.
सिलिकॉन व्हॅली मधलं जेंडर डिस्क्रिमिनेशन ठळकपणे डोळ्यात भरते कारण सिलिकॉन व्हॅली मधल्या कंपन्या यशस्वी आहेत व भरपूर कमवतात त्यामुळे त्या कंपन्या नजरेत येतात. सिलिकॉन व्हॅली मधल्या कंपन्या मेक्सिकनांना व कृष्णवर्णियांना घेत नाहीत व आशियायी व गोऱ्यांना जास्त घेतात असा सुद्धा आरडाओरडा होतो. (पुरावे - 1, 2, 3, 4).
भारतातलं उदा. - सहकारी ब्यांकांमधलं, सहकारी साखर कारखान्यांमधलं डिस्क्रिमिनेशन याबद्दल लिहिलं जात नाही - कारण त्यांच्याकडे पैसा कमी.
--
अमेरिकेतलंच उदाहरण द्यायचं तर अमेरिकेत थलसेनेत् स्त्रियांना अनेक कामांवर गेली अनेक दशके परवानगी आहे. १९४३ पासून. त्याआधी स्त्रिया भाग घेत होत्या. परंतु आज सुद्धा थलसेनेत स्त्रियांचे प्रमाण फक्त् १४% च्या आसपास आहे.
हे म्हंजे स्त्रिया प्रोफेशन निवडताना सेनादलांविरुद्ध भेदभाव करतात असंच म्हणावे काय ?
.
.
"आपल्याला ते समजत नाही हे सुद्धा समजत नाही..."
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
गोबेल्स नीती ????
.
मुद्द्याचं बोला - लोकसंख्येत ५०% च्या आसपास असलेल्या अमेरिकन स्त्रिया आपले करियर निवडताना अमेरिकन सेनादलांविरुद्ध भेदभाव करतात का ?? का सेनादलात नोकरी न करणे हा अमेरिकन स्त्रियांचा प्रेफरन्स आहे व त्या प्रेफरन्स चा आदर केला पाहिजे ?? जर त्यांच्या प्रेफरन्स चा आदर केला पाहिजे तर सिलिकॉन व्हॅली मधल्या कंपन्यांमधल्या हायरिंग म्यानेजर च्या प्रेफरन्स चा आदर का केला जाऊ नये ??
.
का हे आपल्याला समजत नाहीये ??? का समजून घ्यायचं नाहीये ? Are you refusing to get the point ?
.
आय टि मधे तर रिव्हर्स जेंडर
आय टि मधे तर रिव्हर्स जेंडर डिस्क्रिमिनेशन होते. मनोबा विल ॲग्री.
मुळात व्यवसाय , धंदा, नोकरी मधे डिस्क्रिमिनेशन वगैरे शब्दांना थाराच असु नये. ज्यानी त्यानी आपली लायकी दाखवावी आणि किंमत मिळवावी.
कुठल्याही प्रकारच्या डिस्क्रिमिनेशन ची चर्चा न्याय, हक्क वगैरे एरिआ मधे ठीक आहे.
आय टि मधे तर रिव्हर्स जेंडर
मी वाचलेल्या माहीती नुसार अमेरिकेत स्त्रिया हेल्थकेअर मधे मोठ्या प्रमाणावर आहेत. आयमिन पुरुषांच्या मानाने.
तसेच खालील डेटा पहा -
.
.
समजत नाही हे समजत नाही.
मूळ लेखाचा या प्रतिसादांशी असलेला संबंध शोधा, सव्वा-अकरा रुपये मिळवा.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
कांगावा आवरा.
गब्बरच्या असंबद्ध, असंवेदनशील, अडाणी, अर्धवट आणि मूर्ख प्रतिसादाला उत्तर देण्याची गरज नाही. पण गब्बरच्या डोळ्यांवर/डोक्यावर जे कातडं आहे, ते कातडं इतरांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर आणि विवेकावर असण्याची गरज नाही. (हे सगळं स्पष्टीकरण मिहिरसाठी. कारण गब्बरला उत्तर दिलं की तो फटकारतो; आणि त्याचं फटकारणं बहुतांशी योग्यच आहे.) उदाहरणार्थ, ही बातमी पाहा.
Nude-Photo Scandal May Expand Beyond 'Marines United' Facebook Group
थोडक्यात - यू.एस. मरीन्स म्हणून काम करणाऱ्या किंवा केलेल्या स्त्रियांचे नग्न फोटोग्राफ आणि त्यावर आंबट प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी यू.एस. पुरुष मरीन्स फेसबुक ग्रूप चालवत होते.*
यू.एस. मरीन्स म्हणून काम करणाऱ्या स्त्रियांच्या खाजगीपणाचे आणि पर्यायानं त्यांच्या आत्मविश्वास, कर्तबगारी आणि मानसिक आरोग्याचे काय धिंडवडे पुरुष मरीन्स काढतात, याची कल्पना अशा बातम्यांमधून यावी. या स्कँडलची मोठी बोंबाबोंब झाल्यावर त्याविरोधात कारवाई सुरू झाली. त्यातही हा प्रकार टोकाचा क्रूर म्हणून मोठी बोंबाबोंब झाली. हे असं वागणारे आणि त्यांना पाठीशी घालणारे पुरुष एरवी, समोरासमोरही कितपत बरे वागत असतील याची कल्पना करता येईल; त्यासाठी पुन्हा न्यू यॉर्करमधला शीला कोल्हटकरांचा मूळ लेख संदर्भ म्हणून पुरेल. हे हिमनगाचं टोक.
मूळ लेख (जो वाचण्याची तसदी गब्बर घेणार नाही आणि वर आपला असंवेदनशील मूर्खपणा जाहीर करत इतरांना फुर्रोगामी आणि गोबेल्स असली नावं ठेवत बसेल**) त्यातही 'रेडिट' या समाजमाध्यमावर रिव्हेंज पॉर्नविरोधात भूमिका घेणाऱ्या सीईओ-स्त्रीला काय सहन करावं लागलं याचे तपशील आहेत.
*असे ग्रूप्स पूर्णतया बंद झाले असतील असं अजूनही वाटत नाही. याचं कारण, याच आठवड्यात बातमी होती की फेसबुकला नग्न शरीरांचे फोटो हवे आहेत; ते अभ्यासासाठी वापरून रिव्हेंज पॉर्न शोधण्याची अल्गोरिदम्स ते यंत्रांना शिकवणार आहेत. जोवर ही प्रक्रिया यंत्रांकडून होणार नाही, तोवर असे 'चविष्ट' समूह फेसबुकवर राहणार. आणि फेसबुकनं कारवाई केली तर रेडीट, ते बंद झालं तर व्हॉट्सअॅप असे चिकार पर्याय उपलब्ध असतात. स्त्रिया दुय्यम प्रतीच्या नागरिक आहेत असा विचार करणारे असंवेदनशील, अडाणी, अर्धवट आणि मूर्ख पुरुष आणि स्त्रियाही जगात असेस्तोवर हे प्रकार सुरूच राहणार.
** या (अ)नीतीत काही नवीन नाही. अभ्यास करून, आकलन करून घेण्याची बौद्धिक पत नसली, तेवढा आत्मविश्वास नसला की हेच होतं. 'द सेकंड सेक्स'मध्ये सिमोन दी बोव्हारनं अगदी हेच लिहिलेलं आहे; त्या काळात आंतरजाल आणि समाजमाध्यमं असण्याची गरज नव्हती. किंवा मेरी बेअर्ड तिच्या नवीनतम पुस्तकाच या प्रकाराची "परंपरा" असल्याचं लिहीते, असं या परीक्षणावरून दिसतं. पुरुष स्त्रियांशी, उच्चजातीतले लोक खालच्या जातीतल्या लोकांशी, गोरे लोक कृष्णवर्णीयांशी असेच वागतात. नावं ठेवणं सोपं. गब्बरची ती जुनीच रीत आहे. दुसऱ्यांनी काय लिहिलंय हे वाचायचं नाही; त्येच-ते, साधारण-लांबून-लांबून विषयाशी संबंधित वाटतील असे पण पूर्णतः असंबद्ध मुद्दे डकवायचे; विरोधकांना नावं ठेवायची, उचकवायचं आणि त्यांनी दुर्लक्ष केलं की 'जिंकलो, जिंकलो' म्हणून उड्या मारायच्या.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
गब्बरच्या असंबद्ध, असंवेदनशील
(१) गब्बर असंवदनशील आहे हे गब्बर ला सहर्ष मान्य आहे. हे माझ्या युझर आयडी ला अनुसरूनच आहे. परमवीरचक्र मिळाल्याप्रमाणे मी ते मिरवतो. सिरियसली.
(२) लेखाचे शीर्षक हे डिस्क्रिमिनेशन बद्दल आहे व माझा मुद्दा पण डिस्क्रिमिनेशन बद्दलचा च आहे. गब्बर चा प्रतिसाद असंबद्ध कसा आहे ते सांगा.
(३) माझे गृहितक हे की तुम्ही स्वत: सिलिकॉन व्हॅलित राहत नाही. गृहितक चूक असेल तर तसं सांगा. परंतु मी स्वत: सिलिकॉन व्हॅलित राहतो व सिलिकॉन व्हॅलितल्या टेक सेक्टर मधे काम करतो. किमान १० वर्षे. आणि तुम्हाला हे माहीती आहे हे माझे गृहितक आहे. गृहितक चूक असेल तर तसं सांगा. मूळ लेख हा सिलिकॉन व्हॅलितल्या टेक सेक्टरबद्दलचा च आहे. तेव्हा मला लेखाच्या काँटेक्स्ट ची तुमच्यापेक्षा जास्त माहीती आहे असं म्हणायला जागा आहे. - तेव्हा माझा प्रतिसाद अडाणी कसा आहे ते सांगा.
बालिश बहु बॉटासम बडबडला।
मी तर म्हणते की गूगलमध्ये साफसफाई करणाऱ्या रोबॉटनंच या विषयावर अधिकारवाणीनं बोलावं. रोबॉट म्हणजे टेक-सेक्टर, रोबॉट म्हणजे ना-स्त्री-ना-पुरुष थर्ड पार्टी, आणि गूगलमध्ये साफसफाई करणारा म्हणजे त्यालाच गूगलमधलं सगळं माहीत असणार.
या हिशोबात गब्बरच बॉट असणार. बालिश बहु बॉटासम बडबडला।
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
तो लेख न वाचताच एवढंच विचारतो
तो लेख न वाचताच एवढंच विचारतो एकाच बैठ्या जॅाबसाठी १) पुरुषाला नेमणे यास प्राधान्य देतात? / २) एकाच जॅाबच्या बय्राच जागा आहेत आणि स्त्रिया आणि पुरुष नेमले आहेत तेव्हा पुरुषांना उगाचच अधिक वरची स्केल देतात
यांपैकी कोणता भेदभाव आइटी कंपन्या करत असाव्यात?
दोन्ही आणि बरंच
दोन्ही. आणि बरंच काही. कामगार युनियनविरोधी केलेले नियम आता स्त्रियांचं लैंगिक आणि/किंवा आर्थिक शोषण करण्यासाठी वापरले जातात. शिट्या मारण्यापासून संभोगाची मागणी पूर्ण न झाल्यास सत्तेचा, पैशांचा गैरवापर. पदाचा गैरवापर करून स्त्रियांना संभोगासाठी भाग पाडण्याविरोधात पुरेसे कायदे नाहीत; हे असे पुरुष घपले करतात तेव्हा त्यांच्यावर कारवाई करणं सोपं जातं - अल कपोनसारखं - हा आणखी एक मुद्दा लेखात आहे.
तुमच्यात आणि गब्बर-अनुतैंमध्ये फरक असा की तुम्ही लेख न वाचल्याचं कबूल करून सहृदय प्रश्न विचारलात. हे दोघे लेखात काय म्हटलं आहे हे न वाचता असंबद्ध रडगाणी गात आहेत.
उदाहरणार्थ लेखात एक प्रसंग येतो. तरुण उद्योजक व्हेंचर कॅपिटलिस्टसोबत मिटींग ठरवते. त्यात सुरुवातीपासून गोष्टी संभोगाच्या मागणीकडे जातात. ती निघून जाते. आपल्या समानधर्मी पुरुषांकडे याबद्दल बोलते. तिला उपाय-पर्याय सुचवायचे दूरच, सहानुभूतीपूर्वक विचारही होत नाही; "हेच चालायचं," असं ऐकवलं जातं. म्हणूनच 'पुरुषांना समजतच नाही स्त्रियांसमोर काय अडचणी असतात', असं ती लेखात म्हणते आणि माझी कंसात मल्लीनाथी 'समजत नाही हेच समजत नाही.'
गब्बर-अनुतैंना समजत नाही हेच समजत नाही, त्यावर लेख वाचायचा अभ्यास करायचा नाही आणि मूर्ख बडबड (होय, मूर्खच) करून जाब मागितल्यासारखं लिहायचं. एवढं धैर्य मूर्खपणातूनच येतं. त्या दगडांवर कुठे डोकं आपटून घेऊ!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हम्म्!!
हम्म्!!
तुम्ही कधी न्युयॅार्कच्या लेखाची लिंक दिली तर वाचतो. राजकारण विषय असला तर संदर्भ कळत नाहीत ते सोडतो पण कलेविषयीचे वाचतो. आताचा जो विषय आहे त्यावर वर दिसते त्यापेक्षाही अधिक उदाहरणं / प्रकरणं प्रत्यक्ष घडत असतील परंतू नोंद होत नसल्याने पत्रकारिता पिवळी म्हणून आरोप होत असतील. स्थानिक लोकमात्र बरोबर समजून असतात. आताच एका मुलाखतीत हिंदी प्रसिद्ध नटी प्रियांकाने " इकडे शोषण होतं" असं स्पष्ट सांगितलं.
मागे एकदा एका वकीली शिकलेल्या सहकाय्राशी चर्चा करताना असं कळलं की हे काही गुन्हे कायद्याच्या चौकटीत न्यालयात सिद्ध करणे अतिशय अवघड असतं. पुरावे आणि साक्षिदारांशिवाय न्याय होत नाही आणि आरोपी दोन लोक हजर असल्याशिवाय गुन्हा करत नाही यावर कायद्याचा ठाम विश्वास असतो!!
गुन्हा आणि त्याची दहशत
या लेखात जी उदाहरणं आहेत, त्यात कंपन्यांचे नियम, बहुतेकसे कायदे आणि त्यातून निर्माण झालेली व्यवस्था नोकरदार लोकांच्या विरोधात आहेत.
सुरुवातीलाच टेसलामधल्या एका सेल्सवाल्या बाईचं उदाहरण आहे. तिला प्रमोशन देताना डावललं गेलं, तिच्यापेक्षा अननुभवी-पुरुषांना जास्त पगार दिले गेले, तिलाच काय कोणालाही जमणार नाहीत अशी टार्गेट्स दिली - थोडक्यात ती सफल होणारच नाही असं उद्दिष्ट ठेवलं, शिवाय शिट्या मारण्यापासून अश्लील कॉमेंट्सचा सामना करणं असले प्रकार तिच्यासोबत झालेच. तिनं तक्रार केल्यावर तिला नोकरी सोडून देण्यासाठी प्रलोभन दाखवलं; तिनं ते नाकारल्यावर तिला नोकरीवरून कमी केलं. तिनं दावा ठोकल्यावर तिला दुसरी नोकरी मिळू नये याची तजवीज करायला हालचाल झाली.
यात कंपनीचे नियम मरोतच, अनेक कायदे मोडले गेले. न्यायालयातून तिला न्याय मिळेल वगैरे सगळं ठीक. पण त्यासाठी तिला जो खर्च आणि मनस्ताप होईल, त्याचं काय! हे सगळं तिला सहन करावं लागलं कारण ती बाई आहे. शिस्न नसण्याची ही किंमत तिला मोजावी लागणार. अनेकींना मोजावी लागते. अशी अनेक उदाहरणं लेखात आहेत.
बरं, हा जो प्रकार असतो, अन्याय-न्यायालय-खर्च-मनस्ताप तो दोन बाजूंनी हानीकारक असतो. बलात्कारासारखाच. जिला प्रत्यक्ष त्रास होतो, तिला शिस्न नसण्याची किंमत चुकवावी लागतेच. पण त्याच जोडीला, तिच्यासारख्या अनेक स्त्रियांना त्याची दहशत बसते. होय, दहशत. 'माझ्यासारखीच आहे ती. म्हणजे मलाही असाच त्रास सहन करावा लागेल. नकोच ते!' असा विचार अभावितपणे केला जातो. एका बाईवर अन्याय होतो, तेव्हा कदाचित १०-१००-१००० स्त्रियांना दहशत बसते. याचं मोजमाप करणं फारच कठीण. लेखात तसेही उल्लेख आहेत; 'उबर'विरोधात एकीनं फेब्रुवारी २०१७मध्ये तक्रार केल्यावर मग खाजगीत अनेकींनी त्याच माणसाची, त्याच प्रकारची तक्रार केली. या स्त्रियांना नोकरी जाण्याची किती 'दहशत' होती, याचा त्यावरून निदान अंदाज येतो.
किंवा हार्वी वाइनस्टाइनवर दोन अभिनेत्रींनी आरोप केल्यानंतर मग किती स्त्रिया पुढे आल्या. (त्याच लाटेत केव्हिन स्पेसीवर आरोप करणारे पुरुषही पुढे आले. त्यावरूनही अन्यायग्रस्त लोकांमध्ये स्त्रियांचं प्रमाण पुरुषांपेक्षा किती जास्त आहे याची कल्पना येईल.) आणि किती वर्षं स्त्रिया दहशतीखाली जगतात याचाही अंदाज करता येईल!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
लेख वाचतोय. बरीच गुंतागंत
लेख वाचतोय. बरीच गुंतागंत करून लेख लिहिला आहे, असे वाटले. डिस्क्रिमिनेशन, सेक्शुअल हॅरॅसमेंट, रिटॅलिएशन अशी बरीच सरमिसळ आहे.
Employees have no right to demand such information. Period.
डिस्क्रिमिनेशन आणि सेक्शुअल
डिस्क्रिमिनेशन आणि सेक्शुअल एक्स्प्लॉइटेशन हे एकच असते का? म्हणजे हा लेख डिस्क्रिमिनेशन बद्दल आहे की एक्स्प्लॉइटेशनबद्दल?
ग्ब्बर बहुधा डिस्क्रिमिनेशनबद्दल* बोलत आहे.
*डिस्क्रिमिनेशन म्हणजे- स्त्री कर्मचाऱ्यांना कामावर ठेवण्याचे टाळणे, भिन्न पगार देणे, बढती देताना पुरुष कर्मचाऱ्यांना झुकते माप देणे या गोष्टी असे मी समजतो**.
एक्स्प्लॉइटेशन म्हणजे - सेक्शुअल फेवर्सची मागणी करणे, अश्लील वर्तन करणे, अश्लील शेरेबाजी करणे, मेल्स, चित्रे व्हिडिओ क्लिप्स पाठवणे इत्यादि
**अर्थात पुरुषांना समजूच शकत नाही हे जाहीर करून झालेले असल्याने या माझ्या समजण्याला काहीच व्हॅल्यू नाही हे मी*** जाणून आहे.
*** मी "पुरुष" आहे इतपत समज मला असण्याची शक्यता स्त्रीवाद्यांना मान्य आहे असे गृहीत धरले आहे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
बहुतांशी डिस्क्रिमिनेशन
सर्वप्रथम, लेख वाचण्यासाठी आणि आकलन करून घेण्यासाठी सगळ्यांना (अगदी पुरुषांनाही) उपलब्ध आहे. वाचाल तर वाचाल.
लेखाचा विषय बहुतांशी डिस्क्रिमिनेशन असा आहे; काही अंशी एक्स्प्लॉइटेशनही येतं; त्याचं कारण एकाच व्यक्तीला आणि व्यक्तिसमूहाला दोन्ही प्रकारांना तोंड द्यावं लागण्याची उदाहरणं आहेत; आणि त्यामागची कारणपरंपरा सारखीच आहे; असा लेखातला साटल्यपूर्ण मुद्दा आहे.
असंबद्ध गोष्टी सुसंबद्ध मुद्दे असल्याचा आव आणून गब्बर लिहीत आहे. सिलिकॉन व्हॅलीत जेंडर डिस्क्रिमिनेशन आणि त्याच्याच पुढे एक्सप्लॉयटेशन कसं आणि का चालतं, त्याची मुख्यतः आर्थिक बाजू काय आहे (हे लेख वाचल्याशिवाय, थोडक्यात अभ्यास केल्याशिवाय समजणार नाही; लेखात साटल्यही आहेच) असा लेखाचा विषय आहे; या लेखात स्त्रीवादी सिद्धांत म्हणावं असं फार काही नाही. या मुद्द्यांचा सैन्यात स्त्रिया का नाहीत, किंवा घरांची छपरं शाकारणाऱ्या लोकांत स्त्रिया कमी का, याच्याशी अर्थाअर्थी का-ही-ही संबंध नाही. गब्बर जे करतोय, ती नेहमीची राजकीय खेळी आहे.*
पॅसिव्ह अग्रेसिव्हपणा स्वाक्षरीबाहेर, प्रतिसादातही करण्याच्या "सीमोल्लंघनाबद्दल अभिनंदन".
*अवांतर - केव्हिन स्पेसीनंही तेच केलं; स्पेसीवर लहान मुलाच्या लैंगिक शोषणाचा आरोप झाल्यावर त्यानं 'मी गे आहे हो' असं जाहीर करून लक्ष तिथे वळवण्याचा प्रयत्न केला. स्पेसीचा प्रयत्न फसला; त्यावरून स्पेसीला फटके हाणणाऱ्या ओवन जोन्सकडून मी थोडं शिकले.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
डिस्क्रिमिनेशन आणि सेक्शुअल
यही तो मै कह रहा हूं, मालिक. लेखाचे शीर्षक डिस्क्रिमिनेशन बद्दल आहे. व लेखात डिस्क्रिमिनेशन हा शब्द किमान १० वेळा आलेला आहे. एक्स्प्लॉईटेशन हा शब्द एकदा. हरासमेंट हा शब्द किमान ४० वेळा. रिटॅलिएशन हा मुद्दा किमान चार वेळा. मी फक्त डिस्क्रिमिनेशन बद्दल बोलत होतो.
माझा मुद्दा फक्त डिस्क्रिमिनेशन बद्दलच्या कांगाव्याबद्दल होता. खालील स्टेटमेंट्स पहा. विशेषत: तांबड्या रंगात रंगवलेली. डिस्क्रिमिनेशन हे चूक आहे हे वाक्यच मुळात चूक आहे. व्यक्तीला प्रेफरन्सेस असतात .... अमेरिकनच नव्हे तर इतर स्त्रिया सुद्धा सेनादलांत जायला व्यवस्थित सक्षम असतात. पण तरीही अमेरिकन स्त्रिया लोकसंख्येत ५०% च्या आसपास असूनही सेनादलांत त्यांचे प्रमाण फक्त १४% च आहे. सेल्फ सिलेक्शन. ज्याप्रमाणे अमेरिकन स्त्रियांना सेनादलांत संधी असूनही त्यांना जायचे नसते त्याप्रमाणे काही हायरिंग मॅनेजर्स ना स्त्रियांना नोकरी द्यायची नसते. त्यांचात्यांचा प्रेफरन्स असतो. अर्थात कंपनीची जेंडर डिस्क्रिमिनेशनविरोधी पॉलिसी असेल तर कंपनी त्या भेदभाव करणाऱ्या हायरिंग मॅनेजर वर कारवाई करू शकेलच. सर्वसामान्यपणे खाजगी कंपनीचा उद्देश नफा कमवणे हा असतो स्त्रिपुरुष समानता राबवणे हा नसतो व कंपनीच्या आतमधे स्त्रिपुरुष समानता राबवणे ह्यासाठी लागणारे गव्हर्नन्स मेकॅनिझम खर्चीक पडू शकते. उदा. कंपनीची जेंडर डिस्क्रिमिनेशनविरोधी पॉलिसी असेल तर कंपनीला भेदभावाची तक्रार नोंदवून घेणे, घटनेची तैकिकात करणे, निर्णय घेणे, व तो राबवणे - ह्यावर खर्च करावा लागतो. अगदी ते काम आऊटसोर्स करून तो खर्च सरकारवर सोपवायचा म्हंटलं तरी तैकिकात करणारे येणार, इंटरॉगेशन करणार, रेकॉर्ड्स मागणार, शहानिशा करणार व त्यातून इतर मिटिंगा कराव्या लागणार व शेवटी निर्णय होणार - ह्यात वेळ व पैसा दवडावा लागतो. व विद्यमान व संभाव्य शेअरहोल्डर्स हे तुम्ही (म्हंजे मॅनेजमेंट) किती न्याय्य आहात या पेक्षा तुम्ही किती नफा कमवू शकता - याकडे पाहतात.
कोणताही (सरकारी संस्थेतील वा खाजगी कंपनीतील) गव्हर्नन्स हा कॉस्टलेस असतो हे फुर्रोगाम्यांचं आवडतं गृहितक आहे. व अनेकदा (प्रत्येक वेळी नव्हे) एकाशी संवेदनक्षम वागणे हे दुसऱ्याशी असंवेदनक्षमपणा असतो हे तर त्यांच्या गावीही नसतं.
डिस्क्रिमिनेशन कमी करण्यासाठी
डिस्क्रिमिनेशन कमी करण्यासाठी या स्त्रिया एखादा ऑस्सम ओपन सोर्स प्रोजेक्ट मुळापासून का तयार करत नाहीत?
समजा असा प्रोजेक्ट तयार केला आणि तो जर बर्याच ठिकाणी वापरला जात असेल तर मग कुणाला कपॅबिलिटी वर डिस्क्रिमिनेशन करण्याचा वावच मिळणार नाही.
जाता जाता: असे किती ओपन सोर्स प्रोजेक्ट्स आहेत जे स्त्रियान्नी चालु केलेले आहेत आणि मेन्टेन केलेले आहेत?
डिस्क्रिमिनेशन कमी करण्यासाठी
डिस्क्रिमिनेशन कमी करण्यासाठी मार्ग आहे. मस्त मार्ग आहे. व हा मार्ग ह्या फेमिनिस्ट स्त्रियांनी अवलंबला तर कंपन्यांना व त्यांच्या म्यानेजमेंट्सना त्याची दखल घ्यावीच लागेल. तो मार्ग आहे फेमिनिस्ट स्त्रियांनी एकत्र येऊन गट प्रस्थापित करून अशा कंपन्यांचे स्टॉक्स शॉर्ट करणे. हे खर्चीक काम आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे "हस्तिदंती मनोरे" वगैरे वगैरे वगैरे.
तुम्हीच खरे उद्धारकर्ते
बायकांनी कसं-काय करावं, हे सांगायला
आले, गं बाई, आले।
आले गोगोल-गब्बर आले।
भुसनळे पेटून विझले॥
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
विक्टिम मेंटॅलिटी
मला वाटल की तुम्हाला खरचच काहीतरी उपाय शोधायचे आहेत, काही डेटा पॉईन्ट्स बघुन कुठे सुधारणा करता येते ते बघायचे आहे.
एकंदरीत तुमचे शिस्नासंबधी, आणि भुसनळे पेटून विझले ई. ई. प्रतिसाद वाचून तुम्हाला फक्त विक्टिम मेंटॅलिटी गोंजारत बसून पुरुषांना झोडपायचे आहे हे लक्षात आले. ईतरांनी तुमच्या अजेंडा च्या विरुद्ध काहीही म्हणले की त्याला मुर्ख ठरवायला काहीतरी अगम्य प्रतिसाद द्यायचे हा फेमिनाझी कावा पण कळला.
एकंदर या चावून चोथा झालेल्या प्रकारात वैयक्तिक रित्या काहीही आवड व वेळ नसल्यामुळे माझा येथे शेवटचा प्रतिसाद. चालू दे तुमचे.
ईतरांनी तुमच्या अजेंडा च्या
यू सेड इट, ब्रो.
फेमिनाझी ताईंचे मुद्दे खोडून काढले गेले की त्यांच्या प्लेबुकमधल्या नेहमीच्या मुव्हज सादर होतात.
- चमत्कारिक वाक्यरचना करून एक निरर्थक प्याराग्राफ लिहून उत्तर दिल्याचा आभास निर्माण करणे
- 'भुसनळे विझले गं बाई' टाईप गाणी-गवळणी गाणे (जीभ काढून वेडावून दाखवण्याचे ऑनलाईन एक्विव्हॅलंट)
- अचानकच आपला 'संयम आणि उपलब्ध वेळ' संपला असल्याचे आठवणे
- श्रेण्यांची चंची उघडून पकाऊ श्रेण्यांचे वाटप करण्याचा पासिव्ह ॲग्रेसिव्हपणा करणे
- काहीच नाही तर चक्क शिव्या लिहून काढणे
एकूणात मनोरंजक लीळा असतात, हे खरं.
Liberalism is a mental disorder
खरय
(माझा स्वत:चा इथे प्रतिसाद न देण्याचा निश्चय तोडून अगदी न राहावले म्हणून)
ज्यांच्याकडे प्रतिभा आणि कष्ट करण्याची कुवत असते ते प्रतिकूल परिस्थितीतूनही मार्ग काढून जे मिळवायचे असते ते मिळवतातच.
मेरी क्युरिला दोनदा नोबेल प्राईझ मिळवताना नाही आड आले डिसक्रिमिनेशन?
मरियम मिर्झाखानीला फिल्ड्स मेडल मिळवताना नाही आड आले डिसक्रिमिनेशन (किंवा मुस्लिम धर्म)?
इन्द्रा नुयीला शिस्नाची कमतरता नाही जाणिवली पेप्सी सारखी मोठी कंपनी चालवताना?
इंदीरा गांधींना भारतासारख्या देशाचे प्रतिनिधीत्व करताना नाही प्रश्न आला की इथल्या पुरुषांना कसे समजावू की "ते समजत नाही हे सुद्धा समजत नाही"?
यातील प्रत्येक स्त्री वंदनीय आहे आणि यापैकी कुणाच्याही खाली काम करायला मिळाल असत तर तो माझा बहुमान असता. माझ्या मते आपापल्या क्षेत्रात आपण आपल्या कुवतीनुसार स्टॅग्नेट झालो आहे हे समजले की फ्रस्ट्रेशन येते. अशा स्त्रियांची आपण पुढे जात नाही कारण आपली तीतकी लायकी नाही हे सत्य मान्य करायची तयारी नसते. मग घ्यायचा आधार डिसक्रिमिनेशनचा.
च्यामारी आम्ही बरे. माहीत आहे की आम्ही काही फार साध्य नाही केल आमच्या कुवतीप्रमाणे. पण निदान आम्ही ब्राउन असल्यामुळे आम्हाला डिसक्रिमिनेट केल जात आहे अशी बोंब तर नाही मारत...
शेवटचा प्रतिसाद असं म्हणूनही
शेवटचा प्रतिसाद असं म्हणूनही नंतर लोक कुठचंही प्रोव्होकेशन नसताना दातओठ खाऊन, चेवाने वगैरे नवीन प्रतिसाद का लिहितात हे कळत नाही. आणि समजा लिहिला, तरी आपलं statistics, normal distribution, outliers वगैरेबद्दलचं अज्ञान का अधोरेखित करतात? It takes all kinds to make this world I guess.
मस्त मस्त
> शेवटचा प्रतिसाद असं म्हणूनही नंतर लोक कुठचंही प्रोव्होकेशन नसताना दातओठ खाऊन, चेवाने वगैरे नवीन प्रतिसाद का लिहितात हे कळत नाही.
तुम्हाला एक्झॅक्ट्ली काय त्रास झाला?
आणि भुसणले विझले की नाही हे प्रोव्होकेटिव आहे की नाही हे ठरवणारे तुम्ही कोण?
जर तसेच असेल तर सेक्स बद्दल डिमांड करणारे लोक तरी प्रोवोकेटीव का मग?
ट्रिगर व्हायचा हक्क काय फक्त फेमिनाझींचाच आहे का?
> आणि समजा लिहिला, तरी आपलं statistics, normal distribution, outliers वगैरेबद्दलचं अज्ञान का अधोरेखित करतात? It takes all kinds to make this world I guess.
पुर्ण लेखात कुठेही स्टॅटीस्टिक्स बद्दल काहीही बोललेले नाहीये. तुम्ही सुद्धा स्टॅटीस्टिक्स, नॉर्मल डिस्ट्रिब्युशन, आणि आउटलायर्स असे शब्द वापरून मी मुर्ख आहे हे सगळ्यांना दाखवून दिले पण स्वत: हुशारीने कुठेही याबद्दल बोलायचे टाळलेले आहे. जर तुम्ही बोलू शकता तर सप्रमाण सिद्ध का नाही करत?
केवळ आकडेवारीने तर लोक हे सुद्धा म्हणू शकतील की स्त्रियांना गणित जमत नाही कारण की आत्तापर्यंत च्या गणिती स्त्री संशोधकांची कामगिरी तितकी भरीव नाही.
(आता मी आधीच सांगतो की मी याच्यावर विश्वास ठेवत नाही. स्त्री आणि पुरुषांमध्ये बौद्धिक रित्या काहीही फरक नाही)
याप्रकारच्या खंडनाला ॲड होमिनियम म्हणतात हे नमूद करू ईच्छितो.
जाता जाता: मुळ लेखकाने फोन अ फ्रेंड ही लाईफलाईन वापरलेली दिसतीये कारण की घासकडवी साहेबांचा मुळ लेखनावर स्वत:च मत व्यक्त करणारा एकही प्रतिसाद नाही. जो काही प्रतिसाद आहे तो माझी अक्कल बाहेर काढायला टाकलेला आहे. काढा काढा, अपनी तो जैसे तैसे, थोडी तो ऐसे या वैसे ..
अहो रागावू नका. मला खरंच हे
अहो रागावू नका. मला खरंच हे दोन्ही प्रश्न कायम पडलेले आहेत, तुमचा प्रतिसाद पाहून ते पुन्हा सुचले इतकंच. मेरी क्यूरीसारखी आउटलायर उदाहरणं देऊन तुम्ही 'हे सर्वच स्त्रियांना का जमत नाही?' असा प्रश्न विचारला म्हणून संख्याशास्त्राच्या ज्ञानाबद्दल शंका आली. अशी शंका व्यक्त करणं म्हणजे तुमचं ते काय ते अॆड होमिनिम कसं होतं हेही कळलं नाही. पण तुम्ही ठामपणे बोलताय म्हणजे तुमचंच खरं असणार.
तुम्हाला किती नोबेल मिळाले ओ?
गोगोल, आणि त्यांचा प्रतिसाद मार्मिक वाटणाऱ्या सगळ्यांना मेरी क्यूरीसारखे दोन नोबेल पुरस्कार मिळाले कि त्यांच्या मताचा विचार करू.
तोवर भुसनळ्यांची गंमत बघून शिट्या मारायला मला जमेल. तुम्ही येणार का पाॅपकाॅर्न घेऊन?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
तोवर भुसनळ्यांची गंमत बघून
कृपया ॲग्रेसिव्ह न होता आणि वैयक्तिक टिकाटिप्पणी टाळून बोलले, तर चांगली चर्चा करता येईल असे मला वाटते. व्यक्तिश: मलातरी गब्बर, गोगोल, पिऱ्या मांग आणि थत्तेचाचा यांचे लिखाण मुद्देसूद वाटले.
हा घ्या रुमाल.
ऑ ... टिंगल एवढी टोचली का? सवय नसेल ना, बायकांकडून टिंगल करवून घेेण्याची!!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
पुन्हा तुम्ही
पुन्हा तुम्ही सोयिस्कर रित्या मुळ मुद्द्याला बगल दिलीत.
मान्य आहे की मी दिलेली उदाहरणे आउटलायर आहेत. पण मी सर्व स्त्रियांनी हे करावे या हेतुने ती दिलेली नव्हती.
जाता जाता, मुळ लेखाचा काउंटर पॉईन्ट: https://www.nytimes.com/2017/09/23/technology/silicon-valley-men-backlas...
मूळ मुद्दा? माझ्या प्रतिसादात
मूळ मुद्दा? माझ्या प्रतिसादात फक्त दोन गोष्टींबद्दल चर्चा होती. एक म्हणजे थांबतो म्हणूनही न थांबणारे. दुसरा म्हणजे 'या आउटलायर्सना जमतं ते सामान्यांना का जमत नाही?' असा प्रश्न विचारून सांख्यिकीचं अज्ञान प्रकट करण्याचा. थोडक्यात 'तुमचा युक्तिवाद चुकीचा आहे' एवढाच माझा मुद्दा होता. त्यावर मी ठाम आहे.
निव्वळ वादासाठी वाद वाटतोय.
गुर्जी, मला सांख्यिकीचं अज्ञान आहे, म्हणून जरा प्रश्न विचारतो तुम्हाला. (केवळ चर्चा व्हावी म्हणून, गंभीरपणे विचारत आहे.)
पुढील चार्ट दिसला आत्ता. ६ वर्षांपूर्वीचा आहे, पण समजून घ्या.
नोबेल जिंकणाऱ्या स्त्रिया तुलनेत खूप कमी दिसत आहेत. यावर माझे प्रश्न:
१. ज्या स्त्रियांना नोबेल मिळाले आहे, त्या सगळ्या आउटलायर आहेत का?
२. जर उत्तर "नाही" असे असेल तर ५०% स्त्रिया असूनही त्यांना इतके कमी नोबेल पुरस्कार मिळतात, म्हणजे हे जेंडर डिस्क्रिमिनेशन समजावे का?
३. जर उत्तर "हो" असेल तर फेमिनिस्ट त्याबद्दल बोलतात का? तुम्हाला काही कल्पना आहे का?
४. टेक कंपन्यात स्त्रियांना कमी मिळणारा पगार व स्त्रियांना कमी मिळणारे नोबेल पुरस्कार यापैकी जास्त महत्वाचे काय ठरेल की दोन्ही सारखेच महत्वाचे आहेत? नोबेल पुरस्कारात स्त्रियांसाठी ५०% आरक्षण मागणे योग्य ठरेल काय?
मूळ मुद्द्यावर तुम्ही काही मत दिले नाही, म्हणून स्पष्ट विचारत आहे.
(तुम्ही पुरुष असल्यामुळे काही प्रश्न तुम्हाला कळले नाहीत, तर समजू शकतो.)
सांख्यिकी १०१
(गुर्जींशी अनेक स्त्रीवादी संकल्पना-आकलनाबद्दल माझे मतभेद असले तरीही इथे त्यांनी मूळ मुद्द्याबद्दल पुरेसं मतप्रदर्शन केलेलं आहे, असं माझं आकलन आहे.)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
अदिती आऊटलायर तो विदाबिंदू
अदिती आऊटलायर तो विदाबिंदू असतो ना जो एकदम हटके असतो. बहुतेक .... मला आता नीट आठवत नाही पण एकच असा बिंदू असतो जो सरासरी पार बदलवुन टाकतो?
सांख्यिकीचं अज्ञान तुमच्या
सांख्यिकीचं अज्ञान तुमच्या चार्टच्या अवलोकनातूनच दिसतं. प्रश्न असा आहे की नोबेल मिळणाऱ्या स्त्रियांची संख्या कमी का? उत्तर सोपं आहे, गेल्या शतकात उच्च शिक्षण घेणाऱ्या पुरुषांची संख्या उच्च शिक्षण घेणाऱ्या स्त्रियांपेक्षा अनेक पटींनी जास्त आहे. शंभर कोटी सुशिक्षितांमध्ये एक नोबेल मिळत असेल, तर जास्त पुरुषांना मिळेल, कमी स्त्रियांना मिळेल हे उघड आहे.
नोबेल पुरस्कार कमी मिळणं यात नोबेल समितीचं डिस्क्रिमिनेशन नाही. मुळात स्त्रियांना शिक्षण दिलं जात नाही यातून समाज डिस्क्रिमिनेट करतो हे कारण आहे. आणि यावर तुम्ही म्हणता की ज्या इतकूश्या बायकांना शिक्षण मिळतं त्यांच्यातून ज्या हाताच्या बोटावर मोजणाऱ्या स्त्रिया पुढे येतात त्यांच्यासारखंच इतर स्त्रियांनीही करायला काय हरकत आहे? मग तुम्हाला सांख्यिकीचं आकलन नाही म्हणावं तर दुसरं काय म्हणावं?
फेमिनिझम म्हणजे १.आपल्या
फेमिनिझम म्हणजे १.आपल्या स्त्रीत्वाचा न्यूनगंड, २.मिसँड्री, ३.शिश्नमत्सर आणि ४.क्लोझेट लेस्बियनिझम या सर्वांचे एकत्रित पूसीटेल१ आहे हे फेमिनिस्टांना समजत नाही, आणि आपल्याला ते समजत नाही हेसुद्धा समजत नाही.
१. कॉकटेल शब्द यांना आवडणार नाही म्हणून
Liberalism is a mental disorder
अमेरिकेत खाजगी आणि सरकारी
अमेरिकेत खाजगी आणि सरकारी क्षेत्रात स्त्री पुरुष पगारात समानता आली का आता ? (पूर्वी नव्हती असे ऐकून आहे )
नाही
किमान काही सरकारी पगार जाहीर होतात; तिथे पर्याय नसणार. लेखात 'टाईम'नं केलेल्या सिलिकाॅन व्हॅलीच्या पगारांच्या विश्लेषणांचा उल्लेख आहे. त्यात समानता नसल्याचे उल्लेख आहेत.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
1. अमेरिकेत खाजगी क्षेत्रात
1. अमेरिकेत खाजगी क्षेत्रात स्त्री पुरुष पगारात समानता असणे हे कायद्यानुसार आवश्यक नाही.
2. Promotion is not a matter of right. As an employee at will, your employer has the right to determine when or if you should be promoted.
एकंदर चर्चा पूर्वग्रहदूषित असल्याने अधिक लिहित नाही.
बाकी चालू द्या.
Promotion is not a matter of
अगदी.
नोकरी हा पण अधिकार असू शकत नाही.
एखाद्या खाजगी दुकानात सुद्धा कस्टमर म्हणून प्रवेश करणे हा अधिकार नसतो. अनेक दुकानांत पाटी असते की - We reserve the right to refuse service to anyone.
नोकरी हा पण अधिकार असू शकत
At-will employment मध्ये कारण किंवा वॉर्निंग न देता कंपनी तुम्हाला कामावरून कमी करू शकते, तसेच एखादा एम्प्लॉइपण कारण किंवा वॉर्निंग न देता नोकरी सोडू शकतो/शकते.
स्पेशल काँट्रॅक्ट असेल (उदा. एक्झिक्युटिव्ह) किंवा युनियन एम्प्लॉइ असेल तर ते तितकेसे सोपे नाही.
धन्यवाद . समान नसणं हे
धन्यवाद . समान नसणं हे बेकायदेशीर नाही हे कळले . सरकारी क्षेत्रातही असेच आहे का ?
सरकारी क्षेत्राबद्दल माहीत
सरकारी क्षेत्राबद्दल माहीत नाही.
समान पगार नसण्याची काही कारणे: १) सिनिऑरिटी २) कामाचे स्वरूपः उदा: पुरुष ऑपरेटरला जास्त ओव्हरटाइम मिळतो पण स्त्री सेक्रेटरीला तितक्या प्रमाणात मिळत नाही. ३) मेरिट रँकिंग ४) प्रॉडक्शन आउटपुट किंवा क्वालिटी ५) इतर काही पद्धत जी सेक्स डिस्क्रीमिनेशन करत नाही ( सेक्स डिस्क्रीमिनेशन बेकायदेशीर आहे). उदा: विशिष्ट कामासाठी बोनस किंवा पे प्रिमियम वगैरे.
माझा प्रश्न थोडा वेगळा होता .
माझा प्रश्न थोडा वेगळा होता . त्यात 'इतर सर्व गोष्टी सामान असतील तर ' त्यात हे महत्वाचे .
उदाहरणार्थ सिनिऑरिटी , कामाचे स्वरूप, आउटपुट किंवा क्वालिटी हे सर्व समान असेल तर ... असा प्रश्न आहे .
जसे भारतात रोजगार हमी योजने मध्ये (निदान पूर्वी तरी ) स्त्री व पुरुष मजुरांना दिला जात असलेला डेली पगार (?) वेगळा असे . त्यात गृहीतक असे असे कि स्त्री हि शारीरिक कष्टाचे काम कमी करू शकणार त्यामुळे तिचा आउट पुट वेगळा असणार . ( हे गृहीतक १०० टक्के वेळेस काही खरे नसे . बऱ्याच स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त आउटपुट देत तरीही ) .
पगार देण्याचे २ प्रकार म्हणजे
पगार देण्याचे २ प्रकार म्हणजे hourly or salaried. तासावर पगार देताना "समान कामासाठी समान वेतन" हा सर्वसाधारण नियम आहे. म्हणजे कॅफेटेरियातील शेफ. तिथे पुरुष/स्त्री कुणीही काम करू शकतो आणि पगार तासावर ठरला जातो. काही-काही सेक्रेटरीजचे पण तसेच. सॅलरी असेल तर पगाराचा १ बँड असतो. उदा: ८२,००० ते ११२,०००. यात तुमचा पगार काहीही असू शकतो. एच.आर. शक्यतो मिडपॉइंटच्या जवळपास पगार ठेवायचा प्रयत्न करतात. कंपनीच्या दृष्टीने आपण फक्त १ रिसोर्स आहोत, स्त्री किंवा पुरुष याने कंपनीला काही फरक पडत नाही. सारखे सारखे नोकरी सोडून जाणाऱ्यांपेक्षा नोकर टिकून राहाणे, कंपनीच्या दृष्टीने महत्वाचे आहे.
"समान कामासाठी समान पगार" अशी मागणी करणाऱ्यांनी मिल्टन फ्रिडमनचा पुढील व्हिडिओ बघावा.
https://youtu.be/hsIpQ7YguGE
धन्यवाद . उत्तर मिळाले .
धन्यवाद . उत्तर मिळाले .
कायद्यांचा स्त्रियांविरोधी वापर
कामगार कायद्यांचा वापर स्त्रियांविरोधात होत आहे त्याचं उदाहरण.
न्यू यॉर्करच्या लेखात हाही एक मुद्दा आलेला आहे. नोकरदारांचे पगार किती हे जाहीर करण्याची गरज नाही.* काही स्त्रियांनी पुढाकार घेऊन अशा प्रकारची विदागारं निर्माण करायला सुरुवात केली आहे. त्यात काही पुरुषांनीही आकडे भरलेत. कायद्यानुसार स्त्रिया त्याविरोधात काही करू शकत नाहीत; पण न्यू यॉर्करसारख्या प्रतिष्ठित प्रकाशन संस्थांचं महत्त्व तिथे अधोरेखित होतं. 'टाईम' किंवा 'न्यू यॉर्कर'नं टीका केल्यानं छीथू होणं कोणत्याही बड्या कंपनीला परवडणारं नसतं.
*मी हल्लीच जो कोर्स केला त्यातला एक भाग नोकरी मिळवण्यासाठी प्रशिक्षण हा होता. त्यात आमच्या शिक्षिकेचं म्हणणं, "त्यांची अपेक्षाच असते की तुम्ही घासाघीस करावी." विद्यापीठीय संशोधनाच्या पार्श्वभूमीतून आल्यामुळे मला हा प्रकार फारच धक्कादायक वाटला होता.
तेरीज हस्टन नावाच्या मानसशास्त्रज्ञानं पुस्तक लिहिलंय 'How Women Decide'; त्यातही तिनं या प्रकारांचा उल्लेख केला आहे. तिनं गोळा केलेल्या संशोधन-विदेनुसार, पुरुषांना स्वतःबद्दल जरा जादाच अपेक्षा असतात, स्त्रिया स्वतःला कमी लेखतात. पुरुषांनी अवाच्यासव्वा मागणी केली तर ती पूर्ण होण्याची शक्यता अधिक असते; स्त्रियांच्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावण्याची शक्यता जास्त. ही आणि अशी अनेक डिस्क्रिमिनेशन्स, त्यामागची वैचारिक भूमिका, स्त्री-पुरुषांवर केलेले अनुषंगिक मनोवैज्ञानिक प्रयोग आणि मुख्य म्हणजे, यावर स्त्रियांना काय करता येईल याबद्दल ती व्यावहारिक सल्लेही देते. डोकं ठिकाणावर असलेल्या आणि वरच्या पदांवर असणाऱ्या पुरुषांनाही त्याचा फायदा होईल.
सर्वात मुख्य, व्यवसायाची भरभराट व्हायची असेल सर्व प्रकारची कौशल्यं असणारे लोक असावेत, याबद्दल ती लिहिते. सुरुवातीपासूनच समानतेचं धोरण अवलंबणाऱ्या, डिस्क्रिमिनेशन न करणाऱ्या कंपन्या २००८च्या बुडबुडा आणि मंदी या काळातही कशा तगून, टिकून राहिल्या आणि इतरांच्या तुलनेत त्यांची लवकरच भरभराट झाली यांवर - स्त्री-पुरुष मानसिकतेतला फरक, मानसशास्त्रीय प्रयोग, अनुभवाचा फायदा - ती सविस्तर विश्लेषण लिहिते.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
कायद्यानुसार...
एक स्पष्ट करायला विसरलात की हे स्त्रिया आणि पुरुष दोघांनाही लागू आहे.
धन्यवाद. मला पण टॅक्स भरायला आवडत नाही, पण कायद्यानुसार मी त्याविरोधात काही करू शकत नाही. तसंच काहीसं.
Weyco कंपनीचे हे उदाहरण व दुसरी लिंक उदाहरण तर अजून इंटरेस्टिंग आहे.
Epolito was fired for refusing to take the test. She took her case to the U.S. Equal Employment Opportunity Commission but learned that in Michigan, as in 19 other states, her employer had the right to dismiss her for off-duty activity.
सिगरेट प्यायचा माझा हक्क आहे, असे कुणाला वाटत असेल तर. पण हे कायद्यानुसार आहे.
नवीन पुस्तक सुचवल्याबद्दल धन्यवाद. जमेल तेव्हा वाचेन.
अं?
नोकरदार हा शब्द सर्वसमावेशक आहे, लिंगभेद करणारा नाही.
बाकी तुमच्या कायदेशीर आणि बेकायदेशीर आवडीनिवडींबद्दल दुसरीकडे बोलू! ठीक?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
खात्रीने सांगत नाही , पण
खात्रीने सांगत नाही , पण (सरकारी) संशोधन क्षेत्रात , अगदी दहा वर्षांपूर्वी पर्यंत नसावेत . कोण हे कन्फर्म करू शकेल का ?
सरकारी संशोधनाबद्दल माझे अनुभव
भारतात?
कागदावर पगार सारखेच असतात. एक पद एक पगार.
पण स्त्रियांच्या मूलभूत शिक्षणाबद्दल समाजातली बेपर्वाई इथपासून निबंध पाडायला सुरुवात करता येईल. माझ्यासारख्या उच्चवर्णीय, तोंडाळ आणि फडतुसांना टिचकीसरशी उडवून लावू शकणाऱ्या स्त्रियाच तिथे दिसतात. व्यक्तिगतरीत्या, त्यामुळे मला फार नाहीत पण मिळाल्या त्या उत्तम मैत्रिणी मिळाल्या.
अर्ध्या लोकसंख्येला वगळून मेरिटोक्रसी मिरवायला गेलं की जे व्हायचं ते तिथेही दिसतं. सकल विचाराची वानवा, फक्त एकरेषीय हुशार मात्र कर्तबगार नसलेले बुणगे मोठ्या पदांवर, इ. स्त्रियांना समान हक्क मिळावेत यासाठी अजूनही संवेदनशील लोकांना प्रयत्न करावे लागतात.
एका मित्राला हल्लीच मानाचा भटनागर पुरस्कार मिळाला. निस्सीम काणेकार. त्या विषयावरून आमच्या गप्पा पुन्हा सुरू झाल्या. त्यानं आवर्जून लिहिलं, "तू इथे होतीस त्यापेक्षा आता बऱ्याच अधिक स्त्रिया इथे चांगल्या पदांवर आहेत." दोन माझ्या ओळखीतल्या आणि इतर माहीत असलेल्या स्त्रियांची नावं सांगितली. "आता PhD करणाऱ्या मुलीही आहेत", तो म्हणाला. मी तिथे होते तेव्हा एकही नव्हती.
हा मित्र तसा उघड भूमिका घेणारा. स्पष्टच म्हणायचा, "साधारण समान कर्तबगारी, हुशारी असलेले दोन अर्ज आले, एक मुलीचा आणि एक मुलाचा, तर नोकरी, PhD position, काहीही यांसाठी मी मुलीला संधी देईन."
किमान त्या संस्थेतली तरुण पिढी बऱ्यापैकी डावी आणि संवेदनशील आहे. त्या संस्थेला टिकून राहायचं असेल तर असे बदल करणं गरजेचं होतं. मी तिथे असतानाच माझा बाॅस डीन झाला आणि बारीक फरक दिसायला लागलेच होते. निस्सीम आणि इतर काही तरुण मंडळी त्याच्या जोडीला आहेतच. किमान तिथलं दृश्य सुधारलेलं दिसेल, अशी आशा मला आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
तुमचा मुद्दा कळाला .
तुमचा मुद्दा कळाला .
माझ्या माहितीनुसार भारतात विशेषतः पुण्या मुंबईत संशोधन क्षेत्रात स्त्रिया असणे हि काही फार अप्रूप असलेली गोष्ट नाही . आणि PhD करणाऱ्या स्त्रिया हीही . त्यामुळे तुमच्या "आता PhD करणाऱ्या मुलीही आहेत", तो म्हणाला. मी तिथे होते तेव्हा एकही नव्हती." या वाक्याचे आश्चर्य वाटते .
अर्थात आत्तापर्यंत भटनागर पारितोषिक मिळालेल्या शास्त्रज्ञांची लिस्ट बघितली तर त्यात स्त्री शास्त्रज्ञ खूप कमी आहेत .
पण याचे कारण PhD करून , संशोधन क्षेत्रात करियर करून उच्च दर्जाचे कॉम्पिटिटिव्ह संशोधन करणाऱ्या स्त्री शास्त्रज्ञाचा पूल (आकडा ) पुरुष शास्त्रज्ञांच्या पेक्षा छोटा असल्याने असे होत असावे असे माझे मत . माझ्या पत्नीचे (जी संशोधन क्षेत्रात आहे ) मत यापेक्षा (अर्थातच )वेगळे आहे . तिच्या मते डिस्क्रिमिनेशन आहे .
अति भोचक आणि उगाचच अवांतर : तुमचे हे मित्र, बेने इस्रायली आहेत का हो ? नावामुळे कुतुहूल वाटले म्हणून विचारले . इतर काही हेतू नाही .
मला, समोर डिस्क्रिमिनेशनची
मला, समोर डिस्क्रिमिनेशनची उदाहरणं दिसलेली नाहीत. तरीही स्त्रियांचं प्रमाण नगण्य असणं हे सरळच दिसतं. मी जिथे होते तिथे "ते बाथरूम वापरणाऱ्या दोघीच आहेत तर तिथे स्टोरेज रूम बनवू" असा प्रकार झाला होता. (त्यावरून, "मग इथे मुली येत नाहीत म्हणून तक्रारी कशाला करता", असे वाद छेडून झाले होतेच.) किंवा, मुद्दाम 'आता अधिक स्त्रिया आहेत' असं सांगावं लागतं.
एकंदरीत स्त्रियांची संख्या कमी असल्यामुळे संस्थांचं रूप 'मेन्स क्लब'सारखं असणं, तरुण मुली तिथे न टिकणं, एकीच्या एखाद्या चुकीची जबाबदारी सगळ्या स्त्रीजमातीवर टाकणं, असे प्रकार चालतात. व्यक्तिशः मला त्रास झाला नाही. मैत्रीण आणि मी त्याबाबतीत जरा गाॅडमदर होतो. पण गाॅडमदर होण्याची गरज पडायची.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
फेमिनिस्टांसाठी प्रामाणिक प्रश्न:
फेमिनिस्टांसाठी प्रामाणिक प्रश्न:
जर स्त्री-पुरुष इक्वॅलिटी हवी असेल तर मुळात स्वतंत्र बाथरूम का हवेत? "युनिव्हर्सल" बाथरूमचा आग्रह का धरत नाही? (युरोपात मी काही ठिकाणी बघितलेत.) पुरुष आणि स्त्रियांच्या स्वतंत्र चेस टुर्नामेंट बंद करून एकत्र टुर्नामेंटच ठेवा असा आग्रह का धरत नाही? सौदी अरेबियात स्त्रियांना ड्रायव्हिंग करू द्या, हा आग्रह का धरत नाहीत?
किती हो विनोदी तुम्ही!
इथे बायकांना सल्ले देणाऱ्या पुरुषांसाठी नेहमीचाच, घिसापिटा प्रश्न -
तुम्ही अमकंढमकं करा, असं पुरुषांनी बायकांना सांगण्याची, खरं तर आज्ञा देण्याची परंपरा वगैरे असताना; स्वतः इकडची काडी तिकडे न करता वर 'तुम्ही असं का करत नाही' असे उंटावरून-शेळ्या सल्ले देताना; (किमान काही अभ्यास करणं वगैरे अपेक्षा नाहीतच) परंपरेचं ओझं बायकांच्या डोक्यावर नाही, आपल्या डोक्यावर आहे याची चाड वाटत नाही का?
थोडक्यात, 'बायकांनो किंवा फेमिनिस्टांनो, तुम्ही असं का करत नाही', असं पुरुषांनी म्हणणं यात मुळातच शॉव्हनिझम/स्त्रीद्वेष आहे; त्याची टिंगल करणं हे माझं परमकर्तव्य आहे. ही कर्तव्यबुद्धी बाई किंवा फेमिनिस्ट आहे म्हणून नाही; विनोदाबद्दल चाड बाळगल्यामुळे आहे.
असो. हे सगळं या लेखासंदर्भात अवांतर आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
(अवांतर)
बायदवे, रॉयल फतव्याने सौदी स्त्रियांच्या ड्रायव्हिंगवरची बंदी तत्त्वत: उठली, बरे का. (शिळी बातमी. बोले तो, त्यालाही दोन महिने होत आले आता. म्हणजे, आदेश तर निघालाय. त्याच्या अंमलबजावणीच्या पायऱ्या (ज्या काय असतील त्या, बहुधा नियमावली वगैरे) आता ठरवताहेत. २४ जून २०१८च्या आत अंमलबजावणी पूर्ण करायची मुदत आहे.)
http://www.cnn.com/2017/09/26/politics/saudi-arabia-woman-drive/index.html
http://www.bbc.com/news/world-middle-east-41408195
http://www.aljazeera.com/news/2017/09/saudi-arabia-women-drive-170926190...
आणि हे (सौदी) 'फेमिनिष्टां'च्या आग्रहावाचून झालेले नाही, बरे का.
https://www.reuters.com/article/us-saudi-women-driving-politics/saudi-wo...
अर्थात, २४ जूनच्या २०१८पर्यंत बंदी अधिकृतरीत्या उठलेली नसल्याकारणाने तूर्तास तत्त्वत: लागू आहे, आणि कॉप्स विल ऑल्वेज़ बी कॉप्स... चालायचेच.
https://www.theguardian.com/world/2017/oct/09/saudi-arabia-woman-penalis...
आणि, धिस इज़ नॉट टू से की आता सर्वत्र आबादीआबाद आहे. पण, ही पहिली पायरी आहे.
http://time.com/4962707/saudi-arabia-women-driving-license/
आणि, मुख्य म्हणजे, 'सौदी अरेबियात स्त्रियांना ड्रायव्हिंग करू द्या, हा आग्रह (फेमिनिष्ट) का धरत नाहीत', हा प्रश्न ऑपॉप निकालात निघतो. बीन देअर, डन द्याट. (म्हणजे, मी नव्हे. पण सौदी फेमिनिष्टांनी.)
कधीमधी इकडच्यातिकडच्या बातम्या वाचल्या तर अशी नवीन (शिळी) माहितीसुद्धा मिळते. वाचत जाव्यात अधूनमधून. असो.
अहो
ते फेमिनिस्ट वायले हे फेमिनिष्ट वायले.
आधीच मान्य करतो की बेकार
आधीच मान्य करतो की बेकार अद्न्यानी (पुरुष) असल्याने मला कशातलच काहीच कळत नाही, इथल्या so called भुसनळ्यांहुन माझी समज कमीच आहे
हा मित्र तसा उघड भूमिका घेणारा. स्पष्टच म्हणायचा, "साधारण समान कर्तबगारी, हुशारी असलेले दोन अर्ज आले, एक मुलीचा आणि एक मुलाचा, तर नोकरी, PhD position, काहीही यांसाठी मी मुलीला संधी देईन." >>>>
तरी हा न्याय अजिबातच कळला नाही. त्या मुलावर, मुलगा असल्याचा अन्याय नाही का झाला? का ५०% बायका पुरुष प्रमाण होईस्तोवर मुलांनी अन्याय सहन करत रहायचा, कारण पुर्वी अनेक वर्ष स्त्रीया करत आल्या आहेत सहन्? (मग ह्या न्यायाने काही विशिष्ट धर्माच्या लोकांना व्हिसा नाकारणे पण न्याय्य होउ शकते का?.)
जर स्त्री पुरुष फरक मानत नसाल तर मग "पुरुषाला घेणार नाही कामाला" ह्यात पुरुष स्त्री असा भेदभाव झालाच की?
जर दोन्ही अर्जकर्ते एकदच समान आहेत (जे खर तर खुपच अवघड आहे) तर मी तरी कमी पैशात काम करणारा सीलेक्ट करीन बुवा, कारण शेवट मी माझ्या एम्प्लॉयरच्या प्रॉफिटसाठीच काम करत आहे. (if non profit univ etc, then every rupee saved adds to availability of funds for the cause)
असो, चुकत असेल तर माफ करा अन ईग्नोर
नायनाय. तुम्हाला मुद्दा
नायनाय. तुम्हाला मुद्दा चांगल्यापैकी समजलाय.
असं गृहित धरा की एकाच नोकरी साठी एक मुलगा व एक मुलगी आवेदन पत्र पाठवत आहेत. व दोघेही समान प्रॉडक्टिव्ह आहेत. परंतु त्या मुलीला माहीती आहे की त्या हायरिंग म्यानेजरला हे माहीती आहे की दोघेही (मुलगा व मुलगी) समान प्रॉडक्टिव्ह आहेत परंरु त्या मुलीला हे सुद्धा माहीती आहे की तो हायरिंग म्यानेजर भेदभाव करण्याची दाट शक्यता आहे. आता त्या मुलीसमोर दोनच परिणाम असू शकतात - (१) जॉब मिळणे, (२) जॉब न मिळणे (she withdraws or she gets rejected). आता तिचे विकल्प कोणते ह्याचा विचार केलात तर तुम्हाला दिसेल की - (१) तेवढ्याच पगारात जास्त प्रॉडक्टिव्हिटी (quantitatively more work) ची ऑफर करणे, (२) कमी पगारात काम करण्याची ऑफर करणे, (३) क्वालिटेटिव्हली वेगळं काम करण्याची ऑफर करणे (differentiation). उदा. आमच्या क्लायंटकडे एक बाई आहे ती रिस्क म्यानेजमेंट मधे तद्न्य आहे. हा तिच्या कामाचा भागच आहे आणि क्वांटीटेटिव्हली ती तेवढेच काम करते जेवढे तिचे peers करतात पण या एवढ्या एका उपविषयात सगळे जण तिचा सल्ला मागायला जातात. इतकं की ती दर महिन्याला एक कॉल होस्ट करते व त्यात अक्षरश: १५ जण असतात व ती त्या १५ जणांना सल्ले देते. व या १५ मधे स्त्रिया व पुरुष सुद्धा असतात.
हे असे अनेक विकल्प असू शकतात. व् याला स्पर्धा करणे असे म्हणतात.
इक्वल पे फॉर इक्वल वर्क च्या कायद्यांची समस्या काय आहे ? - They destroy her option no. 2.
व्यक्ती निराळी, सांख्यिकी निराळी
यामागचं गृहितक असं की मुलगी असल्यामुळे तिच्यावर समाजाकडून आपसूक अनेक अन्याय होतात. उदाहरणार्थ, तिला सातच्या आत घरात असावं लागत असेल; किंवा तिला वरिष्ठांच्या लैंगिक/आर्थिक शोषणाचा सामना करावा लागत असेल. त्या विशिष्ट मुलीला खरोखरच किती अन्याय सहन करावा लागेल, हा प्रश्न गौण आहे. समाजात (अगदी मोजके अपवाद वगळता इतर) सर्व व्यवसायांत स्त्रियांना डावललं जातं; त्याचं परिमार्जन करण्याचा स्वतःपुरता मार्ग, स्त्रियांना मदत करणे. उलट बाजूनं, तो मुलगा असल्यामुळे त्याला बऱ्याच ठिकाणी 'रेड-कार्पेट-ट्रीटमेंट' मिळते.
हा प्रश्न सांख्यिकीचा आहे, एकेका मनुष्याचा नाही; एका मनुष्यावर अन्याय करणं किंवा एका मनुष्याला न्याय देणं असा नाही. सामाजिक परिस्थिती ज्या गटाच्या विरोधात आहे, त्या गटातल्या माणसांना झुकतं मापं देणं आहे.
हाच मित्र, आम्ही भेटतो तेव्हा मला चिकार टोमणे मारायला, माझ्यावर विनोद करायला, वाद उकरून काढायला किंवा बौद्धिक पातळीवर मला आव्हानं द्यायला कमी करत नाही. (हे प्रकार माझ्याकडूनही होतातच; म्हणूनच तो मित्र आहे, फक्त परिचित नाही, असं मी म्हणते.) मी स्त्री आहे म्हणून माझ्याशी गोडगोडच वागलं पाहिजे, असं व्यक्ती पातळीवर चालत नाही.
हा पर्याय या मित्राला नाही. सरकार पगार ठरवतं. एक-पद-एक-पगार अशी सरकारी व्यवस्था आहे. आणि खरं तर, 'आपले बॉस आपल्यासाठी, आपल्या बाजूनं व्यवस्थेशी भांडतात', हे जर हाताखाली काम करणाऱ्यांना माहीत असेल, तर त्यांच्याकडून बॉस चांगलं काम करवून घेऊ शकतात.
If you pay peanuts, you get monkeys. हुशार लोकांना पाट्या टाकताना बघितलं नाहीत का? हे शहाणपण माझ्या अनुभवातून आलेलं नाही. १०-१२ वर्षांचा मॅनेजरकीचा अनुभव असलेला वर्गमित्र आणि करियर काऊन्सेलिंग करणारी शिक्षिका अशा गोष्टी सांगतात.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हेच लॉजिक
यामागचं गृहितक असं की मुलगी असल्यामुळे तिच्यावर समाजाकडून आपसूक अनेक अन्याय होतात. उदाहरणार्थ, तिला सातच्या आत घरात असावं लागत असेल; किंवा तिला वरिष्ठांच्या लैंगिक/आर्थिक शोषणाचा सामना करावा लागत असेल. त्या विशिष्ट मुलीला खरोखरच किती अन्याय सहन करावा लागेल, हा प्रश्न गौण आहे. समाजात (अगदी मोजके अपवाद वगळता इतर) सर्व व्यवसायांत स्त्रियांना डावललं जातं; त्याचं परिमार्जन करण्याचा स्वतःपुरता मार्ग, स्त्रियांना मदत करणे. उलट बाजूनं, तो मुलगा असल्यामुळे त्याला बऱ्याच ठिकाणी 'रेड-कार्पेट-ट्रीटमेंट' मिळते. हा प्रश्न सांख्यिकीचा आहे, एकेका मनुष्याचा नाही; एका मनुष्यावर अन्याय करणं किंवा एका मनुष्याला न्याय देणं असा नाही. सामाजिक परिस्थिती ज्या गटाच्या विरोधात आहे, त्या गटातल्या माणसांना झुकतं मापं देणं आहे.
हेच लॉजिक वापरून बायकांनी उद्या पुरुषांचे खून जरी पाडले तरी त्यांना हार तुरे घालून सत्कार करून घरी पाठवले पाहिजे.
हाच मित्र, आम्ही भेटतो तेव्हा मला चिकार टोमणे मारायला, माझ्यावर विनोद करायला, वाद उकरून काढायला किंवा बौद्धिक पातळीवर मला आव्हानं द्यायला कमी करत नाही. (हे प्रकार माझ्याकडूनही होतातच; म्हणूनच तो मित्र आहे, फक्त परिचित नाही, असं मी म्हणते.) मी स्त्री आहे म्हणून माझ्याशी गोडगोडच वागलं पाहिजे, असं व्यक्ती पातळीवर चालत नाही.
हा हा हा याचा आणि वरील उदाहरणाचा काहीही संबंध कळला नाही. जेव्हा मुलगी पटवायची असते तेव्हा गोडगोडच बोलून पटवायला लागते अस कोणी सांगितलं तुम्हाला?
उलट नेगिंग म्हणजेच टोमणे हाणून मुली पटवणे हा एक फार फेमस प्रकार आहे.
मी विचार करतोय की जर एखाद्या भविष्यात जाउन भटनागर पुरस्कार मिळवण्याची पात्रता नसलेल्या कलिगने जर का विनोद करायचा प्रयत्न केला असता किंवा गम्मत म्हणून टोमणे मारले असते तर ती सेक्श्युअल हरॅसमेंट ठरली असती का?
अय्या...
तुम्ही कीनै खूप किनै। गोड्डुले किनै आहात बै॥
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
एल् ओ एल्
या लेखावरचे यांचे बहुतांश प्रतिसाद अगम्य आहेत. कुणीतरी प्लीज मला यांचे प्रतिसाद उलगडा करून सांगा कारण फेमिनिष्ठ ते नॉर्मल ह्युमन्स अशी भाषांतर सुविधा अजूनतरी गूगल मध्ये उपलब्ध नाही.
सोडा हो, पुरुष आयडीच्या
सोडा हो, पुरुष आयडीच्या विरुद्ध प्रतिसाद लिहिणे हे बाय इट्सेल्फ पुण्यकर्म आहे असा ग्रह करून घेतलेल्यांच्या नादी काय लागायचे ते.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
यामागचं गृहितक असं की मुलगी
यामागचं गृहितक असं की मुलगी असल्यामुळे तिच्यावर समाजाकडून आपसूक अनेक अन्याय होतात. उदाहरणार्थ, तिला सातच्या आत घरात असावं लागत असेल; किंवा तिला वरिष्ठांच्या लैंगिक/आर्थिक शोषणाचा सामना करावा लागत असेल. त्या विशिष्ट मुलीला खरोखरच किती अन्याय सहन करावा लागेल, हा प्रश्न गौण आहे. समाजात (अगदी मोजके अपवाद वगळता इतर) सर्व व्यवसायांत स्त्रियांना डावललं जातं; त्याचं परिमार्जन करण्याचा स्वतःपुरता मार्ग, स्त्रियांना मदत करणे. उलट बाजूनं, तो मुलगा असल्यामुळे त्याला बऱ्याच ठिकाणी 'रेड-कार्पेट-ट्रीटमेंट' मिळते.
हा प्रश्न सांख्यिकीचा आहे, एकेका मनुष्याचा नाही; एका मनुष्यावर अन्याय करणं किंवा एका मनुष्याला न्याय देणं असा नाही. सामाजिक परिस्थिती ज्या गटाच्या विरोधात आहे, त्या गटातल्या माणसांना झुकतं मापं देणं आहे. >>>>>>>>>>>>>>>>>>
माझा मुद्दा अतिशय मर्यादित होता की त्या मुलावर अन्याय झाला की नाही? त्याच्या सारख्या काही हजार/लाख/कोटी/अब्ज पुरुषांमुळेच झाला असं धरुन चालल तरी हे योग्य आहे का नाही?
ह्या न्यायाने जगातील अनेक अन्यायांची कारणमीमांसा करता येउ शकेल.
पुर्वीचा भेदभाव खोडुन समभाव आणायला आता आमचा भेदभाव स्वीकारा हे उपाय योग्य आहेत का? आणि ते काम करतात का दरी अजुन जहाल करतात?
राहिला त्या मुलीचा प्रश्न - कुठल्याही व्यक्तीस आपणास नोकरी योग्यतेवर मिळाल्याचा जास्तं (आणि रास्त) अभिमान वाटावा. जर तिला काही वर्षाने नोकरी मिळायचे खरे कारण कळल्यास तुम्हास तिची काय प्रतिक्रिया अपेक्शीत आहे??
हाच मित्र, आम्ही भेटतो तेव्हा मला चिकार टोमणे मारायला, माझ्यावर विनोद करायला, वाद उकरून काढायला किंवा बौद्धिक पातळीवर मला आव्हानं द्यायला कमी करत नाही. (हे प्रकार माझ्याकडूनही होतातच; म्हणूनच तो मित्र आहे, फक्त परिचित नाही, असं मी म्हणते.) मी स्त्री आहे म्हणून माझ्याशी गोडगोडच वागलं पाहिजे, असं व्यक्ती पातळीवर चालत नाही. >>>
ं संबंध कळला नाही, माझ्या आकलन शक्तीचा दोष समजुन सोडुन देउ, अनलेस तुम्हाला संत्र सोलायला वेळ असेल तर्
मी तरी कमी पैशात काम करणारा सीलेक्ट करीन बुवा
हा पर्याय या मित्राला नाही. सरकार पगार ठरवतं. एक-पद-एक-पगार अशी सरकारी व्यवस्था आहे. आणि खरं तर, 'आपले बॉस आपल्यासाठी, आपल्या बाजूनं व्यवस्थेशी भांडतात', हे जर हाताखाली काम करणाऱ्यांना माहीत असेल, तर त्यांच्याकडून बॉस चांगलं काम करवून घेऊ शकतात. >>>
पॉईंट टेकन अबाउट पे. मला माहित नव्हत हे.
बाकीचा संबंध कळला नाही बॉस बद्दल्
If you pay peanuts, you get monkeys. हुशार लोकांना पाट्या टाकताना बघितलं नाहीत का? हे शहाणपण माझ्या अनुभवातून आलेलं नाही. १०-१२ वर्षांचा मॅनेजरकीचा अनुभव असलेला वर्गमित्र आणि करियर काऊन्सेलिंग करणारी शिक्षिका अशा गोष्टी सांगतात.>>>
ह्याचाही संबंध कळला नाही. पाट्या मी स्वत: टाकतो (हुषार नसुन) पण त्याचा अन मुलीला पुर्वीचे भेदभाव मिटवण्यासाठी नोकरी द्यायचा संबंध नाही कळला. or am I missing some larger picture here??
>> or am I missing some
>> or am I missing some larger picture here?? <<
हो.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हो. >>>>>
माझी समज कमी आहे हे आधीच कबुल केले आहे, म्हणुन्
तुम्हास वेळ आणि रस असल्यास सांगु शकाल का ?
तसच मला काही प्रश्न पडले होते, काही विचारले वर, काही अजुन पडले आहेत, त्याचीही उत्तरे देउ शकाल का? (सगळे आत्ताच विचारलेले नाहीत, कारण उत्तरे देण्यास वेळ आणि रस असेलच असे नाही)
जर तो डावललेला मुलगा २५ वर्षाने स्वत: हायरिंग मॅनेजर झाला अन त्यासमोरही अगदी हुबेहुब परिस्थीती आली तर तो कसा वागेल असे अपेक्षीत आहे? (7 out of 10 times an average person will hire male just because he was deprived of his job in favour of a woman despite deserving the job and also the hiring manager boasted about it in public. No data point to prove 7 n 10, just my assumption, might be absolutely wrong)
so by giving preference to women candidates, are we addressing the right problem or working for it in short-run and gravely working against it in the long run?
कथा आणि वस्तुस्थिती
या हायपोथेटिकल गोष्टीबद्दल बोलण्यात मला काहीही रस नाही. तुम्हाला हवं तर एखादी कथा लिहा त्यावर (असा फुकटचा संपादकी सल्ला). सांख्यिकी आणि एकेक व्यक्ती यांच्यात तुलना करू नका; असं म्हणून झाल्यावरही पुन्हा तोच-तो मुद्दा सांगण्यात मला काही रस नाही. त्याउप्पर व्यवहारात असलेलं समांतर उदाहरण दिलं की पुन्हा विषयांतर होण्याची भीती वाटतेच; त्यामुळे त्या विषयाचं नाव मी इथे काढणार नाही.
तोवर सध्या प्रत्यक्षात काय सुरू आहे; त्याबद्दल वाचा. दुवा १, दुवा २.
---
ज्यांना आउटलायर वगैरे विषयांतले 'नोबेल पुरस्कार' मिळवायचे आहेत त्यांना गृहपाठासाठी हे दुवे - १.झेड टेस्ट आणि टी टेस्ट, २. हायपोथिसीस टेस्टिंग आणि पी-व्हॅल्यू
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
कथा आणि वस्तुस्थिती
हा मित्र तसा उघड भूमिका घेणारा. स्पष्टच म्हणायचा, "साधारण समान कर्तबगारी, हुशारी असलेले दोन अर्ज आले, एक मुलीचा आणि एक मुलाचा, तर नोकरी, PhD position, काहीही यांसाठी मी मुलीला संधी देईन." >>>>
सुरुवातच हायपोथेटिकल गोष्टीने झाली होती, मला समजला नाही न्याय म्हणुन मुद्दा लांबवत गेलो.
त्याचे उत्तर मिळाले नाहीच कुठे
anyways apologies for wasting your time.
सुरुवातच हायपोथेटिकल गोष्टीने
बळकट मुद्दा आहे, बेकार.
अभ्यासाने होत आहे।
अभ्यास केलात तर अधिक आनंद होईल. ते दोन दुवे खरोखरच वेळ खर्च करून शोधून दिले होते. मित्राच्या त्या बोलण्यामागे याच बातम्यांची पार्श्वभूमी होती.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
दोन्ही दुवे वाचले. मला आकलन
दोन्ही दुवे वाचले. मला आकलन (बहुधा चुकीचे) झाले ते असे -
दोन्हीत प्रामुख्याने "भेदभाव होत आला आहे" हे अधोरेखीत केलेले आहे. पण मी कुठे अन कधी अमान्य केले की भेदभाव होत नसावा.
मला तरी त्या लेखात उपाय म्हणुन पुरुषाना (समान योग्यता असुन फक्त पुरुष आहे म्हणुन) डावला असे काही दिसले नाही.
माझा मुद्दा फक्त हाच होता की पुर्वी झालेला भेदभाव मिटवण्यासाठी आता मी परस्परविरोधी पण भेदभावानेच वागेन हा उपाय किती काम करेल? (माफ करा पण परत हायपोथेटीकल). का भेदभावाची दरी अजुनच खोल अन जहाल करेल.
आणि त्या परिस्थीतीतुन गेल्यावर सहभागी व्यक्तींच्या प्रतिक्रीया काय असतील, समावेशक मुलीची मुख्यत्वे? कुठल्याही उच्च शिक्षीत अन स्वाभिमानी व्यक्तीची नोकरी मिळण्यामागील सत्यपरिस्थेतीची जाणीव झाल्यावर फारशी आनंददायी प्रतिक्रीया (pleasant realization) नसेल्
आणि तुम्ही म्हणलात -
हा प्रश्न सांख्यिकीचा आहे, एकेका मनुष्याचा नाही; एका मनुष्यावर अन्याय करणं किंवा एका मनुष्याला न्याय देणं असा नाही. सामाजिक परिस्थिती ज्या गटाच्या विरोधात आहे, त्या गटातल्या माणसांना झुकतं मापं देणं आहे.
>>> पण सुरुवातीपासुन मला फक्त त्या २ व्यक्तींवर काय परिणाम होईल हे जाणुन घ्यायचे आहे.
आणि जर झुकते माप देणे वगैरे घाउकरित्या चालु झाले तर दुर्दैवाने दरी जलदपणे खोल अन जहाल होईल.
असो, माझच लॉजिक काहीतरी मेजर गंडलेल असावं
एकूण एकमत होणार नाही असं
एकूण एकमत होणार नाही असं दिसतंय.
भेदभाव/ डिस्क्रिमिनेट विरुद्ध प्राधान्य देणे/ प्रेफरन्स याकडे आपण /मी स्वत: काही ठोकताळे ठेवले आहेत का यावर विचार केला तेव्हा हो असे उत्तर आले. लेखातल्या लैंगिक वसुली /इक्स्प्लॅाइटेशन मुद्दा नाही पण इतर गोष्टी विचारात घेतो. हे कंपनी लेवलवर नाही पण फार छोट्या पातळीवर विचार आला.
१) ठेवलेला कर्मचारी रजेची मागणी वारंवार करण्याची शक्यता,
२) अडवान्स मागणे,
३) निरनिराळ्या प्रकारच्या चोय्रांचे भय - पैसे,गुप्तता,अकाउंट्स,डेटा इत्यादी.
४) पेपरवाले ,मिडिया,शेजारीपाजारी यांना माहिती पुरवणे.
हे काही मुद्दे धरून भारतात अथवा परदेशात युएसधरून मालकवर्ग अथवा त्यांचे मॅनेजर काही पुर्वग्रह बाळगून स्त्री/पुरुष अथवा गोरे/काळे अमुक धर्माचे असा भेदभाव करत असावेत असं कुणाला वाटतं का?
( लेखाचा विषय वेगळा आहे परंतू थोडा इथेच उल्लेख करतो आहे.)
व्हिक्टिमहूड मिरवण्याचा
व्हिक्टिमहूड मिरवण्याचा हूडपणा बाकी कधीही संपणार नाही हे या निमित्ताने कळले.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
कालच "मायक्रोॲग्रेशन" नावाचा
कालच "मायक्रोॲग्रेशन" नावाचा शब्द वाचनात आला. मायक्रोॲग्रेशन म्हणजे - वरवर क्षुल्लक वाटणारे तसेच हेतूपुरस्सर अथवा निर्हेतूक केलेले अपमान, टोमणे, भेदभाव. यात वांशिक भेदभाव आला तसाच लिंगविषयक भेदभावही आला.
वांशिक भेदभावाची काही उदाहरणे -
(१) एखाद्या हिस्पॅनिक, भारतीय अथवा ईस्ट एशियन व्यक्तीस निर्हेतूक/सहेतुक विचारलेला प्रश्न - तुझं इंग्रजी इतकं चांगलं कसं?
यात हे प्रश्नकर्त्याने गृहीतक धरलेले आहे की अन्य देशातुन आलेल्या लोकांचे इंग्रजी कमकुवत असते.
(२) एखाद्या हिस्पॅनिक, भारतीय अथवा ईस्ट एशियन व्यक्तीस विचारलेला प्रश्न - नाही पण मूळात तू कोठुन आहेस? व्हेअर आर यु फ्रॉम?
लिंगविषयक मायक्रोॲग्रेशनचे उदाहरण-
(१) बायकोला घरकामात मदत करतो हे मिरवणे. अरे घर तुझंही आहे, तुझीही कर्तव्ये आहेत मग मदत कसली?
(२) एखादी स्त्री अवजड वस्तॉ उचलून नेतेवेळी तिला सांगणे की "हे पुरुषांचे काम आहे. तू इतके अवजड ओझे उचलू नकोस."
(३) एखाद्या गोष्टिविषयक उदा - कॉम्प्युटर प्रोग्रॅम / गेम कौतुक करण्याकरता "हॉट", "सेक्सी" आदि निवडक विशेषणे वापरणे.
__________
लेखाविषयी अदितीला - तुझी ऊर्जा कशाला वाया घालवतेस? अनेकांना तू का बोलते आहेस (व्हेअर यु आर कमिंग फ्रॉम) हेच कळणार तरी नाही किंवा डोळ्यावर ते कातडे ओढुन बसतील. अशांच्या नादी लागू नकोस.
(१) बायकोला घरकामात मदत करतो
अगदी अगदी.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
तुझं इंग्रजी इतकं चांगलं कसं?
यात अग्रेशन, हिणवणं अजिबात वाटत नाही. हे प्रश्न मला विचारले गेले आहेत. अजिबात ओफेंसिव्ह वाटत नाहीत. मातृभाषा सोडून इतर कोणती भाषा सराईतरित्या वापरता/बोलता येणं हे उमेरीकनांना कौतुकास्पद वाटणं समजण्याजोगं आहे. आमच्या इथे एकाने, स्वत:ची ओळख छाप राईटापमध्ये, एक अचिव्हमेंट म्हणून मी इंग्रजीतून माझी पियच्डी पूर्ण केली. मातृभाषा कोणशीशी पूर्वे युरोपिअन असून असं लिहिलं होतं.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
३ फारच हास्यास्पद आहे. जर
३ फारच हास्यास्पद आहे. जर एखादा प्रोग्र्याम नै आवडला तर तो कसा कुरूप राठ पुरुषी आहे असे म्हणायचा हक्क कोणी हिरावून नै घेतलेला.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
तो पॉइन्ट मलाही कळलेला नाही.
तो पॉइन्ट मलाही कळलेला नाही. पण सकाळी घाईघाई होती म्हणुन लिहीले नाही. माझ्या मते पुरुषही "सेक्सी/हॉट" असू शकतात. मग ही शेलकी विशेषणे फक्त स्त्रियांचा उपमर्द करणारी कशी?
जे तुम्हांला व मला कळले
तेच जर त्या व्यक्तीच्या बथ्थड डोक्यात शिरले असते तर बरे झाले असते.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
>>लेखाविषयी अदितीला - तुझी
>>लेखाविषयी अदितीला - तुझी ऊर्जा कशाला वाया घालवतेस? अनेकांना तू का बोलते आहेस (व्हेअर यु आर कमिंग फ्रॉम) हेच कळणार तरी नाही किंवा डोळ्यावर ते कातडे ओढुन बसतील.
माझ्या प्रतिसादाचा रोख नेमका याच्यावरच आहे. पुरुषांना कळणारच नाही अशी खात्री असेल तर मग इथे लेख लिहून काय होणार आहे?
अशा प्रकारच्या स्टॅण्डने सिम्पथेटिक असलेले लोक मात्र दुरावणार.
स्त्रियांच्या एखाद्या शारीर समस्येवर सिम्प्पथेटिक पुरुष काही उपाय सुचवण्याचा प्रयत्न करतील तेव्हा स्त्री शरीररचनेतील डिटेल्सबाबत असलेल्या अज्ञानामुळे तो उपाय चुकीचा असू शकेल. परंतु त्याने उपाय सुचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न तरी केलेला असतो. त्याच्या त्या विशिष्ट अज्ञानाची जाहीर खिल्ली उडवली गेली (भले नाव न घेता) तर ती पुरुष व्यक्ती नव्याने विधायक विचार करण्याऐवजी "मरा तेजायला" असा विचार करण्याची शक्यता वाढते हे "स्त्रीवाद्यांना" समजावे अशी अपेक्षा आहे.
( स्टिरिओटाइप वॉर्निंग सुरू ) स्त्रिया समस्येविषयी बोलतात तेव्हा त्यांना त्यावरचे सोल्युशन नको असते तर फक्त समस्या आहे असे बोलायचे असते ( स्टिरिओटाइप वॉर्निंग संपली ) असे त्या सोल्युशन विषयी विचार करणाऱ्या पुरुषांना वाटणे चुकीचे आहे काय?
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
थत्तेचाचांशी सहमत
थत्तेचाचांशी सहमत.
बरोबर आहे. ओल्याबरोबर सुकंही
बरोबर आहे. ओल्याबरोबर सुकंही जळतं.
अहं, अजिबात नाही.
आपल्याला समजतो तोच स्त्रीवाद; किंवा आपल्याला अनुभव अधिक किंवा आपण सहानुभूतीदार असल्यानं आपलं ऐकूनच घेतलं पाहिजे; आपल्या चुका काढल्याच नाही पाहिजेत किंवा आपण वाद घालतो तो तुमच्या भल्यासाठीच, यांत आणि खरोखर प्रश्नांत रस दाखवून संवेदनशीलता दाखवणं यांत फरक असतो.
'आपले हक्क मागू नका' किंवा 'तुमचे तुम्हीच काय ते प्रश्न सोडवा, सरकारला यातून सोडा' सुचवणारे विचार बाळगणं ही संवेदनशीलता नव्हे.
अजून खाणकाम केलं तर आणखी प्रतिसाद शोधता येतील. एका प्रतिसादाचा रोख होता, 'टॉयलेटमध्ये कचऱ्याची पेटी कशाला हवी!' स्त्रियांच्या इतपत साध्या गरजांबद्दल अज्ञान असताना मतप्रदर्शन वा शंकानिरसन करण्यासाठी वापरलेल्या लोडेड भाषेला मी 'सुकं' समजते. मला आता वेळ नाही, आणि धागा चटकन सापडत नाही. बहुदा मीच एक धागा काढला होता, एका यड्याची टिंगल करणारा. त्यानं लिपस्टिकछाप काही प्रसाधन काढलं होतं, पाळीकाळात योनीमुख बंद करण्यासाठी. शूच्या ओलाव्यानं ते सील तुटेल आणि त्यामुळे सॅनिटरी उत्पादनांची गरज राहणार नाही; अशी त्याची कल्पना होती. पाळी येणाऱ्या कोणत्याही माणसाला त्यांतला मूर्खपणा सहज समजेल. यातला मूर्खपणा समजण्यासाठी पाळी येण्याचीही गरज नाही; स्त्रियांच्या शरीराचा किंचितसा अभ्यासही पुरेल. रक्तातही ओल असते, त्यामुळे ते लिपस्टिक निरुपयोगी आहे. पण यडा त्यावर म्हणत होता, "बायकांना समजत नाही स्वतःला कशी मदत करायची". मुळातल्या वेडपटपणामुळे नाही, तर या मल्लीनाथीमुळे हा इसम टिंगलपात्र ठरतो. ती टिंगल जर तुम्हाला टोचत असेल तुम्हीही टिंगलपात्र आहात.
स्वस्तात सॅनिटरी पॅड बनवणारा मुरुगनाथम बायकांना हिणवत बसत नाही; इथे जसे लोक उंटावरून शेळ्या हाकण्यात वेळ घालवत आहेत तसले सल्ले देण्यात तो वेळ घालवत नाही; थेट मदत करतो. (या दोन टोकांच्या अध्ये-मध्ये बरेच लोक असतात.) मूर्ख आणि संवेदनशील लोकांतला फरक ज्यांना समजत नाही; यडपटांची टिंगल केलेली स्वतःवर आणि मुरुगनाथमवरही ओढवून घेतात आणि वर 'आम्ही एमसीपी आहोत'छाप त्रागा करतात, त्यांचीही टिंगल आवश्यक.
मुरुगनाथमसारखं भरीव काही योगदान सोडाच ते फार लोकांना जमणार नाही या वस्तुस्थितीची जाणीव मला आणि बहुसंख्यांना असते; साधी संवेदनशीलता ज्यांना दाखवता येत नाही - आहेत बुवा तुमच्या निराळ्या अडचणी आणि त्याबद्दल मुर्दाडपणा दाखवणारी व्यवस्था बदलली पाहिजे - आणि त्याबद्दल फटकारलं की 'तुम्हाला फक्त सहानुभूती हवी असते' असा त्रागा करायचा असतो, त्यांची टिंगल करायची नाही तर काय करायचं!
मुर्दाड व्यवस्थेतून सुस्थित बायका मार्ग काढतातच; मला माझ्या व्यक्तिगत आयुष्यात स्त्रीवादाचा काहीही उपयोग नाही. माझं आयुष्य कधीच त्या पलीकडे प्रगत झालंय. तरीही उद्या नोकरीत कमी पगार देऊन माझं आर्थिक शोषण होणार नाही किंवा पदाचा गैरवापर करून लैंगिक सुखाची मागणी करणारा बॉस मिळणारच नाही, याची काहीही शाश्वती नाही. हे सगळं सुखेनैव चालतं आणि मला याची भीती बाळगावी लागते, कारण 'तुमच्या बॉसनं तुमचं लैंगिक शोषण केलं तर तुम्ही नोकरी बदला', असं सांगणाऱ्या ट्रंपला निवडून देणाऱ्या अमेरिकेत राहते. मी मद्दड, भुसनळ्यांच्या जगात जगते आणि माझ्या आजूबाजूला, निदान सोशल मिडीयावर तर भुसनळ्यांचीच बहुसंख्या आहे. म्हणे ऐसी त्यातल्यात्यात उदारमतवादी संस्थळ, पण तिथेही भुसनळ्यांचीच चलती!
हे असं काहीही माझ्या बाबतीत, व्यक्तिगत पातळीवर झालं नाही तरीही काहींना फक्त स्वतःचंच नाही तर सगळ्यांचंच आयुष्य बरं असावं अशी आस, आच असते. तेव्हा 'माझ्यापुरते उपाय सांगू नका', 'भाजीवालीला परवडेल असा उपाय पाहिजे' किंवा 'रेल्वे स्टेशनवर चांगली टॉयलेट्स असणं हा मूलभूत अधिकार सगळ्यांना मिळालाच पाहिजे' अशी व्यवस्था बदलली पाहिजे अशी भूमिका घेणाऱ्यांना 'तुम्हाला फक्त सहानुभूती हवी असते' हे म्हणणं शुद्ध हिणवणं आहे; हे अन्याय्य व्यवस्थेला पाठीशी घालणं आहे. अशा वर्तनाला मी संवेदनशील म्हणू शकत नाही. आत्तापर्यंत, 'जाऊ दे, त्यांना समजत नाहीये, त्यांचा हेतू वाईट नसेल' वगैरे म्हणत होते.
आणखी एक उदाहरण. बायकांच्या प्रश्नाबद्दल बाईनं काही केलं की स्त्रीवादाप्रती-सहानुभूतीदारांच्या भावना दुखावल्याच समजा! कारण त्यांना हव्ये तशी किरन गांधी शालीन नाही ना! दुवा. तुम्ही शालीन-बिलीन असा, आमच्या भावना दुखावू नका, आमच्या कंफर्ट झोनमधून आम्हाला बाहेर यायला सांगू नका, आम्ही भरलेल्या करांतून सार्वजनिक संडास बांधण्याच्या मागण्या करू नका, आमच्या मनाप्रमाणे वागा, मग आम्ही तुम्हाला चिक्कार सहानुभूती दाखवू!
ऑस्कर वाईल्ड म्हणाला, ते पटलंच. बुद्धी नसणाऱ्या माणसांशी शत्रुत्व पत्करू नये. मी ती चूक केली; आता 'तो पॅहा कॅसं बॉलतो' पातळीवर प्रतिसाद लिहित्ये!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
महिलांना संडास उपलब्ध नसणे हा
महिलांना संडास उपलब्ध नसणे हा प्रॉब्लेम मान्यच आहे. सार्वजनिक संडास बांधू नका असे कोणी म्हटलेले नाही. आणि त्यासाठी लढत रहावेच. स्त्रियांनी तसेच पुरुषांनीही. परंतु ती गोष्ट सावकाशीने होईल. समाजव्यवस्थेवर सर्वंकश प्रभाव असणाऱ्या पुरुषांना सुद्धा पुरेसे संडास उपलब्ध नाहीत जे बरे संडास सुलभ शौचालयांच्या स्वरूपात आहेत ते गेल्या पंचवीस तीस वर्षांतीलच आहेत. त्या सुलभ शौचालयांत महिलांसाठीपण संडास असतात. ते संडास घाण असण्यात पुरुष प्रधानतेचा काही संबंध नाही. पुरुषांसाठी असलेलेही संडास घाणच असतात. त्यामागे आरोग्याविषयीची अनास्था हे कारण आहे.
तर मूळ मुद्द्याकडे परत- संडास बांधण्याची मागणी करण्याबरोबरच त्या संडासांच्या अभावी असलेला प्रॉब्लेम सुकर करण्याविषयी "विचार करायचाच नाही" हा अट्टाहास नसावा एवढेच म्हणणे आहे. कोणी तसा विचार करू लागला तर तो "संडासांच्या मागणीला विरोध करतोय" वगैरे अकांडतांडव करण्याची गरज नाही.
-------------------------------------
अवांतर: पाश्चात्य पद्धतीचे संडास हा भारतात वाढीव प्रॉब्लेम आहे. त्याचा वापर कसा करायचा असतो हे बहुतांश भारतीयांना माहिती नसते. मलाही दहा एक वर्षांपर्यंत माहिती नव्हते. मी त्यावर सुरुवातीस भारतीय पद्धतीने उकीडवा बसत असे. तसे केल्याने नंतरच्या सफाईत सर्वत्र पाणी पाणी होते.
अतिअवांतर- प्रतिसादात ज्याचा उल्लेख आहे तो मुरुगन बहुधा पुरुष आहे आणि त्यामुळे त्याने जे सोल्युशन काढले असेल ते चुकीचेच असेल, नै का ?
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
कंटाळा आला आता.
त्या आधी स्त्रियांच्या गरजा समजून घ्या. ते न करता उपाय सुचवले की ...
आधीच्याच प्रतिसादातून -
यडपटांची टिंगल केलेली स्वतःवर आणि मुरुगनाथमवरही ओढवून घेतात आणि वर 'आम्ही एमसीपी आहोत'छाप त्रागा करतात, त्यांचीही टिंगल आवश्यक.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
मुरुगण जे काही करू शकला ते
मुरुगण जे काही करू शकला ते बहुधा त्याने केलेल्या धडपडीपैकी सुरुवातीच्या चुकलेल्या धडपडीची टिंगल करून त्याला नाउमेद करणाऱ्या फेमिनिस्ट महिला त्याला भेटल्या नसाव्यात. त्याऐवजी ज्यांना खरोखर प्रोब्लेमवरचे "तात्पुरते/अर्धवट/अपुरे" का होईना सोल्युशन चालणार आहे अशा समंजस महिला भेटल्या असाव्यात.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
भुसनळे करमणूक करतात.
भुसनळ्यांच्या नादी लागण्याएवढा मला वेळ नाही. अचरट आणि अबापट, आणि त्यांच्यासारख्यांना उत्तरं देणं आवश्यक.
बौद्धिक काम उत्तम पार पाडण्याबद्दल 'सेक्सी' वगैरे म्हणण्यात सरसकट आक्षेपार्ह नसतं. पण तेवढी मैत्री आहे का, याचा विचार होतो का; उच्चपदस्थानं खालच्या पदावरच्या स्त्रीला असं म्हणावं का, त्यामागचा हेतू स्वच्छ असल्याचं आजूबाजूच्या सगळ्यांना समजतंय का, असे बरेच पण-परंतु येतात. सगळ्या प्रकारच्या प्रसंगाचा विचार करून नियम लिहिणं आणि त्यांचं पालन होतंय का नाही हे तपासणं हे काम खर्चिक होईल. त्यापेक्षा संदिग्ध परिस्थिती असल्यास व्यक्तिगत स्वरूपाचे प्रतिसाद औपचारिक व्यवस्थेच्या बाहेरच ठेवणं बरं.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
लिंकवलेल्या लेखात वर कुणीतरी
लिंकवलेल्या लेखात वर कुणीतरी म्हणतय त्याप्रमाणे डिस्क्रिमिनेशन, सेक्शुअल एक्स्प्लॉइटेशन, आणि हरॅसमेंट ह्यांची सरमिसळ जाणवली. पण परत वाचुया म्हणता लेखाची सुरवातच "द ड्रॅमॅटिक इंबॅलंस इन पे ॲन्ड पावर हॅज क्रिएटेड द कंडिशन्स फॉर अब्युस" ह्या वाक्याने झाली असल्याने ही सरमिसळ होणे अपरिहार्य आहे असे वाटले. डिस्क्रिमिनेशन आणि सेक्शुअल एक्स्प्लॉइटेशन एकच नसले तरी पहिल्यामुळे दुसऱ्याला चालना मिळतेय, तेव्हा "डिस्क्रिमिनेशन हे चूक आहे हे वाक्यच मुळात चूक आहे" हे मला चूक वाटते.
-अनामिक
डिस्क्रिमिनेशन आणि सेक्शुअल
(१) स्त्रियांविरोधी डिस्क्रिमिनेशन जास्त झाले तर स्त्रियांना नोकऱ्या कमी मिळतील.
(२) कमी स्त्रिया नोकऱ्या मिळाल्या तर कमी स्त्रियांचे कामावर एक्सप्लॉईटेशन होईल ना.
(३) मग तांबड्या भागाने दर्शवलेल्या मजकूरातील कार्यकारणभाव योग्य वाटतो का ?
तुम्ही म्हणताय त्याला मी
तुम्ही म्हणताय त्याला मी शाब्दिक किस पाडणे ह्या व्यतिरिक्त काहिही म्हणू शकत नाही. एक बाजु धरली कि तिच कशी बरोबर हे सिद्ध करायचं असलं की असं होत असावं.
-अनामिक
अगदी!
हेच लेखाचं सार किंवा raison d'etre.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
"साधारण समान कर्तबगारी,
हा जो कोण मित्र आहे त्या आस्थापनाचा मालक नक्कीच नसणार.
वर उद्द्ध्रुत केलेली केस कोणा पुरुषासमोर आली तर त्याचा निर्णय खालील गोष्टीवर ठरतो.
१. निर्णय घेणारा पुरुष जर त्या कंपनीत नोकर असेल तर तो नक्की स्त्रीला ती नोकरी देइल.
अ. : हे करताना तो कदाचीत कर्तबगारीशी थोडी तडजोड पण करेल
ब : ती स्त्री जर थोडी सुंदर, बऱ्यापैकी सेक्सी वगैरे असेल तर तो कर्तबगारी ह्या क्रायटेरिआ शी बऱ्यापैकी तडजोड करेल.
क : ती स्त्री जर सुंदर आणि सेक्सी असेल तर तो कर्तबगारी ह्या क्रायटेरीआला फाट्यावर मारेल, वर पुढे त्या स्त्रीची कामे पण करुन देइल.
२. जर तो निर्णयक्षम पुरुष कंपनीचा मालक असेल किंवा असा कोणी असेल कि ज्याचा कंपनीच्या फायद्याशी स्वताचा फायदा थेट जोडलेला असेल तर्
अ. : तो पुरुषाला ती नोकरी देइल, त्यासाठी तो कर्तबगारीशी थोडीशी तडजोड पण करेल.
मुळ लेखाचा काउंटर पॉईन्ट
मुळ लेखाचा काउंटर पॉईन्ट: https://www.nytimes.com/2017/09/23/technology/silicon-valley-men-backlas...
आणखी .... क्रिस्तिना सोमर्स
आणखी .... क्रिस्तिना सोमर्स यांचं मत. आता क्रिस्तिना सोमर्स ह्या मिझॉजिनिस्ट आहेत् किंवा भाडोत्री आहेत् असा मुद्दा उपस्थित केला जाईल. स्त्री असली म्हणून काय झालं ? आमच्या विरोधी मत व्यक्त करणारा/री नेहमी अडाणी, असंबद्ध बडबडकरणारा/री, मूर्ख असतो/ते.
.
.
.
Sommers has contrasted equity
लायब्ररीतून पुस्तक घेऊन वाचेन.
.
.
________________________
सॉमर्स यांचे लिखाण त्यांच्या अभ्यासामधुन व व्यासंगामधुन आलेही असेल. वाचायला हवे.
पण गब्बर तुमचे म्हणणे निव्वळ आकसातून आहे असे एकंदर वाटते. फक्त तुम्ही ते आक्रस्ताळेपणाने मांडत नाही एवढेच बाकी यु आर मेल शॉव्हेनिस्ट.
यु आर मेल शॉव्हेनिस्ट.
हे आवडले मला शुची
ही इज आय "नो!"
ही इज आय "नो!"
पण गब्बर तुमचे म्हणणे निव्वळ
मला समानतावाद्यांप्रति नक्कीच आकस आहे. विशेषत: बळजबरीने समानता राबवण्याचा यत्न करणाऱ्यांच्याबाबतीत.
आकस कोणत्याही व्यक्तीला नसायलाच हवा हा आग्रह नेमका कोणत्या दिशेला जातो त्याबद्दल विचार करत आहे.
----
शक्यता नाकारता येत नाही.
.
ॲग्रीड!!
ॲग्रीड!!
आकस कोणत्याही व्यक्तीला नसायलाच हवा हा आग्रह - नाही!!
राहवलं नाही
एकच प्रतिसाद कमी पडत होता शंभरी गाठायला. तो हा. (होऊ दे खर्च हे मालकीणबैंनी आधीच घोषित केलेलं आहे. त्यामुळे काही बाईट्समुळे फरक पडू नये.)
सवय नसेल ना, बायकांकडून टिंगल
बाई बाकी सर्व मान्य आहे. पण या वाक्याचा अर्थ समजलं नाही या बालबुद्धीला.
पहिलं फिक्स करा कि तुम्ही माणूस(human) पहिल्या की बाईमाणूस
होऊच दे खर्च!
तुम्ही आधी पुरुष आहात का आधी माणूस आहात; त्यावर माझं उत्तर अवलंबून नसेल. पण विचारायला माझं काय जातंय! एवीतेवी खवचटपणाचा बळी गेलेला आहेच.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
बरं मग यावर उपाय काय ब्वॉ?
चर्चा वाचली! गोगोल यांनी अेक सॉलिड उपाय सुचवलाय. एखादा उत्कृष्ट ओपन सोर्स प्रॉजेक्ट तयार करून आपले कौशल्य पोटेंशियल अेम्प्लॉयरसमोर आणण्याचा पर्याय कायम उपलब्ध आहे. रेलगर्ल्ससारखे असे काही प्रोजेक्ट्स दिसतात.
निव्वळ अन्याय होतोय असं रडगाणं किती दिवस गाणार. ज्या अमेरिकेबाबत ही चर्चा चाललीये तिथं मुलींना मुलांपेक्षा शिक्षणाच्या किंवा मार्गदर्शनाच्या संधी कमी आहेत असं कधी दिसलं नाही.
वेलकम
हा हा हा, तुम्ही केवळ ही प्रतिक्रिया देऊन स्वत:ला भुसनळा क्लब मध्ये सामावून घेतल आहे.
बाकी हा धागा पुढील काळासाठी साक्ष बनून राहील की फेमिनिष्ठांशी(स्त्री आणि पुरुष दोन्ही) उघडपणे चर्चा अशक्य आहे. तुम्ही त्यांच्या विरोधात काहीही बोलले की सार्या जगाची समज फक्त यांच्या कडे असल्यासारखा आव आणून तुमची अक्कल बाहेर काढतात. पुढे जेव्हा ईंटरनेट अजून अजून वापरले जाईल, लोक अजून मराठी साईट्स वापरतील, वर्तमानपत्रातील वार्ताहर याविषयावर लेख लिहिताना जेव्हा शोध घेतील, तेव्हा हा धागा इथेच असेल.
ट्रंप च्या निवडणूकीच्या वेळी देखील हेच झाले होते. ट्रंप सपोर्टर्सला उघडपणे सांगणे अवघड झाले होते कारण सगळे लिबरल्स इतके ओवर कॉन्फिडंट होते की ते सोडून सगळ्या जगाला वेड्यात काढत होते. त्याचा निकाल आता समोर आहे.
निव्वळ अन्याय होतोय असं
शिक्षणाच्याच काय ... तर करियर च्या सुद्धा. पण स्त्रिया स्वत:च भेदभाव करतात त्याचं काय ?
याचं उत्तर एकच ठरलेलं मिळतं - "स्त्रियांनी काय करावं अन काय करू नये हे तुम्ही कोण सांगणार ?"
पण मग "पुरुषांनी काय करावं अन काय नको हे स्त्रियांनी का सांगावे ?" - या प्रश्नाचे उत्तर मात्र देणार नाहीत.
वस्तुस्थिती ही आहे की अमेरिकेत् "वुमेन ओन्ड बिझनेसेस" ना सवलती सुद्धा आहेत पण अनेक क्षेत्रे की ज्यांत् फिजिकल् हझार्ड नाहीत तिथे सुद्धा स्त्रियांचे प्रमाण कमी आहे. उदा. अमेरिकेतल्या राज्यविधानसभांबद्दल बोलू - लोकसंख्येत ५०% असलेल्या स्त्रिया राज्यविधानसभेत २४% च्या आसपास आहेत. (पुरावा) आता राजकारण हे फिजिकल हझार्ड असलेले क्षेत्र नाही. निदान अमेरिकेत तरी नाही. हे क्षेत्र सोशली डिझायरेबल आहे - म्हंजे इथे स्त्रिया असणे हे स्त्रियांच्या सामाजिक स्थानाच्या वृद्धीस पोषकच आहे. म्हंजे जर अमेरिकेतील राज्यविधानसभांमधे जर स्त्रियांचे प्रमाण वाढले तर
समाजातपुरुषांच्या मनात् जे काही पर्सेप्शन आहे स्त्रियांबद्दल ते बदलेल अशी अटकळ बांधायला जागा आहे. अमेरिकन सिनेट मधे स्त्रियांचे प्रमाण फक्त् २१% आहे. अमेरिकेत पहिली स्त्री सिनेटर १९२२ मधे झाली होती. म्हंजे अमेरिकन राष्ट्रीय राजकारणात् स्त्रियांना संधी गेली अनेक दशके आहे.पण मग स्त्रिया करियर निवडताना राजकारणाविरोधी भेदभाव का करतात ?
(टू बी फेअर - कॅलिफोर्नियातून निवडून गेलेल्या दोन्ही सिनेटर्स स्त्रिया आहेत.)
उत्तर एकच - तुम्ही पुरुष कोण सांगणार आम्ही कोणत्या क्षेत्रात जायचं ते ???
.
.
अभ्यास
The Gender Equality Paradox - Documentary NRK - 2011 - Feminism / Gender Studies
Milton Friedman - Case Against Equal Pay for Equal Work
स्त्रिया राजकारणात कमी
स्त्रिया राजकारणात कमी असण्याचं कारण दुशटं पुरुश मतदार त्यांना मतच देत नाहीत.
मेल्यांना तो लुबरा ट्रंप चालतो पण हिलरी नको.
Liberalism is a mental disorder
ती फुलबाजी
भुसनळे परत आले पण फुलबाजी विझली वाटतं.
(ओशट झालेले पॉपकॉर्न घेऊन थेटरात बसून राहिलेला)
-पिर्या
Liberalism is a mental disorder
याच्यावर तुमचं मत काय ?
याच्यावर तुमचं मत काय ?
( पळा पळा )
.
सिलिकॉन व्हॅलीतल्या जेंडर डिसक्रिमिनेशन
सिलिकॉन व्हॅलीतल्या जेंडर डिसक्रिमिनेशनबद्दल बोलणे ही एक सिस्टिमॅटीक इंडस्ट्री तयार झाली आहे. विविध ठिकाणाहून पैसे गोळा करायचे, दडपशाही करून मुलींना कामावर घ्यायला लावयच ही काही लोकांची मोड्युस ओपरेंडी झालेली आहे. अर्थात आता हळू हळू याची दुसरी ही बाजू समोर येत आहे. या लेखात एका स्त्रिलाच इतर स्त्रियांकडून कसा त्रास सहन करावा लागला याची कहाणी आहे. कारण काय तर फक्त तिचे विचार फेमिनिस्ट बायकांच्या "टेक इंडस्ट्री मध्ये जेंडर डिसक्रिमिनेशन" होते या नॅरेटीव शी जुळत नव्हते. गुगल नी सुद्धा अशा टेक इंडस्ट्री मधील ओढून ताणून आणलेल्या जेंडर ईक्वालिटीच्या विरोधात विचार व्यक्त केलेल्या एम्प्लॉयी ला कामावरून काढून टाकले.
परिस्थिती इतकी वाईट आहे की या इंडस्ट्री विरूद्ध कुणी उघडपणे बोलायला धजत नाही. या धाग्यावर अजून एक स्त्री म्हणतेय:
I'm an older woman in tech, and I learned quickly to avoid women's groups -- both tech groups and broader "women in business" organizations. They often have a "we are noble, struggling victims" belief that no one is supposed to challenge. Plus their events and discussions are often light on the tech and business savvy and heavy on the "girl" stuff like believing in yourself, dressing for success (!), and so forth.
I also learned to turn down their requests for interviews because their request was always some variation on, "Tell us how difficult it was for you because you're a woman." I'd tell them I disagreed with the angle they wanted me to take, and soon they stopped asking.
They claim they want to help women succeed, but the core belief they're selling limits women's development. Of course, I can't say any of this publicly, because the backlash would hurt my business. The whole situation is bullshit.
एकंदर कुणीही या लॉबी विरुद्ध बोलायला लागल की त्यांचा आवाज दडपायचा आणि त्यांच्या बुद्धिमत्तेबद्दल आणि क्रेडेंशियल्स बद्दल शंका उपस्थित करायची असा प्रकार चालू आहे. अर्थात ज्यांनी हा धागा वाचला आहे त्यांना यात काहीही नावीन्य वाटणार नाही.
अजून एक
अजून एक लक्षणीय मत:
Probably will get downvoted for this one, but I think it's important to have this discussion. So many people in tech are radical about advocating for women's and minority rights, that whenever someone from that "minority group" doesn't agree with their politics for whatever reason, they get bullied and ostracized. I'm a woman who currently studies Electrical Engineering & Applied Physics and I'm into embedded eng, my grandmother was a submarine engineer, my mother has two PhDs both in Physics and Chemistry. None of the women in my family had the "protection of feminists" and other advocates when they studied and did their jobs. It was tough, sure, but it's tough for everyone. When you're competent, nobody looks at the gender.
And that's the main issue that I have. I'm not even in the "West" per se. I'm from Eastern Europe. We're not exactly known to be feminist-friendly. And dare I say -- most of these extremely vocal people talk about super-tough and demanding tech jobs when they're in website development or Ruby. I'm not saying they're not important, but they claim to speak for women who are also in less represented areas, like embedded engineering, when that's not true at all. I'm glad that someone speaks about the bullying of women by other women in tech and their facetiousness.
Edit: forgot to add that I got bullied by a feminist for just being a neutral human being who wants to do their job. I didn't want to take a stance regarding her politics. Got yelled at, bullied online and ostracized. In the eyes of these people, non-feminist women in STEM don't exist.
As for sexism in STEM -- anyone who mentions someone's gender is usually also a jerk who tries to nitpick other issues too. And when you've done your job well, no-one can say anything. I've seen my male peers get bullied by male professors too. They don't scream "misandry" and cry themselves to sleep at night, but toughen up and continue. That's what everyone needs to do. Try it out, maybe you'll live a happier life.
Edit 2: I don't know how it is for women in Ruby. But I know that throughout all the years I've been among men in STEM, I've seen how horrible they can be to one another. I've also seen the depression and loneliness, and how competitiveness affects men too. Feminists don't want to talk about that at all, as if they're blind. Many of them have really strong social anxiety and they might not have many friends at all. And they have no one to talk to about their issues. It's not ideal or fair either, but people who have the drive, heart, vision and a strong work ethic, survive. And whenever I look at most of the Women Who Code or whatever bios and CVs, they are experienced public speakers and "politicians", probably will have an impressive twitter bio. But when it comes to actual work, those who are just regular people without any political agenda have more projects under their belt, more experience and competence.
पुरुषी माचोपणाची किंमत
The Cost of Devaluing Women
वर ज्या पुस्तकाचा उल्लेख केला आहे, How Women Decide, त्यातही याच प्रकाराबद्दल एक स्वतंत्र प्रकरण आहे. मानसशास्त्र-संशोधकांनी केलेले प्रयोग, त्यातून काढलेले निष्कर्ष यांची भर पुस्तकात आहे.
गोगोल यांना स्वतंत्र उत्तर देण्याची गरज वाटत नाही. माझी सध्याची सहीच पुरेशी वाटते - सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
आपला तो विदा, इतरांची ती
आपला तो विदा, इतरांची ती सांगोवांगी. एकूणच फेमिनाझी दृष्टिकोनाशी अगदी सुसंगत.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
बरं!
गोगोल यांच्या प्रतिसादातली वाक्यं -
तुम्ही सांख्यिकी विषयातली पदवी मिळवलेली आहे. बरोबर असेलही तुमचं; नसेलही कदाचित.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
मास्टर्स ॲण्ड जॉन्सन यांच्या
मास्टर्स ॲण्ड जॉन्सन यांच्या पुस्तकांना धर्मग्रंथांचा दर्जा देण्यात यावा अशी विक्षिप्त मागणी मी करतो आणि खाली बसतो.
डोक्यावरून तरी पण महत्वाचं
मी प्रामाणिकपणे मान्य करतो कि बरंचसं माझ्या डोक्यावरून चाललंय. पण एकूणच चर्चा महत्वाची वाटतेय. गरिबाला जरा शब्द समजावून सांगा (नाहीतर येऱ्या गबाळ्या लोकांना चर्चेत सामील करून घेतले नाही असा पक्षपातीपणाचे पातक तुम्हाला लागेल)
पहिला शब्द : कालपासून मी विचार करतोय कि "विदा" म्हणजे नेमके काय? पण अर्थ काळत नाहीये. कृपया समजावून सांगा.
data
विदा - data
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
धन्यवाद !!!
आता नीट संदर्भ लागतो आहे.
लेखाला पाटलीणबाईचं रडगाणं नाव
लेखाला पाटलीणबाईचं रडगाणं नाव मस्त शोभलं असतं.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
चर्चेतच लिंगभेद ?
मला तर असं वाटायला लागलाय कि हा धागा सुरु करणारी सदस्य हि स्त्री असल्यामुळेच तिला इतका विरोध होतोय.
गुद्दा हाणून मुद्दा साबित ?
केवळ संख्येचा विचार केलात तर
केवळ संख्येचा विचार केलात तर चर्चेत स्त्रियांचा सहभाग (पुरुषांपेक्षा) कमी आहे. हा स्त्रियांनी केलेला भेदभाव समजावा की त्यांचा प्रेफरन्स.
चर्चा चांगली
गब्बरभौ, आधीच मातब्बरांनी मातब्बरांना सांख्यिकी विषयावर खुळ्यात काढले आहे. मी खेड्यातला येरा गबाळा. मला त्या सांख्यिकी मध्ये ओढू नका. मी पार गटांगळ्या खाईन. बाकी चर्चा चांगली चालू आहे.
कधी होणार आहे हे
कधी होणार आहे हे डिस्क्रिमीनेशन?
चर्चेचा निष्कर्ष
तर्क लावून लावून तीर्थ पदी पोहोचलेले कोणतेच शास्त्री या प्रकरणाचा निकाल लावू न शकल्यामुळे शेवटी आम्हीच 'तीर्थ' घेऊन घेऊन तर्र पदी पोहोचून या प्रकरणाचा निकाल लावायचे ठरवले आहे.
तब्बल ३ आठवडे चाललेल्या या चर्चेतील सर्व वाद-प्रतिवाद्यांची मते ऐकून घेतल्यानंतर आमचे निरीक्षण असे आहे कि:
गब्बर भौ - तुम्ही लै मस्त तात्विक मुद्दे मांडले. आपल्याला त्यातले बरेचसे पटले. मुख्यतः "नियोक्त्याने कोणास नोकरी नाकारली तर तो भेदभाव परंतु नियोक्त्याने १०० वेळा जाहिराती करूनही ठराविक वर्गाने तेथे नोकरीस अर्ज न करणे हे मात्र वैयक्तिक स्वातंत्र्य." हाच मुळात भेदभाव आहे तसेच भेदभाव आणि पसंती ( प्राधान्य/प्रेफरन्स) हे दोन वेगवेगळे मुद्दे आहेत हे तुम्ही सर्वांच्या निदर्शनास आणून दिले.
अदिती ताई - तुम्ही खूप धैर्याने, नेकीने व उत्कटपणे खिंड लढवत आहात आणि तेही एकट्याच याचे आम्हाला कौतुक वाटले. स्त्रियांना कोणत्या परिस्थितून जावे लागते पुरुषांना समजत नाही हे तुमचे म्हणणे रास्त आहे. ज्याला भोगावे लागते फक्त त्यालाच त्याची तीव्रता कळते. बाकी सगळ्यांचे अंदाज असतात. फक्त तुम्ही वैयक्तिक हल्ले न करता आपले मुद्दे मांडले तर आमच्या मनात तुमच्या बद्दल चा आदर आणखीनच वाढेल.
भेदभाव - भेदभाव हा सगळीकडेच आहे. आपण घरातल्या आणि बाहेरच्या, मराठी बोलणाऱ्या आणि अमराठी, आपल्या राज्यतल्या आणि परराज्यतल्या, आपल्या देशातल्या आणि परदेशातल्या लोकांमध्ये काळत नकळत फरक करत असतो. आणि समोरचा माणूस जितका "आपल्यातला" वाटेल त्याला आपण प्रेफर करतो. कोण "आपले" वाटेल याची प्रत्येकाची आपली व्याख्या असते. अगदी तासाभराच्या एस. टी. च्या प्रवासात सुद्धा सीटवर बसताना आपण शेजारचा माणूस बघून त्यावरून सीट ठरवून मग बसतो. हाही एक भेदभावच आहे. भले त्याला प्राधान्य म्हणा. पण प्रत्येक भेदभावाला लैंगिक भेदभाव म्हणणे रास्त होणार नाही. ( भेदभाव करणे योग्य आहे असे मला मुळीच म्हणायचे नाही, किंवा लैंगिक भेदभाव होत नाहीत असेही मला म्हणायचे नाही. फक्त त्याचे सामान्यीकरण ( generalization ) करणे योग्य नाही.)
आता उदाहरणार्थ तीन वेगवेगळ्या व्यक्ती:
एक व्यक्ती कर्मचारी निवडताना अविवाहित अर्जदारांना प्राधान्य देते. त्याचे म्हणणे असे कि अविवाहित मुलांना कौटुंबिक जबाबदाऱ्या कमी असतात त्यामुळे ते काम जास्त करतात व सुट्ट्याहि कमी घेतात.
त्याच्या उलट दुसरी व्यक्ती कर्मचारी निवडताना विवाहित आणि पालक असणाऱ्या अर्जदारांना प्राधान्य देते. त्याचे म्हणणे असे कि विवाहित आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या असणारे कर्मचारी जास्त वर्षे टिकतात व अविवाहित तरुणांसारखे सारख्या नोकऱ्या बदलत नाहीत.
तिसरी व्यक्ती कर्मचारी निवडताना पुरुष अर्जदारांना प्राधान्य देते. त्याचे म्हणणे असे कि स्त्रियांना अनेक कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदाऱ्यांच्या चौकटीत राहून काम करावे लागते त्यामुळे त्यांच्या कामाच्या वेळा लवचिक नसतात. त्यामुळे स्त्री कर्मचारी वेळी अवेळी गरजेच्या वेळी उपलब्ध होऊ शकत नाहीत.
(अमेरिकेमध्ये अर्जदाराला नोकरी देण्यासाठी अशी वैयक्तिक व कौटुंबिक माहिती विचारणे गैर आहे हे सांगणे न लगे.)
वरील प्रत्येक व्यक्तीने कोणाच्यातरी बाबतीत भेदभाव केला आहे. मग त्याला लैंगिक भेदभाव म्हणायचे, कि प्रेफरेन्स म्हणायचा कि कामाची गरज म्हणायचे कि आणखी काही हे तुमचे तुम्हीच ठरावा. हे हि लक्षात घ्या कि अमूकप्रकारच्या नोकरीसाठी फक्त इंजिनीअरच पाहिजे (आणि तो हि नामांकित विद्यापीठातला) हा सुद्धा एकप्रकारचा भेदभावच आहे. एकूण काय कि प्रत्येक ठिकाणची परिस्थिती, संदर्भ आणि गरज वेगळी असू शकते त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या भेदभावाचे सामान्यीकरण करणे चूक ठरेल.)
स्त्रियांना कमी पगार - हे न पटण्यासारखे आहे. कोणत्याही गैर सरकारी आणि उत्पन्नावर आधारलेल्या संस्थेची नोकरीच्या बाबतीत एकाच धारणा असते कि त्यांना कमीत कमी पगारात जास्तीत जास्त चांगला कामगार मिळावा. मग तो कोणत्याही लिंगाचा असो वा कोणीही असो. त्यामुळेच तर एकाच वेळी एकाच पदासाठी निवडलेल्या कामगारांचा पगार वेगवेगळा असू शकतो. कारण नोकरी पक्की करताना, ठरवलेल्या पगारच्या बदल्यात आपल्याला योग्य कामगार मिळालेला आहे अशी नियोक्त्याची धारणा असते व आपल्या कामाच्या बदल्यात आपल्याला योग्य मोबदला मिळत आहे अशी कामगाराची धारणा असते. या परस्परांच्या धारणेवरच नोकरीचा करार आधारलेला असतो.
"समान काम समान वेतन" हे अगदीच मनावर घेणाऱ्यांनी हे हि लक्षात घ्या कि समान कामासाठी M.E. झालेल्या कर्मचाऱ्याला B.E. झालेल्या कर्मचाऱ्यापेक्षा जास्त पगार मिळतो. IIT मधून B.E. झालेल्या कर्मचाऱ्याला शिवाजी विद्यापीठातून B.E. झालेल्या कर्मचाऱ्यापेक्षा जास्त पगार मिळतो. सगळ्या गोष्टी बरोबरीच्या असल्या तरी बाहेरच्या संस्थेमधून येणाऱ्या कर्मचाऱ्याला विद्यमान संस्थेच्या कर्मचाऱ्यापेक्षा जास्त पगार मिळतो. हे योग्य कि आयोग्य, भेदभाव आहे कि नाही यापेक्षा त्या त्या संस्थांच्या परिस्थितीवर, गरजेवर, बाजारावर अवलंबून आहे.
सांख्यिकी / आकडेवारी - काही गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी सांख्यिकी फार उपयोगी पडते. परंतु एखाद्या गोष्टीला सांख्यिकी पुरावा असला तर सांख्यिकी निष्कर्ष खराच आहे असे म्हणता येणार नाही. वाजवी निष्कर्षासाठी इतर बऱ्याच गोष्टी पाहाव्या लागतील. अशी सांख्यिकी वापरून आपण हे हि सिद्ध करू शकतो कि जो कोणी श्वासाद्वारे ऑक्सिजन घेतो तो शेवटी मरतो. अगदी एकूणएक जिवंत व्यक्तीला हे लागू पडते. म्हणून त्यावरून ऑक्सिजन श्वसन केल्यामुळे लोकांचा मृत्यू होतो व ऑक्सिजन आरोग्याला घातक आहे असा निष्कर्ष हि काढला जाऊ शकतो. पण आपणा सर्वांना ज्ञात आहे कि वरील सांख्यिकी प्रमाणानुसार जरी असे भासत असते तरी ते साफ चुकीचे आहे. त्यामुळे सांख्यिकी मध्ये फक्त खूप जास्त नमुने घेतले, अपवाद वगळले, सामान्य वितरण वापरले तर त्याचे निष्कर्ष बरोबरच असतातच असे नव्हे. वाजवी निष्कर्षासाठी गणित आणि सांख्यिकी व्यतिरिक्त इतर गोष्टींचा सुद्धा विचार करणे आवश्यक आहे. जसे कि वरच्या उदाहरणात जीवशास्त्राचा आधार घेणे, उलट पद्धतीने (ऑक्सिजन न घेणाऱ्या व्यक्तींचे आयुष्य वाढते का याची ) सत्यता पडताळून पाहणे गरजेचे ठरते.
तसेच सांख्यिकी वापरून एखाद्या गोष्टीचे प्रमाण कमी आहे म्हणून ती गोष्ट नगण्य व दुर्लक्षित करण्याजोगी आहे असे म्हणणे हि चूक ठरेल. जसे कि सांख्यिकी वापरून एकवेळ असेही सिद्ध करता येईल कि एकूण आत्महत्या करणाऱ्यांमध्ये (व एकूणच रोज अनैसर्गिकपणे मृत्यू पावणाऱ्या लोकांमध्ये) शेतकऱ्यांची संख्या तुलनेने कमी आहे. म्हणून ते ठीक आहे किंवा दुर्लक्षित करण्याजोगे असे म्हणणे हि चूक ठरेल. कारण प्रत्येक जीव हा तितक्याच मोलाचा आहे. एकूण काय कि नुसत्या समोर दिसणाऱ्या आकडेमोडीवर निष्कर्ष काढू नका. त्या त्या विषयाच्या संबंधित इतर अंगांचा विचार करा, विषयाचे गांभीर्य लक्षात घ्या आणि मग निष्कर्ष काढा.
आता या भल्या मोठ्या अहवालानंतर आमचा निष्कर्ष असा आहे कि :
१. सर्व वाद-प्रतिवाद्यांना हे मान्य आहे कि काही ठिकाणी अजूनही लैंगिक भेदभाव होतो.
२. लैंगिक (एवढेच काय कोणत्याही) भेदभावाचे सामान्यीकरण (generalization) करणे अयोग्य आहे.
३. लैंगिक भेदभाव कितीही प्रमाणात होत असला (अगदी १ जरी होत असला) तरी तो अयोग्य आहे व ते थांबायला हवे.
आणि,
या चर्चेचा रोख आता "लैंगिक भेदभाव होतो कि नाही, किती प्रमाणात होतो, कसा होतो इ. इ." वरून "लैंगिक भेदभाव आणि लैंगिक विषमता कमी करण्यासाठी आपण (वैयक्तिक स्तरावर) काय करू शकतो?" असा वळवावा अशी सूचना करू इच्छितो.
फरक
तुम्ही ज्याला वैयक्तिक हल्ले म्हणताय त्याला मी टिंगल म्हणते.
एवढी टिंगलही ज्यांना झेपत नाही, त्यांनी चारचौघांत व्यक्त होणं थांबवलं तर बरं. चारचौघांत लिहिलं की चिकीत्सा होणार, टिंगल होणार, टवाळी होणार; पातळ कातडीच्या लोकांना ते नाही झेपत!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
टिंगलशाहीचा विजय असो.
टिंगलशाहीचा विजय असो.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
अजोंच्या प्रतिसादामागच्या
अजोंच्या प्रतिसादामागच्या भावनेशी एकदम सहमत.
स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद !
त्याला हल्ले म्हणा, टिंगल म्हणा किंवा आणि कोणते गोंडस नाव द्या. एकमेकांवरच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे चर्चा ही चर्चा न राहता चिखलफेक होते. व्यक्तींऐवजी चर्चेतील मुद्दयांवर वाद-प्रतिवाद केले तर चर्चेचा दर्जा वाढतो व त्याचबरोबर त्यातील सहभागी व्यक्तींचे श्रेष्ठत्व वाढते असे मला म्हणायचे होते.
व त्याचबरोबर त्यातील सहभागी
कोणतीही व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत इतरांपेक्षा श्रेष्ठ असताच कामा नये --- असं त्यांचं म्हणणं असेल तर ??
श्रेष्ठ ह्या शब्दातून असमानता प्रतीत होते व नेमका त्यालाच जर स्त्रीवाद्यांचा विरोध असेल तर ?
आईवडीलांनी त्यांची आवक ही आपल्या मुलांमधे समसमान वाटायला हवी असं त्यांचं म्हणणं असेल तर ?
तसे नसावे.
असमानतेला आणि भेदभावाला त्यांचा अगदीच कट्टर विरोध नसावा. त्या काही प्रतिसादांना मूर्ख, चुकीचे असे संबोधून प्रतिसादामध्ये भेदभाव करतातच की. त्यामुळे अगदी टोकाच्या विरोधी नसाव्यात असे वाटते.
फक्त तुम्ही वैयक्तिक हल्ले न
एवढ्या मोठ्ठ्या प्रतिसादातल्या एवढ्या ओळिलाच मिळालेला प्रतिसाद टिंगल मानून घ्यावा का कसं?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
+३
प्रतिसादाच्या शेवटच्या तीनही मुद्द्यांशी सहमत. निष्कर्षाशीही.
तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.
>>कधी होणार हे डिस्क्रिमिनेशन
>>कधी होणार हे डिस्क्रिमिनेशन? - अभ्या.. >>>>
झालंच, पोहोचलंच की मोबाइलात. honor 7x, 10 view (12k,35k)मध्ये.
यामधले कॅम्रा अॅप फोटोत स्त्री/पुरूष ओळखून ब्युटिफिकेशन/माचोफिकेशन करणार म्हणे.
फालतू चर्चा.
फालतू चर्चा.
अमूल्य अभिप्रायाबद्दल धन्यवाद
अमूल्य आणि अभ्यासपूर्ण अभिप्रायाबद्दल धन्यवाद !१
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
+१
या धाग्यावर थत्तेचाचांशी सहमत होता येईल असं वाटलं नव्हतं. पण ही करामत करून दाखवण्याबद्दल सिंथेटिक जिनियसांचे आभार.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
माझा आधिचा ग्रेटथिंकर हा आयडी
माझा आधिचा ग्रेटथिंकर हा आयडी निकालात काढल्याने आपण जास्त सहमतीचे उसासे टाकू नका.आपला टॉलरंस माहित आहे.दाखवायला संस्थळ फक्त वैचारीक आहे बाकी दोनचार टाळकीच इथे भावनिक मैथुनाचा अतिरेक करत बसलेली दिसतात.
फालतू चर्चा.
फालतू चर्चा.
येता का जाऊ?
Examples of Toxic Femininity in the Workplace
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हा गमतीशीर
विडियो सापडला: https://streamable.com/sb94r
त्याहीपेक्षा गमतीशीर व्हिडिओ
त्याहीपेक्षा गमतीशीर व्हिडिओ इथे
गब्बर भौ
आवो तुमी आमचे फेवरीट ऐसीकर झाला ना भौ. जॉर्डन भौ तर पैल्यापास्न आपले लै फेवरीट आहे. त्यो येकलाच हाय जो थोडा फार विचार करतो. पण काय करणार ना भौ, त्यो हाय भुसणळा. म्हणून मग त्याचे विडियो नाय केले पोष्ट. आता ही खालची ईस वर्ष आयटीत काम केलेली आणि सोताच्या मेहनतीने वरच्या पदावर गेलेली बाई काय म्हणते बघा, म्हणे आयटी मध्ये जेंडर डिस्क्रिमिनेशन नाही:
https://www.linkedin.com/pulse/why-we-dont-need-more-women-katy-sherman
कायतरीच काय अवो कायतरीच काय?
अर्थात मला पुर्ण कल्पना आहे की या बायका पण भुसनळ्याच असतील किंवा एका दुसरीच्या उदाहरणावरून जनरलायझेशन नाय करू शकतील ई. ई.
आपली तर आळिमिळि गुप ... आपल्याकडे सांखिकितली ॲडवान्स्ड डिग्री कुठे आहे?
जाता जाता: फिट द नॅरेटीव किंवा गच्छंती अटळ आहे (आठवा जेम्स डॅमोर ला)
जॉर्डन भौ तर पैल्यापास्न आपले
जॉर्डन पीटरसन चे काही मुद्दे मला पटतात. पण अजूनही तो बेसिक्स मधून बाहेर आलेला नाहीये. त्याचे किमान आठदहा व्हीडिओ बघितलेत मी.
बाकी मी तो वर डकवलेला टुकार (सॉरी टकर) कार्लसन बरोबर चा व्हीडिओ कैच्याकै आहे. अमेरिकन पुरुष विदारक (???) स्थितीत आहे त्याची जबाबदारी जॉर्डन ने अमेरिकन पुरुष सोडून इतर सगळ्यांवर ढकललेली आहे. हे कैच्याकै आहे. अमेरिकन पुरुष विदारक स्थितीत असलाच तर त्याची जबाबदारी अमेरिकन पुरुषांची आहे. ती जबाबदारी इतरांवर ढकलणं हे अतर्क्य आहे.
.
जॉर्डन पीटरसन चे काही
> जॉर्डन पीटरसन चे काही मुद्दे मला पटतात. पण अजूनही तो बेसिक्स मधून बाहेर आलेला नाहीये.
+१
> त्याची जबाबदारी जॉर्डन ने अमेरिकन पुरुष सोडून इतर सगळ्यांवर ढकललेली आहे. हे कैच्याकै आहे. अमेरिकन पुरुष विदारक स्थितीत असलाच तर त्याची जबाबदारी अमेरिकन पुरुषांची आहे. ती जबाबदारी इतरांवर ढकलणं हे अतर्क्य आहे.
+१००००
अलेले, माल्लं का तिनी तुला!
हा दुवा कालच आमच्या मुख्य विदावैज्ञानिकाकडून आला. (हा इसम गोरा, ५०+ वयाचा, पुरुष आहे.) हे लिहिणारा इसमही गोरा, पुरुष दिसतोय.
Stack Overflow Isn’t Very Welcoming. It’s Time for That to Change.
बाकी, भुसनळ्यांनी रडारडीचा पॅसिव्ह अग्रेसिव्हपणा केल्यामुळे त्यांना विनोदाचे सव्वादोन गुण देण्यात येत आहेत.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
आमचा फाफॉ, आमच्या लिंका
आमच्या फायरफॉक्सच्या रेकमेंडर सिस्टमवर आमचा भारी जीव!
How Slack Got Ahead in Diversity
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
जेंडर डिस्क्रिमिनेशन
आणखी जेंडर डिस्क्रिमिनेशन.
चंदा कोचर, शिखा शर्मा यांच्यावर महिला असल्यामुळे जास्त टीका.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
सवांतर
'बाई असूनही अशी वागते', अशा छापाच्या गोष्टी आपल्या अवकाशातही घडत असतात. काही वर्षांपूर्वी मिसळपाववर एका स्त्री आयडीनं अत्यंत गलिच्छ खरड लिहिल्यावर आलेल्या प्रतिक्रिया अशाच काहीशा होत्या. ती खरड गलिच्छ होती, यात वाद नाही. पण एक तर ती बाईनं लिहिलेली नसेलच असा प्रवाद होता; किंवा 'बाई असूनही असं कसं लिहिते', अशा छापाच्या प्रतिक्रिया होत्या.
अधिकारपदाच्या जागी असणाऱ्या (आणि घपले न करणाऱ्या) स्त्रियांना दुसरा त्रास होतो; त्यांची बारकी चूकही मोठी गणली जाते. या संदर्भात विदा आणि मानसशास्त्रीय प्रयोगांचा आधार घेऊन तेरीज हस्टन हिनं 'How Women Decide' नावाचं उत्तम पुस्तक लिहिलेलं आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
चालायचेच! (थोडेसे पर्स्पेक्टिवमध्ये)
'समग्र शेक्सपिअरवाङ्मय हे (पहिल्या) एलिझाबेथ राणीने विल्यम शेक्सपिअर या टोपणनावाने (अथवा डुआयडीने) लिहिलेले आहे' असा एक लोकप्रवाद पूर्वी काही गोटांत प्रचलित होता (म्हणे). त्यावर, 'हॅः! एवढे प्रगल्भ वाङ्मय हे एका स्त्रीने लिहिलेले असणे शक्यच नाही' इथपासून ते 'हम्म्म्म्म्... मग (पहिली) एलिझाबेथ ही स्त्री असणे शक्यच नाही' इथपर्यंत काय वाटेल ते प्रतिवाद तथा टीका झाली होती, असे (सांगोवांगीच्या गोष्टीवरून) कळते.
सांगण्याचा मतलब, शेक्सपिअरवाङ्मयास (तथा त्याची कर्त्री खुद्द (पहिली) एलिझाबेथ राणी हीस) जे टळले नाही, ते गलिच्छवाङ्मयास (आणि त्याच्या प्रस्तुत कर्त्रीस) टळले असते, तरच नवल होते. चलता है, समाज ऐसेइच होता है, त्याला कोण काय करणार?
मात्र, उपरोल्लेखित गलिच्छवाङ्मय हे अपौरुषेयच होते, याबाबत निदान आमच्या तरी मनात कोणताही संदेह नाही. किंबहुना, स्त्रीत्वाच्या, आंतरिक ऊर्मीतून उमटलेल्या उत्स्फूर्त, नैसर्गिक आणि मुख्य म्हणजे (कधी नव्हे ते) प्रामाणिक अशा उमाळ्याचा तो आविष्कार असून, सती सावित्रीपासून ते श्यामच्या आईपर्यंत आजवरच्या तमाम नि यच्चयावत 'तसल्या' स्त्रिया आपला (तथाकथित) सोज्वळपणा आजवर (ऑर्गॅझमप्रमाणेच१, २) फेक करीत आल्या असाव्यात, अशी आम्हांस खात्री आहे. सोज्वळत्वाच्या या उरल्यासुरल्या दास्यशृंखलेच्या जोखडातून स्वतःस मुक्त करून स्त्रीत्व ज्या दिवशी प्रामाणिक गलिच्छ अभिव्यक्तीची परिसीमा गाठेल, तोच तमाम स्त्रीत्वाकरिता खराखुरा मुक्तिदिन ठरेल. कारण त्या दिवशी मुक्त स्त्रीने पौरुषाच्या या अंतिम बॅस्टियनला धडक मारून त्याआड नुसताच प्रवेश मिळविला नसेल, तर त्याही क्षेत्रात (झाशीच्या राणीप्रमाणे३) कर्तृत्व गाजविलेले असेल. त्या दृष्टीने, प्रस्तुत गलिच्छअभिव्यक्तिसम्राज्ञीने मुक्तीच्या दिशेने टाकलेले हे मार्गदर्शक असे पहिले पाऊल हे वाखाणण्यासारखे आहे. आधुनिक मुक्त गलिच्छस्त्रीअभिव्यक्तीची४ सिमॉन बुव्वा म्हणून तिचे स्थान इतिहासात अढळ राहील. प्रत्येक होतकरू स्त्रीने तिचा कित्ता गिरवून आपल्या अभिव्यक्तीत अधिकाधिक, अंतिम गालिच्छ्य आणण्याकरिता प्रयत्नरत राहिले पाहिजे, झटले पाहिजे. तीच तिच्या जीवितात्म्यास५ अंतिम श्रद्धांजली ठरेल. जय हिंद!६
..........
१ म्हणजे, असे म्हणतात ब्वॉ! खखो स्त्रियाच जा.
२ या यादीत शिरण्याकरिता डोकेदुखी आणि पाळी यासुद्धा उत्सुक आहेत, असे ऐकून आहे२अ.
२अ हा शुद्ध अप्रामाणिकपणा आहे, असे आमचे मत आहे. परंतु आमच्या मतास विचारतो कोण?
३ असे म्हणण्याचा प्रघात आहे.
४ म्हणजे, अभिव्यक्ती गलिच्छ. स्त्री गलिच्छ नव्हे. (अॅट लीस्ट, नॉट नेसेसरिली.)
५ तिला मेलीला काय धाड भरलीय?
६ याचे प्रचलित दीर्घरूप: 'आणि अशा रीतीने आपले चार शब्द मांडून आम्ही आपले हे भाषण आवरते घेतो.'
पाने