ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग १३

प्रकरण १३ – होमिओपॅथी आणि बाराक्षार

सुधीर भिडे

विषयाची मांडणी

  • होमिओपथीचे शिक्षण
  • होमिओपॅथीची औषधे म्हणजे फक्त प्लासिबो असतो का?
  • असे का असावे?
  • समालोचन
  • होमिओपथीला शास्त्रीय वैद्यक म्हणता येईल?

***


होमिओपथीचे शिक्षण

देशात दीडशेपेक्षा जास्त कॉलेजे BHMS हा कोर्स शिकवितात. सरकारी कॉलेजांमध्ये प्रवेश मिळण्यासाठी NEETची परीक्षा द्यावी लागते. Central Council of Homeopathy ही भारत सरकारने बनविलेली होमिओपॅथीचे शिक्षण नियंत्रण करणारी संस्था आहे. या संस्थेने २००५ पर्यंत लागू केलेला BHMS कोर्सचा अभ्यासक्रम काय दाखवितो?

अभ्यासक्रमाची सुरुवात Introduction to Science of Homeopathy अशा शीर्षकाने होते. म्हणजे Central Council of Homeopathy या संस्थेचा असा दृढ विश्वास आहे की होमिओपॅथी हे एक शास्त्र आहे.

होमिओपथीच्या अभ्यासक्रमामध्ये Anatomy and Physiology, Histology, Biochemistry, Pathology, Haematology, Bacteriology, Parasitology, Gynaecology and Obstetrics हे ॲलोपथीचे विषय शिकविले जातात. हे विषय शिकविण्यासाठी ॲलोपथीचे तज्ज्ञ डॉक्टर बोलावले जातात. या सर्वाची काय गरज आहे?

दर वर्षी २०,००० होमिओपॅथ डॉक्टर पदवी घेतात.(Business Standard Saturday, January 7, 2023)

होमिओपथीच्या औषधांचे उत्पादन

भारतात होमिओपथीची औषधे बनविणारे पन्नासहून जास्त मोठे उत्पादक आहेत. श्वाब इंडिया होमिओपथीच्या औषधांचे मोठे उत्पादक आहेत. या कंपनीचे जगभर उत्पादन आहे.

भारतातून ५९ देशांत होमिओपथीच्या औषधांची निर्यात होते; त्यांचे मूल्य १.४१ दशलक्ष डॉलर्स आहे.

होमिओपथीतील शस्त्रक्रिया

होमिओपथीत शस्त्रक्रियेला कमी प्राधान्य दिसते. हाहनेमानने लिहिलेल्या खालील लेखात ही माहिती मिळते –

Aphorism (§)186 of Organon of Medicine, the book of doctrines of homeopathy, written by Dr. Hahnemann, describes the homeopathic approach on surgical conditions.:

होमिओपथीमधे शक्यतोवर औषधे देऊन उपचार करण्याचा प्रयत्न केला जातो. जेव्हा काही मार्गच राहत नाही तेव्हा शस्त्रक्रियेचा विचार केला जातो. होमिओपथीत आजार दोन प्रकारचे असतात असे समजले जातात. काही आजार शरीरांतर्गत असतात तर काही शरीराच्या एका भागात असतात. निरनिराळ्या प्रकारच्या जखमा, हाडाचे फ्रॅक्चर या प्रकारचे आजार एका भागात असतात आणि त्यासाठी शस्त्रक्रियेचा वापर होतो.

Those so-called local maladies which have been produced a short time previously, solely by an external lesion, still appear at first sight to deserve the name of local diseases. …The treatment of such diseases is relegated to surgery; but this is right only insofar as the affected parts require mechanical aid.

वरच्या वाक्यात relegated या क्रियापदाचा उपयोग मजेदार आहे.

होमिओपथीची औषधे म्हणजे फक्त प्लासिबो असतो का?

सर्व जगात होमिओपथीच्या खरेपणाविषयी बरेच संशोधन झाले आहे. त्यातील काही खाली उद्धृत केले आहे.

वैद्यकीय जगातील संशोधन प्रसिद्ध करणारे लान्सेट हे एक प्रतिष्ठित मासिक आहे. या मासिकाने काही संशोधन प्रकाशित केले, ज्यात असे दाखविण्यात आले होते की होमिओपथीच्या औषधांचा परिणाम प्लासिबोपेक्षा जास्त नसतो.

Smithsonian magazine, March 2015

The largest review conducted on homeopathy to date by the Australian health authority National Health and Medical Research Council in 2015. NHMRC came to the conclusion that “Based on the assessment of the evidence of effectiveness of homeopathy, NHMRC concludes that there are no health conditions for which there is reliable evidence that homeopathy is effective”

(National Health and Medical Research Council (2015) NHMRC Information Paper: Evidence on the effectiveness of Homeopathy for treating health conditions. Canberra)
National library of medicine, Published online 2019 Feb 14.

The European Academies’ Science Advisory Council (EASAC) 2017 verdict on homeopathy is as follows:

Scientific mechanisms of action—where we conclude that the claims for homeopathy are implausible and inconsistent with established scientific concepts.

Homeopathy cannot be regarded as medicine because it cannot prove specific efficacy beyond context effects, such as the placebo effect. The notion that homeopathy is an alternative to medicine is more based on ideology, faith, and belief than on rationality.

NHS (UK) report on Homeopathy

A 2010 House of Commons report said that homeopathic remedies perform no better than placebo. In 2017, NHS in England stopped funding for Homeopathy.

There is no evidence behind the idea that substances that cause certain symptoms can also help to treat them. Nor is there any evidence behind the idea diluting and shaking substances can turn those substances into medicines. Many homeopathic remedies are diluted to such an extent that it is unlikely there is a single molecule of original substance remaining in the final remedy. We consider the notion that ultra dilution can maintain an imprint of substance previously dissolved to be scientifically implausible.

असे का असावे?

आता खालील आकडेवारी पाहा –

  • युरोपातील २५% जनता होमिओपथीच्या औषधांचा वापर करते.
  • बेल्जियममधील ८५% आणि हॉलंड मधील ५०% डॉक्टर होमिओपथीची औषधे देतात.
  • ६० लाख अमेरिकन होमिओपथीची औषधे घेतात
  • इंग्लंडमध्ये होमिओपथीची ६ इस्पितळे आहेत, त्यांना सरकारी मदत मिळते.
  • इंग्लंडचे (दीर्घकालीन युवराज, आताचे) राजे चार्ल्स होमिओपथीच्या कॉलेजचे पेट्रन आहेत.

Despite the fact that homeopathy's assumptions are not supported by scientific evidence, homeopathy exists, and it is even supported by the healthcare systems of many countries . In Germany, its country of origin, it is even privileged by law and approved for statutory health insurance reimbursements. Homeopathic sales in Germany amount to hundreds of millions of Euro (according to German Federal Association of Pharmaceutical Companies);

In the United States, sale of Homeopathic drugs amount to around three billion dollars according to Food and Drug Administration, a threefold increase during the past 10 years.

(Homeopathy—where is the science? Natalie Grams, EMBO Rep. 2019 Mar; 20(3): e47761.Published online 2019 Feb 14. )

माझ्या ओळखीचे एक दांपत्य आहे. दोघेही शास्त्रात उच्चशिक्षित आहेत. असे कळले की ते होमिओपथीचा वापर करतात. होमिओपथीच्या माझ्या लिखाणावर त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याची इच्छा होती. यासाठी त्यांना होमिओपथीच्या लिखाणावरचे भाग १२ आणि १३ पाठविले. या दोन भागात होमिओपथीबद्दल मी काही प्रश्न उभे केले आहेत. माझ्या लिखाणाकडे पूर्ण दुर्लक्ष करून त्यांचा प्रतिसाद असा की त्यांनी होमिओपथीच्या औषधांचा वापर केला आहे आणि त्यांना उपयोग झाला आहे.

असे का असावे याचे एक हे कारण असावे की होमिओपथीची औषधे मिळणे सोपे आहे. शिवाय ही औषधे घेणेही त्रासदायक नाही. छोट्या गोड गोळ्या घ्यायच्या. होमिओपथीवर किती तरी पुस्तके आज सहज उपलब्ध आहेत जी सर्व आजारांवर उपचार सांगतात. ही औषधे औषधांच्या दुकानात सहज मिळतात. असेही म्हणले जाते की या औषधांना काही साईड एफेक्ट्स नसतात. खरे म्हणजे या औषधांचा प्लसिबो सोडून काहीच परिणाम नसतो. मग घेऊन पाहायला काय हरकत आहे असा सहज विचार केला जातो.

समालोचन

होमिओपाथीचे मूलभूत सिद्धांत काय?

  • एका माणसाकडून दुसऱ्याला आजार चुंबकत्वासारख्या एका फोर्सने दिला जातो.
  • like cures like
  • जितका डोस कमी तितका परिणाम जास्त.
  • पाण्याला स्मृती असते.

हे सिद्धांत कधी सिद्ध झालेले नाहीत. ॲलोपथीच्या पूर्वीचे पाश्चिमात्य वैद्यक आणि आयुर्वेद यांप्रमाणे होमिओपथीची औषधे वनस्पतीजन्य, प्राणिजन्य अथवा खनिज पदार्थांपासून बनलेली असतात. होमिओपाथीच्या औषधांचे जेव्हा ॲलोपाथीच्या औषधांप्रमाणे Randomised double blind controlled trials करण्यात आल्या त्यात एकाही वेळी प्लासिबोपेक्षा जास्त परिणाम आढळून आला नाही. जगातील मोठ्या संस्थांनी हे वैद्यक निराधार असल्याचे घोषित केले आहे.

बाराक्षार हा होमिओपाथीचा लहान भाऊ आहे.

होमिओपथीला शास्त्रीय वैद्यक म्हणता येईल का?

होमिओपथीला शास्त्रीय मानदंड लावून काय दिसते ते पाहू.

ज्या मूल सिद्धांताच्या पायावर हे वैद्यक उभे आहे हे सिद्धांत कसे सिद्ध झाले? परत प्रयोग करून हे सिद्धांत पाहिजे तेव्हा सिद्ध करता येतील का? या प्रयोगातून काय प्रकारचे मोजमाप वापरण्यात आले? सुरुवातीला ग्राह्य धरलेले कोणते सिद्धांत मागून चूक ठरले?

होमिओपाथीचे मूलभूत सिद्धांत काय? एका माणसाकडून दुसऱ्याला आजार चुंबकत्वासारख्या एका बलाने दिला जातो; like cures like; जितका डोस कमी तितका परिणाम जास्त; पाण्याला स्मृती असते.

Like cures like या तत्त्वाची सत्यता पाहाण्यासाठी हाहनेमानने काही चाचण्या केल्या खऱ्या पण कोणत्याही अर्थाने त्या चाचण्यांना शास्त्रीय चाचण्या म्हणता येणार नाही. हे मूल सिद्धांत कधी सिद्ध झालेले नाहीत.

अशा प्रयोगांचे शोध निबंध इतर तज्ज्ञांनी तपासून मग प्रसिद्ध केले जातात का? तर अशा प्रकारची काही परंपरा नाही. रोगाच्या निदानासाठी काय प्रकारच्या चाचण्या वापरल्या जातात. या चाचण्यांत काय मोजमाप केले जाते? चाचण्यांचे निष्कर्ष मानवी हस्तक्षेपाशिवाय रेकॉर्ड होऊ शकतात का?

कोणत्याही चाचणीचे मोजमाप नाही.

औषध देण्याअगोदर RCT केल्या जातात का? RCT कुठल्या संस्थेमार्फत केली जाते? या संस्थेची स्वायत्तता कशी राखिली जाते?

होमिओपाथीच्या औषधांच्या Randomised, double blind Controlled trials केव्हा झाल्या? हे लेख कोणी तपासले? ते कुठे प्रसिद्ध झाले?

या प्रश्नांची उत्तरे निरुत्तर करणारी आहेत. – लेख होमिओपथीच्या मासिकात प्रसिद्ध झाले. ते लेख होमिओपथीच्या तज्ज्ञांनी तपासले. ॲलोपथीचे लेख ॲलोपथीचे तज्ज्ञ तपासतात आणि ॲलोपथीच्या मासिकात प्रसिद्ध होतात. मग होमिओपथीने तसेच केले तर काय बिघडले?

क्रमशः

***

भाग १ - शास्त्रीय दृष्टीकोनातून निरनिराळ्या वैद्यकीय प्रणालींचे मूल्यांकन
भाग २ - ॲलोपथीच्या आधीचे पाश्चिमात्य वैद्यक
भाग ३ - आयुर्वेदाचे मूल सिद्धान्त
भाग ४ - आयुर्वेदाचे मूल सिद्धान्त – त्रिदोष
भाग ५ - परीक्षा आणि चिकित्सा
भाग ६ - आयुर्वेदाची औषधे – भाग १
भाग ७ - आयुर्वेदाची औषधे – भाग २
भाग ८ - आयुर्वेदाचे शिक्षण आणि नंतर
भाग ९ - आयुर्वेदाची प्रॅक्टीस
भाग १० - युनानी आणि सिद्ध
भाग ११ - निसर्गोपचार
भाग १२ - होमिओपॅथी आणि बाराक्षार

field_vote: 
0
No votes yet

सर्व भाग अतिशय अभ्यासपूर्ण. आपल्या ज्ञानलालसेला नमस्कार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही आंतरजालावरील लेख खाली दिलेल्या लिंक नुसार वाचनीय आहेत.

आधुनिक वैद्यकातली नीतीमत्ता आणि कट प्रॅक्टिस उर्फ़ रेफ़रल फ़ी
http://www.misalpav.com/node/5292

आपले आरोग्य आपण कोणाच्या हातात सुपूर्त करतो?
http://www.misalpav.com/node/3386

प्लासिबो
http://mr.upakram.org/node/2660

होमिओपॆथी एक थोतांड
http://mr.upakram.org/node/2651

होमिओपथी : वैयक्तिक अनुभव
http://mr.upakram.org/node/2408

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

ते विज्ञान आहे की नाही हे तुम्ही शोधत बसा आम्हाला गुण आल्याशी मतलब! या युक्तिवादाला काय करणार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

मी तुमचे आयुर्वेदावर लेख वाचले. तुम्ही खूप मेहनत घेतली आहे, भरपूर संदर्भ शोधून टंकले आहेत. अर्थात शेकडो तास तुम्हाला यावर द्यावे लागले असतील. तुमच्या मेहनतीला निश्चितच सलाम. पण दुर्भाग्य तुमचा लेख लिहण्याचा दृष्टीकोण नकारात्मक असल्याने तुम्ही तर्कपूर्ण विवेचन करू शकले नाही. आयुर्वेद ही शास्त्रशुद्ध प्रणाली नाही हे सिद्ध करण्यासाठाई व्यर्थचे तर्क दिले. च्यवन प्राश मध्ये किती पदार्थ असतात याची माहिती ही चुकीची होती. (51 पदार्थ असतात). अधिकान्श भस्म जर शास्त्र शुद्ध पद्धतीने तैयार केले असतील तर त्यांच्या कुठलाही दुष्परिणाम होत नाही. (यावर रिसर्च प्रकाशित झाले आहे. मी लिंक देणार नाही. तुम्हीच शोधा) आयरन केपसुलपेक्षा लौह भस्म केंव्हाही सुरक्षित. आयुर्वेदात प्रामाणिक एक सारखी औषधी बनत नाही हे आकलन. पण आज आधुनिक यंत्रांमुळे आयुर्वेदिक औषधी ही एक सारखी बनतात. सरकारची उदासिनता आणि वित्तीय मदत न देण्याची भूमिका असल्याने (आज ही 98 टक्के खर्च एलोपथि वर खर्च करते), आयुर्वेदिक औषधीनवर अनुसंधान करणे शक्य नव्हते. एक एक औषधीवर अनुसंधान करण्यासाठी अनेक कोटी खर्च होतात. आयुर्वेदिक औषधांची विक्री आणि कमी नफा यामुळे निर्माते परीक्षण करण्यास असमर्थ होते. आज परिस्थिति बदललट चालली आहे. आयुर्वेदिक कंपन्या ही अनुसंधानवर खर्च करत आहे. अनुसंधान आधारित नवीन औषधी बाजारात आणत आहे. बाकी करोंना काळात आयुर्वेदिक औषधी प्रभावी ठरल्या त्याची दखल जागतिक दर्जाच्या मेडिकल जर्नल्स ने ही घेतली आहे.
बाकी जगातील सर्व वनौषधी प्रणाल्या 2000 हून जास्त फेक आहेत, यावर मनोरंजन म्हणून लेख वाचायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शास्त्रीय आहे की नाही ह्या पेक्षा रिझल्ट महत्वाचा .
असाच विचार करणारी खूप लोक असतात.

कोलगेट ल by करून .
विको किंवा dabar किंवा पतंजली ची टूथ पेस्ट वापरणारी लोक च जास्त आहेत.
आज पण शिकेकाई ,वर च लोकांचा जास्त विश्वास आहे.
फेस पॅक korpad च वापरली जाते आणि ते पॅक घरीच बनवले जातात
खोकला आला की काढा च लोक घेतात.
सर्दी झाली की वाफ च घेतात.
Mouth wash पेक्षा मिठाच्या पाण्याच्या गुळण्या,आणि लवंग तेल पाण्यात टाकून त्याच्या गुळण्या हेच आज पण प्रभावी आहे.
पारंपरिक आहार परत आला आहे.
गहू , मैदा जावून.
ज्वारी,बाजरी,नाचणी च्या भाकऱ्या लोक खात आहेत.
गव्हाचे पीठ वापरण्यास पेक्षा गव्हाचा दलिया वापरला जातो
कॅन्सर,tb ह्या सारखे मोजकेच आजार झाले की लोक alopathy कडे जाणे गरजेचे समजतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विवेक पटाईत यांनी असे मुद्दे मांडले आहेत -

  • तुमचा दृष्टीकोन नकारात्मक असल्याने तर्कपूर्ण विवेचन नाही
  • च्यवनप्राशमध्ये ५१ पदार्थ
  • आयर्न कॅप्सूलपेक्षा लोह भस्म सुरक्षित
  • सरकारची उदासीनता.

प्रथमत: विवेक पटाईत यांनी लेख काळजीपूर्वक वाचल्याबद्दल आभार. ते म्हणतात की माझा दृष्टीकोन नकारात्मक असल्याने विवेचन तर्कपूर्ण नाही. माझा दृष्टीकोन नकारात्मक आहे की नाही हा मुद्दा थोडा बाजूला ठेवू. विवेचनात काय तर्कपूर्ण नाही हे त्यांनी सांगितल्यास, मला योग्य वाटल्यास मी पुनर्विचार करून लिखाणात बदल करेन.

च्यवनप्राशमध्ये ३५ वनस्पती आहेत की ५० याला महत्त्व नाही. जेव्हा उत्पादक 'च्यवनप्राश घेतल्याने इम्युनिटी दुप्पट होते' असे लिहितात तेव्हा प्रश्न निर्माण होतो. कारण इम्युनिटी मोजण्याचे आज काही साधन नाही.

आयर्न कॅप्सूल्समध्ये लोह सल्फेट असते, भस्मात ते ऑक्साइड स्वरूपात असते. ऑक्साइड शरीरात शोषण्याला त्रास होतो. कोणत्याही फॉर्ममध्ये आयर्न शरीरात गेले तर त्याचे साईड इफेक्ट्स होणारच.

पुढच्या भागात दाखवून दिल्याप्रमाणे सध्याचे सरकार आयुर्वेदाच्या बाबतीत अजिबात उदासीन नाही.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आज आयुर्वेदात ही रिसर्च होत आहे. भस्म हे नेनो मेडिसीन असल्याने त्याचे काही ही वाईट परिणाम नाही. खालील लिंक आणि रिसर्च पेपर्स सोबत दिलेले अनेक रिसर्च रेफेरेन्स पाहू शकतात.
https://pubs.acs.org/doi/full/10.1021/acsomega.2c05391
https://www.frontiersin.org/articles/10.3389/fphar.2021.751576/full

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणजे टेस्ट काय करतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0