Skip to main content

चित्रबोध - ३

याआधी:
भाग - १
भाग - २
==========================
भाग - ३


ही दृश्यकलेची जाण मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय करावे लागेल?


हा प्रश्न मी लेखमालेच्या शेवटी घेतला असला तरी याचा समावेश चित्रबोधाच्या सुरवातीच्या व्याख्यानात होता. माझ्या मते हे व्याख्यान शेवटचे ठेवले असते तर अधिक फायदेशीर वाटले असते. असो.

काही 'जपानी' अनुभव

जपान, पृथ्वीवरील एक नंदनवन! निसर्गसौंदर्याने नटलेला एक नितांत सुंदर देश. त्याहुनही महत्वाचे म्हणजे प्राचीन संस्कृती आणि सभ्यता असलेला आणि त्यांची प्रचंड निष्ठेने जोपासना करणारा एक देश. देश, समाज, देशवासीय ह्यांचे आपण काहीतरी देणे लागतो, त्यांच्यामुळेच आपण एक सुसह्य सामुदायिक जीवन जगु शकतो अशी गाढ श्रद्धा असलेले जपानी लोक.

छायाचित्रण पाक्षिक-आव्हान १ : माझे शहर/गाव

ऐसीअक्षरेवर अनेक हौशी छायाचित्रकार आहेत. काही मंडळी वेगवेगळे प्रयोग करत असतात. खास छायाचित्रणासाठी विविध ठिकाणी जाणे, काही विशिष्ट दिवशी - वेळी हव्या त्या छायाचित्रासाठी प्रयत्न करणे वगैरे सव्यापसव्ये अनेक जण करताना दिसतात. मला बहुतांश चित्रे छान वाटतात. इथे प्रसिद्ध होणारी सर्व चित्रे ही सहेतूक असली तरी एकाच विषयाला धरून असतातच असे नाही.

मात्र, नुकत्याच झालेल्या दोन खगोलीय घटनांच्या वेळी - कंकाणाकृती ग्रहण आणि शुक्राचे अधिक्रमण - एकाच विषयावर अनेक चित्रे बघायला मिळाली व तुलना करायला मजा आली व बरेच काही शिकायला मिळाले

स्पर्धा का इतर?

आपण कुठे अन ते कुठे - मराठी कविता

Taxonomy upgrade extras

नमस्कार.

'आपण कुठे आणि ते कुठे' अशा शीर्षकाचा चर्चाविषय मांडताना धाकधूक आहे कारण तितकेसे शास्त्रीय अथवा अभ्यासक्रमात असते त्याप्रमाणे ज्ञान मिळवलेले नसल्याने ही मते केवळ एक 'फीलिंग' ठरेल आणि वास्तव वेगळेच असल्याचे निदर्शनास येईल आणि त्यातून आपले हसे होऊ शकेल असे वाटत आहे.

तरीही, विस्ताराचे भय असूनही हे लिहावेसे वाटत आहे की उर्दू काव्य, मराठी काव्य व हिंदी चित्रपट गीतांचा प्रवास याची काही प्रमाणात जमेल तशी ओळख करून घेतल्यानंतर हा विषय मांडत आहे.

===========================

"...कविता कविता कविता..."


इकडे कविता तिकडे कविता
बघावे तिकडे कविताच कविता
पेपरच्या पुरवणीत कविता
मासिकाच्या गदारोळात कविता
रद्दी कागदावर दिसते कविता
कवितेच्या रद्दीवर कविता
सुटका नाही बजावतात कविता
संमेलनात सतावतात कविता
ऑर्कुट कविता सर्किट कविता
ब्लॉग कविता फेसबुक कविता
चितेवर कविता चिंतेवर कविता
उन्हावर कविता पावसावर कविता
गारांसारख्या आदळतात कविता
धबधब्यासारख्या कोसळतात कविता
तहानभूक विसरून कविता
उठता बसता पाडतात कविता
शब्दांपुढती शब्द कविता
वेळही जातो बनते कविता

झांशीची राणी!

Taxonomy upgrade extras

आजकाल मानसीचा दुपारचा वेळ फारच चांगल्या प्रकारे जात होता. मस्त जेवण, (अधून मधून चायनीज), थोडीशी वामकुक्षी, सटर फटर वाचन, व नंतर 42 इंची फ्लॅट स्क्रीनसमोर बसून आलटून पालटून दोन - तीन टीव्ही चॅनेल्सवरील पुनर्जन्मावरील मालिका बघणे यात वेळ कसा भुर्रकन उडून जात होता याची ती कल्पना करू शकत नव्हती. पोटात मूल वाढत असल्यामुळे डॉक्टरानी सक्तीच्या विश्रांतीची शिक्षा सुनावली होती. 12-15 तास (तेही ऑफिसचे काम न करता!) कसा घालवावा याची तिला पहिल्या पहिल्यांदा धास्ती होती. परंतु या टीव्ही सिरियल्सने तिचा प्रश्न चुटकीसरशी मिटवला. कुतूहल म्हणून मानसी या मालिका पाहू लागली. व त्या तिला चक्क आवडू लागल्या.

अमिरी खमण

साहित्य-
१ वाटी हरबरा डाळ, १ वाटी मूग डाळ, २ टेबलस्पून तेल,
२ पेराएवढे आले, ३ ते ४ हिरव्या मिरच्या, १/२ चहाचा चमचा खायचा सोडा, २ चमचे दही किवा अर्धी वाटी ताक,
१/२ चमचा हळद,१/२ चमचा मोहरी,१/२ चमचा जिरे,१/२ चमचा हिंग (मिसळणाच्या डब्यातील लहान चमचा),
एका मध्यम लिंबाचा रस, २ चहाचे चमचे साखर,मीठ चवीनुसार,५ते६ काजूबिया तुकडे करुन
१/२ वाटी खवलेले ओले खोबरे, मूठभर कोथिंबिर,१/२ वाटी बारीक शेव +

चीज मश्रुम्स्


राम राम मंडळी, एका छोट्याश्या सुट्टीनंतर पुन्हा एकदा पाककृती विभागात हजेरी लावतोय. काही चुकलं माकलं तर पोटात घ्याल याची खात्री आहे. :)

साहित्य : अळंबी (मश्रुम्स्) ,

वैज्ञानिक सत्यं खरी मानायला मानवी मन का कचरतं?

जी गोष्ट विज्ञानानं सिद्ध झालेली आहे तिच्यावर अनेक माणसांचा विश्वास बसत नाही असं अनेक बाबतींत दिसतं. हे असं का होत असावं याचं कारण कदाचित आपल्या मेंदूतच असावं असं आता आढळू लागलं आहे. जगाविषयीच्या काहीशा भोळसट संकल्पना माणसाच्या मेंदूत मुळातच असतात की काय असं मानण्याला जागा आहे. उदाहरणार्थ, 'सूर्य पृथ्वीभोवती फिरतो' हे आपल्या अंत:प्रेरणेतून आलेलं भोळसट ज्ञान म्हणता येईल. विज्ञान शिकताना अशा भोळसट अंतःप्रेरणांचा त्याग करावा लागतो. जी वैज्ञानिक तथ्यं अशा भोळसट ज्ञानाच्या विरोधात जातात त्यांच्यावर प्रक्रिया करायला मेंदूला त्रास द्यावा लागतो.

चिंता

असाच आणखी एक प्रवास.

रस्त्यावरचं गाव.
नेहमीप्रमाणे मला उशीर झाला आहे.
माझं काम कधी वेळेत संपत नाही - कारण चर्चेत एकातून एक मुद्दे निघत राहतात.
ते तितकेच महत्त्वाचे असतात.
त्यावर बोलत राहतो आम्ही.

पण आत्ता या उशीराबद्दल मला फार चिंता नाही.
इथं काही मीटिंग वगैरे नाही.
तर दोन तीन घरांत आम्ही जाणार आहोत.
नुकतीच एक माहिती गोळा केली आहे आमच्या टीमने.
ती काही घरांत जाऊन, तिथल्या लोकांशी बोलून आणि नंतर (आमच्या हाती असलेल्या) त्या घराच्या माहितीशी पडताळून पहायची आहे.
म्हटलं तर एकदम सोपं काम - म्हटलं तर अवघड.

पुढची मोटरसायकल थांबते. आमची गाडीही थांबते.