भाषा

शब्दांचे अर्थ, प्रतिशब्द, पर्यायी शब्द, भाषांतर वगैरे - भाग ५

व्यवस्थापकः
आधीचा धागा लांबल्यामुळे पुढील धागा काढला आहे.
या आधीचे धागे: भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४

----

सोहिरोबानाथ अंबिये ह्या संतकवींच्या खालील ओळींचे इंग्रजीत भाषांतर कसे कराल?

दिसणे हे सरले
अवघे प्राक्तन हे नुरले
आलो नाही, गेलो नाही
मध्ये दिसणे ही भ्रांती

Taxonomy upgrade extras: 

शब्दांचे अर्थ, प्रतिशब्द, पर्यायी शब्द, भाषांतर वगैरे - भाग ४

व्यवस्थापकः
आधीचा धागा लांबल्यामुळे पुढील धागा काढला आहे.
या आधीचे धागे: भाग १ | भाग २ | भाग ३

----

"सुमार" ह्या शब्दाचा मराठी मधे अर्थ average ह्या अर्थी घ्यायचा की below average ह्या अर्थी घ्यायचा.
मी तरी दुसरा अर्थ वापरते.

हा उर्दु/फारसी वगैरेतुन आलेला दिसतो शब्द ( बेसुमार मधला हाच सुमार असला तर ), पण सध्या तिथे तो वापरात आहे का?

Taxonomy upgrade extras: 

येथे कुठला मराठी शब्दप्रयोग चपखल बसेल? - ३

व्यवस्थापकः
आधीच धागा लांबल्यामुळे पुढील धागा काढला आहे.
या आधीचे धागे: भाग १ | भाग २

----
चटोर आणि चंट या दोन्ही शब्दांना चपखल इंग्रजी शब्द कोणते असू शकतील? एकदा का इंग्रजी शब्द सापडले की त्या इंग्रजी शब्दांना हे चपखल मराठी शब्द असे ठरवता येईल. (धागा चुकलेला नाही.)

Taxonomy upgrade extras: 

येथे कुठला मराठी शब्दप्रयोग चपखल बसेल? - २

'अनवट मराठी शब्द, वाक्प्रचार, संदर्भ' हा धागा लांबल्यामुळे दुसरा धागा काढला आहे.

hostile ला मराठीत नेमकं काय म्हणतात ?

Taxonomy upgrade extras: 

फ्रेंच लेखनपद्धती व उच्चार

et al फ्रेंच वाटत नाही, लॅटिन असावा - Et Tu Brute वाला.

बाकी फ्रेंच उच्चारांचे काही नियम ध्यानी घेतले, तर बव्हंशी गाडी धकून जाते. (कॉलिंग चिंजं!). एक मुख्य नियम म्हणजे, फ्रेंचमध्ये शेवटचा consonant बव्हंशी सायलेंट असतो. त्याला काही अपवाद आहेत, ते म्हणजे c, r, f, l हे शेवटी आल्यास. ('केअरफुल' हे mnemonic लक्षात ठेवावे.)
ते आले की शेवटच्या consonant चा उच्चार होतो*.

*अर्थात, या अपवादासही अपवाद आहेत, पण तिथवर बुडी न मारता हा उथळ पाण्याचा (सायलेंट) खळखळाट :).

===

Taxonomy upgrade extras: 

मराठी शब्द सुचवा (विषय : प्रताधिकार)

जिथे सध्या काही शब्द वापरात आहेत ते कंसात दिले आहेत. आधीक चांगला चपखल शब्द सुचवणे अथवा सध्याच्या शब्दाबद्दलच सहमती/दुजोरा देणे यात सहकार्य हवे आहे. उदाहरणार्थ वापरातील वाक्ये दिली आहेत. पुर्ण वाक्याचा अनुवादही सुचवल्यास हवा आहेच.

* Attribution पर्याय रोपण, श्रेय
* Share Alike जसेहोते वापरातसेच
* endorse पाठींबा
* licensor
* licensee

: वाक्यात उपयोग उदाहरण
:This file is licensed under the Creative Commons Attribution-Share Alike 4.0 International license.

Taxonomy upgrade extras: 

'च' आणि 'ही' चे भाषांतर

खालिल वाक्यांचे इंग्रजीत अक्षरशः भाषांतर करून हवे आहे.
१. मी लातूरला गेलो.
२. मीच लातूरला गेलो.
३. मी लातूरलाच गेलो.
४. मी लातूरला गेलोच.
५. मी लातूरला गेलोच कि!
६. मीही लातूरला गेलो.
७. मी लातूरलाही गेलो.
८. मी लातूरला गेलोही.
९. मी लातूरला गेलोही कि !
१० मीही लातूरलाही गेलोही कि!
११. मीच लातूरला गेलोही.
१२. मीच लातूरलाही गेलोच.
१३. मीच लातूरलाच गेलोच.

Taxonomy upgrade extras: 

संस्कृत भाषा - आजची स्थिति

इंडियन एक्स्प्रेस, ८ डिसेंबर २०१४ च्या अंकातील लेख येथे पहा.

त्यातील एक भागः

If I am dead, do I want a rebirth? If I am a ghostly shadow, do I want to become visible again? I am not sure. I would feel so out of place in this India. William Jones said I am a language of precision. What will I do in a culture that has lost the art of fine distinctions? I am the language of logic and form. What will I do in a culture where public argument is nothing but the flouting of logic? I am a language where the purpose of language is language itself. What will I do in a culture where everything is instrumental? I am the language of refined eroticism. What will I do in a culture where my supporters would unleash the tides of repression? I am the classic language of double meanings. What will I do in a culture where people cannot even hold one meaning in their head? I am the language of the classic pun. What will I do in a culture that is humourless? I am the language of itihasa. What will I do in a culture where all history is merely politics by other means? I am the language of refined aestheticism. What will I do in a culture where aesthetics is confined to museums or kitsch? The meaning of my name, they say, is perfection. What will I do in a culture where excellence is seen as an instrument of domination? I am the language of the gods. What will I do in a world where gods have been banished by godmen? I am the language of liberation, the gateway to being itself. What will I do in a culture that seeks bondage and refuses self-knowledge?

Taxonomy upgrade extras: 

वाचेल तो वाचेल!

पुढे दिलेली काही उदाहरणं पाहा:

● कुठलाही गुन्हेगार जन्मत: वाईट नसतो. परिस्थितीमुळे तो तसा बनतो.

● मराठी नाटकाचा प्रेक्षक बहुतकरून उच्च मध्यमवर्गातला आहे.

● सरकारी नोकर म्हटला म्हणजे कुठल्याही जातीतून वर आलेला असला तरी एकदा पदावर आला की मग त्याने प्रत्येकच नागरिकाचं हित बघायला पाहिजे. 'हा ब्राह्मण, हा मराठा, हा आपला माणूस' असा भेदभाव त्याने करणं बरोबर नाही.

Taxonomy upgrade extras: 

अचूक मराठी लेखनासाठी मदत

दिवाळी अंकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने पुढे आलेली एक बाब म्हणजे मुद्रितशोधन. तसा प्रत्येकानेच थोड्याफार प्रमाणात या कामाला हातभार लावला असला तरी मेघना भुस्कुटे, अमुक आणि चिंतातुर जंतू यांनी ही जबाबदारी समर्थपणे सांभाळली. त्यांनी ही बारीक फणी फिरवल्यामुळे ऐसीच्या दिवाळी अंकात शुद्धलेखन, भाषेचा वापर, विरामचिन्हांचा उपयोग इत्यादी बाबतीतल्या चुका अत्यंत नगण्य स्वरूपात आहेत अशी आम्हाला खात्री आहे. त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. दुर्दैवाने न राहिलेल्या चुका दिसत नाहीत, त्यामुळे त्यांना किती काम करावं लागलं याची कल्पना येत नाही.

Taxonomy upgrade extras: 

पाने

Subscribe to RSS - भाषा