ही बातमी समजली का? - ८९
नेपाळमधील नव्या घटनेनंतरच्या काव्व्यावर आजचा लोकसत्तेचा शहाणा अग्रलेख.
एकुणच नेपाळचा तिढा सोडायला मोठ्या मुत्सद्देगिरीची गरज दिसतेय. सद्य सरकार आता कसे वागते ते बघायचे.
मात्र, एकुणात भारतीय परराष्ट्र धोरणावर बराच विश्वास असल्याने (व ते आता स्वराजांसारख्या हुशार नेत्याच्या हातात असल्यानेही) योग्य ती पावले उचलली जातील असा (उगाच) विश्वास वाटतो.
==
जाता जाता:
नेपाळमधील समलैंगिक जोडप्यांचे घटनात्मक मान्यता मिळाल्याबद्दल अभिनंदन! तर नेपाळी तरूणींबद्दल (परकीय व्यक्तींशी लग्नास घटनात्मक अटकाव असल्याब्द्दल) खेद प्रकट करतो
India turns to Israel for
India turns to Israel for armed drones as Pakistan, China build fleets
भांडवलवाद समजून घ्यायचा असेल तर फक्त या बातमीचे पहिले वाक्य वाचावे. ( अर्थात हे अतिसंक्षिप्त, व सोपेकरणाचा अतिरेक असेल. )
जर्मन धर्मराजाचा हवेतुन
जर्मन धर्मराजाचा हवेतुन चालणारा रथ एक्दम जमिनीवर आला.
----------
"Our company was dishonest, with the EPA and the California Air Resources board, and with all of you and in my German words, we have totally screwed up.," Horn told the audience at the lavish launch event in Brooklyn, New York.
"We have to make things right, with the government, the public, our customers, our employees and also very important, our dealers," Horn added, saying that the company's actions were not consistent with its core values.
The US Environmental Protection Agency (EPA) alleged on Friday that the automaker had used software to trick regulators measuring toxic emissions on its diesel vehicles between 2008 and 2015.
The software allowed the cars to emit pollutants above legal limits pollutants while on the road, but reduced the pollution during emissions tests.
The software allowed the cars
भारतात सुपरहिट होईल की हे सॉफ्ट्वेअर!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
भारतात सुपरहिट होईल की हे सॉफ्ट्वेअर!
हो पण जर पायरेटेड असेल तरच. नाहीतर आमचा पीयूसीवाला देतो की हातानी लिहून पाहिजे ते आकडे ! आणि पोलीसमामाने अजूनतरी आक्षेप घेतला नाहिये.
अर्थातच, भारतातले हिट्ट
अर्थातच, भारतातले हिट्ट सॉफ्ट्वेअर पायरेटेडच असते. सव्वाल?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
२०%
शेअर पण एका दिवसात २०% खाली आला.
एन्क्रिप्शन धोरण मागे
कितीही वेळा तोंडघशी पडले तरी माध्यमांवर नियंत्रण ठेवण्याची सरकारची हौस काही भागत नाही. पॉर्नबंदी मागे घ्यावी लागली, आता हे...
सोशल मीडिया सरकारी कचाट्यातून सुटला; एन्क्रिप्शन धोरण मागे
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
सर्वांत हास्यास्पद म्ह. ९०
सर्वांत हास्यास्पद म्ह. ९० दिवस मेसेज जपून ठेवण्याची अट. काय फालतूपणा आहे, सगळंच्या सगळं डिलीट केलं तरी गूगल, वत्सप्प इ. कंपन्यांकडे ब्याकप असतोच असतो. मग अॅडिषनल ब्याकपचं कंपल्षण कषाला?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
सॉरी !
सरकार तोंडघशी पडतयं असा तुमचा गोड गैरसमज आहे. 'लगा तो तीर नही तो फकीर' हीच प्रत्येक सरकारची पॉलीसी असते. आणि गुगलसारख्या कंपन्यांकडे बॅकप असतो ही शेंबड्या पोरांना माहित असलेले गुपित सरकारला माहित नसते हे तुम्हाला खरे वाटते ? (कित्ती सोज्ज्वळ आहात हो तुम्ही !)
ज्या पॉलीसीजवर सरकार बॅकफुटवर आलेय त्याला विरोध करणार्यांना आपण जिंकली म्हणून आनंद आणि ज्यांना अशा प्रकारची पॉलीसी हवी होती पण ती नतद्रष्ट लोकांनी होऊ दिली नाही असा समाज सरकारला नावे न ठेवता या लोकांना नावे ठेवतो. सरकारला काय, दोन्ही बाजूंनी जिंका जिंका सिच्युएशन.
बोलविता धनी वेगळाचि...
हां बरोबर आहे तुमचं. इतका दूरगामी आणि सर्व बाजूंनी विचार करून सरकारला धोरणविषयक सल्ले देणारे लोक नक्कीच संघाचे असणार.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
धोरणविषयक सल्ले देणारे लोक नक्कीच संघाचे असणार.
असणार म्हणजे ?? अजुनही तुम्हाला संशय वाटतो ?
हे पाऊल मागे घेताना वापरलेले
हे पाऊल मागे घेताना वापरलेले शब्दप्रयोग फारच आवडले. 'हा नुसता ड्राफ्ट होता हो. सरकारचा व्ह्यू वगैरे काही नव्हता.' पण लोकांनी तक्रार केली नसती तर हा जसाच्या तसा मान्य झाला असता ना! म्हणजे तो पुरेसा विचार करूनच केला गेला होता. त्यानंतर ते म्हणतात 'अनकॉल्डफॉर मिसगिव्हिंग्ज'. हे तर भारीच गमतीदार. मिसगिव्हिंग्ज अनावश्यक कारणासाठी? मग ड्राफ्ट मागे का घेता?
असो. मागे पाऊल हे चांगलं पाऊल म्हणून सरकारचं कौतुक करायलाच हवं. कदाचित यापुढेही अशीच मागे पावलं उचलली तर आणखीनही कौतुक करता येईल.
अवांतर - पॉर्नबंदी, बीफबंदी, मांसविक्रीबंदी, सोशल मीडिया नियंत्रण .... हे सरकार विकास करणार असेल तर इतक्या ठिकाणी नियंत्रण/बंदी का घालावी लागते? मला तर वाटलेलं होतं की विकासासाठी मुक्तता आवश्यक असते.
मला तर वाटलेलं होतं की
इस बात पर एक एक जाम हो जाए.
इंटरनेट पॉर्नबंदी हा शुद्ध
इंटरनेट पॉर्नबंदी हा शुद्ध वेडेपणा होता. पण हौशिंसाठी टोरेंट सीड्या होत्याच.
बीफबंदी - वेडेपणा मान्य. (पण माझा एक मित्र रेग्युलरली बैलाचं मटण आणतो. फक्त गाईचं मास विकायला बंदी आहे म्हणे. मी कधी आणायला गेलो नाहीये.)
मांसविक्रीबंदी- या बद्दल बरीच चर्चा झाली आहे. परत सांगायचा कंटाळा आलाय. हे या सरकारचं देणं नाही. हे सापडलं. आता लगेच स्केलेटन इन द कबर्ड वगैरे म्हणा. लोकांना आत्ताच कंठ फुटलेला पाहून मजा वाटली. या आरड्याओरड्यामागे व्यक्तिस्वातंत्र्य वगैरेबद्द्ल काहीही पडलेलं नसून शिस्तीत राजकीय हेतू आहेत.
असो.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
फक्त गाईचं मास विकायला बंदी
शांतम पापम! अहो, नंदी, शंकराचं वाहन तर बैलच आहे ना?
सांस्कृतिक धसका!
आपण तर नेक्ष्ट विंडिया ट्रीपला भर विमानातच (म्हणजे विमानाच्या बाथरूमात!) पॅन्ट सोडून सोवळं नेसूनच मग छशि अड्ड्यावर पाऊल ठेवणार बुवा!
उगीच मागाहून लफडं नको!!!
तेव्हढी विमानात जानवं पुरवायची सोय करा बघू.
सरकारवर पुन्हा नामुष्की. कालच
सरकारवर पुन्हा नामुष्की.
कालच राजदीपला दिलेल्या उत्तरात न्यायालयाच्या आदेशावरून तसे पत्रक काढले असे सांगणार्या मुख्यमंत्र्यांवर आपलेच शब्द गिळावे लागण्याची पाळी येणार बहुदा.
न्यायालयानेच या परिपत्रकाला स्थगिती दिली आहे. वर असेही स्पष्ट म्हटले आहे:
सरकारलाच आपण काय करतोय याचा पत्ता नसावा बहुधा!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
नाही
नाही, ही विन-विन सिच्युएशन आहे. कॉलिंग धर्मराज फॉर फर्दर एलॅबोरेशन.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
ते पत्र खरोखरीच मुख्यमंत्र्यांनी लिहिले होते हे नक्की आहे काय ?
ते पत्र खरोखरीच मुख्यमंत्र्यांनी लिहिले होते हे नक्की आहे काय ? तसे असते तर इतर वर्तमानपत्रांत थोडातरी उल्लेख असावयास हवा होता. निदान चर्चा तरी. लोकमत सोडून कोठेच उल्लेख दिसत नाही. नाही म्हणजे न्यायालयाने तसा आदेश दिला आहे असे मुमं म्हणाले देखील असतील. पण पत्र !!!!! असो.
सर्वज्ञानी
थोडं गूगल केलंत तर सर्वांचाच वेळ वाचेल.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
सगळेच गुगलज्ञानी झाले तर !
सगळेच गुगलज्ञानी झाले तर भाव कुणी खायचा हो ?
कर्मण्येवाधिकारस्ते, किंवा कामी आलो आम्ही...
आज फडणविसांचे पत्र हा फेसबुकवरचा टॉप ट्रेन्डिंग टॉपिक आहे.
पत्राचा उल्लेख जिथे झाला ती स्थळे :
हे राजदीप सरदेसाईंचं उत्तर
शिवाय, हे आहेतच -
बिकाऊ मीडिया छोड़ो :- फेसबुक समाचार पड़ो
आजचे देवेन्द्र उद्याचे नरेन्द्र
झालंच तर -
आणि
झाला आमचा भाव खाऊन. आता विन विन सिच्युएशन कशी ते सांगाल प्लीज?
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
बघा, कशी भारी बॅनर, पोस्टर्स
बघा, कशी भारी बॅनर, पोस्टर्स डकवता आली. खोटं बोलून का होईना, आपल्याला राजदीपला गप्प करता आलं अशी प्रतिमा देवेंद्रला निर्माण करता आली ना. न्यायालय काय म्हणतं, कधी म्हणतं, त्यावर काय कारवाई होते याकडे कोण लक्ष ठेवतंय. प्रतिमा तयार झाली, पुढे न्यायालयाही शांत केलं की साप भी मरे और लाठी भी न टूटे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
विन विन सिच्युएशन उघड आहे. हा
विन विन सिच्युएशन उघड आहे. हा अध्यादेश युपीएनेच काढलेला होता. तो इंग्लिशमध्ये होता. त्याचं मराठीत भाषांतर केलं ते या सरकारने. त्यातून अर्थातच मराठी अस्मितेला खतपाणी घातलं. त्या भाषांतरात 'चुका' करून आपण आख्ख्या अॅडव्हर्टायझिंग इंडस्ट्रीबरोबर आहोत हे दाखवून दिलं. आणि खरंतर त्या अध्यादेशातल्या गोष्टी युपीएनेच लिहिलेल्या असल्यामुळे त्यात जो गोंधळ होता त्याचं खापर मागच्या सरकारवरच फोडता आलं. आणि तसंही अध्यादेश हा फक्त अध्यादेशच असतो, सरकारचं मत वगैरे काही नसतं. त्यामुळे तो मागे घेणं स्वाभाविकच आहे.
राजस्थानमध्ये आरक्षण ६८
राजस्थानमध्ये आरक्षण ६८ टक्क्यांवर
http://www.lokmat.com/storypage.php?catid=2&newsid=8028061
'कोर्ट' निघाली ऑस्करवारीला
‘Court’ chosen as India’s official entry for Oscars
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
वा! पहिल्यांदाच इतकं भारी
वा! पहिल्यांदाच इतकं भारी वाटलंय ऑस्करसाठीची निवड ऐकून.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
ऐकावं ते नवलच
आता केरळातले ब्राह्मणही स्वतःला मायनॉरिटी दर्जा मागत आहेत.
धाग्यातली मूळ बातमी वाचायची
धाग्यातली मूळ बातमी वाचायची राहिलीच.
नेपाळमधल्या घटनांमुळे भारतात गुरख्यांचा तुटवडा येउन अंतर्गत सुरक्षा धोक्यात येईल असं वाटतय. बघू मोदी कस हँडल करतात.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
First Airplane That Anyone
First Airplane That Anyone Can Fly
------------------
Angela Merkel caught on hot mic griping to Facebook CEO over anti-immigrant posts
याला मर्केलबाईंनी केलेले विंडो ड्रेसिंग म्हणावे, लबाडी म्हणावी की निर्लज्जपणा ??
तांत्रिक रिस्ट्रिक्शन्समुळे
तांत्रिक रिस्ट्रिक्शन्समुळे दुवा उघडत नाहीये, उत्तम बातमी, पण.. "फर्स्ट प्लेन दॅट एनीवन कॅन फ्लाय" हे तांत्रिक बाबतीत म्हटलंय की आर्थिक अँगलने?
कारण वैसेभी एनीवन कॅन फ्लाय अदर एअरक्राफ्ट्स ऑल्सो. (तांत्रिक या अर्थाने).
आर्थिक अँगलनेच
आर्थिक अँगलनेच.
$१९७,००० ही खूप कमी किंमत आहे ... विमानाची. असा माझा समज आहे. सेकंड हँड म्हणालात तर येत्या काही वर्षांत $१००,००० मधे विमान मिळेल अशी आशा आहे.
फक्त आर्थिक अँगलने म्हटलेले
फक्त आर्थिक अँगलने म्हटलेले नाही. त्यांच्या ग्राहकांपैकी ४०% लोक्स पायलटचे प्रशिक्षण नसलेले आहेत असे वाचलेले होते. ऑपरेटिंग कंट्रोल्स आर लाईक अ कार रादर दॅन अ प्लेन वगैरे वगैरे....
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
ग्राहकांपैकी ४०% लोक्स
:O
पण पण पण.. प्रत्यक्ष विमान फ्री-फ्लो "उडवण्याचे" कंट्रोल्स कितीही सोपे किंवा कारसारखे असले तरी ट्रॅफिक रुल्स, फ्लाईट लेव्हल्स, सेपरेशन, हवामान, क्रॉसविंड, नॅव्हिगेशन, रेडिओ कम्युनिकेशन.. ?!
ते आहेच, ती शंका मलाही आलीच
ते आहेच, ती शंका मलाही आलीच होती. पण डीटेलमध्ये गूगलले नाही.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
हवेतही भविष्यात भारतीय
हवेतही भविष्यात भारतीय ट्रॅफीकची झलक बघायला मिळणार तर !!
तोडपाणी कसं होईल याची
तोडपाणी कसं होईल याची उत्सुकता आहे..
लेख वाचला
लेखात बरेच डीटेल्स अनुत्तरीत सोडले आहेत.
'या विमानाला म्हणे एअरपोर्ट लागता नाही.' म्हणजे काय? रनवे लागत नाही, व्हर्टिकल टेकऑफ घेतं?
जर जमिनीवर रनवे लागत नाही, पाण्यावर उडू शकतं (कारण हे डेमन्स्ट्रेशन पाण्यावर केलं होतं) असा अर्थ असेल तर तशी अनेक प्लेन्स आज अलास्कात वापरली जाताहेत.
अजून एक, याला जेट इंजिन आहे की प्रोपेलर?
जर प्रोपेलर असेल तर टू सीटर प्लेनला $१९७के ही किंमत खूप जास्त वाटते आहे....
अकिला ड्रोनची बाअतमी ऐसीवर
अकिला ड्रोनची बाअतमी ऐसीवर शेअर झाली होती का? नसल्यास - http://money.cnn.com/2015/07/30/technology/facebook-drone-aquila/
अॅस्ट्रोसॅटचे यशस्वी
अॅस्ट्रोसॅटचे यशस्वी उड्डाण
सर्व भारतीय नागरीकांचे अभिनंदन!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
Modi leaves his Mark!
Modi leaves his mark at Facebook HQ
आणि हे पाहिलंत का?
Modi Gets Emotional | Cries When Speaking About His Mother To Mark Zuckerberg
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
मोदी स्वतःचा लालू करून घेतायत
मोदी स्वतःचा लालू करून घेतायत का काय असं वाटायला लागलय. त्यांच्या पीआरने वेळीच जागं झालेलं बर.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
मोदींच्या आम्रिका भेटीवर
मोदींच्या आम्रिका भेटीवर लोकसत्ताचा वाचनीय अग्रलेख
हा हा हा! लोकसत्ताच्या फारच बॉ अपेक्षा!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
पण पण...
पण झकरबर्गला पत्नी आहे; तो समलिंगी असल्याचं कुबेरांना कसं कळलं?
- स्वतःला काहीही कळत नसताना केवळ गूगल / विकीपीडिया पांडित्याच्या बळावर कीस पाडून मोदी भक्ती जतवणारा जंतू
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
अचुक निरीक्षण पण मुद्दा तो
अचुक निरीक्षण
पण मुद्दा तो नाही
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
काल इंग्रजी पेपर ला अशी बातली
काल इंग्रजी पेपर ला अशी बातली आली होती त्यामुळे कुबेरांचा गैरसमज झाला असावा.
Modi left HIS MARK at Facebook HQ
__/\__ दंडवत!
__/\__ दंडवत!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
मोदी रंगमंचावर ज्याच्या
खरंच ??
-----
मला खरंच समजत नाही. मोदींवर सोशल मिडिया चे चँपियन आहेत व केवळ हवाबाजी करून (सोशल मिडियाचा वापर करून हवाबाजी) करून निवडणूका लढवण्याबद्दल, holograms वापरण्याबद्दल आरोप कम तारीफ झालेले आहेत. त्याचे काय करायचे ??? का ते केवळ निवडणूकीत वापरलेले आहेत म्हणून त्याज्य्/दुर्लक्षित करून निवडणूकीनंतर पॉलीसी मधे वापरलेत की नाहीत ते बघायचे ???
डिजिटल इंडिया इनिशिएटिव्ह हा आधुनिक का व कसा नाही ??
मोदींचे व्यक्तीगत आचरण पारंपारिक आहे हा आक्षेप आहे ????
सुरुवातच "चपराश्याचे पाय
सुरुवातच "चपराश्याचे पाय धरण्याच्या" उदाहरणाने करण्याबद्दल काय बोलावे?!
मागच्या वेळी मॅडिसन चौकातलं भाषण वगैरे तिथल्या माध्यमांनी मुखपृष्ठावर छापलं होतं. आता मात्र छापलं नाही. हा मुद्दा तसा ठीक.. पण त्यावेळी छापलं त्याचा उल्लेख करताना उगीचच "मनोरंजनात्मक मूल्याने का होईना पण मुखपृष्ठावर छापलं" असा टोन.. आणि यावेळी त्याच मनोरंजनाची अॅलर्जी होऊन तिथल्या माध्यमांनी अगदी पहिल्या दिवसापासूनच त्यांना टाळलं? मनोरंजनाचं महत्व कसं कमी झालं बुवा? आणि झालं असेल तर मग चांगलंच आहे की. निव्वळ पब्लिकच्या मनोरंजनात्मच्या कारणाने भारताच्या पंतप्रधानांना कव्हरेज मिळण्यात भूषण होतं का? आणि ते कमी झालं म्हणून दु:ख आहे का?
नसेल मान्य तर नका ना करु.. जे मांडायचं ते मांडून मग उगीच शेवटी मान्य केल्यासारखं कशाला ?
इतकेच आहे तर आईला पंतप्रधाननिवासात का आणत नाहीत? असं म्हणायचं आणि लगेच, "तो त्यांचा खाजगी प्रश्न" असंही म्हणायचं.. अरे मग आधी उल्लेख कशाला केलात?
आपल्या देशात आलेल्या अन्य देशाच्या राष्ट्रप्रमुखांना पब्लिकली अवघड, कानकोंडे करणारे "कैसा पकड्या" अशा प्रकारचे प्रश्न विचारणं कोणत्या देशाच्या शिष्टाचारात बसेल? साधे प्रश्न विचारले यावरही टीका?
पॉईंट काय आहे?
एकदा मोदींनी तिथे जाऊन नेमकं काय काय आणि कसं कसं केल्यावर ते योग्य झालं असतं तेही लिहीतील का?
मंगळावर द्रव स्वरूपात पाणी
मंगळावर द्रव स्वरूपात पाणी मिळाले, जीव असण्याची शक्यता वाढली
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
राजन दबावाला झुकले की त्यांना
राजन दबावाला झुकले की त्यांना हवं तेव्हाच त्यांनी हा निर्णय घेतला?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
आता सेबीपण...
आता सेबीसुद्धा तुमचे एसएमएस आणि व्हॉट्सअॅप मेसेजेस वाचणार?
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
ऐसीच्या शेअर्सबद्दलचं बोलणं
ऐसीच्या शेअर्सबद्दलचं बोलणं आता व्हॉट्सअॅपवर करता येईल का नाही ते सांगा नीट.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
उंदराचा प्रयोगशाळेत वाढवलेला
उंदराचा प्रयोगशाळेत वाढवलेला 'सजीव' हात.
रोचक! कॄत्रिम नॉनव्हेजची
रोचक! कॄत्रिम नॉनव्हेजची नांदी म्हणावी काय ही?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
राज्य सरकारचा स्वागतार्ह
राज्य सरकारचा स्वागतार्ह निर्णय
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
थेपगुं मधे भारत प्रथम क्रमांकावर.
थेपगुं मधे भारत प्रथम क्रमांकावर.
याचे श्रेय मोदींना द्यायची मला घाई झालेली आहे.
( कुठुन तरी याच्या विपरित डेटा शोधून काढा रे. प्लीज. किंवा कमीतकमी - हे असले स्टॅटिस्टिक्स फेकून सामान्य माणसाचे काय भले होणारे ? - असा प्रश्न तरी विचारा. अगदी काही जमलं नाही तर शेतकर्यांच्या आत्महत्येचे आकडे, निर्यात कमी झालीये त्याचा डेटा तरी सादर करा. अगदी सरतेशेवटी निर्वाणीचे हत्यार म्हणून हा डेटा कसा ट्विस्ट करून दिला गेलेला आहे ते तरी सादर करा. प्लीज. )
तुमच्यासाटी कायपन.
हे असले स्टॅटिस्टिक्स फेकून सामान्य माणसाचे काय भले होणारे ? दोन वेळची रोजीरोटी तुमच्या डिजिटल आणि व्हर्च्युअल क्रांतीने मिळणारे का?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
कसली एक्सलंट बातमी आहे.
कसली एक्सलंट बातमी आहे. केवढ्या होप्स आहेत. प्रॉमिसिंग आणि अभिमानास्पद आहे बॅट्या.
खरं तर मला जमिनीवर ओढा या आनंदात काहीतरी चूक होऊन बसेल = बातमीचे परिप्रेक्ष्य (पर्स्पेक्टिव्ह?) चुकून बसेल असे वाटले ती वाचल्यावरती.
नक्की कशात गुंतवणूक झाली आहे?
नक्की कशात गुंतवणूक झाली आहे? त्यानंतर भाष्य करता यावे (खुश!?)
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
लगेचच मिळालं.
घ्या.......
http://timesofindia.indiatimes.com/business/india-business/Why-FDI-data-...
A recent report by a data consultancy owned by the Financial Times of London created a stir by estimating that India is now the most favorite destination for foreign direct investment, beating China and the USA. The fine print indicates that they are talking about "estimated capital expenditures" in greenfield, that is, new ventures. By this estimate, India attracted $31 billion compared to China's $28 billion in the first half of 2015.
Reserve Bank of India (RBI) data for foreign investment flows does not appear to reflect this, causing much puzzlement in India. The total foreign direct investment that flowed into India between January and June 2015 is pegged at $20.6 billion. If you deduct the outflow from India in the form of outgoing FDI from India, this gets pared down to $19 billion.
तरीपण गुंतवणूक वाढते आहे हे खरेच आहे. त्याबद्दल अभिनंदन.
(पैला नंबर आलाय तो चीन ७१ वरून २८ बिलियनवर आणि अमेरिका ५१ वरून २७ बिलियनवर आला म्हणून).
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
म्हंजे अॅबसोल्युट ग्रोथ
म्हंजे अॅबसोल्युट ग्रोथ नैय्ये. पण रिलेटिव्ह ग्रोथ म्हणायला वाव आहे कारण इतरांची रिलेटिव्ह पिछेहाट झालेली आहे.
गेल्या सात वर्षांच्या FDI वृद्धीचे आकडे टक्केवारी पाहणे गरजेचे आहे. तसेच एखाद्याच मोठ्या प्रोजेक्ट मधे साताआठ बिलियन डॉ. गुंतवणूक झालिये का ते पाहिले पाहिजे. तसे केले असेल तर ती काहीप्रमाणावर लबाडी....
खालची ग्लोबल काँपिटिटिव्हनेस ची आकडेवारी पाहता काँग्रेस ने जे घालवले ते मोदी सरकारने रिकव्हर केले असे म्हणायला हरकत नाही. टिकवून ठेवा म्हंजे मिळवली.
55 (2015-2016)
71 (2014-2015)
60 (2013–2014)
59 ( 2012–2013)
56 ( 2011–2012)
५१ (2010–2011)
४९ ( 2009–2010)
?
>>म्हंजे अॅबसोल्युट ग्रोथ नैय्ये.
अॅबसोल्यूट ग्रोथ सुद्धा आहेच की. (फक्त पैल्या लंबराचं रहस्य वेगळं आहे).
बाकीचं ग्लोबल कंपिटिटिव्हनेस म्हणजे काय ते आधी वाचून पाहतो.
The Global Competitiveness Report defines competitiveness as the set of institutions, policies and factors that determine the level of productivity of an economy,
७१ वरून ५५ वर नंबर येण्यासाठी अधोरेखित बाबींमध्ये नक्की काय बदललं आहे?
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
http://www.businesstoday.in/o
http://www.businesstoday.in/opinion/perspective/india-jumps-in-the-globa...
आणखी एक मुद्दा विचारात
आणखी एक मुद्दा विचारात घेण्यासारखा आहे व तो म्हंजे - डिसे २००७ - जुन २००९ या कालात अमेरिकेत अधिकृत मंदी होती. व २००९ ते २०१३ च्या कालात अमेरिकेत अर्थव्यवस्था खूप नाजुक होती. इन्व्हेस्टर कॉन्फिडन्स खूप डाऊन होता. Corporations were also sitting on record cash. पण गुंतवत नव्हते. त्या कालात जी गुंतवणूक अमेरिकेत होऊ शकली असती त्यातली काही भारताकडे वळवता आली असती. अर्थशास्त्री सिंग सायबांचे हे अपयश आहे. किमान काही प्रमाणावर तरी.
( एअर कंडिशन रूम मधे बसून चर्चा करायला माझं काय जातंय. )
एअर कंडिशन रूम मधे बसून चर्चा
जळवु नका गब्बर इथे ऑक्टोबरमधेच थंडीने गारठतोय आम्ही. तुम्ही बरे तिकडे एसी & ऐसी दोन्ही उपभोगत आहात
http://maharashtratimes.india
http://maharashtratimes.indiatimes.com/international/international-news/...
जंतू शेअर करतील हा व्हिडो असं
जंतू शेअर करतील हा व्हिडो असं वाटलं होत!
हे देखील गंमतीशीर आहे.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
हे देखील गंमतीशीर आहे. खरय.
खरय.
मस्त
तेजा मै हू. मार्क उधर खडा रेह... हा हा हा.
शेवटच्या फोटोत झुकेरबर्ग खरच
शेवटच्या फोटोत झुकेरबर्ग खरच ओशाळलेला वाटतोय
Russia carries out first
Russia carries out first air strikes in Syria
---------------------
झुक, वॉश युअर हँड्स
अगदी. आणि सादिक शेख चे चरण मोदींनी धुवावेत म्हंजे २००६ मधे झालेल्या हल्ल्यात जे वर गेले त्यांच्या आत्म्यांना चिरःशांति मिळेल.
Bhajan Singh of Organization
Bhajan Singh of Organization for Minorities of India, one of AJA’s member groups, says: “Modi is a monster whose regime is typical of the pattern of Indian State rule for the past decades. Sikhs faced state-sponsored terror in 1984 under Congress and Muslims faced it in 2002 under BJP, while Christians and Dalits and other communities are routinely terrorized with impunity and state complicity. By the power of the Almighty, we will stand and speak truth to power on September 27.”
we will stand and speak truth
अधोरेखित भाग म्हंजे एकदम मज्जा आहे.
प्रजातंत्रात पॉवर ही जनतेकडे असते. मग हे लोक जनतेकडे जाऊन आपले गार्हाणे का मांडत नाहीत ?
(गब्बर, प्रजातंत्रात पॉवर ही जनतेकडे असते असं म्हणणं हा भोळसटपणा आहे.)
आणि पॉवर ही जनतेकडे नसून राज्यकर्त्यांकडे असते तर परिवर्तन का काय ते का घडून येत नाही ?? सगळे राज्यकर्ते आमूलाग्र बदल सोडा पण मध्यमप्रमाणावर सकारात्मक बदल का घडवून आणत नाहीत ?? जनता इतक्या वेळेला चुकीच्या राज्यकर्त्यांना का निवडून देते ??
Submissions to the Oscars 2016 for Best Foreign Language Film
'कोर्ट'समोर अनेक तगडे प्रतिस्पर्धी आहेत -
Submissions to the Oscars 2016 for Best Foreign Language Film
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
पण कोणते?(तुमच्या मते)
पण कोणते?(तुमच्या मते)
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
सोप्पय
हा काय प्रश्न आहे? अर्थातच हा
Everyone you know will be
Everyone you know will be able to rate you on the terrifying ‘Yelp for people’ — whether you want them to or not
Your mother will (perhaps) be the only one giving you a 10 out of 10 rating.
http://timesofindia.indiatime
http://timesofindia.indiatimes.com/world/us/Gunman-opens-fire-at-communi...
वारंवार अशा अंदाधुंद गोळीबाराच्या घटना होताहेत.
..अतिस्वातंत्र्याचे साईड इफेक्ट्स की आणि काही कारण?!
...
खरं तर गन कंट्रोल केला
खरं तर गन कंट्रोल केला पाहीजे. पण गन कंट्रोल विरुद्धची लॉबी स्ट्राँग आहे. gun rights lobbyists say such laws (गन्स बॅन करण्याचे) would violate Americans' constitutional right to bear arms. They also argue that citizens need weaponry to defend against criminals -- and the possibility of future government tyranny.
.
तरी गन्स विकताना त्या ग्राहकाचा बॅकग्राऊंड चेक वगैरे करतातच आणि तरीही हे प्रयत्न निष्फळ ठरताहेत व वरचेवर शूटींग्स होतायत. कनेक्टीकटच्या शाळेतील. कोलोरॅडो मधील सिनेमा थिएटरातील सिरकाण, आमच्या विस्कॉन्सिनमध्ये मिलवाऊकीला शिख धर्मस्थळावर झालेला हल्ला.
_____
एकच मोठ्ठा नॅशनल सर्व्हेय्/मतदान घेतले पाहीजे या इश्युवरती. आणि मग जो निर्णय होइल तो मुकाट्याने मानायचा.
_________
तरी गन्स सरेंडर करा आणि गिफ्ट्कार्डस मिळवा टाइप प्रोग्रॅम्स राबवले जातातच. काही मोजके गरीब लोक त्यांचा लाभ घेत असतील पण अन्य अनेकजण रिक्रिएशनल हेतूने (शिकार) किंवा स्वसंरक्षणार्थ गन बाळगून रहातातच.
.
या घटना म्हणजे स्वातंत्र्याचे
या घटना म्हणजे स्वातंत्र्याचे कोलॅटरल डॅमेज आहे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
योग्य संकल्पना. मार्मिक.
योग्य संकल्पना. मार्मिक.
अतिस्वातंत्र्य म्हंजे नेमके
अतिस्वातंत्र्य म्हंजे नेमके काय ?
---
गन लॉबी ला माझा फुल्ल पाठिंबा.
---
Do countries with strong gun control laws have lower murder rates? Only if you cherry-pick the data. ____ Thomas Sowell
.अतिस्वातंत्र्य हा माझा शब्द
.अतिस्वातंत्र्य हा माझा शब्द गंडलेला आहे हे मान्य.
..अतिसमृद्धी, अतिसंपृक्तता किंवा काय म्हणावे कळत नाहीये.
..दुसरा मुद्दाही योग्यच. स्वित्झर्लंडमधे भरपूर गनधारक असूनही मर्डर रेट फारच कमी आहे असं वाचलं.
..शिवाय उपरोल्लेखित अमेरिकन हत्याकांडे ठराविक हेतूनेही झालेली वाटत नाहीत (बरीचशी)..नुसते वैफल्यातून अंदाधुंद रँडम वाटते.
..माझा रोख याकडे होता..गनस्वातंत्र्याकडे नव्हे.
Do countries with strong gun
चेरिपिक न करता तुलना केली तर ती कशी दिसते हे जर सॉवेलने कुठे दाखवलं असेल तर बघायला आवडेल.
तुलना उपलब्ध आहे
अशी तुलना उपलब्ध आहे बहुतेक.
फ्रिकॉनॉमिक्स नावाच्या पुस्तकात वाचल्याचं आठवतय.
http://m.timesofindia.com/wor
http://m.timesofindia.com/world/us/Gunman-kills-10-in-Oregon-college-45t...
..वरील बातमीनुसार फक्त या वर्षातलं हे पंचेचाळिसावं स्कूल शूटआउट आहे.
..अमेरिकेत राहात नसल्याबद्दल सुटकेचा निश्वास टाकण्याची इच्छा होईल असं वाटलं नव्हतं.पोरं शाळेत गेली की जीव टांगणीलाच की तिथे.
डेटींग साईटस वरती
डेटींग साईटस वरती शुद्धलेखनाचे कुल पॉइन्टसच फक्त मिळत नाहीत तर शुद्धलेखन आवर्जुन पाहीले जाते
नही चॉलबे स्त्रीची वेदनेची
नही चॉलबे
स्त्रीची वेदनेची अनुभूती आणि पुरुषाची वेदनेची अनुभूती भिन्न असते. रोग्/आजार्/डिसॉर्डर्स स्त्रीमध्ये वेगळ्या रीतीने अनफोल्ड्/ऑपरेट होतात व पुरुषांत वेगळ्या पद्धतीने. आणि तरीही वैद्यकिय संशोधनात्/प्रयोगात ८०% सँपल सेट पुरुष असतात.
Across the industrialized
Across the industrialized world, women still live 5 to 10 years longer than men. Among people over 100 years old, 85% are women, according to Tom Perls, founder of the New England Centenarian Study at Boston University
नही चॉलबे?
उदंड आयुष्य हवं ननि पण निरामय
उदंड आयुष्य हवं ननि पण निरामय हवं. आणि स्त्रियांना वैद्यकिय संशोधनामध्ये सॅम्पल सेट मध्ये ५०% स्थान हवं. त्यांचे रिप्रेझेन्टेशन आणि त्यांच्यावरचे संशोधन कमी होऊ नये. त्याला मी "नॉय चॉलबे" म्हटलेलं.
Israel’s Netanyahu cancels
Israel’s Netanyahu cancels dinner at NY restaurant where PM Sharif was dining
--------------
पाकिस्तानी मिडियातली चर्चा - Modi Vs Sharif - Hotel Stay in NYC. नवाझ शरीफ हे अत्यंत महागड्या हॉटेलात राहिले व मोदी त्या मानाने अतिशय कमी खर्चिक हॉटेलात राहिले. $८००० वि. $११०० प्रतिदिन.
आकडेवारी खरी आहे असे गृहीत धरून माझा प्रश्न - एका चायवाल्याची मजल उंची, उच्चभ्रू हॉटेलांपर्यंत का जात नाही ?? सूटबूट वाल्यांना महागडी हॉटेले का नकोशी वाटतात ??
महाग
महागडं ते सर्व चांगल्या दर्जाचं अशी विचारसरणी बरोबर आहे का? ती सहसा अनुभवांती होते बहुधा. पण तो काही अलिखित नियम नाही.
बाकी व्हिडीओ ऐकता येत नाहीये, घरात मुलीच्या मैत्रिणींचा गोंधळ चालू आहे.
एक ओक्टोबरपासून
एक ओक्टोबरपा सून दुरांतो ट्रेन्सना मिळणार स्टॅाप्स
"Workplace Boredom"फ्रेन्च
"Workplace Boredom"
फ्रेन्च लोकांना कामाच्या कमतरतेमुळे डिप्रेशनसारख्या व्याधी जडत आहेत.
____
तू-तू-मैं-मैं
काश्मीरी जनतेला भारत दमन करत आहे की पाकिस्तान याबद्दल तू-तू-मैं-मैं
वाइन कॅपिटल ऑफ इंडिया चे
वाइन कॅपिटल ऑफ इंडिया चे वाइन- आइस्क्रीम
.
झिंगायला लावणारी, टल्ली करणारी अशी वाइन- आइस्क्रीम नाशिकच्या युवा उद्योजकांनी तयार केली आहे. वाइन कॅपिटल ऑफ इंडिया अशी ओळख असलेल्या नाशिक शहराने या क्षेत्रात आणखी एक पाऊल पुढे टाकलेय. या संशोधनाला "सबझिरो‘ यांनी पेटंटदेखील मिळवलेय.
_____________
the best story in the world today
.
“This is the best story in the world today. These projections show us that we are the first generation in human history that can end extreme poverty,’’ said World Bank president Jim Yong Kim in a statement.
____
identity shift - Google officially became Alphabet last Friday
.
Google officially became Alphabet last Friday, and the change becomes stock-market official today. Google announced the overhaul of its structure in August, aimed at separating its core search and online ad business from the so-called "moonshot" ventures such as driverless cars, glucose-monitoring contact lenses and high-altitude balloons that provide Internet in remote areas.
तीव्र गरिबी नष्ट होणार ही
तीव्र गरिबी नष्ट होणार ही खरोखरच आनंदाची गोष्ट आहे. या जगात लोकसंख्या चक्रवाढीने वाढणार आणि उत्पादन मात्र सरळ रेषेतच वाढणारया माल्थसच्या सिद्धांताच्या नाकावर टिच्चून लोकसंख्या वाढूनही गरिबी नष्ट करण्याइतकं उत्पादन वाढलेलं आहे.
टे अ बाव, ह्यूमन इंजेन्युइटी!
आता गरिबी कमी होणार म्हणजे पृथ्वीचे रिसोर्सेस संपून जाणार वगैरे विधानं शिल्लक राहातील. ती नाहीशी व्हायला अजून पन्नासेक वर्षं लागतील बहुधा.
आजवर उत्पादन वाढलं आहे म्हणजे
आजवर उत्पादन वाढलं आहे म्हणजे पुढेही वाढणारच! इम्पेकेबल लॉजिक. इन्जेन्युइटी!!
रिसायकलिंग
The Reign of Recycling
पर्यावरणवाद्यांना खूप आवडेल हा लेख. बरंच खाद्य आहे.
लेख पूर्ण वाचून "खवचट" श्रेणी
लेख पूर्ण वाचून "खवचट" श्रेणी प्रदान केलेली आहे.
हे अज्जिबात लक्षात आलं नव्हतं. दुधाचे कॅन्स रिलिजसली धुवून वगैरे रिसायकलिंग मध्ये टाकत होते. वरील विधान वाचून वैयर्थता (असा शब्द आहे का नक्की?) कळते आहे.
.
हे वाचून हसून खुर्चीतून कोसळले. पर्यावरणवाद्यांना कमालीचे सटली / नॉनसटली दोन्ही रीतीने झोडले आहे.
हा हा
अमेरिकेतलं गो-ग्रीन आणि रिसायकलिंग एकंदरीत मजेदार आहे. आधीच्या एका धाग्यावर मी अपार्टमेंटचा अनुभव सांगितला होता. कपडे वाळत घालण्याऐवजी दर मंगळवारी रिसायकलेबल कचरा गोळा करणे हे अधिक पर्यावरणवादी आहे असा त्यांचा समज आहे.
http://aisiakshare.com/node/3274
इतर चर्चाही पुन्हा एकदा वाचून मनोरंजन झाले.
हाहाहा रोचकच आहे. मलाही कपडे
हाहाहा रोचकच आहे. मलाही कपडे खरं तर ड्रायरपेक्षा उन्हात वाळवणेच आवडेल्/आवडत असे. पण टेक्सासमधील, माझ्या अपार्टमेन्ट्वाल्यांनीही ताकीद दिलेली
.
नवीन जॉइन केलेलं होतं फेसबुक तेव्हा उत्साहाने एक पेज लाइकलेले (टिपीकल कन्या रास पेज) काहीतरी डु यु गो ५० का काहीतरी म्हणजे तुम्ही ड्रायर "मिडीअमवर वापरता का? नसल्यास वापरा कारण त्याने कार्बन एमिशन कमी होते" वालं पेज होतं. त्या काळात मीदेखील वॉशिंगमशिन चा, ड्रायर मिडीअम्/लो असा ठेवत असे. आता मात्र हाय असतो.
तुम्हाला
तुम्हाला स्यूडो-पर्यावरणवाद्यांना झोडलेय असं म्हणायचंय का?
रिटायर होण्याआधी करायच्या
रिटायर होण्याआधी करायच्या गोष्टी लेख माहीतीपूर्ण आहे.
हा मुद्दा आमच्यासाठी नाही परंतु या बकेटमध्ये कोण कोण पडतं हात वरती करा
.
हा मुद्दा आवडला.
चकित झालो
मला वाटलं नेहमीप्रमाणे सेल्फ-हेल्प टाईपचा लेख आहे की काय? पण चक्क वॉल स्ट्रीट जर्नलचा लेख बघून चकितच झालो. रिटायर होण्याबद्दल माझे मत: Getting there is half the fun. रिटायरमेंटसाठीची ही माझी लिस्ट.
छानच लिस्ट आहे. आवडली.
छानच लिस्ट आहे. आवडली.
मी वाट पहातेय गब्बरच्या
मी वाट पहातेय गब्बरच्या नावावर नवा धागा निघतोय की माझ्या? टसल आहे
मुद्दाम त्याच्या बातम्यांच्या राखीव कुरणात घुसलेय
आता किती ललीतं पाडायची? त्यापेक्षा लिंका फेकणं सोपं नाही का?
- (पळा....)
__________
Prime Minister Narendra Modi is the 13th most influential person in the world
.
Prime Minister Narendra Modi is the 13th most influential person in the world, according to Bloomberg Markets Most Influential’ list which is topped by US Federal Reserve chairman Janet Yellen
_____
Germany Announces € 1 billion Solar Power Fund For India
.
A deal to fast track approvals for German companies in India, and a €1 billion solar power fund in India, were among the major takeaways from the talks between Prime Minister Narendra Modi and Chancellor Angela Merkel, with both sides inking 18 MoUs to scale up ties in strategic areas.
बातमीमध्ये मर्केल यांच्या नावाची स्पेलिंग मिस्टेक आहे. अर्थात मुद्दा तो नाहीच. बातमी उत्तम आहे.
______
India could muscle China out, ‘durably occupy’ top growth spot: IMF(International Monetary Fund) - आता मात्र जाणकारांनी प्रकाश टाकावा. रिपर्कशन्स नीट कळले नाहीत
टसल आहे खरी
मी वाट पहातेय गब्बरच्या नावावर नवा धागा निघतोय की माझ्या? टसल आहे.
हाहाहा
हाहाहा २ बोके, लोण्याचा गोळा व हुषार वानर गोष्ट आठवलेली आहे.
.
नाव आठवलं - दोघांचे भांडण तिसर्याचा लाभ.