काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ८ (९ फेब्रुवारी २०२०)

आज पोलिसांच्या मॅरेथॉनमुळे मलबार हिलला पोचायला प्रचंड उशीर झाला.
सी लिंक आणि बरेचसे महत्त्वाचे रस्ते बंद होते.
'घरचं'च कार्य असल्यामुळे जागोजागी नाकाबंदी होती.
पण पोलीस वेल बिफोर टाइम अडवण्याऐवजी अगदी शेवटी चुकीच्या पॉईंटवर अडवत होते.
(उदाहरणार्थ सी लिंकची एंट्री )
त्यामुळे तीनचार वेळा लांबलचक वळसे घ्यावे लागले.

म्हणजे कमिटमेंट नको असेल तर मुलीला पहिल्या दोस्ती-सेक्सच्या आधीच सांगावं.
लग्नाच्या दिवशी नको ना कॅन्सल करायला... तसं काहीसं!

एकंदरीत थोडा वैतागलो पण ठीक आहे.
नुक्तीच पोलिसांनी मला काही गोष्टींत फारच चांगुलपणा दाखवून मदत केलीय.

त्यामुळे हे त्यांना माफ.
फायनली ११ वाजता टॅक्सी घेतली.

एका कपलला नरीमन पॉईंटच्या आय-नॉक्स ला सोडला.
फार देखणं शांत लोकेशन आहे ह्या मल्टिप्लेक्सचं.
इथेच मैत्रिणीबरोबर नानाचा नटसम्राट बघितला होता त्याची आठवण झाली.
नटसम्राट नाटक बरंच आधी पाह्यलं असल्याने मी थोडा ओव्हर एक्साईट झालो.
आणि मैत्रिणीला अंमळ जरा जोरानीच कॉमेंट्री देत होतो.
मागे एक नॉन-महाराष्ट्रीयन बाई बसली होती. ती मला ओरडली.
रिफ्लेक्स ऍक्शननी मी "आवाज हळूच होता" वगैरे मराठी बाण्याचा वाद घातला.
ती बिचारी गप्प झाली.
पण नीट विचार केला आणि कळलं की चूक माझी होती.
नटसम्राटसाठी खास आलेल्या नॉन-मराठी माणसाचा मराठी पिक्चरचा अनुभव नासायचं घनघोर पाप केलं असतं तर रंगदेवतेनी कधीच क्षमा केली नसती मला.
मग आख्खा पिक्चर गप्प बसलो आणि संपल्यावर तिची बिनशर्त कडकडून माफी मागितली.
निघता निघता आम्ही जवळ जवळ मित्रच झालो होतो.
मीच बिघडवलेलं मराठी माणसांचं इम्प्रेशन मीच दुरुस्त केलं असावं अशी आशा करतो.

असो...

नरीमन पॉईंट वरून लगेच एका कपलला मेट्रोला सोडलं.
मेट्रोला मुंबई बघायला आलेली उत्तर भारतीय फॅमिली उचलली.
पोराबाळांसकट ५ - ६ जण होते.
पण बसवले टॅक्सीत... इतकं चालावं!
रविवारी सकाळी चालतं.
पोलिसांची मॅरेथॉन गेट वे ला च संपत होती.
त्यामुळे तिकडे ही SSS गर्दी होती.

काळा घोड्यावरून तीन मॅरेथॉनवाल्या मित्रांना उचललं.
त्यांना अध्ये मध्ये ड्रॉप करत शेवटच्याला भाटिया हॉस्पिटलच्या गल्लीत सोडला.
तिकडे लगेचच ऑपेरा हाऊसचं भाडं मिळालं.
त्यांना सोडता सोडता बाजूच्या टॅक्सीतील एकाला गुटख्याचा कागद न टाकण्याविषयी विनंती केली.
पाठच्या बाईंनी मला शाबासकी दिली Smile

तितक्यात माझी मैत्रीण करिष्माचा मेसेज आला.
मित्रांना एक राईड फ्री असल्यामुळे तिला घ्यायला सात-रस्ताला गेलो.
तिला हँगिंग गार्डनला जायचं होतं.
महालक्ष्मी मंदिर सिग्नल वर ब्यक्कार जॅम होता.
तिनं शिव्या घालत गाडी सरळ लेफ्टच्या चढानं वर घ्यायला लावली.

ओ हो हो हा अल्टा माउंट रोडचा गॉर्जस नागमोडी रस्ता आज पहिल्यांदाच कळला.
बेसिकली हा रस्ता पेडर रोडला समांतर पण सरळ अज्जाबात न्हाई.
नावाप्रमाणे टेकड्यांवर चढत उतरत लवलव वळत हा रस्ता फायनली केम्प्स कॉर्नरला पुन्हा पेडर रोडला भिडतो.
म्हणजे पेडर रोड रिमलेस चष्मा लावणारा डिसेंट ऋजू मोठा भाऊ असेल;
तर अल्टा माउंट रोडला केस झिंझारलेला पण अशक्य हॅण्डसम, गिटार-बिटार वाजवणारा,
फॅमिलीशी फटकून रहाणारा,
फक्त वडलांच्या श्राद्धाला उगवणारा... बोहेमियन धाकटा भाऊ म्हणता येईल.
थँक्यू करिष्मा!

मग तिकडून पुन्हा दोन तीन आसपासची भाडी मारून चर्चगेटला आलो.
तिकडून एका कपलला मेट्रोला सोडायचं होतं.
चर्चगेटवरून मेट्रोला जायचा महर्षी कर्वे रस्ता रेल्वे-ट्रॅकला समांतर जातो.
गोल मस्जिदीच्या सिग्नलला राईट वळायला थांबलेलो.

डावीकडे तीनचार तगडी पोरं दिसली.
मुंबईची नव्हती.
राज ठाकरेंच्या मोर्चाला आली होती बहुतेक

त्यांना ट्रॅकच्या पलीकडे मरीन ड्राइव्हला जायचं होतं आणि इकडचा फूटओव्हर ब्रीज बंद केलाय.
त्यांच्यातले दोन उत्साही दीडशहाणे शॉर्टकट शोधात तुटक्या कम्पाउंडमधून ट्रॅकवर घुसले आणि क्रॉस करायला लागले.

मी थरथरलोच.
रविवार दुपार असल्याने त्याक्षणी कोणती गाडी येत नव्हती ट्रॅकवर पण आली असती तर चटणी झाली असती त्यांची.
मी बराच ओरडा आरडा करून त्यांना धोका समजावून सांगितला.

शेवटी ते पुढच्या मरीनलाईन्स ब्रिजवर गेले जो फक्त २०० मीटरवर आहे.
मी कपाळावर हात मारत उजवीकडे वळलो.
(माजी) इंजिनाच्या कार्यकर्त्यांना इंजिनापासून वाचवलं मी बहुधा!

मग दोन-तीन भाडी मारून सैफी हॉस्पिटलवरून एका मुलीला उचललं.
हॉस्पिटलमध्ये तिची आई ऍडमिट होती आणि बराच हट्टीपणा करत होती वाटते.
भावाने आणलेला डब्बा खात नव्हती वगैरे.
मुलगी तिला खूप ताडताड बोलली वगैरे... आणि मग मात्र मायाळू झाली.

हे गुड कॉप / बॅड कॉप रुटीन सृष्टीच्या प्रारंभापासूनच आहे एकंदरीत.

पण आई आजारी असली की सुचत नाही काहीच हे मला नीटच माहिती.
बरी होवो लवकर तिची हट्टी-ममा!

तिला कुलाबा कोळीवाड्यात जायचं होतं.
नेव्ही नगराच्या सुबक एरियात घुसून आम्ही टी. आय. एफ. आर. च्या आधी एक खुफिया राईट टर्न मारला.

च्यायला मला वाटायचं हे मुंबईचं दक्षिण टोक म्हणजे नेव्ही नगर आणि टी. आय. एफ. आर. फक्त
पण तसं नाहीये.
डावीकडे नेव्ही नगरची भिंत आणि उजवीकडे कुलाब्याची खाडी ह्यामध्ये हा चिंचोळा कोळीवाडा आहे.
आई आणि बायकोत चेपलेल्या मुलासारखा हे हे हे.

पण इकडून मुंबुड्याची निराळीच आणि मस्त स्कायलाईन दिसते.

cuff

त्या मुलीला सोडल्या सोडल्याच एक टिपिकल कोळी जोडपं टॅक्सीत चढलं.
त्यांना चर्चगेट स्टेशनला जायचं होतं.
आत्ता काय आलो तसंच बाहेर पडायचं.
मी फुल्ल कॉन्फिडन्समध्ये सणसणत मंत्रालयापर्यंत पर्रफेक्ट आलो आणि... हगलो.
तिकडून चर्चगेटचा राईट मारण्याऐवजी लेफ्ट मारला Sad
नेहमी मी कूपरेज ग्राऊंडच्या पलीकडल्या बाजूने येतो आज पहिल्यांदा अलीकडून आलो त्यामुळे असेल बहुतेक.
लेफ्ट सरळ मरीन ड्राइव्हला जातो.

मी मनातल्या मनात त्यांना आपला घोटाळा कळला नसेल अशी आशा करत गाडी साळसूदपणे हळूच मरीन ड्राइव्हला वळवली.
आता पुन्हा अम्बॅसेडर हॉटेलकडे राईट मारला की चर्चगेट.
पण झोल पचायचा नव्हता.
कोळी मामा आधी हळू हळू आणि मग ताड ताड उकळायला लागले.
"आम्हाला काय येडा बनवतो काय?" वगैरे...
त्यांची तीन तीनदा माफी मागितली पण ते जरा जास्तच भडकले होते.
त्यांची बायको बिचारी माउली होती पण,
"आवो जावंदे, सॉरी बोल्ले ना ते. त्याचा काय येवडा? आणि मग टर्न मारायच्या आदीच सांगायचा ना त्याला..."
तुमाला येवडा म्हायती होता तर..."
तिनी पॉईंट काढला.
शेवटी ते धुसफुसत गप्प झाले.

९० रुपये झाले त्यांनी १०० ची नोट दिली...
माझ्या चुकीचं परिमार्जन म्हणून मी त्यांना ५० परत द्यायला लागलो.
पण त्या जेश्चरनी त्यांना अगदीच भरून आलं...
माझा घोटाळा मोठ्या मनानी माफ करत त्यांनी ८० रुपये घ्यायला लावले.
प्रेमानी जग जिंकता येतं वगैरे....

चर्चगेट स्टेशनवरूनच हाजी-अलीला जाणारी चार-पाच मुलं टॅक्सीत बसवली.
यु. पी. साईडचेच गरीब मजूर होते. त्यांनासुद्धा वाजवी दरात सोडल्यामुळे साश्चर्य खुश झाली पोरं.
हाजी-अली सिग्नलवरून गाडी हळूहळू वरळीच्या दिशेनी टाकली... अशीच एमलेस!
उजवीकडे सरदार पटेल स्टेडियम ठेवून थोडं पुढे गेलं की एक छोटा सिग्नल नेहेमी लागतो.
डावीकडे छोटा देखणा रस्ता परत समुद्राच्या दिशेनी जातो बहुतेक.
भेंडी ४३ वर्षं मुंबईत काढली पण कधी लेफ्ट मारायची सवड / इच्छा झाली नाही...
सो व्हाय नॉट आज... रप्पकन लेफ्ट मारला.

Samudra

अच्छा इकडेच ही समुद्र-महाल बिल्डींग आहे च्यामारी!
येस बँकेच्या राणा कपूरमुळे सध्या जरा फेमस (?) झालीय ही बिल्डींग.
समुद्र-महालच्या बाजूच्या रस्त्यानी सरळ पुढे गेलो.
हाही रस्ता प्रायव्हेट आहे खरं तर.
इकडे एक वॉचमन होता पण हा अगदीच 'झेन' म्हणता येईल असा चिल्ड आऊट होता.
त्याला काही प्रॉब्लेम असेलसं वाटलं नाही.

जाताना उगीच त्याला हात दाखवला, त्यानंही दाखवला :).

(अवांतर जुगाडू टीप:
नाकाबंदी, वॉचमन अशा अडवल्या जाण्याच्या ठिकाणी वापरायची ही मुंबईकरांची ऍग्रेसिव्ह आयडीया आहे.
नवीन सोसायटीत जाताना वॉचमनला उगीचच क्या दोस्त कैसा हय, खाना हुआ क्या असं म्हणून पहा. तो हसून आत जाऊ देणारच...
पोलीस नाकाबंदीत तर आमची मैत्रीण अनुया ही तर सरळ गाडीचा आतला लाईटच ऑन करते.

एवढं सहकार्य बघून बिझी पोलिसांनासुध्दा बरं वाटतं आणि ते सरळच जाऊ देतात आपल्याला.
आपला आणि त्यांचा दोघांचाही वेळ वाचतो.)

तर हा निर्जन रस्ता सरळ समुद्राच्या टोकालाच थडकतो.
इकडून समुद्रात डावीकडे हाकेच्या अंतरावर हाजीअली दिसतं.
इकडे मा हजानी दर्ग्याची जुनी देखणी इमारत आहे.
ही फारशी कोणाला माहीत नसलेली खिन्न मेलनकॉलिक जागा माझी आवडती होत जाणार असा मला दाट संशय येतोय.

ajani

hajani 2

आजची कमाई:
८०० रुपये

क्रमश:
आधीचे दुवे:
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: उपोद्घात
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २८ नोव्हेंबर २०१६
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ नोव्हेंबर २०१६
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ३१ जानेवारी २०१७
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १६ मार्च २०१७
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २०१८
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ जानेवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ जानेवारी २०१९ उत्तरार्ध
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ५ व १२ जानेवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १६ फेब्रुवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १८ मार्च २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २४ मार्च ते १२ एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २० एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २६ एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ३० एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ मे आणि २९ मे २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १५ जून २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २२ जून २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ जून २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट माईलस्टोन: २० जुलै २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २० जुलै ते डिसेंबर पहिला आठवडा २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १ (८ डिसेंबर २०१९)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस २ (१५ डिसेंबर २०१९)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ३ (२२ डिसेंबर २०१९)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ४ (२९ डिसेंबर २०१९)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ५ (१९ जानेवारी २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ६ (२६ जानेवारी २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ७ (२ फेब्रुवारी २०२०)

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

पण पोलीस वेल बिफोर टाइम अडवण्याऐवजी अगदी शेवटी चुकीच्या पॉईंटवर अडवत होते.
(उदाहरणार्थ सी लिंकची एंट्री )
त्यामुळे तीनचार वेळा लांबलचक वळसे घ्यावे लागले.

म्हणजे कमिटमेंट नको असेल तर मुलीला पहिल्या दोस्ती-सेक्सच्या आधीच सांगावं.
लग्नाच्या दिवशी नको ना कॅन्सल करायला... तसं काहीसं!

हे बऱ्याच वेळा पाहिलंय.

अर्थात म्हणजे मीही काळापिवळा नवस बोल्लेलोय असा कुणी समज करून घेऊ नये म्हणजे झाली.

बाकी नानाचा नटसम्राट भिकार होता हे मत आहे.

ती मेलन्कॉलिक् जागा फारशी स्वच्छ नसावी असे वाटते आहे. (की होती?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्वच्छ नव्हती!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0