माझी पहिली सायकल

माझी पहिली सायकल ही ' फिलिप्स ' मेकची आणि ' मेड इन इंग्लंड ' होती आणि ती ही लेडीज सायकल होती , असं मी सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल ; पण हे अगदी खरं आहे !..
त्याचं असं झालं की ,माझे वडिल हे म. न.पा मध्ये नोकरीला होते. त्यांची झाली बदली ऑक्ट्रॉय नाक्यावर बोपोडीला. ३७३, शनिवार पेठेतल्या आमच्या घरातून (आताची पेपर गल्ली ) , रोज बोपोडीला जायचं म्हणजे काहीतरी वाहनाची गरज होती. त्यांच्याच ऑफिसमध्ये 'हुसेन ' नावाचा एक सहकारी होता. दोघे अगदी जिवलग मित्र बनले होते. हुसेनच्या भावाचा नव्या-जुन्या सायकल्सचा ट्रेडिंगचा व्यवसाय होता रविवार पेठेत. पुणे तेंव्हा सायकलचं शहर होतं ..
एक दिवस हुसेन आमच्या घराच्या दारात उभे, सायकलची घंटी वाजवत , ‘’ देखो, पेंडसेजी, मैं आपकेलिये क्या तोहफा लाया हूँ ! ’’ पुणे कॅम्पातल्या कुठल्यातरी इंग्लिश लेडीकडून ही सायकल हुसेनच्या भावाकडे आली होती. वडिलांचं रोज या सायकलवरून बोपोडीला जाणं - येणं चालू झालं. ही झाली १९७० ते ७५ सालांदरम्यानची गोष्ट. पण मग १९७५ साली मला शिवाजीनगरच्या इंजि. कॉलेजमध्ये प्रवेश मिळाल्यावर ,'' मी रोज कॉलेजला जायचं कसं ? '' हा प्रश्न उभा राहिला. आणि मग वडिलांनी त्यांची सायकल माझ्या ताब्यात दिली. हीच माझी पहिली सायकल !
मी इंजि. कॉलेजच्या मित्रांना अभिमानानं सांगायचो ''' फिलिप्स ' मेक, मेड इन इंग्लंड ' आहे. तर त्यावर ते माझी टर उडवायचे, चेष्टा करायचे कारण बाजारात एव्हाना अनेक अत्याधुनिक सायकल्सचे ब्रँड आले होते. तेंव्हा इंजि. कॉलेजपाशी आत्ताच्यासारखे फ्लाय ओव्हर्स नव्हते. एकच पूल होता, ट्रॅफिकजामवाला. मित्र चेष्टेने म्हणायचे ''लेका , ह्या पूलावर जरी ही तुझी सायकल दोन दिवस कुलूप न लावता सोडून गेलास , तरी ती कोणी चोरणार नाही ''. पण मला त्याचं काही वाटायचं नाही कारण खूप खूप प्रेम होतं माझं माझ्या सायकलवर !
माझ्या अनेक सुख-दुःखाच्या क्षणांची ती सोबतीण आहे. ह्याच सायकलशी निगडित अनेक सुगंधी, रम्य, हुरहूर लावणाऱ्या आठवणी आहेत. कुणाची वाट पहाण्याच्या सोशिक प्रसंगातसुध्दा ती बिचारी स्टँडच्या एकाच पायावर उभी राहून माझ्या भावनांत वाटेकरी व्हायची. माझी बहिण 'वीणा फडके', जिनं आता '' आई रिटायर होतेय '' नाटकातलं आईपण स्वीकारलंय, तीसुध्दा सायकल शिकली ,ती ह्याच सायकलवर . वडील तिला फर्ग्युसन कॉलेज ग्राऊंडवर शिकवायला घेऊन जात. माझ्या मुली धडपडल्या, त्या हीच सायकल शिकताना. हिच्यावरून रमत-गमत फिरताना मला नवीन कथा-कविता सुचतात. कर्वेनगरमधील आमच्या नवीन घराच्या बांधकामाची देखरेख करायला जाणं , दर रविवारी भल्या पहाटे सिंहगड सर करायला जाणं अशा अनेक गोष्टींची मदार ह्या सायकलवरच होती. पटवर्धन बागेत माझ्या भावी पत्नीला ,लग्नाच्या आधी भेटायला जायचो ते ह्याच सायकलवरनं ,तिला मी कॅरियरवर बसवून चक्क चक्करपण मारून आणायचो. खूप मजा यायची तिला ,गंम्मत वाटायची , अजून एक, अजून एक राऊंड ...असं म्हणायची लहान मुलासारखी !
भक्कम स्टीलची बॉडीफ्रेम ,चकाकणारे क्रोमप्लेटेड हँडलसारखे पार्टस ,न खडखडणारं चेन-कव्हर, अंधारात दिसावं म्हणून हॅण्डलपाशी रॉकेलवरची दिवाबत्ती : अशा ह्या सायकलची मी खूप खूप काळजी घ्यायचो. नियमित तेलपाणी करायचो. तिनेही मला कधी दगा दिला नाही. भर रस्त्यात मध्येच चेन निखळल्ये, किंवा चेन कव्हरमध्ये अडकल्ये असं कद्धिच झालं नाही. उतारावरसुद्धा ब्रेक दाबल्यावर , हुं की चूं न करता जागीच उभी राह्यची !
आता वयाच्या पासष्ठाव्या वर्षी सुद्धा एक ' अँटिक पीस ' म्हणून आणि वडिलांची आठवण म्हणून कर्वेनगरच्या माझ्या नव्या घरी तिला जपून ठेवली आहे आणि प्रत्येक खंडेनवमीला चकाचक पुसून , तेलपाणी वगैरे करून झेंडूची फुले वाहतो.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

माझी पहिली सायकल ही ' फिलिप्स ' मेकची आणि ' मेड इन इंग्लंड ' होती आणि ती ही लेडीज सायकल होती , असं मी सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल ; पण हे अगदी खरं आहे !..

...कारण खूप खूप प्रेम होतं माझं माझ्या सायकलवर !

अंधेरी रात थी
वह मेरे साथ थी
मैं उस के ऊपर था
वह मेरे नीचे थी
बुरा ना मानो, वह मेरी सायकल थी|

आता वयाच्या पासष्ठाव्या वर्षी सुद्धा एक ' अँटिक पीस ' म्हणून आणि वडिलांची आठवण म्हणून कर्वेनगरच्या माझ्या नव्या घरी तिला जपून ठेवली आहे

सरळसरळ तिची (बोले तो, सायकलची) आठवण म्हणून का सांगत नाही? उगाच वडिलांचे नाव कशाला ते मध्ये आणखी? आँ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा हा हा ! ! !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझी पहिली सायकल (माझी ' मेड इन इंग्लंड ! ') महाराष्ट्र टाइम्स : ११ फेब्रुवारी २०२०मध्ये छापून आली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मटाने पण मुक्तपीठ सुरू केलें की काय?

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाडा व सायकल दोन्ही लेख ११ फेब्रुवारी या एकाच दिवशी मटा मधे कसे काय आले?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

sorry,ekachi tarikh 23 ahe.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझी पहिली ....... या विषयावर उदंड लिहिता येईल. पण पहिली नक्की कोण, हेच आठवत नसल्याने लेखणी म्यान केली आहे.
असो. तुमचे सर्व लेख काळजीपूर्वक वाचले. जवळजवळ सर्वच बायो-डाटा माहीत झाला. मोबाईल नं. सोडून.
त्या वाड्यावरच्या लेखातील, संडासाने काय शिकविले ते हृदयाला स्पर्शून गेले .
लिहीत रहा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उरलो स्मायली पुरता|

त्या वाड्यावरच्या लेखातील, संडासाने काय शिकविले ते हृदयाला स्पर्शून गेले .

हृदयाला, की...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्या वाड्यावरच्या लेखातील, संडासाने काय शिकविले ते हृदयाला स्पर्शून गेले .

हृदयाला, की...
याचे उत्तर देण्यासाठी आमच्या बायो-डाटा मध्ये डोकावलो असताना ही रंजक माहिती मिळाली.
आमच्या चाळीच्या संडासांकडे जाणारा रस्ता झाडीतून होता आणि त्या झाडीत एक घोरपड वास्तव्य करुन होती. ती पार करुन विष्ठ स्थळी पोचलो तरी तिथे पालींची फौज होती. त्यामुळे आमचे बोधवाक्य, 'बद्धकोष्ठ हेच जीवन आणि विष्ठानाश हाच मृत्यु', असं झालं होतं!
म्हणून, त्याबाबतीतल्या संयमाविषयी वाचलं की ते हृदयालाच स्पर्शून जातं!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उरलो स्मायली पुरता|

Thanks, Vivek Pendse Mob 7875109911

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण2
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सायकल म्युझियम ,कर्वेनगर वाले विक्रम पेंडसे तुमचे कोण ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

koni nahi. fakt adnav bandhu !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आवडलं लेखन.
पहिल्याच लेखात एवढी आइडेंटिटी उघड केलीत. मजा आली. भिडणारं लेखन.
" मटाचं मुक्तपीठ" इकडे लक्ष देऊ नका. लिहीत राहा.

मलाही एक लेख लिहावासा वाटतोय. बघू कसं काय जमतंय.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Thanks a lot !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्यांच्याच ऑफिसमध्ये 'हुसेन ' नावाचा एक सहकारी होता. दोघे अगदी जिवलग मित्र बनले होते.

पण... पण... पण... वडील तर संघाचे कार्यकर्ते होते ना? (नाही म्हणजे, त्या वाड्यावरच्या लेखात तरी म्हटलेय तसे.) मग, त्यांचा जिवलग मित्र 'हुसेन'?

नाही, असेलसुद्धा... किंवा, कदाचित 'हुसेनी ब्राह्मण' असेल. कोणी सांगावे?

(किंवा, ते ब्रिटिश राजवटीत नाही का, हिंदुस्थानच्या वतीने युद्ध पुकारण्यापूर्वी हिंदुस्थानच्या जनतेची संमती घेतली नाही, या कारणाखाली विविध प्रांतांतल्या तमाम काँग्रेस मंत्रिमंडळांनी घाऊक भावात जेव्हा राजीनामा दिला होता, तेव्हा संधी साधून (सावरकरांच्या) हिंदुमहासभेने (जीनांच्या) मुस्लिम लीगबरोबर युती करून सिंधमध्ये नि वायव्य सरहद्द प्रांतात मंत्रिमंडळे स्थापिली होती (गूगल आपला मित्र आहे!), तसे काही - an alliance of convenience? आय मीन, सायकली पुरवू शकणारा सद्गृहस्थ उपयुक्त ठरू शकतो. (त्या गोमातेसारखा.) किंवा असेच काहीतरी. फक्त, त्याला 'जिवलग मित्र' वगैरे म्हणून उगाच नसती फुकाची सेक्युलर क्रेड्स का ढापायची, इतकाच प्रश्न पडतो.)

(नाही, कोणाचाच 'हुसेन' नावाचा - किंवा अन्य कोणत्याही नावाचा - जिवलग मित्र असायला आक्षेप असा काहीच नाही - किंबहुना, आक्षेप असण्याचे काहीच कारण नाही - परंतु, काँबिनेशन किंचित चमत्कारिक वाटले, इतकेच. नाही म्हणजे, राजकारणात वगैरे ठीक आहे - Politics makes strange bedfellows - परंतु, व्यक्तिगत आयुष्यात एक संघिष्ठ कार्यकर्ते आणि एक मुसलमान सद्गृहस्थ - व्यावहारिक अपरिहार्यतेमुळे सहकारी असणे वगैरे समजण्यासारखे आहे, परंतु - जिवलग मित्र असणे वगैरे संभवनीयतेच्या पलीकडचे - तथा तिखटमीठ लावलेली लोणकढी - वाटते. याविषयी श्री. हुसेन यांचा दृष्टिकोन समजू शकल्यास ते रोचक तथा उद्बोधक ठरावे. असो.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अगदी लहानपणी कुणाच्या प्रापगंडा प्रवचनाने कान भारले गेले नसल्यास मुले एकमेकांची मैत्री खेळ, आवड, इतर गंमतीमुळे करतात. त्यांना धर्म, वैर माहीतही नसते.
खुशवंत सिंगने म्हटले आहे " माझे जिवाभावाचे मित्र सिख आणि हिंदु सिंधी यांपेक्षा मुसलमानच जास्त आहेत. " ( दिल्ली कादंबरीत आणि इतर पुस्तकांत सापडेल.)

प्रस्तुत हुसेन थोडे मोठेपणी लेखकाचा मित्र झाला असायला तशीच कारणेही असावीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रस्तुत हुसेन थोडे मोठेपणी लेखकाचा मित्र झाला असायला तशीच कारणेही असावीत.

मी या लेखात जे वाचले, त्याप्रमाणे, प्रस्तुत हुसेन हा लेखकाचा नसून लेखकाच्या वडिलांचा जिवलग मित्र होता.

त्याउपर, लेखकाचे वडील हे RSSचे/शाखेचे कार्यकर्ते होते, आणि (त्यामुळे) त्यांचा (अर्थात लेखकाच्या वडिलांचा) 'मित्रपरिवार खूप मोठा होता', अशी माहिती त्या वाडावाल्या लेखातून मिळते.

RSSचा/शाखेचा कार्यकर्ता असलेल्या सद्गृहस्थाची एका मुसलमान सद्गृहस्थाशी जिवलग मैत्री हे काँबिनेशन नुसते चमत्कारिकच नव्हे, तर असंभवनीय वाटते.

(बोले तो, दिवसा हुसेनशी जिवलग मैत्री करायची, आणि संध्याकाळी शाखेत जाऊन 'बौद्धिका'त (to put it very, very mildly) मुसलमानांविरुद्ध बोलायचे/ऐकायचे? How can such a person be trusted in either capacity?)

----------

अशा सद्गृहस्थाच्या मुलाची नव्हे; लक्षात घ्या. गोष्ट लेखकाच्या वडिलांची चाललेली आहे, लेखकाची नव्हे. खुद्द लेखक या आस्पेक्टच्या संदर्भात स्वतःविषयी काहीही बोलत नसून वडिलांच्या संदर्भात बोलत आहे. प्रस्तुत हुसेन हा लेखकाच्या वडिलांचा जिवलग मित्र असल्याबद्दल उल्लेख आहे; लेखकाचा जिवलग मित्र असल्याबद्दल (किंवा मोठेपणी झाल्याबद्दल) लेखात काहीही म्हटलेले नाही. (त्यामुळे, आपण ते गृहीत धरू शकत नाही.) सबब, for all I know and care, the author, as a child, may himself have been innocent, as you suggest, but that is utterly irrelevant; This, after all, is not about him, at all. आणि, लेखकाचे वडील हे शाखेत - त्या प्रॉपगांडा प्रवचनांच्या ('बौद्धिकां'च्या) कर्मभूमीत! - जाऊनसुद्धा त्यांचे कान भारले जाणार नाहीत, त्यांना धर्म, वैर ठाऊक नसेल (थोडक्यात, आपण म्हणता त्याप्रमाणे ते निरागस असतील), हे एक तर अशक्य तरी आहे, किंवा मग असा माणूस त्या माहौलात फार काळ राहणे अशक्य आहे. (To put it very simply, पटत नाही तर जायचे कशाला तिथे?) आणि, त्या परिस्थितीत, त्या समूहात त्यांचा 'मित्रपरिवार खूप मोठा' असणे अशक्य आहे.

उलटपक्षी, अशा सद्गृहस्थाचा 'हुसेन'शी कामाच्या ठिकाणी कामाच्या निमित्ताने संबंध येणे, आणि अशा प्रसंगी वाकड्यात न शिरता त्यांच्यात व्यवहार होणे - आणि दोघांनी एकमेकांना tolerate करणे, अगदी verbal pleasantriesपर्यंत जाणे (मनातल्या कोठल्यातरी कप्प्यात एकसमयावच्छेदेकरून 'अरे, हा साला मुसलमान आहे हं!' अशी धारणा असतानासुद्धा) - हे सहज शक्य आहे. (आणि, तसे होण्यात काही गैर आहे, असा दावा नाही.) मात्र, याला 'जिवलग मैत्री' म्हणणे विपर्यस्त वाटते. असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कुणाचा मित्र वगैरे. इतक्या विरुद्ध वातावरणात मैत्री कशी झाली,टिकली, वाढली इत्यादी रोचक हेसुद्धा मान्य.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपण का दु:खी व्हायचं? लेखकाच्या वडिलांचीही ते आरएसएसवाले असले तरी त्यांनी जेनरल थिअरी न वापरता स्पेशल थिअरी ओफ रिलटिवटी वापरली, मैत्री कायम राखली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0