ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग १८

प्रकरण १८ - ॲलोपथीमधील उणिवा

सुधीर भिडे

विषयाची मांडणी

  • ॲलोपथीच्या औषधांचे साईड इफेक्ट्स
  • योग्य औषधांमुळे मरण
  • ॲलोपथीक औषधांवर केली जाणारी टीका
  • ॲलोपथीमधील डॉक्टरांचा गैरव्यवहार
  • अनावश्यक चाचण्या
  • मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया आणि भ्रष्टाचार
  • एक मोठा धोका – प्रतिजैविकांना दाद न देणारे जीवाणू
  • भेसळयुक्त वा खराब गुणवत्तेची औषधे
  • संशोधनातील भ्रष्टाचार
  • समालोचन

***


आधुनिक वैद्यक ॲलोपथी

ॲलोपथीच्या औषधांचे सहपरिणाम (साईड इफेक्ट्स)

आजारासाठी रोग्यास औषध दिले जाते. असे औषध आजारावर परिणाम करून आजार आटोक्यात आणते. परंतु याचबरोबर औषधाचे असे काही परिणाम होतात की जे रोग्यास त्रासदायक असू शकतात. औषधांच्या अश्या परिणामांना सहपरिणाम (साईड इफेक्ट्स) असे म्हणले जाते. येथे दुष्परिणाम हा मराठी शब्द विचारपूर्वक वापरलेला नाही. एखाद्या औषधाचे काय सहपरिणाम (साईड इफेक्ट्स) असू शकतात हे औषध कंपन्या लिहीत असतात आणि हे डॉक्टरांनाही माहीत असते. यासाठी बऱ्याच वेळेला डॉक्टर मुख्य औषधाबरोबर सहपरिणाम कमी करणारे औषधही देतात. बऱ्याच वेदनाशामक औषधांनी मलावरोध होतो. त्यामुळे अशा औषधांच्या बरोबर डॉक्टर्स अवरोध कमी करणारे औषधही देतात.

योग्य औषधांमुळे मरण

माहिती खालील संदर्भातून घेतली आहे.
- Death By Prescription: The Shocking Truth Behind an Overmedicated Nation, By Dr Ray Strand
- Death by Prescription, by Dr. John Neustadt, Nutritional Biochemistry, Inc publication

सर्व माहिती अमेरिकेतील जनतेविषयी आहे. भारतात स्थिती फार निराळी नसावी.

अमेरिकेत दर वर्षी २० लाख घटना घडतात ज्यांचा संबंध औषधांच्या दुष्परिणामांशी असतो. या सर्व घटना आजारावर योग्य औषध देऊन झालेल्या असतात; चुकीचे औषध देऊन नव्हे. या घटनांपैकी एक लाख घटना रोग्याच्या मृत्यूला कारणीभूत होतात. जेव्हा औषधांच्या चाचण्या होतात तेव्हा औषधाचे दूरगामी परिणाम माहीत नसतात. यासाठी जबाबदार डॉक्टर्स अशीच औषधे देतात जी किमान दहा वर्षांपासून वापरात आहेत.

शास्त्रीय वैद्यक / ॲलोपथीवर केली जाणारी टीका

- ॲलोपथीची औषधे संसर्ग करणाऱ्या जिवाणूबरोबर चांगल्या जीवाणूंनाही मारून टाकतात.
- ॲलोपथीच्या ‌डॉक्टरांची प्रवृत्ती 'गोळ्या खा आणि बरे व्हा' अशी असते. बहुतेक वेळा रुग्णांची जीवनशैली आणि त्यांची मानसिक स्थिती यांचा विचार केला जात नाही. वैद्यकीय अभ्यासक्रमात शेवटच्या वर्षात रोगप्रतिबंधशास्त्र आणि सामाजिक आरोग्यशास्त्र हे विषय शिकविले जातात. पण या विषयांकडे दुर्लक्ष केले जाते. वास्तविक हेच सर्वांत महत्त्वाचे विषय आहेत, हे कळायला डॉक्टरांना अनेक वर्षे लागतात. सुखी जीवनाच्या आहार-विहार-तणाव या त्रिसूत्रीबद्दल डॉक्टर्स स्वत:च अनभिज्ञ असतात हे केवढे दुर्दैव! (आनंदी शरीर, आनंदी मन – डॉक्टर लिली जोशी, रोहन प्रकाशन पृष्ठ १२)
- बरीच औषधे आजार बरा करीत नाहीत; आजार दाबून ठेवतात. जास्त रक्तदाबावरची औषधे आजार बरा करीत नाहीत; रक्तदाब नियंत्रणात ठेवतात. अशी औषधे आयुष्यभर घ्यावी लागतात.
- आजच्या स्पेशालिस्टांच्या युगात त्या विशेषज्ञाचे लक्ष शरीराच्या आजारी भागावर असते; रुग्णाकडे नाही. समजा माझी गुडघ्याचा सांधा बदलण्याची शस्त्रक्रिया ठरली आहे. विशेषज्ञ फार तर पाच मिनिटे माझा गुडघा तपासतील आणि त्यानंतर मला तिच्या सहाय्यकाबरोबर बाकी सर्व ठरवावे लागेल. एक फिजीशिअन माझी तब्येत तपासेल. विशेषज्ञाचे लक्ष फक्त माझ्या गुडघ्यावर असेल.

ॲलोपथीमधील ‌डॉक्टरांचा गैरव्यवहार

आतापर्यंत मी वैद्यकातल्या शास्त्राविषयी बोलत होतो. आता आपण त्या वैद्यकाच्या प्रॅक्टिसविषयी बोलू. शास्त्र प्रयोगशाळेतून बाहेर पडले की लगेच त्यात भ्रष्टपणा चालू होतो. शास्त्र शुद्ध असते, शास्त्राचा वापर करणारे काही लोक भ्रष्ट असतात. ॲलोपथीमधील गैरव्यवहाराबद्दल कित्येक डॉक्टरांनीच लिखाण केले आहे. आपण सर्व जण याचा अनुभव नेहमी घेतच असतो. चारच उदाहरणे देतो.

Reference, John Hopkins Medicine, Released on May 3 2016, Martin Makary, M.D., M.P.H., Professor of surgery at the Johns Hopkins University School of Medicine. Coauthor Michael Daniel

A recent Johns Hopkins study claims more than 250,000 people in the U.S. die every year from medical errors. Other reports claim the numbers to be as high as 440,000. Medical errors are the third-leading cause of death after heart disease and cancer. Patients are never informed about the real cause of such deaths.

भारतात या संदर्भात काय परिस्थिती आहे याची आकडेवारी नाही.

वैद्यकीय चुकांचा दुसरा भाग, ज्याला मेडिकल गॅसलायटिंग म्हणतात, तो म्हणजे डॉक्टरने रोग्याने सांगितलेल्या लक्षणांकडे दुर्लक्ष करून हा केवळ मनाचा खेळ आहे असे घोषित करणे. यामुळे रोग्याचे मोठे नुकसान होऊ शकते (टाइम्स ऑफ इंडिया, २८ ऑगस्ट २०२२)

Relationships between physicians and Pharma, Carl Elliott, MD, PhD, Journal of Neurology Clinical Practice, April 2014. : The pharmaceutical industry pays the vast majority of physicians for one reason: to make money

औषधे बनविणाऱ्या कंपन्या डॉक्टरांना भेटवस्तू आणि इतर फायदे देत असतात याविषयी पेपरमध्ये वारंवार माहिती येत असते. हा फायदा डॉक्टरांनी त्या कंपनीची औषधे प्रिस्क्राईब करण्यासाठी दिला जातो. करोनाच्या काळात एका कंपनीने डोलो-६५० हे औषध बाजारात आणले. खरे म्हणजे हे औषध ६५० मि.ग्रॅ. असणारे साधे पॅरासिटामोल होते. हे औषध प्रिस्क्राईब करण्यासाठी कंपनीने लाखो रुपये डॉक्टरांना दिले अशी वदंता आहे. हा खटला सध्या सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. (डॉक्टर नागराल यांनी टाईम्स ऑफ इंडिया मधील २४/८/२२ रोजी लिहिलेल्या लेखावरून.)

BMJ Opinion या मासिकात २०१७ साली जसलोक हॉस्पिटलचे डॉक्टर नागराल आणि गंगा राम हॉस्पिटलचे डॉक्टर नंदी यांनी भारतात वैद्यकीय क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या कट प्रॅक्टिस या विषयावर एक लेख लिहिला. एका डॉक्टराने स्पेशालिस्ट डॉक्टरला रोगी पाठविल्याबद्दल मिळणारा मोबदला याला भारतात कट प्रॅक्टिस म्हणतात. याविषयी हे डॉक्टरद्वय लिहितात –

Commissions for referrals (colloquially called "cuts" or "kickbacks") are a longstanding and widespread practice in Indian healthcare. It is an incentive fee for general practitioners to refer patients to specialists, now includes kickbacks from pathology and radiology establishments This is despite the Medical Council of India decreeing that fee splitting is unethical, in its 2012 code of ethics.

There is no question that commissions in healthcare, not only erode trust, but also have other serious consequences. As well as leading to unnecessary tests and procedures, the money that exchanges hands is factored into patients' bills. If referrals are based on commissions it is likely that the patient will be referred to the highest paying doctor and not to one who is most suitable.

Lot of these transactions involve unaccounted cash (known as black money in India) and hence the protagonists are unlikely to reveal details. The announcement that the Maharashtra government is to issue a new law called the "Cut practices in Medical Services Act, 2017" is unprecedented. The act will make referring patients for "non-medical" indications to doctors and hospitals a cognisable offence. Whether such a law will be effective, remains to be seen.

अनावश्यक चाचण्या

माहिती या लेखातून – Too many medical tests done unnecessarily, The Tribune, 13 Nov 2022

चाचण्या हे रोग निदानाचे महत्त्वाचे साधन आहे. परंतु भरमसाठ चाचण्या करायला सांगणे हा नेहमीचा प्रकार झाला आहे. याची निरनिराळी कारणे आहेत – डॉक्टरला निदानाविषयी आत्मविश्वास नसणे, हॉस्पिटलने दिलेली धंद्याची टार्गेट साध्य करणे. या प्रकाराला इंग्रजीत डिफेंसिव मेडीसिन असे अमेरिकेत म्हणतात.

Defensive medicine includes performing unnecessary diagnostic tests and invasive procedures, prescribing unnecessary treatment and needless hospitalisation.

अमेरिकेत ‌डॉक्टरांचा हलगर्जीपणा सिद्ध झाला तर डॉक्टरांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे डॉक्टर्स अशा चाचण्या करायला सांगतात. त्यातून उपचाराचा खर्च वाढत जातो. भारतात डॉक्टरांवर कोणताच अंकुश नसल्याने अनावश्यक चाचण्या हा नेहमीचा प्रकार झाला आहे.

मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया आणि भ्रष्टाचार
मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाची स्थापना १९३३ साली झाली. मेडिकल कॉलेजांना मान्यता देणे आणि ॲलोपथीच्या डॉक्टरांचे रजिस्ट्रेशन ठेवणे ही कामे ही संस्था करत असे. १९८० सालापासून बरीच नवीन मेडिकल कॉलेजे चालू झाली. या सर्वांना मान्यता देणे आणि जुन्या कॉलेजांची मान्यता चालू ठेवणे यांत भ्रष्टाचार चालू झाला. त्यासंबंधी टाइम्समध्ये आलेल्या एका लेखातील भाग उद्धृत केला आहे.

Two decades of attempts to cleanse medical education and its regulator the MCI
March 16, 2019, Rema Nagarajan , टाईम्स ऑफ इंडिया, १६ मार्च २०१९

Nov 2001— Delhi High Court concluded there was a high level of corruption in MCI and ordered removal of then president Dr Ketan Desai, who in 2000 faced corruption charges and income tax raids. Maj Gen (retd) SP Jhingon was appointed by the court as MCI administrator. Centre was to constitute a new MCI.

Jun 2002— Jhingon complained to court that he was not being allowed to function by MCI members in the executive committee and general body, many said to be close associates of Desai.

Nov 2002— Supreme Court relieved Jhingon and appointed a three-member watch-dog committee of eminent doctors with MCI vice-president Dr Keshavan Kutty Nair (a known Desai associate) as head.
By 2007— Desai was back as MCI member and by March 2009 became president yet again
Apr 2010— CBI arrested Desai in on bribery allegations and he was removed as MCI president. The CBI recovered 1.5 kg of gold and 80 kg of silver from Desai's premises. Further, gold worth ₨ 35 lakhs were recovered from Desai's bank lockers in Ahmedabad. Desai, the head of urology at B J Medical College and president of the Gujarat Medical Council was caught by the CBI for accepting a bribe of 2 crores to grant recognition to a private college. Desai was removed from the MCI and his registration cancelled.

२०१९ साली मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया बरखास्त करून नॅशनल मेडिकल कमिशन बनविण्यात आले.

एक मोठा धोका – प्रतिजैविकांना (अँटिबायोटिक्स) दाद न देणारे बॅक्टेरिया

सुमारे १०० वर्षापूर्वी पेनिसिलीनचा शोध लागला. तेव्हापासून संसर्गजन्य आजारांवर नियंत्रण शक्य झाले. अशा औषधांना प्रतिजैविके (अँटीबायोटिक) असे म्हटले जाते. संसर्ग करणारे तीन प्रकारचे जीवजंतू असतात – जीवाणू (बॅक्टरिया), विषाणू (व्हायरस) आणि फंगस. यामध्ये जीवाणू आणि आणि काही अंशी फंगस यांवर ही औषधे काम करतात.

जीवाणू निरनिराळ्या जातींचे असतात. प्रत्येक प्रकारच्या जीवाणूसाठी काम करणारे प्रतिजैविक शोधले गेले. या जीवाणूंचे एक वैशिष्ट्य म्हणजे हे जीवाणू बदलतात. त्याला म्युटेशन असे म्हणतात. म्युटेशन झाल्यावर जुने औषध काम करेलच असे सांगता येत नाही. कोव्हिड विषाणूच्या म्युटेशनविषयी आपण पुष्कळ वाचलेच असेलच.

गेल्या तीस वर्षांत प्रतिजैविकांचा वापर फार वाढला. आवश्यकता नसताना डॉक्टर प्रतिजैविके देऊ लागले. याशिवाय भारतात प्रतिजैविके प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळू शकतात. रोगी स्वत:च या औषधांचा वापर करू लागले. याला इंग्रजीत overuse and misuse असे म्हणतात. याचे परिणाम गेल्या वीसवर्षांपासून दिसू लागले. काही जीवाणूंवर जुनी औषधे परिणामकारक नाहीत असे ध्यानात आले.

Each year in the U.S., at least 2 million people are infected with antibiotic-resistant bacteria, and at least 23,000 people die as a result. We are on the edge of a global crisis of drug-resistant bacteria. According to the British Government's Review on Anti Microbial Resistance, Antibiotic resistance is one of the biggest health risks and is estimated to kill 50 million by 2050 worldwide.

या संकटाचा भारताला मोठा धोका आहे. कारण भारतात अजूनही संसर्गजन्य रोगाने होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण जास्त आहे. या संबंधात टाइम्स ऑफ इंडियात ११ सप्टेंबर २२ रोजी आलेली बातमी पाहा –

इस्पितळांमध्ये झालेल्या संसर्गाचे सर्वेक्षण संपूर्ण देशात १२० आय. सी. यूं. मध्ये करण्यात आले. ३०००पेक्षा जास्त रक्ताच्या नमुन्यांत आणि ७९२ मूत्र नमुन्यांत असे जंतू सापडले की जे माहीत असलेल्या प्रतिजैविकांना दाद देत नव्हते. यांपैकी ३८% रोगी दोन आठवड्यांच्या आत मरण पावले.

भेसळयुक्त औषधे / खराब गुणवत्तेची औषधे

नुकतीच वृत्तपत्रात आलेली बातमी आपण सर्वांनी वाचली असेल. आफ्रिकेतील देश गांबियात भारतातून निर्यात केलेल्या खोकल्याचे औषध घेतल्यानंतर ६६ मुलांचा मृत्यू झाला. या मृत्यूंसाठी औषध कंपनी आणि भारत सरकार असे दोघेही जबाबदार आहेत. माध्यमांनी हे प्रकरण पुढे आणले नसते तर ते झाकून टाकण्यात आले असते. हा प्रश्न ॲलोपथीशी प्रत्यक्षात संबंधित नसून तो संलग्न असलेल्या औषध उत्पादन व्यवसायाशी आहे. दुर्दैवाची गोष्ट ही की खोकल्याच्या औषधाच्या सोलव्हंटमध्ये धोकादायक तत्त्वे असू शकतात याची माहिती होती आणि औषध कंपनीने त्यासाठी खातरजमा करणे आवश्यक होते. रेग्युलेटरने या कंपनीचा परवाना रद्द केला अशी बातमी होती. खरे खोटे देव जाणे. यानंतर भारत सरकारने एक समिती नेमून या प्रकरणाची तपासणी चालू केली आहे. सामान्य मराठीत याचा अर्थ हा होतो की हे प्रकरण दाबले गेले.

यानंतर उजबेकिस्तानमधून डिसेंबर २२च्या शेवटच्या आठवड्यात बातमी आली की अशाच प्रकारे भारतीय बनावटीचे औषध घेतल्यामुळे १२ मुलांचा मृत्यू झाला.

भारतात तीन हजारांहून जास्त औषधकंपन्या आहेत आणि दहाहजारांहून जास्त औषध उत्पादन कंपन्या आहेत. याचा अर्थ औषधकंपन्या एकापेक्षा जास्त औषध उत्पादन कंपन्या चालवितात आणि काही फक्त औषध उत्पादन कंपन्या आहेत. त्या माल औषध कंपन्यांना विकतात. अजून एक गुंतागुंत वाढविणारा भाग म्हणजे औषध उत्पादक कंपन्या त्यांना लागणारा कच्चा माल बाहेरून विकत घेतात. यापैकी ७०% माल चीनमधून आयात होतो.

औषधांची गुणवत्ता पाहाण्याची जबाबदारी Food and Drugs Administration या संस्थेकडे आहे. या संस्थेच्या प्रत्येक राज्यात शाखा असतात. टाइम्स ऑफ इंडियामधील २५ऑक्टोबर मधील लेख विदारक स्थितीचे वर्णन करतो.

महाराष्ट्रात १००० ॲलोपाथिक औषधे बनविणारे उत्पादक आहेत. याशिवाय ४५० आयुर्वेदिक औषधांचे आणि ४०० प्रसाधने बनविणारे उत्पादक आहेत. FDAच्या खात्यात ५४% जागा रिकाम्या आहेत. निवृत्त FDA प्रमुख काय म्हणतात? – The corruption is so rampant that having vacant positions works to FDA employees advantage. Companies are getting away without mandatory testing. The system wakes up only when there are deaths. However, what about side effects of substandard drugs?

Current Scenario of Spurious and Substandard Medicines in India: A Systematic Review, A. N. Khan and R. K. Khar, Indian J Pharm Sci. 2015 Jan-Feb

India along with China could be the major contributors to spurious medications as per Patrick Lukulay, vice president of US Pharmacopoeial Convention's global health programs. In a report, it has been declared by the European Commission that 75% of the global cases of SFFC medicines originate from India.

बालकांच्या मृत्यूबद्दल औषध निर्मात्यांना आणि राज्यकर्त्यांना काहीच वाटू नये? पैसा मानवी जीवनापेक्षा जास्त महत्त्वाचा आहे का?

संशोधनातील भ्रष्टाचार

(माहिती आरोग्यशास्त्र संशोधन – सत्य की मिथ्य, लेखक डॉक्टर शरद वर्दे, दीपावली २०२२, या लेखातून)

बहुतेक वेळेला शास्त्रीय संशोधनासाठी अनुदान सरकारी किंवा विश्वविद्यालयातून मिळत नाही. औषध क्षेत्रातील संशोधनासाठी अनुदान मिळते ते औषध बनविणाऱ्या कंपन्याकडून. संशोधनानंतर निष्कर्ष निघतात ते कंपनीला कळवावे लागतात. शोधनिबंध प्रसिद्ध करण्याची परवानगी कंपनीकडून घ्यावी लागते. निष्कर्ष कंपनीला आर्थिकदृष्ट्या फायदेशीर नसतील तर ते प्रसिद्ध करायची परवानगी मिळत नाही. कदाचित अशा संशोधकाला पुढे आर्थिक मदत मिळणे अवघड होते. मग कंपनीला अपेक्षित असे निष्कर्ष द्यायला ती सपशेल नकार देईलच असे नाही – या संशयाला जागा आहे.

संशोधनाचे मूलभूत संशोधन आणि उपयोजित संशोधन (applied research) असे दोन भाग असतात. मूलभूत संशोधनात असा गैरव्यवहार होत नाही कारण त्याचा उपचार आणि औषधे यांच्याशी प्रत्यक्ष संबंध नसतो. जर उपयोजित संशोधनाला सरकारी आर्थिक सहाय मिळाले तर भ्रष्टाचार कमी होऊ शकेल.

बऱ्याच वेळेला (चुकीचे) पूर्वग्रह, फाजील आत्मविश्वास आणि अर्थकारण अशा निरनिराळ्या कारणामुळे शास्त्रज्ञ भरकटला जाऊ शकतो. त्यामुळे त्याचे निष्कर्ष काही काळानंतर चुकीचे आहेत हे सिद्ध होऊ शकते. असे एक-दोन प्रसंग एकाच मासिकाच्या बाबतीत झाले की त्या मासिकाची विश्वासार्हता कमी होते. लान्सेट या मासिकाच्या बाबतीत असे झाले आहे. (संपादकीय टिप्पणी - याविषयी मतभेद आहेत.)

समालोचन

या प्रकरणात आपण ॲलोपथीच्या प्रॅक्टिसमधील काही त्रुटी, उणिवा आणि दुर्व्यवहार याची माहिती घेतली. यावरून असे म्हणता येणार नाही की इतर वैद्यकीय प्रणालींत काही उणिवा वा दुर्व्यवहार नाहीत. ॲलोपथीमधील दुर्व्यवहार प्रकाशात येतात, इतर प्रणालींत ते जाजमाखाली झाडले जातात.

या सर्व प्रश्नांचा संबंध accountability अकाउंटेबिलिटीशी येतो. (शब्द कोशात अकाउंटेबिलिटीचा मराठी शब्द जबाबदारी असा दिलेला आहे. इंग्रजी शब्द अकाउंटेबिलिटी हा जबाबदारीची पुढची पायरी आहे, जबाबदारी म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी) रोगी डॉक्टरांकडे एका विश्वासाने जात असतो. त्यानंतर डॉक्टरांना पुढील क्रमाने जायचे असते.

  • रोगी सांगत असलेली लक्षणे आणि प्राथमिक चाचण्याचे निकाल यांवरून रोगाचे निदान करणे.
  • वाटत असलेल्या आजाराचे उपचार करण्याची क्षमता नसल्यास रोग्याला योग्य डॉक्टरांकडे पाठविणे.
  • शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेले उपचार रोग्यास देणे.
  • रोग्यास इस्पितळात इतर संसर्ग होऊ नयेत ही काळजी घेणे.
  • रोगी इस्पितळातून घरी गेल्यावर काही आठवड्यांनी रोग्याची स्थिती पाहणे.
  • या सर्व प्रक्रियेमध्ये कुठे चूक झाल्यास त्याची व्यवस्थित चर्चा करून अशी चूक पुन्हा होऊ नये ही काळजी घेणे.

वर उल्लेखलेल्या भ्रष्टाचाराबद्दल सर्व डॉक्टरांनी आणि इस्पितळांनी विचार करणे आवश्यक आहे. नाहीतर वैद्यकी पेशाऐवजी वैद्यकीय व्यवसाय असे नामकरण करून घ्यावे.

क्रमशः
***

भाग १ - शास्त्रीय दृष्टीकोनातून निरनिराळ्या वैद्यकीय प्रणालींचे मूल्यांकन
भाग २ - ॲलोपथीच्या आधीचे पाश्चिमात्य वैद्यक
भाग ३ - आयुर्वेदाचे मूल सिद्धान्त
भाग ४ - आयुर्वेदाचे मूल सिद्धान्त – त्रिदोष
भाग ५ - परीक्षा आणि चिकित्सा
भाग ६ - आयुर्वेदाची औषधे – भाग १
भाग ७ - आयुर्वेदाची औषधे – भाग २
भाग ८ - आयुर्वेदाचे शिक्षण आणि नंतर
भाग ९ - आयुर्वेदाची प्रॅक्टीस
भाग १० - युनानी आणि सिद्ध
भाग ११ - निसर्गोपचार
भाग १२ - होमिओपॅथी आणि बाराक्षार
भाग १३ - होमिओपॅथी आणि बाराक्षार
भाग १४, १५ - ॲक्युपंक्चर आणि आयुष
प्रकरण १६ - ॲलोपथी
प्रकरण १७ - ॲलोपथीतील बदल

field_vote: 
0
No votes yet