Skip to main content

पाहिले म्यां डोळा

पालथ्या मुठीत घुसवलेली iv ची सुई
जीवघेण्या कवितेपेक्षा टोचरी.
अँटिव्हायरलच्या ठिबकसिंचनाचा
गिनीपिगी जीवरोपट्यावर विफल अभिषेक.
बेबंद नाडीठोक्यांपुढे मुक्तछदंही अचंबित.
धपापते विद्रोही तप्तश्वास.
PPE आच्छादितांच्या नि:शब्द कवायतींनी कोंदलेले भवताल.
स्वप्न-जागृतीच्या, शुध्दी-बेशुध्दीच्या अस्थिर सीमारेषांवर भोवंडणार्‍या जाणिवानेणिवांची कण्हणारी कडवट कडवी.
संपतील एकदाची आत्ताच
की,
ध्रुपदत राहतील
व्हेंटिलेटरच्या जागत्या पहार्‍यात
आज
उद्या
परवा?

"द डिसायपल" : नाद आहे या घड्याला अन् घड्याच्या भोवती

चैतन्य ताम्हाणे यांच्या "द डिसायपल" या मराठी सिनेमाला व्हेनिस चित्रपटमहोत्सवात महत्त्वाचा पुरस्कार मिळाल्यानंतर तो सिनेमा पाहाण्याची उत्सुकता वाढली होती. त्या आधी हा सिनेमा हिंदुस्तानी गायकी, गुरुशिष्य परंपरा यांच्याशी संबंधित आहे हे कळलेलं असल्याने या जिव्हाळ्याच्या विषयांवर असणारा हा सिनेमा पहायचा हे ठरलेलं होतंच.

काल एका ऑनलाईन पोर्टलवर, अधिकृतरीत्या प्रदर्शित झालेला हा सिनेमा पाहायला मिळाला. तो विशेष आवडला.

ललित लेखनाचा प्रकार

"रेलचेल"

अमेरिका ही एक तरल व्हिस्की असेल असे समजून
येथे आलो होतो, प्रत्यक्षात ती निघाली एक
मोठ्ठी हिरवट बियर पॅक, पगार झालेल्या दिवसाची .
बाहेर पोलिसांच्या गाड्या वेगाने, सायरन वाजवीत
फिरतच आहेत, गुन्हा झालेलाच आहे, कोणाला तरी
त्याची पगाराच्या दिवसाची बियर मिळालेली दिसत
नाही. असे वारंवार का होते हे विचारायचे नसते.
अमेरिकेत ते अंगभूतच असते. पण इतकी तरी बियर
आम्ही गुन्हेगारांनी इतिहासकाळात कधी प्यायली होती,
तिच्यायला? अमेरिकचे हेही उपकार लक्षात ठेवा.
तुमहाला हवी असो वा नसो, अमेरिका बियर पाजतच
रहाते . तुम्हाला नको असलेल्या वस्तूंची रेलचेल!
xxx

"रामरावांचा पिवळट सोफा "

अमेरिकेतले मोट्रीने दूरदूर फिरणे सोडून मी पळून
येईन. पुण्यात अर्ध्या टेकडीवरचा जुना बंगला विकत घेईन.
पिवळट सोफ्यावर बसून जुने सिनेमे पाहीन. शेजारची
मुलगी पंजाब्याबरोबर पळून गेल्यास चुकचुक करेन.

मी लांब मराठी वर्तमानपत्रे वाचेन. मी भाजपाला मत
देईन. मी काँग्रेसला मत देईन. दारी आलेल्या
गणेशोत्सव कार्यकर्त्यांना आनंद होईल इतकी
वर्गणी देईन. मी माझे नाव लाऊडस्पीकरवर सांगू
नका असे त्यांना सांगेन.

मी माझा जुना कॉम्प्युटर माझ्या शाळेला
देईन.

"ब्रह्मांडाचे प्रचंड पिठले"

ब्रह्मांडाचे प्रचंड पिठले उकळत राही फतफत फतफत
मात्र तयातील मानवतेची परवड आता नाही बघवत
व्हायरस जेंव्हा चालून येई कधी करोना कधी इबोला
कशामुळे तो देवाने हा धरिला आहे असा अबोला?

निसर्गास जो मानव पिडतो , निसर्ग पिडतो मानवतेला
सांग मला तू असा तमाशा कशासाठी तो उगाच केला ?
गतजन्मीची पापे अथवा या जन्मातिल अहंकार तो?
सारे दुर्बल, कोण ठरविते: अमूक जगला , तमूक मेला ?

कोविड डायरी (पहिला सप्ताह) : डॉ . तुषार पंचनदीकर

"५८ वर्षांचे वय घरच्यांसाठी जरी काळजीचे असले तरी मला कोविडसाठी काम करण्याची ही एक यथोचित संधी वाटली. आणि मी या लढाईत सामील झालो." - कोविड ड्यूटीच्या पहिल्या आठवड्याचे अनुभव सांगताहेत डॉ. तुषार पंचनदीकर

ललित लेखनाचा प्रकार

उत्तरप्रदेशात झालेल्या निर्घृणपणे अत्याचाराबद्दल

उत्तरप्रदेशात झालेल्या निर्घृणपणे अत्याचाराबद्दल वाचून बातम्या पाहून मन विषण्ण होते. दोन वर्षापूर्वी मी खालील कविता किंवा मुक्तछंद म्हणा हवं तर. लिहिले होते. तेच पुन्हा इथे प्रकाशित करतोय.
पहिल्या ओळीतील नावे फक्त बदलत राहतील. माणूस म्हणून खरेच कमी पडतोय आपण. हतबल होऊन काहीच करता येत नाही लाज वाटते.

अ ब्यूटीफुल डे इन द नेबरहूड- मुलाखतकाराची मुलाखत

Tom Hanks

प्रसिद्ध अमेरिकी नियतकालिक ई-स्क्वायरच्या १९९८ सालच्या एका अंकात आलेल्या ‘Can You Say … Hero?’ या मुखपृष्ठकथेवर आधारलेला गेल्या वर्षी आलेला हा चित्रपट. सत्य घटनांवर आधारित. फ्रेड रॉजर्स या अमेरिकी टीव्ही सेलिब्रेटीभोवती केन्द्रित.

समीक्षेचा विषय निवडा