इमले अक्षरतेचे, अर्थात अष्टाश्वमेध नाटक - १
"... नेमाने झोपून नेमाने उठायला मी काही अभ्यासू आणि कष्टाळू कॉलेजतरुण नव्हे. अभ्यास करून, कष्ट करून आयुष्यात मला काही मिळवायचं आहे का? नाही. जरी कष्ट केले तरी काही मिळणार आहे का? नाही. तशी धमक माझ्यात आहे का? नाही. मला महत्त्वाकांक्षा नाही. यापूर्वी नव्हती आणि आत्ताही नाही. मग निष्कारण सकाळी लवकर उठून आपल्या उर्वरित आयुष्याचा हा पहिला दिवस आहे असं स्वत:ला बजावून सांगून पुढे मी काय करणार आहे? काही नाही. म्हणून मग कालची रात्र अशीच काहीबाही वाचत विचार करत मनन करत जागून काढली. या निशा सर्वभूतांना तस्यां जागर्ति संयमी. शितावर जमलेली भुतं जेव्हा झोपलेली होती तेव्हा संयमाने निशापाणी करीत विश्वाची चिंता करीत मी आपला जागा होतो. ह्या चिंतेचं ओझं जेव्हा पेलवेनासं झालं तेव्हा श्रान्त आणि क्लान्त मनाने रामप्रहरी जो डोळा लागला तो हा आत्ता उठतो आहे. माझ्या उर्वरित आयुष्याची ही पहिली संध्याकाळ आहे. तेव्हा चहा घेऊन ये."
विशेषांक प्रकार
- Read more about इमले अक्षरतेचे, अर्थात अष्टाश्वमेध नाटक - १
- 4 comments
- Log in or register to post comments
- 6838 views
समांतर विश्वांत पक्की
विशेषांक प्रकार
- Read more about समांतर विश्वांत पक्की
- 11 comments
- Log in or register to post comments
- 20571 views
प्लॅन के मुताबिक…
'बटरफ्लाय इफेक्ट'चा परिणाम आणि इन्स्पेक्टर राण्यांच्या शिव्यांमुळे नक्की काय झालं?
विशेषांक प्रकार
- Read more about प्लॅन के मुताबिक…
- 11 comments
- Log in or register to post comments
- 14537 views
महासाथीकडून काय धडे घ्यावेत? - डॉ. विनय कुलकर्णी
एचआयव्हीसारख्या व्हायरसच्या साथीचा अभ्यास, रोगावर प्रत्यक्ष उपचार आणि रोगाच्या सामाजिक-आर्थिक परिणामांचाही अभ्यास अशा वेगवेगळ्या अंगांनी अनेक वर्षे कार्यरत असलेले डॉ. विनय कुलकर्णी सांगताहेत - करोनाच्या महासाथीकडून आपण कोणते धडे घ्यायला हवेत?
- Read more about महासाथीकडून काय धडे घ्यावेत? - डॉ. विनय कुलकर्णी
- Log in or register to post comments
- 6716 views
प्रदूषणाला आळा घालण्यासाठी यावर्षी साजरा करूया मेणबत्ती विरहित ख्रिसमस.
मधमाश्या नष्ट झाल्या कि चार वर्षात मानव नष्ट होईल अस म्हटलं कि लोक विचारतात कस बर... हे वाक्य आहे थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन याचं, ते सांगतात कि मधमाशी विविध प्रकारचा वनस्पतीचे परागीभवन करीत असतात, बरीच फळझाड, फुलझाड, भाजीपाला, धान्य पिके याचं परागीभवन फक्त मधमाश्याच करू शकतात. जर याचं प्रमाण कमी होत गेल तर आपल्या खाद्यातील अनेक घटक नष्ट होतील आणि मग वनस्पतीच्या अनेक प्रजाती नष्ट होऊन, अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होऊन भूकबळी वाढतील आणि मग अन्नही मिळणार नाही.
आणी या मधमाशा कशाचे घर बनवतात ? मेणाचे - आणि मेणबत्ती कशाने बनते मेणापासून !
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about प्रदूषणाला आळा घालण्यासाठी यावर्षी साजरा करूया मेणबत्ती विरहित ख्रिसमस.
- 9 comments
- Log in or register to post comments
- 6634 views
ओळख!
संदर्भः
लहान मुलांकडे असलेल्या निरागसतेमुळे मी नेहमीच प्रभावित अन् अचंबित होत असतो. आणि खरंतर ते अत्यंत आनंददायी असतं!
"अरे खरंच.. आपण असा साधा विचार का नाही करू शकलो?" असं स्वतःला अक्षरशः अनेकदा विचारण्याची वेळ येते!
त्यांचा जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन फार साधा आणि कुतुहलाचा असतो. सरळ स्वभाव असल्यामुळे केमिकल लोचा कमी असतो!
परत, जरी त्यांची स्मृती चांगली असते तरी मनात अढी ठेवून वागण्याची वृत्ती त्यांच्यात नसते. उलट ते फार सहजपणे गोड वागतात, माफ करतात आणि विसरूनही जातात. कदाचित याच कारणानं लहान मुलं सगळ्यांना हवीहवीशी वाटतात!
- Read more about ओळख!
- 3 comments
- Log in or register to post comments
- 1699 views
अर्नब गोस्वामीचे अटकनाट्य..
अर्नब गोस्वामी हा आक्रस्ताळेपणा करतो त्याच्या प्रत्येक कार्यक्रमात हे जगाला ठाऊकच आहे. मात्र त्याने उचलून धरलेले मुद्दे आणि प्रश्न सोयीस्करपणे दुर्लक्षित करता येऊ शकत नाहीत. जुन्या केसमध्ये अर्नबला अटक होते याचा अर्थ राजकीय हस्तक्षेपामुळे हे घडतेय. नक्कीच सुडबुद्धीने ही कारवाई केली गेली. यात सरकारचे समर्थन करणारे बरेचजण आहेत. मुद्दा हा आहे की, अशीच कारवाई जेव्हा भाजपप्रणीत सरकारने केली होती जुन्या केसेस उकरुन काढून तेव्हा हेच सरकारचे समर्थन करणारे लोक भाजपाला नावे ठेवत होती. भाजपा सुडाचे राजकारण करत आहे असे बोलत होते.
- Read more about अर्नब गोस्वामीचे अटकनाट्य..
- 54 comments
- Log in or register to post comments
- 21376 views
वणवा आणि जंगल
वणवा जंगलात विलीन होतो की जंगल वणव्यात?
फार फार वर्षांपूर्वी एक वणवा सुरू झाला आणि हळूहळू पूर्ण जंगल व्यापु लागला.
मजल दर मजल करत एका सदाहरित जंगलपाशी आला.
सदाहरितांनी आधीच दूर दूर च्या जंगलातील पशुपक्षीं ना आसरा दिलेलं ज्यांचं घर त्याच वणव्यात जळून गेलेलं.
गवत वेली किंचालल्या "वाचवा-आग-आग" त्यावर उंच उंच सावली न देणारी अशोकाची झाडे म्हणाली 'चूप बसा, तुम्हाला दिसत नाही पण मला दिसतंय, वणव्यात आहे तेज, अंधकार मिटवायला आलाय.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about वणवा आणि जंगल
- 4 comments
- Log in or register to post comments
- 3373 views
व्युत्पत्ती
"नाव सोनूबाई आणि हाती कथलाचा वाळा" ही म्हण तुम्ही ऐकली असेलच. धनसुख आणि माया शर्मा या दांपत्याला मात्र ही म्हण गैरलागू होती. त्यांच्या मालकीच्या शेकडो कुरणांमध्ये हजारो एकरांमध्ये गवताची अब्जावधी पाती डोलत असत. हिरवंगार गवत विकत घेण्यासाठी मोठमोठ्या डेअरी फार्म्सची अहमहमिका असे. शर्मा दांपत्याला कसली ददात नव्हतीच. त्यांनी हौसेने बांधलेल्या टुमदार टोलेजंग बंगल्याबाहेरील संगमरवरी पाटी त्यांची फ्राॅईडियन स्लिप दिमाखात मिरवत असे - "शर्मा सधन"!
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about व्युत्पत्ती
- 3 comments
- Log in or register to post comments
- 4890 views
डळमळलेल्या जगातून - अमेरिकेचे भवितव्य टांगणीवर
अमेरिकेसह जगभरात या निकालाबद्दल आश्चर्य आणि अविश्वास व्यक्त होत आहे.
ट्रम्प यांचं बेधडक, तारतम्यविहीन आणि गर्विष्ठ व्यक्तिमत्त्व पाहता ते काय
गोंधळ घालू शकतील, याविषयी जगभरात काहीसं भीतीचं वातावरण निर्माण झालं
आहे.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about डळमळलेल्या जगातून - अमेरिकेचे भवितव्य टांगणीवर
- 100 comments
- Log in or register to post comments
- 51877 views
