कार्नेगी देवाची कहाणी
ऐका देवा महाराजा कार्नेगीजी देवा तुमची कहाणी. एक आटपाट मेट्रो महानगर होते. तेथे एक राजा राज्य करत नव्हता. त्याला दोन राण्या नव्हत्या. एक आवडती नव्हती आणि एक नावडती नव्हती. कारण तेथे लोकशाही नांदत होती. त्या लोकशाहीची व्याख्या अशी होती Democracy is a government off the people, buy the people and f*** the people.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about कार्नेगी देवाची कहाणी
- Log in or register to post comments
- 4226 views
कांदे की फटके
एक गोष्ट लहानपणापासून ऐकत आले आहे.
गुन्हा केलेल्या एका माणसाला राजाने पन्नास कांदे खा किंवा चाबकाचे पन्नास फटके खा असा पर्याय दिला. गुन्हेगाराने कांदे खाणं सोप्पं समजून तो पर्याय निवडला. मात्र सातआठ कांदे खाल्ल्यानंतर चाबकाचे फटके परवडले असं वाटून फटके मारा म्हणाला. असं होता करता दोन्ही शिक्षा भोगून नशीबाला दोष देत गलितगात्र अवस्थेत पडला.
टीप: करोना आणि लॉकडाऊनने उद्भवलेल्या परिस्थितीशी याचा संबंध लावायचा असल्यास आपापल्या जबाबदारीवर लावावा. लेखकाचा हेतू आणि मन निर्मळ आहे.
- Read more about कांदे की फटके
- 17 comments
- Log in or register to post comments
- 10006 views
बखर....कोरोनाची (भाग ७)
इतिहास घडतोय, आपल्यासमोर... वेगाने, इतक्या की गेल्या महिन्यात काय होते हे आपण आज कदाचित विसरणार आहोत. म्हणून आज घडणारा इतिहास, आपल्याला दिसेल तसा इथे नोंदवत जाऊयात का? हिस्टरी ऑफ द प्रेझेंट लिहुयात ? इथेच, या धाग्यावर? बखर वगैरे म्हणजे काय असतं ? हेच ना? चला, जशी दिसेल तशी, कळेल तशी ,कुठल्याही विषयावर कोरोना साथीमुळे झालेल्या बदलांची नोंद करूयात आणि लिहुयात.
- Read more about बखर....कोरोनाची (भाग ७)
- 100 comments
- Log in or register to post comments
- 77669 views
सुशांतसिंग राजपूतच्या प्रकरणाच्या तपासासाठी प्लॅन्चेटवाल्यांची मदत घेणे गरजेचे आहे!
सुशांतसिंग राजपूत या हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्याच्या तथाकथित हत्याची (की आत्महत्याची(?)) तपास करणारी यंत्रणा कामाला लागलेली असून ती रोज नवनवीन विधानं करत आहे; पुरावे सिद्ध करत आहे; खुलासे मांडत आहे. तरीसुद्धा चौकशीत आकंठ बुडालेल्या या तपास यंत्रणेला एक अनाहूत सूचनेवजा सल्ला द्याविशी वाटते. 
- Read more about सुशांतसिंग राजपूतच्या प्रकरणाच्या तपासासाठी प्लॅन्चेटवाल्यांची मदत घेणे गरजेचे आहे!
- 12 comments
- Log in or register to post comments
- 6405 views
प्रकरण ४: अमेरिकेचे स्थलांतरण धोरण? वंशवादी की आधुनिक मूल्याधारित?
आधी म्हटल्याप्रमाणे कोलंबसाने अमेरिका शोधल्यापासून अमेरिकेत अव्याहतपणे स्थलांतर सुरूच आहे. जस जशी वस्ती वाढायला लागली तसतश्या ब्रिटिश, फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश.... विविध कॉलन्या तयार झाल्या, त्यांचे त्यांच्या देशांशी व्यवहार सुरूच होते, त्या त्या देशातील कायदे पद्धती तिथे राबवली जात होतीच, सर्वप्रथम ब्रिटिश कॉलन्यांमध्ये १७४० साली पहिला, प्लांटेशन ऍक्ट लागू झाला. नागरिकत्वाशी संबंधित ज्ञात असलेल्या कायद्यांपैकी पहिला कायदा. १७४० म्हणजे अमेरिकेला स्वातंत्र्य मिळायच्या आधी ३६ वर्ष हा कायदा लागू झाला होता.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about प्रकरण ४: अमेरिकेचे स्थलांतरण धोरण? वंशवादी की आधुनिक मूल्याधारित?
- 2 comments
- Log in or register to post comments
- 3094 views
कोविडोत्तर अर्थव्यवस्था : नवयुग चूमें, नैन तिहारे । जागो जागो, मोहन प्यारे ।
डोकीवर आणि दाढीत पांढरे केस उगवण्याचा एक तोटा म्हणजे सदरहू इसम हा मार्गदर्शन करणेलायक झाला आहे अशी एक गप्प ममव मार्केटमध्ये पसरते. विशेषतः दहावी बारावीच्या निकालानंतर मार्गदर्शनेच्छू लोकांचा सुकाळू होतो, आणि बऱ्याच जणांचा मुख्य प्रश्न असतो,
"सध्या स्कोप कशाला आहे?"
लेट मी क्ल्यारिफाय, विचारणाऱ्याच्या बाजूने या प्रश्नात चूक काहीही नाही. डोकीवर एकही पांढरा केस नसताना आणि दाढीचा उदय होत असताना मीही हा प्रश्न कोणा बेसावधाला पकडून विचारला असेल.
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about कोविडोत्तर अर्थव्यवस्था : नवयुग चूमें, नैन तिहारे । जागो जागो, मोहन प्यारे ।
- 22 comments
- Log in or register to post comments
- 27216 views
सांख्यिकी आणि मशीन लर्निंग - भाग २ - शंभर?
मागच्या भागात मी दोन प्रारूपं (मॉडेलं) दाखवली. सांख्यिकी पद्धतीनं प्रारूप बनवलं तर त्रुटी (error) आली १.८८, आणि मशीन लर्निंग वापरलं तर त्रुटी आली ०. कुठलं प्रारूप निवडायचं, ह्यात त्रुटी शून्य असेल तर ते प्रारूप कधीही निवडू नये. त्यातून सरसकटीकरण (generalisation) करता येत नाही. सगळी विदा रटल्यामुळे त्रुटी शून्य आली आहे.
त्यामुळे ह्या भागात मशीन लर्निंगसाठी प्रारूपात काहीसा बदल केला आहे. आणि ३०च्या जागी १०० विदाबिंदू निवडले तर काय दिसेल?
- Read more about सांख्यिकी आणि मशीन लर्निंग - भाग २ - शंभर?
- 13 comments
- Log in or register to post comments
- 6098 views
प्रकरण ३: भारतीयांचें अमेरिकेतील स्थलांतरण: एक दृष्टिक्षेप
भारत आणि अमेरिका हे देश खरं तर पृथ्वीच्या विरुद्ध दिशेला आहेत. कधी कधी असं मजेत म्हटले जाते की भारताच्या बाजूने खोदायला सुरुवात केली तर दुसऱ्या बाजूने अमेरिकेत बाहेर पडू. भारताचा थेट संबंध आला तो मध्य-पूर्वेतील किंवा युरोपिअन देशांबरोबर. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या शीतयुद्ध कालावधीत भारताचा कल रशियाकडेच राहिला, त्यामुळे भारतीयांचे अमेरिकन आकर्षण वाढायचे तसे काही ठोस-सबळ कारण दिसत नाही, तरी सुद्धा भारतीयांचे २०व्या शतकात अमेरिकेत स्थलांतर होतंच राहिले आणि ते आजतागायत सुरु आहे.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about प्रकरण ३: भारतीयांचें अमेरिकेतील स्थलांतरण: एक दृष्टिक्षेप
- 4 comments
- Log in or register to post comments
- 8887 views
प्रकरण २: अमेरिका स्थलांतरितांचा/स्थल-आंतरितांचा देश?
जगमान्य सिद्धांताप्रमाणे, १४९२ साली कोलंबसाने "नवीन जगाचा" शोध लावल्यापासून "नव्या जगाकडे" स्थलांतरितांचा ओघ गेली ५०० वर्षे अव्याहतपणे सुरु आहे, आणि या पुढेही तो सुरूच राहील.
परंतू कोलंबसाच्या "शोधाला" छेद देणारे नव-नवीन प्रस्ताव सतत मांडले जातात.
जसे,
१) दहा - पंधरा हजार वर्षांपूर्वी समुद्राची पातळी कमी असल्याने आशिया खंडातून अलास्कामार्गे प्रथम स्थलांतर झाले, तीच संस्कृती पुढे "मूळ-निवासी" (नेटिव्ह - इंडियन) विस्तारली आणि त्यांची कोलंबसाची भेट झाली.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about प्रकरण २: अमेरिका स्थलांतरितांचा/स्थल-आंतरितांचा देश?
- 7 comments
- Log in or register to post comments
- 7564 views
प्रकरण १:अमेरिका, अमेरिकन जीवनाच्या प्रेरणा आणि मूल्य व्यवस्था
अमेरिका... विकासाचा चर्मबिंदू!!, अमेरिकेतील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कलात्मिक तसेच जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातील घडामोडींचा संपुर्ण जगावर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रभाव पडत असतो. इतर देश एखाद्या क्षेत्रातील आपला विकास किती झाला आहे हे दर्शवण्यासाठी अमेरिकेच्या प्रमाणाची फूटपट्टी वापरतात. अमेरिकेला सर्दी झाली की जगाला ताप येतो वगैरे म्हणी सहज बोलताना वापरल्या जातात, आणि जागतिक मंदीच्या काळात त्या जाणवतात देखील.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about प्रकरण १:अमेरिका, अमेरिकन जीवनाच्या प्रेरणा आणि मूल्य व्यवस्था
- 3 comments
- Log in or register to post comments
- 4078 views