Skip to main content

पेट्रोल का वाचवावे?

Taxonomy upgrade extras

बऱ्याचदा आपण म्हणतो की गरज नसेल तर पेट्रोल जाळू नये, सार्वजनिक वाहतूक वापरावी वगैरे वगैरे.

पण मला असं वाटतं (मी त्यावर अमलबजावणी करत नाही ही गोष्ट वेगळी), की

- समजा अजून १०० वर्षांनी पेट्रोल संपणार आहे. पेट्रोल जास्त वाया घातल्यास अजून लवकर संपेल आणि राजकारणी, वैज्ञानिक लोकांवर अपारंपरिक ऊर्जा स्रोत तंत्रज्ञान लवकरात लवकर विकसित व्हावं असा खूप मोठा दबाव पडेल.

आपणास काय वाटते? या लॉजिक मधे काही चुकीचं आहे का?

चिंकीचे ना (आवडते) सूप)

कित्येक वर्षांनी चिंकी घरी आली होती. आता ती मोठी झाली होती. वाटलं होत तिचे बालपणाचे नखरे संपले असतील. पण कुठचे काय, सौ.ने मटार आणि गाजराची सुखी भाजी केली होती. ताट वाढल्यावर भाजीतले गाजर वेचून तिने अलग केले आणि म्हणाली मावशी मला गाजर आवडत नाही. न जाणे का मला दुर्बुद्धी सुचली आणि म्हणालो. चिंकी गाजर डोक्याकरता चांगले असतात. करमचंद नेहमी गाजर खात-खात मोठ्या-मोठ्या अपराध्यांना हुडकून काठायचा. "टीवीवर सर्व खोट दाखवितात. माझे किनई १०वीत ९५ टक्के मार्क्स आले होते, ए मावशी तुझे किती आले होते ग! विचारत तिरक्या डोळ्यांनी माझ्याकडे बघितले. तिच्या गुगलीवर माझी विकेटच उडाली.

उदरभरण नोहे : हल्ली कुठे आणि काय खाल्ले? -१२

Taxonomy upgrade extras

आपण रोजचे जेवण जेवतोच, पण त्याच बरोबर वेगवेगळ्या हॉटेलांमध्ये नवनवीन पदार्थ चाखत असतो. हॉटेलांतच नाही तर सणासुदीच्या निमित्ताने किंवा कधी सहज लहर आली म्हणून किंवा कधी एखादा जिन्नस स्वस्तात मिळाला म्हणून घरीच काहीतरी नवा, सुग्रास पदार्थ बनतो. हा धागा अशाच तुम्हाला आवडलेल्या/नावडलेल्या पदार्थांवर चर्चा करण्यासाठी आहे. इथे हल्ली तुम्ही कुठे आणि काय खाल्ले? ते तुम्हाला आवडले का? असल्यास का? नसल्यास का? जर हा पदार्थ घरी स्वतः बनवला असेल / त्याची पाकृ माहित असेल तर तो कसा बनवला? जर हा हॉटेलात खाल्ला असेल तर ते हॉटेल कुठे आहे? पदार्थाची किंमत काय होती?

कलिंगडाचे धोडक

उन्हाची झळ बसायला सुरुवात झाली की गारम गार काय काय खाता येईल ह्याचा विचार सतत चालू असतो. खादाडीची आवड असणाऱ्यांचा (माझ्यासारख्यांचा) जरा जास्तच.

त्यातलेच एक सर्वांचेच प्रिय कलिंगड. बाजारात गेल्यावर जड कलिंगड वाहून आणल्यावर ते कधी एकदा कापून मस्त गार करून खातो/ते असे प्रत्येकालाच होत असते. खर्र की नाही? पण मग त्याचा तो जाड जाड सालींचा पसारा उचलून टाकताना अर्धे पैसे वाया गेले म्हणून वाईट वाटत असेल तर आता मी त्यावर एक उपाय सांगते जो तुम्हाला नक्की आवडेल.

बाहुबलीला पुरस्कार आणि काहींची पोटदुखी

Taxonomy upgrade extras

मी आजवर बाहुबलीबद्दल लिहायचं मुद्दामच टाळलं होतं. भारतीय सिनेमाच्या इतिहासातील या ऐतिहासिक ठरू शकणार्‍‍या सिनेमाबद्दल तथाकथित बॉलीवूड आणि स्वघोषित बुद्धिजीवींची काय प्रतिक्रिया येते याची मला उत्सुकता होती. आणि सांगायला अत्यंत आनंद होतो की दोघांनीही मला अजिबात निराश केलं नाही. दोघांनीही 'बाहुबली' सिनेमागृहात चालू असताना व तो उतरल्यावरदेखीलही सतत त्याला अनुल्लेखाने मारण्याचा पूरेपूर प्रयत्न केला. हे सगळं आठवायचं कारण म्हणजे बाहुबलीला नुकताच जाहीर झालेला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार.

एकट्या बाईने प्रवास करण्याआधी करण्याची मनाची आणि सामानाची तयारी -

मला हे लिहिण्याची उबळ का आली हे निश्चितपणे सांगता येईल. सांगावं का नाही असा प्रश्न आहे. कदाचित प्रतिसादांमधून त्याची उत्तरं देण्याची उबळ उचकीसारखी येईल आणि मग थांबता येणार नाही.

लेखनाचं स्वरुप स्त्रियांसाठी टिप्स असं आहे. अर्थातच ऐसी अक्षरे हे संस्थळ फक्त स्त्रियांसाठी नसल्यामुळे (आणि एकट्या बाईबद्दल धागा असल्यामुळे) पुरुष सदस्य/न-सदस्य हा धागा वाचणारच; त्यांना त्या टिपांमागचा तर्क अर्थातच समजणार नाही आणि मग पकाऊ प्रश्नोत्तरं होणार. ते टाळण्यासाठी आणि वाचक स्त्रियांचं मनोरंजन करत त्यांना 'पुरुषांना विचार कसा करता येत नाही' याची उदाहरणं देण्यासाठी टिपांमागची स्पष्टीकरणं दिलेली आहेत.

डोसा ऑम्लेट

बीजे मेडीकल कॉलेजात असताना एकंदर ४ ऑफिशियल अन एक अनॉफिशियल कँटीन्स होती. होस्टेल कँटीन अन कॉलेज कँपसच्या दरम्यान सेंट्रल बिल्डिंगच्या कॉर्नरला जे आहे (अजूनही असेल कदाचित. तिथे पादचारी पूल झालाय रस्ता ओलांडायला) ते अनऑफिशियल सेंट्रल कँटीन. हे नुस्तंच टिपिकल इराणी हॉटेल होतं, पण आमची इतकं पोरं पडीक असत, की जणू कँटीनच असावं.

आवडलेली व्यंग्यचित्रे/वेब कॉमिक्स - १

आपल्याला आवडलेल्या व्यंग्यचित्रांना इथे शेअर करा. कोणत्याही भाषेत असले तरी चालतील. वाटल्यास अनुवाद करु शकता.

टिपः कृपया मीम (meme) लींकू नका.

सेलेब्रेटीची आत्महत्या

Taxonomy upgrade extras

प्रत्युष्या बॅनर्जीच्या आत्महत्याच्या चर्चेत एका ब्रेकअप झालेल्या सेलेब्रेटीची आत्महत्या असाही सुर आहे. पण ब्रेकअप हे फक्त एकच कारण नाहीये, अनेक कारणांपैकी ते एक कारण असू शकते. प्रत्युश्याकडे फक्त एक सेलेब्रेटी म्हणून न बघता आत्ताच्या तरूण पिढीची एक प्रतिनिधी म्हणून ही बघावे लागेल आपल्याला.