Skip to main content

ही बातमी समजली का? - ८३

http://www.technologyreview.com/news/539131/india-loves-moocs/

How does a talented Indian teenager like Gaurav Goyal make his mark on the world? Ordinarily, his destiny would have been set on the morning in 2008 when he took his country’s toughest college placement exam: the IIT Joint Entrance Exam. More than 300,000 students attempted the test that year; only 8,652 qualified for a spot at one of the ultra-elite Indian Institutes of Technology.

पॉर्नबॅन आणि गजेंद्र चौहान - खरा अर्थ

नुकताच ऐसी अक्षरे या संस्थळावर स्वघोषित विचारजंत श्री. चिंतातुर जंतू यांनी 'पॉर्नबॅन आणि गजेंद्र चौहान - एक अन्वयार्थ' हा मोदीद्वेषाने ठासून भरलेला लेख वाचनात आला. एफटीआयआय या संस्थेच्या संचालकपदी थोर कलावंत श्री. गजेंद्र चौहान यांची नेमणूक झाल्यापासून वामपंथीयांनी मोदींचा तेजोभंग करण्यासाठी आपल्या डाव्या हाताने विडाच उचलला आहे. तीच अफजलखानी परंपरा चालवत श्री. जंतू यांनीही आपल्या लेखणीला भलतेसलते अन्वयार्थ काढायला भाग पाडलेलं आहे. ते पाहून मला याविरुद्ध आवाज उठवला पाहिजेच असं कळकळीने वाटायला लागलं. तेव्हा माननीय पंतप्रधान श्री.

पॉर्न बॅन आणि गजेंद्र चौहान - एक अन्वयार्थ

Khuli Khidki

कधीकधी काय होतं की घटना सुट्या सुट्या घडत असतात त्यावेळी त्यांचं ‘बिग पिक्चर’ आपल्याला दिसत नाही. किंवा, असं ‘बिग पिक्चर’ पाहण्याचा मक्ता केवळ पूर्वग्रहदूषित मानवतावादी, विवेकवादी, आधुनिक, अपरंपरावादी, नास्तिक वगैरे विचारजंतांकडे आहे असं लोकांना वाटत असतं. पण एखाद्या सुदिनी मात्र वास्तवाचा नवा अन्वयार्थ वगैरे आम्हा पामरांना पण लागू शकतो. आज सकाळच्या दोन बातम्या वाचून माझं असंच झालं.

शौचालयाबद्दलची मानसिकता

एका सर्वेक्षणानुसार जगभर वापरात असलेल्या आताच्या (भारतीयांचे स्क्वॉटिंगच्या वा कमोडच्या) फ्लश टाइप संडास रचनेत सुधारणा करण्यास भरपूर वाव आहे. आपल्यासाऱख्या शहरी मध्यमवर्गीयांना आताच्या फ्लश टॉयलेटमध्ये काही उणीवा असू शकतील असे वाटत नाही. 1880 सालापासून त्या वापरात असून गेली सव्वाशे वर्षे त्यातील प्रत्येक पार्ट न पार्ट मधील डिझाइनमध्ये सुधारणा होत होत आता त्याचे optimization झालेले असावे.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

भयकथा - शिकारी साखळी

(कथा वाचण्यापूर्वी एक निवेदन - ही कथा मी पूर्वी लिहिलेल्या शिकारी रात्र या कथेची सुधारीत आवृत्ती आहे. कथा कशी वाटली याबद्दल आपल्या प्रतिक्रिया कळवा फक्त प्रतिक्रिया पूर्वग्रहदूषित नसाव्या ही माफक अपेक्षा!)
***
मध्यरात्र उलटून गेलेली असते.
वातावरणात खूप थंडी असते.
एक बैलगाडी गावाबाहेरच्या निर्मनुष्य मैदानातून चंद्राच्या उजेडात गावाकडे जात असते.
अचानक दोन्ही बैलाच्या मधोमध एक भयप्रद कुत्रा येतो आणि गाडीच्या खाली सरकतो आणि दोन्ही चाकांच्या मधोमध चालायला लागतो.

बरोबर बैलांच्या वेगात वेग मिसळून तो चालतो.
बैलगाडी हाकणारा (नंदू) बैलगाडीवर बसलेल्या दुसर्‍या माणसाला (हरी) म्हणतो,

ललित लेखनाचा प्रकार

याकूबला फाशी

याकूबला शेवटी फाशी दिलीच. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचेही शेवटपर्यंत एकमत होत नव्हते. हाच न्याय पंजाब, तमिळनाडूतील आरोपींना लावला गेला नाही. राजकीय पाठिंबा नसल्याने शेवटी याकूब गेलाच.

असो लोकसत्ताचा अग्रलेख आवडला. एकंदरीत टायगर आणि दाऊद ह्या मुख्य जबाबदार व्यक्तींच्या कृत्याची शिक्षा याकूबला झाली अशी भावना हा लेख वाचूून झाली आहे. असंगाशी संग प्राणाशी गाठ या म्हणीचा चोख प्रत्यय या घटनेतून येतो. बाकी देशभक्तांचा उन्माद बघवत नाही. अनेकांना शिक्षेच्या अंमलबजावणीनंतर समाधानही वाटले आहे. असो.

गुरुदत्त - तीन अंकी शोकांतिका : अरुण खोपकर

Gurudutt Cover Page

अरुण खोपकरांचं गुरुदत्त - तीन अंकी शोकांतिका हे पुस्तक अनेक वर्षं अनुपलब्ध होतं. अखेर त्याची नवी आणि देखणी आवृत्ती उपलब्ध झाली आहे. त्या निमित्तानं जुन्या आवृत्तीचा मी दिलेला परिचय पुन्हा प्रकाशित करतो आहे -

समीक्षेचा विषय निवडा

सर्प दंश - दोन लघु कथा

महाराज या विषारी नागाने आपल्या राज्यातल्या अनेक नागरिकांचे प्राण घेतले आहे. सैनिकानी त्याला पकडले आहे. महाराज आज्ञा करावी, विषारी नागाचे काय करायचे. राजाने आज्ञा दिली, यात विचार कसला, ठेचुन टाका त्याला. सैनिकानी तत्काल त्या नागाला ठेचुन ठार केले.

दुसरी कथा:

महाराज या विषारी नागाने आपल्या राज्यातल्या नागरिकांचे प्राण घेतले आहे. सैनिकानी त्याला पकडले आहे. महाराज आज्ञा करावी, विषारी नागाचे काय करायचे. राजाने आपल्या मंत्र्याना या बाबत त्यांच्या सल्ला मागितला.

ललित लेखनाचा प्रकार