Skip to main content

बासरीचे गुपित

नित्य हरिचे अधरामृत
सेवन तू करिशी
भाग्यवंत तू बासरी
अभागी राधा मी बावरी

काय तप केले?
कोण पुण्य संपादिले?
मज सांगी तू बासरी
विनवी राधा मी बावरी

अहं भुसा टाकूनी
पोकळ जाहले
ऐक राधे गे साजणी
गुपित सांगतसे बासरी

- देवदत्त परुळेकर

एक लेखक - एक वाचक!

आमच्या ‘वाचकघर’च्या एका मिटींगचा विषय होता -- ‘माझा आवडता पुरूष लेखक’. त्यानिमित्ताने मिलिंद बोकीलांच्या सर्व पुस्तकांचे एकत्रित वाचन अन अभ्यासच झाला तेव्हा!
सुरूवातीला ‘दुर्ग’, ‘एकम’ ह्या दिवाळी अंकांतील मिलिंद बोकीलांच्या कलाकृतींतून त्यांची ओळख झाली. ते लिखाण आवडले अन मग झपाटल्यासारखी त्यांची इतर पुस्तके वाचली गेली.‘शाळा’ तेव्हा नुकतीच प्रकाशित झाली होती. अन ती वाचावी की नाही, आपल्याला ती कितपत रुचेल अशा संभ्रमात होते.

समीक्षेचा विषय निवडा

अनुभव-कथन...

चार बायका एकत्र जमल्या की काय करतात..... एक स्वानुभव!

नोव्हेंबर ’०९ महिन्याच्या ‘वाचकघर’चा विषय होता ‘माझा आवडता पुरूष लेखक’. आधीपासून ठरवूनही निम्म्याजणी काहीही तयारी न करता आल्या. पण ख्रर्‍याखुर्‍या वाचक असल्याने आपल्या स्मरणशक्तीच्या आधारे आवडत्या पुरूष लेखकाविषयी भरभरून बोलल्या.

राधिका व. पु. काळेंविषयी तर हर्षदा पु .ल. देशपांडे ह्यांच्या दोन पुस्तकांविषयी बोलली. ‘एक शून्य मी’ आणि ‘दाद’ ह्या दोन पुस्तकांच्या वाचनाने आपली मराठी भाषेची जाण समृध्द झाली हे हर्षदाने आवर्जून सांगितले.

पैज – प्रेम दिन स्पेशल

आज १४ फेब्रुवारी- प्रेम दिवस - कॉलेजातील पोरांचा एक घोळका आशाळभूत नजरेने येणाऱ्या पोरीं कडे पाहत होता. पण कुठलीही पोरगी त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नव्हती. तेवढ्यात ती कॉलेज सुंदरी त्यांना दिसली. तिला पाहून त्यांचे चेहरे उजळले. त्यातला एक म्हणाला म्हणाला आपण सर्व तिच्या वर फिदा आहोत, आज प्रेम दिवस आहे. हिम्मत असेल तर आपल्या पैकी कुणी तिला I love you म्हणून दाखवावे. जर तिनी त्याला आपल्या हातानी नुसता स्पर्श ही केला तर १००० रुपयांची पैज तो जिंकेल. काही वेळ शांतता राहिली. सहजा-सहजी बळीचा बकरा कोण बनणार? स्वत:ची शोभा कोण करायला तैयार होणार? पण काही विचार करून त्याने पैज स्वीकारली.

हलकेच जाग मज आली

रात्री विरहाच्या कळा पांघरून येतात, डोळ्यांत तुझ्या संदेशांच्या चाहुलींची वलयं उमलू लागतात. देहभान आसपास मिसळत जाते, आठवणींचे जन्म वेदनांचे वंश बेगुमान वाढवतात. त्यांनासुद्धा उभ्या रकान्यात बसवता येते म्हणे. मला ते कळणे अवघड होते. लोलकाच्या विकीरणाला सात रंगात सोयीपुरतं भागता येतं, मला तो सलगच पट्टा वाटतो, एकाच मोठ्या वारंवारतेचा. ह्या सलग वेदनाच मला लपेटून जाताना, माणसांना वेगळं करणाऱ्या पडद्यांचे लांबून पाहिलेले कड बुबुळाला स्पर्शु लागले. आता उठतोय, स्वप्नं-बाहेरचं मंद ऊन अशा मिश्रणापुढे निष्प्रभ होता होता.
तुझा एकेक शब्द खरा आहे, आता स्पष्ट कळतंय.

फॅंड्री - जाता नाही जात ती...

(ह्यात सिनेमाची गोष्ट अजिबात सांगितलेली नाही; त्यामुळे कोणताही रहस्यभेद ह्यात नाही.)

समीक्षेचा विषय निवडा

बंडू नि दिगू

आपल्या वाढत्या वजनामुळे बंडू चिंतीत होता घरात बायकोसमोर तर ऑफिसात साहेबांसमोर वजन काही वाढत नव्हते पण शारीरिक वजन मात्र बंडूच्या कोणत्याही विरोधाला न जुमानता वाढतच होते. आता ह्या वजनाचे करायचे काय असा प्रश्न बंडूला पडला. काय करावे ह्या चिंतेत सदा बंडू राहू लागला. कुठल्यातरी वृत्तपत्रात बंडूने वाचले होते कि चिंता केल्याने वजन घटते. म्हणून बंडू हा सगळ्याच गोष्टीत चिंता करू लागला जपानमध्ये भूकंप झाला तर बंडू इथेच हादरु लागला.

भाषिक, प्रांतिक, जातीय, इ. इ. अस्मिता

Taxonomy upgrade extras

अवांतरात मोडेल पण एक किस्सा सांगितल्याशिवाय रहावत नाही.

स्थळः कोथरूडमधल्या एका डॉक्टरांच्या क्लिनिकची वेटिंग रूम. एक हुच्चभ्रू मध्यमवयीन मराठी महिला येते आणि शेजारच्या खुर्चीवर बसते. चेहेर्‍यावर चिंता करते विश्वाची छाप भाव. अचानक माझ्याकडे वळते:

हुममः मला एक सांगा...डॉक्टरांचं नाव करमाळकर आहे का करमळकर?
मी: (स्वगत) त्याने काय फरक पडतो, मावशी. औषध गिळा आणि गप पडा की. (प्रकट) काही कल्पना नाही.
हुममः विचारून घ्यायला पाहिजे त्यांना.
मी: (न रहावून) पण त्याने काय फरक पडतो?