Skip to main content

गणितज्ञांच्या अद्भुत कथा -7: कोनिग्सबर्गच्या पुलावरील परेड

आतापर्यंत होऊन गेलेल्या गणितज्ञांपैकी एक बहुआयामी, अत्यंत प्रतिभावान व्यक्ती म्हणून लिओन्हार्ड ऑयलर (1707-1783) या गणितज्ञाचे नाव सर्वात वरच्या क्रमांकावर असेल. दर वर्षी सुमारे 800 पानं लिहित आयुष्यभरात त्यांनी गणित विषयात सुमारे 500 अभ्यासपूर्ण ग्रंथांची भर घातली. सगळ्यात महत्वाचे म्हणजे वापरात असलेल्या गणितीय प्रमाणित संज्ञांसाठी इतर कुठल्याही गणितज्ञांपेक्षा त्याचे जास्त योगदान होते. जास्तीत जास्त दोन संज्ञा शोधणारे अनेक होते.

"बिंज् वॉचिंग" (Binge Watching)

Taxonomy upgrade extras

सर्वात आधी, "बिंज वॉचिंग" म्हणजे काय ? तर माझ्या समजुतीप्रमाणे, "बिंज" हा शब्द "अल्पावधीत अतिरिक्त सेवन करणं" अशा अर्थाने रूढार्थाने अस्तित्त्वात आहे. बहुतांशी तो एकेका रात्री दारूचे "खंबेच्या खंबे" पिण्याला किंवा "तुडुंब" भरून मेजवानी करण्याला वापरला जात होता/अजूनही वापरतात.

तर मग हे "बिंज वॉचिंग" म्हणजे काय तर, एखाद्या प्रदीर्घ मालिकेचे सर्वच्या सर्व भाग एकसलग बघणे. (किंवा, असं एकसलग बघून दोने-तीन सत्रांमधे त्या मालिकेचे अथपासून इतिपर्यंतचे भाग संपविणे!)

महागोफणीचा भीमटोला

तुम्हाला जर असा प्रश्न कोणी विचारला की आदिमानवाला गवसलेले पहिले असे प्राणघातक हत्यार कोणते की जे वापरून त्याला दूर अंतरावरून आणि त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त गतीने धावू शकणार्‍या, रानटी प्राण्यांची शिकार करणे किंवा स्वत:च्या मानवी शत्रूलाही दूर अंतरावरूनच ठार मारणे किंवा किमान पक्षी त्याला घातक प्रमाणातील शारिरिक इजा करणे शक्य झाले असावे? तर तुम्ही त्याचे काय उत्तर द्याल? खरे तर या प्रश्नाचे उत्तर अगदी सोपे आहे. हे हत्यार होते व आहे, शेतकरी शेताची राखण करत असताना वापरतात ती साधी गोफण!

धाग्याचा प्रकार निवडा:

चिं. त्र्यं. खानोलकर - "गणुराया" आणि "चानी"

चि.त्र्यं. खानोलकर, "गणुराया" आणि "चानी"
मौज प्रकाशन, मुंबई, प्रकाशन वर्ष १९??

समीक्षेचा विषय निवडा

ठाणे कट्ट्याचा वृत्तान्त

स्मार्ट दिसण्याच्या क्षणभंगुर मोहापायी खादीचं जाकीट चढवलं, तेव्हाच या कट्ट्याचा वृत्तान्त सादर करण्याचं गोड झेंगट आपल्या गळ्यात येऊन पडणार याबद्दल नियती पूर्वसंकेत देते आहे हे मला कळायला हरकत नव्हती. पण स्वखुशीनं पत्करलेल्या स्थानिक यजमानपदाच्या उत्साहात गर्क असताना, गुर्जींनी माझी बकरी कधी केली ते माझ्या नजरेतून निसटलं. मग शहाण्या आणि अभ्यासू मुलासारखे फोटू काढणं, एका जागी जमवणं, फेसबुकावर डकवणं आणि अक्षम्य उशीर होण्याआत वृत्तान्ताची डेडलाईन गाठणं आलंच.

हाक

गावची नदी येते स्वप्नात
स्वप्नात नदीला पूर असतो आलेला
स्वप्नात समुद्रासारख्या उसळतात नदीच्या लाटा
वार्‍यानं घरंगळत जाते मी
पण पडत नाही पाण्यात नदी बेफाम हाका मारत असताना

स्वप्नात गावातल्या
खचलेल्या रस्त्यांना पडतात भूकंप झाल्यागत भेगा
त्या भेगेत जाऊन पडते सायकलरीक्षा
ज्यात बसलेय मी आणि चालवतोय एक लहान मुलगा
पण वाचतो आम्ही दोघंही, फक्त वाहन गायब होतं

स्वप्नात गावचं घर दिसतं
घरासमोरच्या मैदानात निजलेय मी उघड्यावर
आणि दोन आडदांड पाहून दचकते
ओरडते तर निघतच नाही घशातून आवाज
हाक मारू पाहतेय... बाबा... बाबा... बाबा...

भाषांतरकाराचे कार्य (अनुवादित)

मूळ जर्मन लेखक: वॉल्टर बेन्जॅमिन (१९२३)
इंग्रजी भाषांतर - "द ट्रान्स्लेटर्स टास्क": स्टीवेन रॅन्डल (१९९७)

(हे मराठी भाषांतर इंग्रजी भाषांतरावरून केले आहे.)

ऱ्हायनो सिझन

पिफमधल्या आवडलेल्या काही चित्रपटांपैकी एक ऱ्हायनो सिझन. इराणच्या कट्टर इस्लामिक राजवटीमधे एका कवीला आणि त्याच्या बायकोला ब्लास्फेमीच्या आरोपाखाली वेगवेगळ्या तुरुंगात टाकलं जातं, ३० वर्षानंतर सुटल्यावर बायकोचा शोध घेणाऱ्या कवीची हि कथा.

समीक्षेचा विषय निवडा