Skip to main content

भविष्य दर्शन

अनेकांना दिवसा डुलक्या काढायची सवय असते . कामावर असताना अशा डुलक्या काढताना बॉस ने पाहिले तर महागात पडू शकते . इतकेच नव्हे तर गाडी चालवत असताना येणाऱ्या डुलक्या प्राणघातक अपघातास निमंत्रण देवू शकतात .

पण हीच डुलकी तुम्हाला भविष्यात घडणार्या घटनांचे प्रतिबिंब देखील दाखवू शकते . नुकत्याच अमेरिकेतील एका संशोधनात सुमारे ८०,००० लोकांचे अनुभव नोंदवण्यात आले। त्यापैकी सुमारे ६०% लोकांनी डुलकी म्हणजेच microsleep च्या काही सेकंदात पुढे काही दिवसात घडणार्या घटनातील काही अंश पाहिल्याचे सांगितले .

विसरून जाण्याचे वय

माझी इयत्ता तिसरीत असलेली नात रोज स्कूल बसने शाळेत जाते. तिच्याच वर्गात असलेल्या काही मुली सुद्धा या बसच्या फेरीत तिच्या बरोबरच्या रोजच्या सहप्रवासी असतात. ती शाळेतून घरी परत आली की तिच्या त्या वेळच्या मूड वरून त्या दिवशी ती आणि तिच्या बसमधल्या मैत्रिणी यांच्यामध्ये भांडणे झाली असतील? का त्या गळ्यात गळा घालून बसल्या असतील? याचा सहज अंदाज बांधता येतो.

सांत्वन

रात्र जरी वैर्याची असली
आस रविकीरणांची आहे|
लाख दुख्खे अंतरी पण
हास्य तर चेहरावर आहे|
क्षितिज आहे दूर जरीही
तो किनारा दूर नाही|
जिंकण्या चे दैव नाही
झुंज़ तर स्मरणीय आहे|

विनायक अनिखींडी

४) Autism - निदानानंतर..

याआधी: ऑटिझम | कसं वागावं? | लक्षणे |

Developmental Pediatrician तुम्हाला तुमच्या गोड बाळाच्या थोड्या वेगळ्या वागण्याचे निदान 'स्वमग्नता' असे करतो तो नक्कीच पालकांच्या आयुष्यातील सोप्पा क्षण नसतो. पण हे सुद्धा खरे आहे कि बर्याचदा त्या वेळेस पालकांना काहीएक कल्पना नसते आपले पुढचे आयुष्य कसे असणार आहे?

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

अकबराचा मोबाईल हरवतो

अकबराचा मोबाईल हरवतो

नेहमीप्रमाणे अकबर बादशाह दरबारात बसला होता. इतर सारे दरबारी आपाअपल्या खुर्च्यांवर बसले होते. दरबाराचे कामकाज चालू होते. नविन टॅक्स सिस्टीम कशी राबवायची, रेपो रेट कमी करायचा का नाही, आधार कार्ड स्कीम बंद करून नविन आयडेंटी कार्ड लागू करावे काय, अनुदानातले गॅस सिलेंडर, अभिनेत्री करूना कपुर हिला पद्मश्री पुरस्कार आदी बरेच विषय चर्चेला होते. एका दिवसात हे सारे विषय काही संपणारे नव्हते हे बादशाहाला अन बाकीच्या दरबार्‍यांनाही सवयीने माहीत झाले असल्याने टंगळमंगळ, विनोद करत चर्चा चालू होती.

दोन चित्रपट

काही घटना आणि त्यांना चिकटलेले चित्रपट. कधीतरी चित्त लावून पाहिलेली चित्रे घटनांना समांतर हलकीच मनावर उतरतात कधी ​आपणच सगळं कोरं मन घेऊन त्यांच्याकडे जातो. तिथं आठवणी, विचार आणि त्यातून डोळ्यापुढच्या दृश्यात एकाग्र व्हायला मागणारे मन, सरत असणारा काळ यांच्यात कसलेसे ताण निर्माण होतात, आंखोमें नमी येते. उमटणाऱ्या हरेक तरंगांना शब्दांच्या चिमटीत धरता येत नाही, पण काहीतरी विलक्षण असते ते मांडावेसे वाटते.

सडा :​ Tree of life

गुंडाळलेली पाईप उलगडत, नळाला तिचे टोक बसवण्याची धडपड करून अंगण ​भिजवून मुमर झालेल्या मातीला शांतवत असता मनातला फुफाटासुद्धा गार होतो.

३) Autism - लक्षणे व Evaluation.

पहिल्या लेखात ओझरता उल्लेख येऊन गेलाच आहे पण या लेखात Autismची लक्षणे खोलात पाहू.

खालील चित्र हे दोन वेगळ्या चित्रांपासून एकत्र केलेले आहे. या लिखाणासाठी मी मराठीमध्ये भाषांतरीत केले आहे( यथाशक्ती).

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

कातरवेळ - १

दुपार जरा कलंडली आणि इतक्यावेळ उन्हाने गपगार पडलेली वळचणीची पाखरे किलबिलाट करू लागली. पलंगावर बसून भिंतीला टेकून बसल्याने पाठीला चांगलीच रग लागली होती. पाखरांच्या आवाजाने तिची तंद्री मोडली. दोन्ही पायाला घातलेले हाताचे विळखे तिने हळुवार सोडले आणि मान भीतीला टेकवून खिडकीकडे पहिले. हळूच खिडकीच्या उंबरा ओलांडून एक धिटुकल पाखरू आता आलं, मान वेळावून त्याने सगळीकडे पाहून घेतलं, चोचीने तिथलच काहीतरी उचललं, थोडावेळ खिडकीच्या गजाच्या आत-बाहेर केलं, तेवढ्यात वारयाने पडदा हलला. तेवढूश्या हालचालीने पाखरू केवढ्याने दचकले आणि भुर्क्कन खिडकीबाहेर उडून गेलं. त्याची ती लगबग बघून तिला हसू आल...वाटल..