ब्लॉगीचे श्लोक
ब्लॉगाधीश जो ईश सर्वांगुणांचा।
मुळारंभ आरंभ संशोधणाचा।
नमूं नटवरा मूळ चौफेर चर्चा।
धंदा खरा हा महामानवांचा।।1।।
मना सज्जना ब्लॉगपंथेचि जावें।
तरी अंतरी खाजवितो स्वभावें।
जनी निंद्य तें सर्व ओतूनि द्यावे।
जनी वंद्य तें सर्व फुल्यां घालावें।।2।।
प्रभाते मनीं ब्लॉग चिंतीत जावा।
पुढें वैखरीं ब्लॉग आधीं वदावा।।
अनाचार हा बौद्धिक सोडूं नये तो।
जनीं तोचि तो मानवी धन्य होतो।।3।।
विनातर्क संदर्भ कामास ये रे।
मना सर्वदा फक्त बुध्दी नको रे।।
मनासी उगा नीति सांगू नको हो।
मना अंतरीं विचार अतिसार राहो।।4।।
मना सत्यसंकल्प विसरूनि जावा।
मना विकृतेतिहास पुन्हा वदावा।।
- Read more about ब्लॉगीचे श्लोक
- 4 comments
- Log in or register to post comments
- 4958 views
होतकरू फेस्बुकीसाठी विद्वता-प्रसिद्धी-तंत्र: (प्रथमच गाईड-रूपात)
विद्वान म्हणवून घेण्यासाठी सनातन विसाव्या शतकापर्येंत ज्ञानार्जन आणि इतर पारंपारिक परिश्रम घेणे अपरिहार्य होते. एकविसाव्या शतकातील पुरोगामी भासमान विश्वातही विद्वान म्हणवून घेणे ही देखील वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. अनेक विद्वानांना महा सामाजिक जालावर नावारूपाला आणल्यानंतर "फाटे कोचिंग क्लासेस"ने आपल्या अथक संशोधनातून गरीब होतकरू विद्वानांसाठी ही अभिनव कार्यपद्धती विकसित केली आहे. गरजूंनी तिचा लाभ घ्यावा आणि आपआपल्या विद्वत्तेचे चाँद फेसबुक वर कलेकलेने वृद्धिंगत करावे. भांडवल म्हणून एक फेसबुक अकाऊंट असणे आणि चार-दोन मित्र असणे आवश्यक आहे.
- Read more about होतकरू फेस्बुकीसाठी विद्वता-प्रसिद्धी-तंत्र: (प्रथमच गाईड-रूपात)
- 8 comments
- Log in or register to post comments
- 7561 views
" बया आज माझी नसे वात द्याया - " (विडंबन)
.
(चाल : प्रिया आज माझी नसे साथ द्याया -)
बया आज माझी नसे वात द्याया
असो बंद डोळे मिटो पापण्या या..
नको गाणी आता जरा झोपतो मी
सुरांची तिच्या आज ती हूल नाही
बयेवीण ना त्रास होईल आता..
किती छान म्हटले तरी त्रास होतो
जरी कान बंदी तरी बोल येतो
शिरा त्या गळ्याच्या फुगाव्या किती त्या..
न भांडी धुवाया, न कामा उशीर
कसा आज हातास येईल जोर
मुखी यातना रात्र जागेल गाया..
किती आठवू मी अशा भांडणांसी
पुरे लाटण्यावीण शब्दांस खाशी
कशाला उभी ती मनीं महामाया.. !
.
- Read more about " बया आज माझी नसे वात द्याया - " (विडंबन)
- 6 comments
- Log in or register to post comments
- 6231 views
' बाळूचे स्वप्न - '
सशाने धरले सिँहाचे कान
गरगर फिरवून मोडली मान ।
शेळीने घेतला लांडग्याचा चावा
लांडगा ओरडला-धावा धावा ।
मुंगीची ऐकून डरकाळी कानात
हत्ती घाबरून पळाला रानात ।
कासवाने लावली हरणाशी शर्यत
हरीण दमले धापा टाकत ।
उंदराने बोक्याच्या पकडून मिशा
काढायला लावल्या दहा उठाबशा ।
बाळूने मोजले दोन सात चार
स्वप्नात बाळू मोजून बेजार !
.
- Read more about ' बाळूचे स्वप्न - '
- 9 comments
- Log in or register to post comments
- 7551 views
" आम्ही वारकरी, निघालो पंढरपुरी - "
आम्ही वारकरी, निघालो पंढरपुरी
हाती टाळ, चिपळ्या, वीणा, एकतारी ..
भाळावरी गंध, विठ्ठलनाम छंद
विठ्ठलस्मरणांत होतो सारे धुंद ..
तुळशीवृंदावनाचा डोईवर ना भार
पेलतो विठ्ठल आमचा हा संसार ..
भक्त सारे गुंग मुखात अभंग
भजनात रंग कीर्तनात दंग ..
जातीभेदा वारीत नाही हो थारा
विठ्ठलभावाचा एक सर्वास निवारा ..
उच्चनीच नाही, नाही रावरंक
सर्वांनाच मोही विठ्ठलनाम एक ..
"विठ्ठल विठ्ठल"- गर्जता शिस्तीत
दिंडीला येई जोर, वाडीवस्तीत ..
बाल-वृद्ध चालता चालता वारीत
विठ्ठलाचा जयघोष मुखाने करीत ..
रिंगणात नाचूया, विठ्ठल विठ्ठल
या रे सारे गाऊ, विठ्ठल विठ्ठल ..
- Read more about " आम्ही वारकरी, निघालो पंढरपुरी - "
- Log in or register to post comments
- 2506 views
भाषिकाचे दौर्बल्य की भाषेचे स्वतःचे दौर्बल्य?
मनुष्य स्वतःशी आणि इतर जगाशी भाषेतून संवाद साधतो. या भाषांची लौकिक रुपे त्यांच्या आदर्श रुपांपासून फार दूर आहेत. भाषेचे/भाषेत (दोन्हीपैकी काय उचित आहे?) किती प्रकारचे दोष आहेत यांची यादी बनवणे अवघड आहे. मनुष्याला न गवसलेल्या विश्वातल्या कितीतरी सत्यांचं हे त्याच्यापासूनचं अंतर कदाचित फक्त भाषेमुळे निर्माण झाले असेल. भावनांचे मनात/मनाबाहेर प्रकटीकरण करणे यासाठी कदाचित भाषेची गरज नसेलच. मग ते भाषेत केले तर अतिशय अपूर्ण असेल.
धाग्याचा प्रकार निवडा:
- Read more about भाषिकाचे दौर्बल्य की भाषेचे स्वतःचे दौर्बल्य?
- 90 comments
- Log in or register to post comments
- 73915 views
राघवजी प्रकरणामुळे उपस्थित प्रश्न - कोणता बलात्कार 'नैसर्गिक'?
राघवजी या मध्य प्रदेशच्या माजी अर्थमंत्र्यांविरोधात त्यांच्या नोकराने केलेल्या तक्रारीनंतर त्यांना अटक झाली आणि भाजपमधील स्थान गमवावे लागले. या केसच्या निमित्ताने भारतीय दंडविधानातील बलात्काराविषयीच्या तरतुदींतील एक त्रुटी पुन्हा एकदा दृष्टीस येते आहे.
- Read more about राघवजी प्रकरणामुळे उपस्थित प्रश्न - कोणता बलात्कार 'नैसर्गिक'?
- 7 comments
- Log in or register to post comments
- 8230 views
महाभारत युद्धामागील राजकीय समीकरणे
Taxonomy upgrade extras
हस्तिनापूरचे राज्य हे तसे छोटेसेच. या एवढ्याश्या राज्याच्या वाटणीवरून जे युद्ध झाले, ते मात्र एवढे विराट. त्यात तात्कालीन भारतवर्षातील जवळ जवळ सर्व राजे आपापल्या सैन्यासह लढायला आले. वस्तुत: हा तंटा एकाच कुलातील दोन शाखांचा असताना दूर-दूरच्या राजांना त्यात काय स्वारस्थ्य होते? या युद्धातून त्यांचा काही लाभ होण्यासारखा होता का? त्यातील काही राजांनी दुर्योधनाची बाजू घेतली, तर काहींनी युधिष्ठिराची. यामागे त्यांची काय भूमिका होती? त्यात काही राजकीय समीकरणे होती का? या प्रश्नांचा मागोवा घेण्याचा हा एक प्रयत्न.
* * * * *
- Read more about महाभारत युद्धामागील राजकीय समीकरणे
- 23 comments
- Log in or register to post comments
- 18017 views
छायाचित्रण पाक्षिक-आव्हान २३: एकाकी
या वेळेची कथावस्तू* (थीम) आहे "एकाकी".
एकाकी पडलेले मुल. एकाकी स्त्री. गर्दीत असुनही एकटा जाणवणारा इसम. जंगलात असुन एकटे पडलेले झाड. असे काहिही. छायाचित्र कोणत्याही सजीव/निर्जीव विषयाशी निगडीत असु शकते. पण त्या विषयाचा एकाकीपणा हा जाणवला पाहिजे.
चला तर मग!
- Read more about छायाचित्रण पाक्षिक-आव्हान २३: एकाकी
- 61 comments
- Log in or register to post comments
- 46926 views
बिन लादेन रिपोर्ट
बिन लादेनच्या लपण्याच्या जागेवर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर ह्य सर्व गोष्टीची तपासणी करून अहवाल देण्यासाठी पाकिस्तान सरकारने एक कमिशन नेमले होते. त्या कमिशनचा ३००+ पानांचा अहवाल अल-जझीराच्या संस्थळावर www.aljazeera.com येथे वाचण्यासाठी/उतरवून घेण्यासाठी उपलब्ध झाला आहे.
'युद्धस्य कथा रम्या:' म्हणून कोणास तो वाचायची इच्छा असल्यास तेथे जावे असे सुचवितो.
- Read more about बिन लादेन रिपोर्ट
- 4 comments
- Log in or register to post comments
- 4133 views