Skip to main content

"वटपौर्णीमा

Taxonomy upgrade extras

मी 'लीव इन रिलेशनशिप " मधे रहाणारी एक तरुणी आहे माझी हि पहिलिच "वटपौर्णीमा "आहे

मी हे व्रत कसे साजरे करु>?? सभासद मार्ग दर्शन करतिल का मला??

चारधामच्या निमित्ताने

चारधाम यात्रा करावी का नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. सध्या भयानक आपत्तीमुळे चारधाम, विशेषतः केदारनाथ गाजते आहे. पण या लेखाचा विषय तो नाही. मी जेंव्हा चारधामांना भेट दिली त्याचे सचित्र प्रवासवर्णन करण्याचाही या लेखाचा हेतू नाही. तर एकंदरीतच, जे अनुभव आले त्यातून आपल्याला काही बोध घेता येतो का, याविषयी हा लेख आहे.

गरजवंताच्या नशिबाचे तरंगणे.

गरजवंताच्या नशिबाचे तरंगणे.

आयुष्यात दोन गोष्टी एकदा शिकल्या की त्या आपण कधीच विसरत नाही. त्या म्हणजे सायकल चालवणे आणि पोहणे. तरुण वयात या दोन्हीची क्रेझ असते. पहिली गोष्ट आवडीतून गरजेत कधी रूपांतरित होते हे कळतच नाही पण दुसरी गोष्ट गरज बनावी अशी काही परिस्थिती अजूनतरी पुण्यात नाही.
आता जेव्हा पूर्वी पानशेत धरण फुटले होते तेव्हा लोकांनी घरातील वाहून गेलेलं सामान (गरज म्हणून) पोहत पोहत जाऊन पकडून आणले होते प्लस वाहून गेलेल्या लोकांना शोधण्याच्या मदतकार्यात हि ते (गरज म्हणून) होते हा भाग वेगळा.

कोणती प्रतिमा सजीव वाटते?

खाली दिलेली दोन पोर्ट्रेटस प्रसिद्ध सरोदवाद्क विश्वजित रॉयचौधरी (पंडित मल्लिकार्जुन मन्सुर यांचे शिष्य) यांच्या मी पुण्यात काढलेल्या एका पोर्ट्रटच्या दोन वेगवेगळ्या आवृत्त्या आहेत.

कॅमेरात असलेल्या evaluative metering या प्रकारात प्रतिमा फ्लॅट होते आणि त्यामुळे निर्जीव वाटते. प्रतिमेच्या वेगवेगळ्या भागात प्रकाशाच्या तीव्रतेची सरासरी काढून मग सरासरी तीव्रता ठरते आणि कॅमेरा एक्सपोजर सुचवतो. Centre weighted meteringला काही मर्यादा पडतात. विशेषत: प्रतिमेचा मुख्य विषय स्थिर नसेल तर Centre weighted metering वापरणे जरा किचकट ठरते.

छायाचित्रण पाक्षिक-आव्हान २२: यंत्र

या वेळचा विषय आहे "यंत्र". मानवनिर्मित यंत्रांची चित्रे येथे दिसावी, अशी विषय देतानाची अपेक्षा आहे.

यंत्रे म्हटली म्हणजे उपयुक्तता हा प्राथमिक हेतू असतो. परंतु यंत्र बनवणार्‍याची सौंदर्यदृष्टी म्हणा, किंवा यंत्राच्या अभियांत्रिकीसाठी काही विवक्षित संमिती (सिमेट्री) लागत असल्यामुळे म्हणा, कित्येक यंत्रे सुंदरही असतात. कधीकधी बघणार्‍याच्या परिप्रेक्ष्यामुळे, कॅमेर्‍याच्या चौकटीतल्या निवडीमुळे, किंवा यंत्राच्या परिसराशी होणार्‍या संदर्भामुळे एक कथानक निर्माण होऊ शकते.

अशी यंत्रांची चित्रे आपण येथे बघूया!

-----

स्पर्धा का इतर?

अनावृत काफिऱ

तुझे शुभ्र, संयत शुकवस्त्र
पाघळतं, विरघळतं
विभ्रमाचा प्रारब्ध तेवढा गतिमान करत ठेवतं
सत्य अन्शा अन्शाने प्रकट होत जातं
आणि माझ्यातला मी मात्र
अनायासेच तू कभिन्न करून ठेचलायस

खिन्न प्रणयाचा सारीपाट
घडी करुन परत आत सारलाय
तुझ्या अमर्त्य अमृताशी एक मर्त्य क्लेश
कायमचा बांधला गेलाय
नुकत्याच कोरड्या केलेल्या मज्जारज्जूंनी

माझ्या किरमिजी बेटावरची
तुझ्या आत्मलिंपणाची नक्षी
पांथस्त सूर्योदयाची

सुबक विप्रलब्ध आविष्कार
अलिखीत उन्मीलीत समाधीकडे नेतो
आणि तू आपल्या करूणेचे उन्माद
शिताफीनं शेवटपर्यंत झेलत राहातेस

ह्रदयंगम अकृत्रिम स्नेहाचा सांजशकून मात्र

प्रोडक्ट

'मी' नावाच्या 'प्रोडक्ट'ला,
धारदार एकाकीपणाचं वेष्टण आहे,
त्यातला जिन्नस 'एक्सपायर' होत नाही,
जोवर तुम्ही ते 'रैपर' 'स्क्रेच' करत नाही,
'लकी ड्रॊ' सुद्दा आहे त्यात एक,
ज्याच्या 'विनर'ला काहीच गवसणार नाही,
माहीत आहे?

तरीही कापू म्हणतो हा 'टेट्रापेक' एकदाचा,
पाहीन तरी,
किती 'प्रिझर्वेटीव्हज' आहेत
किती 'न्यूट्रियंट्स' आहेत
अथवा उगाच,
नुसताच आपला बुडबुडा भरलेला असायचा

एरर इन क्वालिटी कंट्रोल
ऎबनोर्मल डिसट्रीब्यूशन

मार्केट मधे मात्र पोकळ डब्यांनाच चलती आहे,
नुसता चकचकीत, गुलाबी असला तरी चालेल,
चालेलच हे प्रोडक्ट

सिलीकोन भरलेली,
टंच,
आधीची,

मास्लोचा पिरेमिड

मास्लोचा पिरेमिड माणसाच्या गरजांची उतरन्ड दाखवतो. जशा एकावर एक रचालेल्या विटा. प्रत्येक विटेची गरज खालची वीट. आधी जिवंत राहण्यासाठीच्या गरजा. मग प्रेम-बिम, सामाजिक गरज. त्यावर बनतात मान्यता, प्रतिष्ठा, प्रसिद्धी. आणि शेवटी म्हणे आत्मभान येत. त्यामुळे म्हणे बहुतेक जण खालच्या विटा बनून राहतात. कारण त्यांना वरची पायरी गाठताच येत नाही कधी. आणि जसजसे माणसाला काही मिळत जाते तस तसे म्हणे त्याला आणखी हवे. अस अगदी शेवट होई पर्येन्त तो पायर्‍या चढायचा प्रयत्न करत राहतो. पण शेवटी अत्युच्च बिंदू सुद्धा एक त्रिकोण आहे, आतल्या आत. त्यात रुतत जाणे, आकसत जाणे हा आपल्या जीवनाचा ध्येयवाद असतो म्हणे.