Submitted by सचिन काळे on सोमवार, 19/06/2017 - 18:40
मला बऱ्याच वाचकांकडून मी जुन्या मुंबईचे लिहिलेले वर्णन कोणत्या सालातील आहे, याची विचारणा होत होती. मी आपणांस सांगू इच्छितो, की हे सर्व वर्णन अंदाजे १९७५-७७ सालाच्या दरम्यानचे आहे.
हे सांगण्याकरिता मी मूळ धाग्यावर उत्साहाने प्रतिसाद लिहावयास सुरवात केली. पण माझा प्रतिसादच एवढा मोठा झाला, की मला त्याचा हा पुरवणी धागा काढण्याचा विचार करावा लागला.
त्या कोपऱ्यात बसून मी अवघ्या ५५ पैशात साधा डोसा आणि त्याबरोबर एक्स्ट्रा चार्ज न लावता मिळणारी चटणी चक्क पाच सहा वाट्या चापलेली आहे.
Submitted by सचिन काळे on रविवार, 18/06/2017 - 12:56
माझी बालपणीची पंचवीसएक वर्षे मुंबईत गेली. आता नोकरी आणि वास्तव्य उपनगरात असल्याने वाट वाकडी करून मुंबईत जाणे सहसा होत नाही. बऱ्याच वर्षांनी काल सकाळी काही कामानिमित्त कुर्ला ते कफ परेड येथे बसने दीड दोन तासाचा प्रवास करणे झाले. प्रवास मेनरोडवर सायन, दादर, भायखळा, सीएसटी असा सरळसोट होता. बसचा लांबचा प्रवास असल्याने मी मस्त खिडकितली जागा पटकावली होती.
Submitted by भांबड on रविवार, 11/06/2017 - 11:28
पुर्वलक्षीप्रभावानं (prejudice) जे लेखन येतं त्यावर लिहीणार्याला बर्यापैकी ऊत्तरे देणं भाग पडतं. पण लिहीता वेळेसची तिव्रता अशी काही असते की, मी तर म्हणतो की भाड मे गयी दुनिया...पण कधीकधी तिव्रता ओसरल्यावर थोडी mystake झाल्याची जाणिव होते, अन् one stroke मध्ये आठवलेलं आणि लिहीलेलं edit करायला मात्र जिवावर येतं. तसंच ह्याचंही आहे. पुर्वप्रकाशित आहे माझ्या blog वर.
एक fantasy होती यार…
Submitted by अवंती on शुक्रवार, 09/06/2017 - 23:02
Submitted by anant_yaatree on गुरुवार, 08/06/2017 - 09:39
"द टेम्पेस्ट –(झंझावात)".
=================
भाषाप्रभू शेक्सपिअरच्या साहित्यिक कारकिर्दीतले त्याचं (बहुधा) हे शेवटचं नाटक.
त्याच्या इतर प्रत्येक कलाकृती सारखंच - मानवी जीवनाची व्यामिश्रता अन सद्-असद भाव-भावनांचे कंगोरे अलगद उलगडून दाखवणारं.
त्याची प्रत्येक कलाकृती त्रिपुरीच्या दीपमाळेसारखी उजळलेली,भुरळ घालणारी.
त्या दीपमाळेतला मला भुरळ घालणारा एक छोटासा दीप म्हणजे हे “यक्ष”गान.
Submitted by सचिन काळे on गुरुवार, 01/06/2017 - 20:26
दोन दिवसांपूर्वीच मुंबईत हळूहळू पावसाला सुरुवात झालीय. घामाची चिकचिक आणि उन्हाने त्रस्त झालेल्यांचा, आता पावसाचे आगमन होणार याची नांदी मिळाल्याने जीव सुखावला आहे. पावसाच्या सरी पडलेल्या पाहून मला तर आनंदाने नाचावासे वाटू लागले, आणि मी फेसबुकवर पोस्टसुद्धा टाकली. "पाऊस आया!!!.....एssss पावसामें नाचोssss!!!!...... ढिंगचॅक्! ढिंगचॅक्!! ढिंगचॅक्!!!......." मोराला आपला पिसारा फुलवून पावसात नाचताना जेवढा आनंद होत असेल तेवढाच मलाही पहिल्या पावसात भिजताना आनंद होतो.
Submitted by अवंती on सोमवार, 29/05/2017 - 16:36
Submitted by सचिन काळे on रविवार, 28/05/2017 - 09:29
पावसाच्या वर्षावात न्हायला सर्वांनाच आवडतं. पण मी तुम्हाला आता एक असा खरा घडलेला प्रसंग सांगणार आहे, ज्यात अशा एका गोष्टीच्या वर्षावात काही जणांना न्हायचा योग आला होता, ज्याची कोणी स्वप्नातसुद्धा कल्पना करू शकणार नाही.
Submitted by अवंती on गुरुवार, 25/05/2017 - 01:04
Submitted by निमिष सोनार on सोमवार, 22/05/2017 - 17:17
तुम्ही संवेदनशील आणि भिडस्त आहात?
तुम्हीं शांत स्वभावाचे आणि मितभाषी आहात?
सालस आणि आज्ञाधारक आहात?
आणि त्यासाठी तुमचे कौतुक होत आहे?
तर मग आजच सावध व्हा!
ते कौतुक यासाठी आहे की तुम्ही तसेच सद्गुणाचे पुतळे राहावे म्हणजे जग तुमचे शोषण करू शकेल!
पाने