Skip to main content

करोना

श्री कोरोनाविजय कथामृत (१) - जानेवारी २०२१

Taxonomy upgrade extras

ऐका महाराजा आपल्या कोरोनाविजयाची कथा.. जे हेत्ते काळाचे ठायी..

करोनाव्हायरस आणि प्रतिकारशक्ती – डॉ. विनीता बाळ (भाग २)

लस दिल्यानंतर शरीरात काय व्हायला हवं? लस मिळालेल्या लोकांकडून संसर्ग कमी होतो का? हर्ड इम्युनिटी कधी येईल का? यासारख्या प्रश्नांची उत्तरं देत आहेत ज्येष्ठ इम्युनॉलॉजिस्ट डॉ. विनीता बाळ.

कोव्हिड लसींची परिणामकारकता - डॉ. प्रमोद चाफळकर

लसींची परिणामकारकता म्हणजे किती टक्के लोकांना कोव्हिड-१९ होऊ शकतो असा त्याचा अर्थ नाही. हॉस्पिटलमध्ये दाखल व्हायला लागू नये आणि मृत्यू होऊ नये एवढीच लसींची उद्दिष्टे आहेत. लस घेऊन हॉस्पिटल आणि मृत्यू टळला तरी सौम्य कोव्हिड-१९ होऊ शकतो. आणि ती व्यक्ती व्हायरस पसरवू शकते. त्यामुळे लस घेतल्यावरही फेसमास्क लावणे आणि सोशल डिस्टंटन्सिंग पाळणे आवश्यक आहे.

दुसऱ्या लाटेच्या निमित्ताने

महाराष्ट्रात कोरोना महासाथीचा ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात कहर चालू होता. ऑक्टोबरपासून हळू हळू सगळं ओसरत चाललं होतं . डिसेंबर अखेरीला दररोज नवीन बाधित रोग्यांची संख्या आटोक्यात आल्यासारखं चित्र दिसत होतं.

जानेवारीत सार्वत्रिक लसीकरणाची सुरुवात झाली आणि महासाथीच्यासंदर्भात सकारात्मक वातावरण निर्माण झालं होतं. पण आता महासाथ पुन्हा जोराने उसळून आलेली दिसते.

पुण्यात तर फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात फक्त दीडशे-दोनशे नवीन बाधित असत. आज चार पाच आठवड्यांच्या नंतर हाच आकडा हळू हळू वाढून दीडशेवरून ४५००च्या घरात गेला आहे.

लसविषयक शंकानिरसन आणि चर्चा

लसविषयक माहितीचा महापूर जरी सध्या आला असला तरी समाजात / लोकांच्या मनात अजूनही अनेक किंतु-परंतु आहेत. त्यांपैकी काहींचा परामर्ष घेत आहेत अवधूत बापट आणि मिलिंद पदकी.

महाराष्ट्रातील करोना : साथनियंत्रण व लसीकरण - डॉ. प्रदीप आवटे

डॉ. प्रदीप आवटे महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्पात (Integrated Disease Surveillance Program उर्फ IDSP) सर्वेक्षण अधिकारी आहेत. सध्या चालू असलेल्या लसीकरणाबाबत आणि एकंदर महासाथीच्या प्रवासाबाबत त्यांनी 'ऐसी अक्षरे'ला मुलाखत दिली.

सार्वजनिक आरोग्यव्यवस्था आणि लसीकरण यंत्रणा - डॉ. मधुसूदन कर्नाटकी

आपल्या खंडप्राय देशात कोरोनाचे लसीकरण कसे होणार अशी शंका बऱ्याच लोकांच्या मनात येते. परंतु आपण यापूर्वीही मोठे लसीकरण कार्यक्रम यशस्वीपणे पार पडले आहेत आणि कोरोना लसीकरण कार्यक्रमही तसाच यशस्वी होईल यात शंका नाही. लोकांच्या मनात असलेला किंतु दूर व्हावा याकरिता महाराष्ट्र राज्याच्या आरोग्यसेवेचे माजी सहसंचालक डॉ मधुसूदन कर्नाटकी यांचा हा लेख.

बखर....कोरोनाची (भाग ८)

आज आपण सर्व एका महत्त्वाच्या 'ट्रान्झिशन टाइम' मध्ये आहोत.

म्हणजे असं, की आत्ता जे घडत आहे ते आपल्या सगळ्यांकरता एका प्रकारचं 'once in a lifetime' घटना आहेत.

माझ्या वडिलांच्या पिढीने कदाचित दुसऱ्या महायुद्धाच्या परिणाम वाचले, बघितले आणि क्वचित भोगले असतील.
आजोबांच्या पिढीने कदाचित प्लेग बघितला असेल त्याचे परिणाम भोगले असतील.

पण अर्थातच हे सर्व जागतिकीकरणपूर्व काळातील आहे.
आणि त्यामुळे मर्यादित भागात परिणाम करणारं.
पण आज जे घडताना दिसतंय ते सर्वदूर आणि दूरगामी परिणाम करणारं आहे असं वाटतंय.

कोरोना लस - mRNA तंत्रज्ञान

mRNA ह्या प्रकारची लस म्हणजे काय? ती कशी तयार करतात? ही लस अपायकारक तर नाही ना? सांगताहेत सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ योगिनी लेले.

कोरोना लस - तीन विचारप्रवाह

मूळच्या पुण्याच्या आणि आता सिडनीवासी असलेल्या योगिनी लेले यांनी सूक्ष्मजीवशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे व त्याच क्षेत्रात काम करतात. लशीविषयी काही रोचक माहिती देणारी एक लेखमाला त्या 'ऐसी अक्षरे'साठी लिहीत आहेत. त्यातील हा पहिला भाग.