अर्थकारण

बुलेट ट्रेन (भाग ४) : तैवान आणि श्रीलंका

बुलेट ट्रेन प्रकल्पात इतर देशांनी आपल्याला फसवले आहे का? की आपणच आपली फसगत करून घेऊन एक पांढरा हत्ती आपल्या पुढील पिढ्यांच्या गळ्यात मारला आहे? जर हा प्रकल्प सुरु झालाच आहे तर मग आता आपण पुढे काय करू शकतो? या प्रश्नांची उत्तरे देण्यापूर्वी वाहतुकीसंबंधीच्या तीन महाकाय प्रकल्पांबद्दल मी काय वाचले आहे ते चौथ्या आणि पाचव्या भागात प्रथम सांगतो आणि मग सहाव्या भागात वरील प्रश्नांची उत्तरे देऊन ही लेखमाला संपवतो.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

बुलेट ट्रेन (भाग ३) शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरो गेज, स्टॅंडर्ड गेज, ब्रॉडगेज

ज्याला जगभरात बुलेट ट्रेन म्हणतात त्याला जपानमध्ये शिन्कान्सेन म्हणतात. शिन्कान्सेन या जपानी शब्दाचा इंग्रजीत शब्दशः अर्थ होतो New Trunk Line. आपण मराठीत त्याला म्हणूया 'नवी रेल्वे लाईन'. यातलं बाकीचं सगळं नंतर बघूया पण 'नवी' या शब्दात जपानमधल्या या प्रकल्पाचे कारण दडले आहे. ही जर नवी रेल्वे लाईन आहे तर जुनी रेल्वे लाईन असणारंच. आणि कुठल्या ना कुठल्या कारणाने जपानी लोकांना नवी रेल्वे लाईन चालू करावीशी वाटले असणार. काय होती ती कारणं? आणि नवी रेल्वे लाईन आल्यावर जपानमधली जुनी रेल्वे लाईन बंद झाली का?

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

बुलेट ट्रेन (भाग २) प्रकल्पाचे लाभार्थी

बुलेट ट्रेनवरच्या लेखमालेच्या पहिल्या भागात ताजमहाल आणि हूवर धरण याची तुलना करून बुलेट ट्रेन प्रकल्पापुढील आव्हाने मांडायचा प्रयत्न केला होता.

मुख्य मुद्दा एकंच होता. ताजमहाल संपूर्ण सल्तनतीच्या गोळा करून ठेवलेल्या करातून बनला आणि जेव्हा त्यामुळे सल्तनतीचा खजिन्यात ठणठणाट झाला तेव्हा पुढील सम्राट औरंगझेबाला संपूर्ण सल्तनतीकडून नवीन जाचक कर वसूल करावे लागले. आग्र्याची भरभराट झाली नाही ते तर सोडाच पण संपूर्ण सल्तनतीतील प्रजा अजूनच दुबळी आणि असंतुष्ट झाली.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

बुलेट ट्रेन (भाग १) ताजमहाल आणि हूवर धरण

अकबराचा थोरला मुलगा जहांगीर म्हणजे मुघल- ए- आझम या चित्रपटातला सलीम, मुघल साम्राज्याचा सम्राट असूनही अफूच्या आहारी गेला होता. त्याच्यानंतर त्याचा तिसरा मुलगा खुर्रम, आपल्या धाकट्या भावाला (शहर्यारला) हटवून मुघल सल्तनतीचा सम्राट बनला. त्याला आपण ओळखतो ते शहाजहान म्हणून. मुमताजमहालचा नवरा आणि औरंगझेबाचा बाप असलेल्या शहाजहानने १६३२ मध्ये ताजमहाल बांधायचा निर्णय घेतला. १६५३ मध्ये काम पूर्ण झाले. २०,००० लोकांनी २२ वर्षे काम करून जगातील सात आश्चर्यांपैकी एक आश्चर्य यमुनेच्या तीरावर वसवले.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

फाय‌नान्स‌, प्रोजेक्ट‌ फाय‌नान्स‌, अकाउटिंग‌, बॅंकिंग, इ इ संबंधित‌ प्र‌श्न: भाग‌ -१

या धाग्यावर अकाउंटींग, कॉर्पोरेट फायनान्स, प्रोजेक्ट फायनान्स, बँकींग, इन्वेस्टमेंट बँकिंग, टॅक्सेशन, इन्शुरन्स, इंटरनॅशल फफायनान्स, इंटरनॅशनल ट्रेड, स्टॉक्स, डेरिवेटिवज, ऑडिट, कंपनी सेक्रेतरियल वर्क्स, काँट्रॅक्ट्स, स्टार्ट्प, इ इ बिझनेस रिलेटेड प्रश्न विचारावेत. शुद्ध पर्सनल फायनान्स आणि शुद्ध इकॉनॉमिक्स वरचे प्रश्न टाळलेले बरे. क्रमांक दिलेले बरे.

सुरुवातीला मी इथे दोन प्रश्न देत आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

GSTच्या निमित्ताने : वस्तूंचा जीवनक्रम

Taxonomy upgrade extras: 

GSTच्या निमित्ताने ज्या चर्चा चालू आहेत त्या ऐकताना मनात काही प्रश्न आले. त्याचा संबंध प्रत्यक्ष वस्तू आणि सेवा कराशी नाही तर वस्तूंच्या जीवनक्रमाशी (life cycle) आहे. एखादी वस्तू उत्पादित होते तेव्हापासून ते तिच्या ग्राहकाच्या हाती पडते इथपर्यंतचा प्रवास अनेक टप्प्यांत होतो. ती वस्तू आणि तिच्याशी संबंधित प्रत्येक व्यवहार सरकारच्या म्हणजे कराच्या जाळ्यात अडकावेत अशी यंत्रणेची इच्छा असते, तर संबंधित व्यक्तींचे हितसंबंध पाहता तसं होऊ नये अशी किमान काही जणांची तरी इच्छा / अपेक्षा असणार.

जीएसटी : शिम‌गा आणि क‌वित्व‌?

Taxonomy upgrade extras: 

जीएसटीवरील चर्चा लांबल्याने वेगळ्या धाग्यात हलवली आहे.

स‌ंस्थ‌ळाबाब‌त‌ आक‌डेमोड‌ - २

१०० जोर्दार‌ लेख‌क‌.

ऐसीव‌र‌च्या एकूण‌ ७ ह‌जार‌ लेखांपैकी कोण‌ आहेत‌ टॉप‌ लेख‌क‌?
हे घ्या. काही नाव‌ं अनपेक्षित‌ अस‌तील‌ त‌र‌ काही अपेक्षित‌. ब‌घा तुम्हीच‌.
(शुचीमामींचे सग‌ळे आय‌डी ह्यात‌ कुठेकुठे अस‌तील‌, ते एक‌त्र‌ क‌र‌ण‌ं माझ्या अवाक्यात‌ल‌ं काम‌ नाही, सॉरी!)
राकु - ह्यांनी तुफान‌ लेख‌न केल‌ंय‌ तेही इव‌ल्याश्या काळात‌. ते अधिक‌ काळ‌ राहिले अस‌ते त‌र‌ .. लोल‌.
ग‌ब्ब‌र‌ सिंगांच‌ं लेखन‌ ब‌हुतेक‌ "ही बात‌मी स‌म‌ज‌ली का" मुळे असावा असा सौश‌य‌ आहे.
मिलिंद‌भौंच्या क‌विता आणि काही एकोळी धागे अस‌ले त‌री नो स‌र‌प्राईज‌.

माहितीमधल्या टर्म्स: 

मोहीम - १ पॅम्प्लेट्स इन्सर्शन

माझ्यासाठी ५.०० एएम म्हणजे लेट नाईट असते बर्‍याचदा पण अर्ली मॉर्निंग कधीच नाही. तरीही ह्या पंचपंचऊ:षकाले अ‍ॅक्टीव्हाला किका मारुन वैतागलोय. बटनस्टार्ट तर होतच नाहीये, किक अ‍ॅणि स्टॅन्डमधला फरकही कळत नाही. स्वतःची नेहमीची बाईक देऊन मागून घेतलीय मित्राची अ‍ॅक्टीव्हा. कारणही तसेच. धंदा हो. दुसरे काय. इन्सर्शन्स टाकायचेत एक लाखभर.
.........................

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

पुरोगाम्यांचा अस्सल विजय

पुरोगाम्यांचा अस्सल विजय हा कायदेशीर रित्या विषमता निर्माण करणे हा आहे.

http://timesofindia.indiatimes.com/business/india-business/indias-rising...
महत्त्वाचा भाग :
The study, released by rights group Oxfam ahead of the World Economic Forum (WEF) annual meeting here attended by rich and powerful from across the world, showed that just 57 billionaires in India now have same wealth ($ 216 billion) as that of the bottom 70 per cent population of the country.
===========
ही बातमी सनातन प्रभात मधली नाही.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

पाने

Subscribe to RSS - अर्थकारण